चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रविवारी स्पायडर-मॅन:होमकमिंग पाहिला,
दिग्दर्शक जॉन वॉट्स यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने MCU मध्ये स्पायडरमॅनचे आगमन करवले आहे. टॉम हॉलंड (स्पायडरमॅन), रॉबर्ट डाऊनी Jr (आयर्न मॅन), मायकेल किटन (व्हल्चर), अशा दिग्गजांचा अप्रतिम अभिनय, उत्कृष्ट ऍक्शन, मजा आणणारी कॉमेडी आणि अर्थात जे नियमित मार्वलचे कॉमिक्स वाचतात (माझ्यासारखे) त्यांच्यासाठी भरपूर easter eggs!
हा चित्रपट थिएटरमधेच बघावा, परत परत पाहण्यासारखा आहे!
या आधीचे म्हणजे अर्थातच, सॅम रायमी-टोबी मॅग्वायर आणि वेब्ज-अँड्रयू गारफिल्डचेही स्पायडरमॅन चित्रपट चांगलेच होते पण आता ज्यापद्धतीने हा स्पायडर मॅन एका मोठ्या युनिव्हर्सचा भाग झाला आहे त्यामुळे तो फक्त एका सुपरहिरो पुरताच मर्यादित नाही, त्यात अनेक सुपरहिरोजचा समावेश झाल्यामुळे हि सिरीज नक्कीच जास्त EXCITING असेल!

चीकू, अभय देऊल चे सगळेच मोवी भारी आहेत>>> +१०००
त्याचा मनोरमा सिक्स फीट अंडर जबरदस्त आहे. आयेशा केवळ त्याच्यामुळे पाहिला.
सस्मित, मनोरमा सिक्स फीट अंडर>> मला कळलाच नाही.

मनोरमा सिक्स फीट अंडर हा जॅक निकोलसनच्या Chinatown(१९७४)ची कॉपी आहे, ओरिजिनल मूवी पहा, अजून जास्त आवडेल आणि कळेल.

परवा यु ट्युब वर वाय झेड पाहिला.
मला खूपच आवडला. सई सकट सगळ्यांचं काम छान झालंय.
बत्त्तीस चं काम केलेला अक्षय टांकसाळे (बहुधा) पण अफाट आवडला.
पर्ण पेठे जाम गोड दिस्ते.

मुक्ता प्रत्येक रोल मध्ये मुक्ताचं वाटते... संवादफेक एकाच शैलीत,बॉडी लँग्वेज पण सेमच..
फक्त जोगवा मध्ये चांगली वाटली होती..

मुक्ता प्रत्येक रोल मध्ये मुक्ताचं वाटते... संवादफेक एकाच शैलीत,बॉडी लँग्वेज पण सेमच..
फक्त जोगवा मध्ये चांगली वाटली होती.. >> च्रप्स अनुमोदन मला पण इथे अगदी बोर वाटली. अर्थात तिला फार मोठा रोल नव्हता आणि वाव पण.
आणि त्यांचं लग्न लावून देऊन हिरोने काय गाजवून दाखवलं? Uhoh ते दोघे तसे ही एकत्र (येउन जाउन रहात) होतेच, फक्त लग्न हे एक रिच्युअल होतं त्यांच्यासाठी.

हो कारण इतक्या खाली कोणी जाऊ शकत नाही..☺️
सेम अभिनय, सेम संवादफेक, कोणताही मोवी चा सिन घ्या, कोणत्याही मोवी मध्ये टाका... एकदम फिट बसेल.. इतका मोनोटोनस...

YZ मलाही आवडला.हलका फुलका आहे टाईमपास .
मुक्ताबाबत सहमत .थोडी मोनोटोनस वाटायला लागलीये आता.

मला पर्ण पेठे आणि त्या बत्तीस च काम आवडलं.सहजसुंदर काम केलंय. पर्ण पेठे दिसतेही छान .

सईने पण छान काम केलंय

मॉम पाहिला:
एकदमच कैच्यकै आहे.
अक्षय खन्ना फुकट आहे. त्यात नवाजुद्दीन व्यक्तीरेखा एकदमच फुसकी आणि कैच्यकै आहे. त्याला इतके डीटेल्स कसे मिळतात, तो मदत करण्याचे कारण वगैरे नीटसे समोर येत नाही.
श्रीदेवीने पुन्हा कोणाला तरी डबींग करायला सांगावे. इतके फालतु उच्चार , आणि जड किरट्या आवाजात बोलणे.... नकोसे वाटते एकायला.
बौत शुक्रिया! अच्चा आयड्या हय. असे उच्चार एकायला मिळतात.

इतकी वर्षे काम करून हे हिंदी? मग आमचे मराठी हिंदी इतकही वाईट नाही वाटत एकायला. कमीत कमी आमच्या पिढीचे ...

कथा काहीही नवीन नाही...

तेव्हा ** फक्त

मुक्ताच वावरणं सारखंच असतं बहुतेकदा. त्यात तिचे ते मध्ये पंचवार्षिक योजनेप्रमाणे त्या ढोल्या बरोबर काम करताना पाहून इतकं बोरं आहे.

ढोल्या= रामदास पाध्येचा बाहुला= जोश्यां स्वप्निल

& जरा हटके पाहिला. आवडला. एकदा तरी नककीच पाहण्यासारखा आहे. कॉफी आणि बरंच काही आवडला होता. त्याच दिगदर्शकाचा - प्रकाश कुंटे - हा दुसरा चित्रपट आहे. प्रत्येक फ्रेम देखणी, सर्व कलाकारांची कामे छान, एकूण visually rich चित्रपट आहे. छोटे छोटे सीन्स, सम्वाद त्या त्या वेळी आवडून जातात. आता प्रकाश कुंटे या नावाकडून अपेक्षा आणखी वाढलेल्या आहेत.
स्टोरी कदाचित श्रीमंती दु:खं टाईप वाटेल पण प्रेझेंटेशन flawless आहे. मला निशांत चं काम करणारा मुलगा खूप आवडला. आकाश झालेला अभिनेताही एकदम देखणा व सहज काम करणारा आहे. मृणाल कुलकर्णी छान फ्रेश दिसते, आस्था झालेल्या मुलीनेही गोड काम केलय.

चश्मेवाला लुकडा मुलगा
बाबा स्फोटात ठार.
घुबड मेसेज् आणते तसे पोस्टातून् डीव्हीडी येते.
एकामागोमाग एक रहस्ये उलगडतात.
क्लॉक टॉवरवर टीचरचा खून
गेलेली रेल्वे उडत्या गाडीतून पकडणे ..
उंचावरुन धुराडी रेल्वेचा लाँग शॉट
दोन तोंडाचा व् दोन नावांचा विलन
पक्ष्यावरुन सवारी.
टकल्या पीटर पॅटेग्रु
....
हॅरी पॉटर नाही , जग्गा जासूस

लपाछपी पाहिला , मराठीत horror movies खुपच कमी बनतात आणि त्याहुनही मी कमीच बघतो , बेकरीवर ट्रेलर पाहून हा पाहुयात ठरवलं होतं , हा पाहिला आणि चक्क आवडला सुद्धा . वेगळी स्टोरी आहे , म्यूजिक अफाट आहे , जाम टरकलो होतो Proud
शुक्रवारी उतरेल बहुतेक , आम्ही तर रिक्वेस्ट करून शो लावायला भाग पाडलं . नक्की बघा .

परवा "जग्गा" बघितला. टाईमपास म्हणून छान आहे. काही गोष्टी न पटणार्‍या आहेत. पण केवळ मनोरंजनासाठी पहायचा असेल तर त्या कडे दुर्लक्ष कराव. 'यही उमर है' हे गाण सोडल तर बाकी गाणी खास वाटली नाहीत. कॅटरीनाची अ‍ॅक्टींग बघताना बँग-बँग मधे केली तशीच वाटली.
बरेच सीन बघताना ते कुठल्याना कुठल्या चित्रपटांतून घेतले आहेत हे जाणवते. जसे हॅरी पॉटर, टिनटिन. ई.

लिपस्टीक अंडर माय बुरखा चुकवू नये असा सिनेमा आहे! चार स्टार्स! नक्की बघा.
सेंसॉर बोर्डाला डोकं खरंच आहे का असा प्रश्न पडतो! ह्या चित्रपटात बंदी घालावी असं काहीच नाही. ह्या चित्रपटाला आपण पाठिंबा दिला पाहिजे..तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोचवा!

लिपस्टीक अंडर बुरखा ट्रेलर पाहिल्यापासुनच लिस्टित टाकून ठेवलाय मी..नक्की बघणारे अन ते पन थेटरात..

काल परवा लपाछपी पाहीला..सॉल्लीड्ड हितभर झालेली दोन तीन शॉट्स मधे..बेक्कार..छाने..एकदा बघण्यासारखा..काये दुसर्‍यांदा भिती वाटणार नाही ना म्हणुन..

मुन्ना मायचेल बघितला, जबरदस्त आहे, नवीन हेरॉईन तर कातीलना आहे.. नवाज ने अक्का पिच्चर संबळाला आहे, टायगर नाचायला लागला फुल्ल शिट्ट्या...
चुकवू नाका

हा फुल टू मुव्ही विकेंड झाला. तर पाहिल्या चित्रपटांबद्दल..

पहिला अर्थातच डंकर्क.
ख्रिस्तोफर नोलन लिखित, सहनिर्मित आणि दिग्दर्शित 'डंकर्क' पाहीला. दुसर्‍या महायुद्धातल्या 'डंकर्कची माघार' ह्या महत्त्वाच्या घटनेवर आधारीत हा चित्रपट. जर्मन रेट्यासमोर बेल्जियमच्या राजाने त्याच्या मंत्रीमंडळाला तसेच इंग्लड आणि फ्रान्सला न विचारता परस्पर शरणागती पत्करली आणि मोठ्या संख्येने आंग्लो-फ्रेंच सैन्य संकटात सापडलं. अश्या परिस्थितिल जर्मनांना झुलवत ठेऊन डंकर्क ह्या बंदरातून ब्रिटीश सैन्यानी माघार घेतली. सुमारे ३ लाख ब्रिटीश आणि मोठ्या संख्येने फ्रेंच सैन्य डंकर्क हून खाडी ओलांडून पळालं. जर्मन हावईदल तसेच सैन्याचा रेटा इतका जबरदस्त होता की ही यशस्वी माघारही विजयच समजला गेला कारण हे सैन्य जर्मनांच्या हाती लागलं असतं तर पुढे इतिहास बदलला असता.
सिनेमा ह्या घटनेतल्या दिवसाचं चित्रण दाखवतो. जमीन, हवा आणि पाणी अश्या तिनही स्तरावरचं कथानक दाखवत सिनेमा पुढे सरकतो.
पहिलं म्हणजे पूर्ण सिनेम्यात अत्यंत कमी आणि मोजकेच डायलॉग आहेत. सैन्य समोरासमोर उभी आणि सैन्यप्रमुख जोरदार भाषणबाजी करत आहेत, अशी ('बॉर्डर'छाप) दृष्ये ह्यात नाहीत !
सिनेमॅटोग्राफी अफाट आहे! विमानातून घेतलेली दृष्ये केवळ भारी आहे! डायलॉग नसल्याने त्यांनी जागा बॅकग्राऊंड स्कोरने भरून काढली आहे. पार्श्वसंगीत इतकं अंगावर येतं की बस!
अजून एक जाणवलेलं वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण चित्रपटात एकही जर्मन कॅरॅक्टर दाखवलेलं नाही. सैनिक, जनरल, नागरीक कोणीही नाही. युध्दपट असूनही युध्दातल्या दुसर्‍या बाजूचं कोणीही न दाखवता परिणाम साधण्यात खास 'नोलन' टच आहे!
डार्क नाईट, इन्सेप्शन, इंटरस्टीलर्स असे फँटसीपट काढल्यावर हा एकदम वेगळा प्रकार नोलनने आणला आहे. आता तरी त्याला अ‍ॅ़केडमी नक्की मिळावं!
आवर्जून आणि थिएटरमध्ये बघण्यासारखा चित्रपट.

डिस्पिकेबल मी -३
सिनेमांच्या सिक्वेलमध्ये नेहमी पहिला भागच छान वाटतं. त्याप्रमाणेच हयाचं ही. पण हा भागही आवडला. मिनियन्सचा आचरटपणा पाहून आमची मुलगी आणि थिएटरमधली इतर पोरही पोट धरून हसली.

दृष्यम - नेटफ्लिक्सवर पाहिला. मला नावावरून हा पिरियड फिल्म किंवा मायथॅलॉजिकल (:|) असेल असं वाटलं होतं! सहज दिसला म्हणून लावला आणि खूप आवडला. लांबी थोडी कमी चालली असती. अजय देवगणने मस्त काम केलं आहे. तब्बू आयजी वगैरे वाटत नाही पण ठिक आहे.

नेटफ्लिक्सवर परत एकदा अजब प्रेम की गजब काहानी पाहिला. अत्यंत पाचखळ, पांचट विनोदांवर परत तेव्हडचं हसून स्वतःची करमणूक करून घेतली. Happy

Pages