चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या आठवड्यात टी.व्ही. वर जुना `अनुराधा' नावाचा (बलराज सहानी आणि लीला नायडू) सिनेमा पाहिला . गाणी सुरेख आहेत सर्वच. सिनेमाही आवडला. लीला नायडू आवडली फारच.
तसेच अजुन एक जुना सिनेमा `अफसाना' पाहिला थोडा . त्यात प्राण आणि अशोक कुमार ओळखू आले फक्त. कर्ज सिनेमा याचाच रिमेक आहे.

मुरांबा पाहिला नेटफ्लिक्स वर. अजिबात आवडला नाही. किती ते ब्रेकप वर चर्वितचर्वण.
ओव्हरअ‍ॅक्टींग बाय सचिन खेडेकर, अमेय वाघ, चिन्मयी सुमित..... संथ, रटाळ पूर्ण चित्रपट

#उलटाझेंडा

परवा झी क्लासिक वर "जय विक्रांता" नावाच्या एका चित्रपटाची सुरुवात बघायला मिळाली. चित्रपटाच्या सुरुवातीलाच संस्कारी आलोकनाथ ला शेतात विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल राज्य सरकारकडून "किसान शिरोमणी" Uhoh हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार म्हणजे एक मोठी ट्रॉफी असते जिच्यावर भारताचा झेंडा लावलेला असतो. आता गोम अशी आहे की राज्य सरकारकडून मिळालेल्या या ट्रॉफीवर भारताचा झेंडा चक्क उलटा लावला आहे. बरं.. तो झेंडा इतका उठून दिसतो (चांगला मोठा आहे साईझने) तर आपण एकदम चपापतोच. कॅमेरा टाळ्या वाजवायला आलेल्या पब्लिकच्या सगळ्यात शेवटच्या रांगेच्या मागून तो शॉट घेतो तरी उलटा झेंडा अगदी ठसठशीत दिसतो. मग हा ट्रॉफी घेऊन शेतात येतो तिथे मी मेल्यावर माझी माती होऊन या शेतीत मिसळू दे वगैरे डायलॉग्स टाकतो. पुन्हा ती ट्रॉफी अगदी क्लोजप शॉट मध्ये आपल्या शेतात काम करणाऱ्या लोकांना दाखवतो. (तिथेही कोणाच्याच लक्षात येत नाही की झेंडा उलटा आहे). मग त्याची बायको येते (रीमा लागू) नी त्याच्या उलटा झेंडा लावलेल्या ट्रॉफीकडे कौतुकाने बघते (पुन्हा ट्रॉफीचा क्लोजप). मग कश्याला मरणाच्या गोष्टी करता वगैरे लटका राग.

मला एक कळत नाही.. झेंडा उलटा लावला गेल्याचं कोणालाच कसं कळलं नाही / नसेल? कलाकारांना? प्रॉप वाल्यांना? कॅमेरामन? दिग्दर्शक? स्पॉटबॉय? चित्रीकरणात सहभागी असलेले इतर लोक? मी उगीच पूर्णवेळ त्या ट्रॉफीकडे बघत बसले होते या आशेने की कदाचित पुढच्या फ्रेममध्ये तरी कोणाच्यातरी लक्षात येऊन झेंडा सुलट केलेला असेल. बरं बाकीचे जाऊदेत.. नंतर चित्रपट एडिट करणार्याने सुदधा नोटीस केले नाही? केले असेल तर ट्रॉफीचा क्लोजप असलेले शॉट्स कापले नाहीत?

बहुतेक त्या काळी झेंड्याचा अपमान वगैरे नियम नसावेत किंवा लोक एवढे सजग नसावेत किंवा सोशल मीडिया नसल्याने हा मुव्ही बघायला गेलेले दोनपाच लोक वगळता कोणाला हे कळलेही नसावे. आजच्या काळात एखाद्या चित्रपटात हे झाले असते तर नक्की जास्त गवगवा झाला असता.

असो.. पुढे हा संस्कारी बाबूजी उर्फ आलोकनाथ रिमा लागुला विक्रांता कुठे आहे ते विचारतो. त्याच्या नावाने आपण काहीतरी सुरू केले आहे असे सांगतो. त्या दिवशी रक्षाबंधन आहे असा उल्लेख करतो (याचा रेफ मला काही कळला नाही. रक्षाबंधन आहे तर बापाला मुलाकडे काय काम आहे? बहुतेक आत्याच्या ताम्हणात घालायला ओवाळणी उसनी हवी असावी). तर त्यावर रीमा तो हिराला घेऊन गावातल्या जत्रेत गेला आहे असे सांगते. (कोणत्या गावात रक्षाबंधन च्या दिवशी जत्रा असते? Uhoh ) तर पुढच्या शॉटमध्ये एकदम गावची जत्रा दाखवली आहे. यात विक्रांता म्हणजे संजय दत्त आणि हिरा म्हणजे त्याचा कोंबडा जत्रेत कोंबड्याच्या फायटिंग स्पर्धेत पार्टीसीपेट करायला आलेले असतात.

संस्कारी आलोकनाथ च्या पोटी संजय दत्त आलेला पाहून आणि चित्रपटाच्या नावावरून या कोंबडेवाल्याची जय करणारा हा चित्रपट आहे हे जाणवून मी टीव्ही बंद करून टाकला.

पियू, तो झेंडा बनवतानाच हिरवा रंग वर व भगवा खाली असा बनवलाय. आपल्या देशात असे कोट्यवधी लोक असतील ज्यांना तिरंगा म्हणजे झेंडा हे कदाचित माहीतही असेल पण रंगांचा क्रम माहीत नसेल. आजच्या पिढीतल्या शालेय मुलांचे ज्ञान किती यावरच्या अहवालावर एक धागा इथेच आहे, त्यावरून ओळखा साक्षरता.

आणि ते रक्षाबंधन तुम्ही नीट ऐकले नाहीत, पुढचे वाक्य 'अच्छा तो वो झीनत के हातो राखी बंधवाने गया होगा' असे आहे. किती मोठा अर्थ आहे आधीच्या प्रश्नाला. विक्रांता काय चीज आहे हे एका वाक्यात इस्टेब्लिश होतं, उगीच 4 रिळे खर्ची पडत नाहीत.

थोडं अवांतर आहे तरीही
मधे दोनचार वेळा ब्रीद चं त्रेलर पाहिलेलं टीव्हीवर. आर माधवन आणि तो सुलतान मधला एक हॅन्ड्सम आहे त्यात Happy
नक्की काय आहे? चित्रपट की मालिका?
मालिका आहे तर टीव्हीवर आहे का?
अ‍ॅमेझॉन वर प्राईम मधे वॉच एपि १ असं दिसतंय. फक्त अ‍ॅमेझॉन प्राइमवरच आहे का?
फक्त माधवन (आणि जोडीला सुलतान मधला एक हॅन्ड्सम) आहे म्हणुन एवढ्या चवकश्या. Happy
आणी सस्पेन्स स्टोरी आहे हा ही भाग आहेच.

Amazon ची serial आहे, breath. बहुतेक खूप पॉप्युलर झाली तर एखादं चॅनेल दाखवायला लागेल, सध्या prime videos वर दाखवत आहेत. मी जो trailer पहिला त्यावरून माधवन च्या मुलाला कसलासा रोग / आजार आहे आणि बहुतेक एखादा अवयव रिप्लेसमेंट करणं गरजेचं आहे. त्यासाठी राघवन खून करतो. एक पोलीस अधिकारी खुन्याचा म्हणजे राघवन च्या1 मागावर आहे. Thriller कमी आणि emotional, sadustic drama जास्त वाटला, ट्रेलर वरुन.

थँक्स साधना..

आणि ते रक्षाबंधन तुम्ही नीट ऐकले नाहीत, पुढचे वाक्य 'अच्छा तो वो झीनत के हातो राखी बंधवाने गया होगा' असे आहे. किती मोठा अर्थ आहे आधीच्या प्रश्नाला. विक्रांता काय चीज आहे हे एका वाक्यात इस्टेब्लिश होतं, उगीच 4 रिळे खर्ची पडत नाहीत.

>> हे काही कळले नाही. यात काय इस्टेबलिश होतं? काय गहन अर्थ आहे?

खरंच की. Uhoh
थँक्स साधना आणि च्रप्स.

मधे दोनचार वेळा ब्रीद चं त्रेलर पाहिलेलं टीव्हीवर. आर माधवन आणि तो सुलतान मधला एक हॅन्ड्सम आहे त्यात Happy

दर शुक्रवारी एक भाग रिलिज होतो. ५ भाग प्राईम वर रिलिज झालेत.

The Post पाहिला गेल्या आठवड्यात. अतिशय उत्कृष्ट चित्रपट. टॉम हॅंक्स आणि मेरिल स्ट्रीप अक्षरशः जगले आहेत त्यांच्या भूमिका. कथेबद्दल मी अधिक काही लिहिण्यापेक्षा गिरीश कुबेर यांच्या सुंदर लेखाची लिंक देते Happy
https://www.loksatta.com/lekha-news/katharine-graham-steven-spielberg-me...

कधीतरी माणुस सुसायडल होतो आणि जी गोष्ट करायला नको होती वा टाळता येण्याजोगी होती ती करुन जातो असं काहीसं आज मी केलं..
रईस पाहिला..
तद्दन भिकारपट म्हणता येईल इतका भंगार पिच्चर.. शाहरुख सहन होईना झालाय त्यात. जरासा अतुल, थोडासा झिशान अय्युब्ब अन बर्‍यापैकी नवाजने तारलं नाही तर जीव जायला आला होता..
कधी कधी वाटत जीव जास्त झाला म्हणुन का इतक उदार व्हावं अन तब्बल अडीच तास सतत शाखाचं टॉर्चर सहन करावं.
ग्लोरीफिकेशन पर्यण्त कळेलही माणसाला पण डायलॉग एक आणि कामं दुसरे हिथुनच लॉजिक गंडलय तर पुढे काय बोलावं..
भिती याची वाटत होती कि नवाज निभावत असलेलं पात्र आपलं बेरींग सोडून त्या अतिमहाछपरी माणसासाठी दोन अश्रु गाळत कि काय पण धन्य कि अस काही झालं नाही.. फार कमी वेळा इतका पछतावा होतो मला एखादा पिच्चर पाहिला कि जसा आता जीवाचा तळतळाट होतोय..
का? का?

The house next door पहिला.. अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ, अन्द्रिया,अनिशा सगळ्यांची कामे ठीक. 1 time watch. नेफली वर आहे.

The Post माझा मिस झाला... Sad

त्या पद्मावतसाठी एका आठवड्यात थिएटर्समधून त्याची हकालपट्टी झाली. Angry

आज पद्मावत पाहिला.. बोर झाला मला..
खुप खुप सारे पिच्चर ढापाढापी झाली हे ठळक दिसुन आलं..
स्पॉयलर
हे सारेच्या सारे सतत डॉळ्यात पाणि घेऊन का वावरलेय.. अन किती त्या क्लोजअप मधे ठळक दिसलय सारं..
खिलजी क्रुर कमी आणि विक्रुत जास्त वाटला मला... आवाजही कधी कधी चिरका..
मेवाडचे राजाराणी सतत ते पण असं मधेमधे का बोलतात?
उर्दू कमी हिंदी जास्त वाटली.. आणि राणी पद्मावती जर श्रीलंकेची होती तर तिने सिंहली भाषा बोलायला हवी ना? (हकुना मटाटा टाईप्स Biggrin )
ती आल्यानंतर बडी राणीसासोबत तिचं वागणं फार रुड आणि अहंकारी वाटल..
शेवट तर निव्वळ वाया घालवलाय.. मधेच रंग बदलणारे दिपीकाचे घागरे कि ओढणी.. सतत लाल रंगात आणि क्लोज अप शॉट मधे एकदम राणी कलर/ गुलाबी.. मग परत लाल..
शेवटी खिलजी आत घुसतो तेव्हा सगळ्या बायका चुपचाप त्याला सामोरे जातात.. कवायती केल्याप्रमाणे अंगावर निखारे काय फेकतात आणि मग लगेच ओरडत कल्ला करत अंदर काय पळत सुटतात.. बर आधी खिलजी एकटा होता म्हणुन शांत असेल असपन मानाव तर त्याच सैन्य ढालीने त्याची रक्षा करायला पोहोचत तरी यांची कोयले कि बरसात चालुच.. वर दरवाज्यातुन दहा लोकं आत जाउ शकेल अश्या पद्धतीने उभ्या..अन मग एकच कल्ला आणि ओरडत आत पळतात...अगम्य.. खुप फ्लॉज आहे..खुपच.. असो..

गफुर आवडला..रणवीर ठिक, शाहिदही आवडला अन आदिती राव पन.. दिपीकाने मात्र कचरा केलाय..श्या...
असो.. पडद्यावर घुमर ठिक पण खली वली जास्त आवडलं.. स्पेशली रणवीरची एनर्जी त्यात..

आपला माणूस चित्रपट पाहिला ! सिनेमा जमलाय शेवटचा प्रिची मेलोड्रामा सोडल्यास. तो जर नसता तर मराठीतील उत्तम क्राईम थ्रिलर होऊ शकला असता . नानाने त्याची तीच ती टोन बदलली पाहिजे .नटसम्राट पासून तेच तेच ऐकून कंटाळा आलाय .
सुमित राघवन आवडला . छान काम केलंय. इरावती हर्षे छान दिसते.(सगळेच छान आहेत हे पाटेकरीय वाक्य टाळलं आहे Wink )
मराठी सिनेमाच कला दिग्दर्शन बरेच सुधारल आहे. सिनेमाची निर्मितीमूल्यही उच्च दर्जाची आहेत . शेवटाला अजय देवगणला का घेतलं ते कळलं नाही .निर्माता वगैरे आहे म्हणून घेतलं आहे का ते ठाऊक नाही .

तर एकंदरीत वन टाइम वॉच आहे.

कोणीतरी लिहा आपला माणूस वर!!
नाना सुमित इरावती सगळे मस्तच. ग्रेट अभिनयाची जुगलबंदी.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
स्पॉयलर*****************************************************************************************************************************
नानाचा इन्स्पेक्टर नागरगोजे अवतार मस्त.काय दिसतो बाईक वर!! आमची मुलगी युए असून 'उदय शेट्टीचा पिक्चर' म्हणून आवडीने आली बघायला.तिला वेलकम मधला उदय शेट्टी खूप आवडतो.आबा वाला अवतार माझ्या डोक्यात गेला. (मीन सून असल्याचा आरोप पत्करुन) 'घरात सगळं असून उगीच टोमणे टाकत राहणार्‍या या अश्या खवचट कटकट्या म्हातार्‍याला कोणी टपकवल्यास टपकवणारा पूर्ण चूक कसा म्हणता येईल' असे काहीसे विचार डोक्यात येत होते.
पण पिक्चर म्हणून चांगला आहे. काही मुद्दे खरोखर विचार करण्यासारखे वाटले.शेवट पर्यंत खिळवून ठेवतो.ज्येना ना त्यांच्या बाजूचा असल्याने जास्त क्लिक होईल.

काल गुलाबजाम पाहीला आणि खूप आवडला! सकुंचा आणि सोकु चा आजवरचा सर्वात आवडलेला सिनेमा! नक्की पहा पण पहायला जाताना भरल्या पोटी जाणे Happy

आज ब्लॅक पँथर पाहिला...
Marvel Studios ने खूपच सुंदर बनवला आहे! कॉमिक एलिमेंट्स जसेच्या तसे घेतलेले आहेत. सर्व कलाकारही अप्रतिम! ऍक्शन फिल्म्समध्ये ब्लॅक पँथर खूपच वेगळा पण जबरदस्त वाटतो! पुन्हा पुन्हा थिएटर मध्ये पाहण्यासारखा!

काल नेटफ्लिक्सवर लव पर स्क्वेअर फीट बघितला. खूप आवडला. लाईट कॉमेडी, ड्र्रामा..... नक्की बघा. एक घर मिळवण्यासाठी अनमॅरीड कपल ने केलेल्या युक्त्या... हिरो हिरॉईन नवीन आहेत. पण त्यांचे आईवडिल झालेले रत्ना पाठक, सुप्रिया पाठक, राजपाल यादव ने धमाल आणलीये... Happy वन टाईम वॉच नक्कीच आहे.

नेटफ्लिक्स वर गजेंद्र अहिरेचा 'द सायलेंस' पाहिला.... सत्यघटनेवर आधारीत आहे. लहान मुलीचे मामाकडून शोषण, तो बायकांवर करत असेलला अत्याचार सगळं अंगावर येणारं आहे. बॅड मॅन नागराज मंजूळे आहे. गरीब बाबा बुड्ढीके बाल विकत गुजराण करणारा रघुवीर यादव दाखवलाय. त्याचं मुलीशी असलेलं नातं खूप हळवं आहे. गावात ती सुरक्षित नाही हे कळल्यावर जेव्हा लहान मुलीला मोठीबरोबर शहरात पाठवायला निघतो तेव्हाची त्याची घालमेल डोळ्यात पाणी आणते. नागराज च्या बायकोचे पण काम चांगलेय. कोण अ‍ॅक्ट्रेस आहे माहित नाही. एकूणच अंगावर येणारा पिक्चर वाटला.

नागराज च्या बायकोचे पण काम चांगलेय. कोण अ‍ॅक्ट्रेस आहे माहित नाही.>>अंजली पाटील आहे ना ती.. 'चक्रव्युह' , 'न्युटन' सारख्या पिच्चर मधे दिसलीए.

मी परी बघुन आली..
NH10 मधली अनुष्का ती हिच का असली बेकार अ‍ॅक्टींग केलीए तिने..
त्यामानाने रजत कपूर अन परम्ब्रता चॅटर्जी मस्तच मस्त..
बरेच कच्चे दुवे आहे चित्रपटात.. लिहायला गेली तर स्पॉयलर व्हायचे म्हणुन राहु देते..
'Exorcism', 'Let the right one in', 'Conjuring' असले बर्‍याच चित्रपटातले जम्प पॉईंट्स सही सही उचलले आहेत..
उगा लांबवलेली कथा वाटली.. वातावरण निर्मितीच्या धांदलीत मिव्वळ म्युझिक अन इतर बाबींकडे लक्ष दिल अन त्या नादात कथा गेली चुलीत असं झाल. हॉरर अन हिडियस मधला फरक समजावून सांगा यांना कुणीतरी असं म्हणावस वाटल मला.. असो..
या बघुन..

Pages