होममेड चॉकलेट

Submitted by वर्षा_म on 15 September, 2011 - 02:47
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१] व्हाईट चॉकलेट स्लॅब
२] मिल्क चॉकलेट स्लॅब
३] डार्क चॉकलेट स्लॅब

फिलींगसाठी आवडीनुसार ड्रायफ्रुटस , मध , वेफर , राईस बॉल ( बाजारात मिळतात )

चॉकलेट मोल्ड , चॉकलेट रॅपर.

01.jpg02.jpg021.jpg022.jpg

क्रमवार पाककृती: 

03.jpg04.jpg05.jpgलेयर चॉकलेट
१] १२५ ग्रॅम व्हाईट चॉकलेटचे छोटे छोटे तुकडे करुन मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा. (नंतर गरज पडली तर १० सेकंदाच्या अंतराने ठेवा.)

२] चांगले घोटुन साच्यांमधे अर्धा साचा भरेल असे ओता. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ). यामुळे हवेचे बबल असतील तर निघुन जातील.

३] फ्रीजरमधे साचा ठेवा. ( साधारण मिनीटा दोन मिनीटात सेट होते )

४] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

५] घोटुन आधी व्हाईटाचॉकलेट टाकलेल्या साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).

६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.

७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा.

८] रॅपरच्या भानगडीत न पडता मटकवा Happy

बदाम चॉकलेट

१] प्रत्येक बदामाला बत्त्याने एक ठोसा द्या. ( मिक्सरने हा इफेक्ट येत नाही )

२] मावेमधे रोस्ट करुन घ्या. थंड होउ द्या.

३] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

४] रोस्टेड बदाम आणि वितळलेले चॉकलेट नीट मिक्स करा.

५] साच्यांमधे पुर्ण भरा. ओटॅवर साचा हलकेच आदळा ( टॅप करा ).

६] फ्रीजरमधे १५ मिनीटासाठी ठेवा.

७] बाहेर काढुन ताटामधे साचा उलटा करुन हलकेच टॅप करा. चॉकलेट तयार. रॅप करा किंवा तसेच ठेवा.

071.jpg072.jpgचॉकलेट बाउल

१] १०० ग्रॅम मिल्क चॉकलेट आणि २५ ग्रॅम डार्क चॉकलेटचे तुकडे करा. मावेमधे ४० % पॉवरवर २ मिनीट ( दर ३० सेकंदाने हलवत ) चॉकलेट वितळेपर्यंत गरम करा.

२] एका स्टीलच्या वाटित मिश्रण ओता. हलकेच वाटी गोल फिरवत आतल्या बाजुला युनीफॉर्म लागेल अशा पध्दतीने वाटी फिरवत रहा. थंड झाले की फ्रीजरमधे १ तास ठेवा.

३] हलकेच टॅप करुन चॉकलेटची वाटी काढा.

08.jpg081.jpg082.jpg

वाढणी/प्रमाण: 
भरपुर
अधिक टिपा: 

चॉकलेट स्लॅब तिन प्रकारात उपलब्ध आहेत. मी मोर्डे कंपनीचे वापरते. त्यावर किंमत लिहीलेली नसते. दुकाणदार फसवनुक करतात. म्हणुन खाली साधारण किंमत दिली आहे)
१] व्हाईट चॉकलेट ५०० ग्रॅम ( १२० रुपये )
२] मिल्क चॉकलेट ५०० ग्रॅम (११० रुपये )
३] डार्क चॉकलेट ५०० ग्रॅम ( ११० रुपये )

१] चॉकलेट धुण्यासाठी गरम पाणी वापरु नका. मोल्ड वितळतो ( स्वानुभव Proud )
२] सुरवातीला डीझाईनचे मोल्ड वापरुन चॉकलेट करताना मजा येते. नंतर ते कंटाळवाने आणि वेळखाउ काम वाटाते. म्हणुन कॅटाबरी , किटकॅटच्या आकाराचे मोल्ड आणले तर वेळ वाचतो. आणि पटापट तुकडे करुन चॉकलेट मटकवता येतात.
३] मावे नसेल तर डबल बॉयलर पध्दतीने चॉकलेट वितळुन घेता येते. एका मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेउन त्यात चॉकलेट घातलेले छोटे भांडे अलगद वर बसेल असे ठेवावे. पाण्याच्या वाफेवर चॉकलेट वितळणे अपेक्षीत आहे.
४] सगळ्यात महत्वाचे हे सगळे करताना चॉकलेटला पाणी लागु देउ नका. नक्की कशा प्रकारे खराब होते त्याचा अनुभव नाही Happy
५]तयार चॉकलेट फ्रीजरमधे न ठेवता फ्रीजमधे ठेवावे. (उन्हाळ्याशीवाय फ्रीज बाहेरही नीट रहातात.)
६]फिलींगची चॉकलेट करायचे असेल तर साच्याला सगळीकडुन चॉकलेटचा लेयर देउन फ्रीजरमधे १-२ मिनीट ठेवल्यावर फिलींग टाकुन वरुन मेल्टेड चॉकलेट टाकावे आणी १५ मिनीट फ्रीजरमधे ठेवावे.
७]काल मोर्डेचे डार्क चॉकलेट दुकानात अ‍ॅवेलेबल नव्हते. त्याने दुसर्‍या कंपनीचे दिले. त्यावर किंमत १८५ होती. मला ९५ ला दिले. ( म्हणजे लेबलवर जाउ नका. फोटोत कंपनीचे नाव स्पष्ट दिसन नाही. मी उद्या लिहीते).
८] वेगवेगळे ड्रायफ्रुटस, वेफर, राईस बॉल्स वापरुन ट्राय केले. पण माझ्या घरी सगळ्यात जास्त लेयर चॉकलेट आणि बदाम चॉकलेटच आवडले.
९]चॉकलेट मोल्ड नसेल तर आईस ट्रे वापरु शकता. नाहीतर सरळ छोट्या ताटलीत मोठे चॉकलेट करुन हाताने तुकडे करायचे Proud
१०]वाटी प्रत्येकवेळी जमेलच असे नाही. नाहीच जमली तर पुन्हा वितळायच्या भानगडीत पडु नये. तसेच खाउन संपवावी. माझी २ वेळा जमली. पण काल करताना क्रॅक घेला Sad
११] चॉकलेट स्लॅब, साचे, रॅपर कुठे मिळतात? >> पुण्यामधे मंडईजवळ नॅशनल टी डेपो आणि त्याच्या जवळपासची २-३ दुकाने. कोथरुडमधे प्रतिज्ञा हॉलच्या रोडवर पाटाणकर खाउअवालेंच्या दुकानाजवळ एक ड्रायफ्रुटचे दुकान आहे त्यांच्याकडे असतो. सहसा ड्रायफ्रुटसच्या मोठ्या दुकानात.

माहितीचा स्रोत: 
१५ मिनीटाचा बेसिक कुकीग क्लास आणि माझे प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच्...इंट्रेस्टींग आणि टेम्प्टींग्...चॉकलेट ग्लास साठी संजिव कपूर ने प्लास्टीकच्या ग्लासेस मधे करायची युक्ती सांगितली होती. आधीच ग्लासला थोडा कट मारुन घ्यायचा आणि बाकी तुमच्या पद्धतीनेच करुन बाहेरचा ग्लास सोडवून घ्यायचा. सहज आठवलं म्हणून नमुद केलं.

जाम पेशन्स च काम दिसतय पण.. >> चॉकलेट करायला नाही लागत जास्त पेशन्स. आणि साचे न वापरता आईस ट्रे ( किंवा डायरेक्ट ताटली ) वापरले तर ५ मिनीट करायला आणि फ्रिजरमधे १० मिनीट.

मग फोटूत इतकी कमी कशीयेत???? >>> बाकीची संपली Proud

आधीच ग्लासला थोडा कट मारुन घ्यायचा आणि बाकी तुमच्या पद्धतीनेच करुन बाहेरचा ग्लास सोडवून घ्यायचा. सहज आठवलं म्हणून नमुद केलं. >> हे खरच सोपं पडेल आणि फसण्याचे चांसेसही कमी. पुढच्यावेळी नक्की ट्राय करणार Happy

वर्षे भारीय हे ,

पण माझी एक शंका ...
हे चॉकलेटच्या लाद्या आणून त्यांना आकार द्यायचा प्रकार आहे ना ?

चॉकलेटच्या लाद्या आणून त्यांना आकार द्यायचा प्रकार आहे ना ? >> हो पण आपल्याला हवे ते फिलींग , कॉम्बीनेशन करता येते.

हे फारच भारी आहे. धन्यचवाद पायरी पायरीने दिल्याबद्दल.
इतकं लिहिलं आहेस, तरी अजून एक प्रश्न आहेच- ह्या चॉकलेट स्लॅब कुठे मिळतात?

पौर्णिमा आणी चिउताई तुमच्या प्रश्नांची उत्तर वर टाकलेय आत्ताच Happy

बेसीक चॉकलेटची पण कृती देणार का? चॉकलेटच्या लाद्या बर्‍याच महाग दिसतात? >> अनघा मी पुर्वी बेसीक चॉकलेट मी पुर्वी केले होते. कोको पावडर , लोणी वगैरे वापरुन. पण मला तरी तेव्हडे जमले नसावे ( चव ठीक होती ). पण किमतीचा आणि चवीचाही विचार करता स्लॅबचे परवडते असे मला तरी वाटले.

तुम्ही फक्त व्हाईट चॉकलेट ट्राय करु शकता. किंवा डार्क चॉकलेट न वापरता नुसते मिल्क चॉकलेटही चालेल. आणी नाहीच जमले काही तर नुसता स्लॅबपण मस्त लागतो Happy

यम्म्मी रेसेपी/आयडीया. मस्त!
जमण्यासारखी नाही म्हणुन नुसती बघुन समाधान मानुन घेतेय.. कधी करण्याची हिंमत झालीच तर इथे लिहीन. Happy

मस्त प्रकार.
सहज म्हणून लिहितो, चॉकलेट जरी फ्रान्स, स्विस मधली जगप्रसिद्ध असली तरी त्यासाठी लागणारा बहुतेक कोको आफ्रिकेतील घाना, नायजेरिया या देशातच पिकतो. तिथेही स्थानिक पात़ळीवर उत्तम चॉकलेट्स तयार केली जातात. खास करुन घानाचे डार्क चॉकलेट खुपच छान लागते. तरी तिथला उत्तम प्रतिचा कोको मात्र परदेशीच पाठवला जातो.
स्थानिक लोक कोकोच्या बिया नूसत्याही खातात, पण त्याला केवळ तूपकट चव लागते. (मी खाल्ल्यात) या मळ्यात जास्त करुन बुर्किना फासो (हो या नावाचा देश आहे) मधली लहान मूले राबतात.
कोकोचे मूळ स्थान मात्र दक्षिण अमेरिका आहे. तिथे मिरचीपूड घालून चॉकलेट करतात.

वर्षा-- सॉरी.. रहावलं नही.

नुसता स्लॅबपण मस्त लागतो>>>>>>>>> अगदी.. सुरुवातीला मी अगदी हौसेने साचे ओळखीच्यांकडुन आणुन वगैरे केली होती अशी चॉकलेट्स.. पण आता स्लॅब्स आणल्या तर बहुधा तसाच संपवुन टाकेन Happy

लहान मुलांना गिफ्ट म्हणुन द्यायला वगैरे हा प्रकार सहीच...

मी अशी चॉकलेट नेहेमी करते. सेट होण्यासाठी फ्रीजरमधे ८.५ ते ९ मिनीटे ठेवली तर तयार चॉकलेट फ्रीजमधे ठेवायची गरज नाही. हवाबन्द डब्यात छान रहातात. फक्त सॉफ्ट आणि लिक्विड सेन्टरवाली फ्रीजमधे ठेवा
SELBOURNE स्लॅब वापरा, क्वालीटी सगळ्यात चान्गली असते.

धन्स दिपा SELBOURNE बद्दल एकले होते. पण किंमत खुप जास्त आणि क्वालीटी बद्दल माहीत नसल्याने घेतले नव्हते. आता नक्की ट्राय करणार. साधारन तिन्ही स्लॅबच्या किमती सांगु शकाल का? प्रत्येक दुकानदार वेगळी किंमत सांगतो.

कधी देत्येस? >> परवा केले होते. कालच संपले Proud

आता यंदा येताना तुझ्यासाठी चॉकलेट्स आणणर नाही >> आजिबात आणु नको माझ्यासाठी (पिटुकले) चॉकलेट्स. फक्त अर्धा-अर्धा किलोचे हे तिन इंपोर्टॅड स्लॅब आण Wink

मस्त

Yummy

Pages