चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोमवारी थॉर रॅग्नरॉक पहिला....
भारी ऍक्शन, जबरदस्त कॉमेडी सकट MCU ने अव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर साठी खूप मस्त सेट अप केला आहे, इस्टर एग्ग्स, मिड क्रेडिट आणि पोस्ट क्रेडिट सीन्स तर खूपच भारी आहेत!
मार्वल कॉमिक फॅन्सनी तर नक्कीच पाहावा! केट ब्लँचेट आणि जेफ गोल्ड्ब्लूमला MCU मध्ये समाविष्ट केल्याबद्दल खरंच केविन फायगे चे आभार मानायला हवेत!

'रब ने बना दी जोडी' बघतेय. i am pretty sure की ह्या सिनेमाला सुरुवात करण्याआधी शाहरुखने दिलिप प्रभावळकरांचा एखादा तरी सिनेमा पाहिला असला पाहिजे. मला तर कित्येकदा समोर शाहरुख नसून ' एक डाव भुताचा' मधले प्रभावळकर आहेत की काय असे वाट्तेय. (i am at the beginning right now)

Marvel Universeचा Thor पाहिला..
ऑस्सम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म आहे...कुणी बघीतला नसल्यास नक्की नक्की बघुन या असा अ‍ॅक्शन कॉमेडी..

कोको पहावा का?
बरा आहे की 'मोआना'सारखा (म्हणजे नुस्तीच सिजिआयची उधळण, रटाळ गाण्यांचा कलकलाट आणि झीरो सबस्टन्स)?

भयानक असा डॅडीज होम २ पाहिला. करण जोहर सिनेमा बनवु शकतो पण अजून दोन बाप( जन्म दिलेला बाप, आताचा बाप ) कसे करणार भारत्तात फक्त त्याचा विचार केला तर बाकी करण जोहरला हि गोष्ट आहे तयार.

वंडर पाहिला.... अप्रतिम सिनेमा आहे. नक्की बघा... ज्युलिया रॉबर्ट्स, ओवेन विल्सन, जेकब सगळ्यांचे रोल एकदम मस्त... खुप वेळा डोळ्यातून पाणी आले, हसवले पण... खुप दिवसांनी इतका छान पिक्चर पाहिला.

कोको पाहिला. >> Movie Synopsis मधे extraordinary journey through the Land of Dead दिसतंय..
६ वर्षाचा मुलगा पाहू शकेल काय ?

<कोको पहावा का?>
अवश्यमेव पहा. अतिशय सुंदर फिल्म आहे. कथा, व्हिज्युअल्स, संगीत अतिशय मनभावन आहे. मेक्सिकन लोकसंस्कृतीचा आधार घेऊन इतकी सुंदर कथा रचलीये की बास. आपली माणसं, त्यांचं आपल्याला असणारं स्मरण, स्वप्नांच्या मागे धावताना मागे सुटणारी आपली माणसं, आणि अर्थातच मरण या गोष्टीवर आजिबात बोजड न होऊ देता फार सुरेख भाष्य केलंय.
<६ वर्षाचा मुलगा पाहू शकेल काय ?>
नक्की. फार आवडेल त्याला. आजी- आजोबांसोबत पाहिला तर अधिक भावेल असे वाटते.

कोको पाहिला...
खुप दिवसांनी एक सुंदर अ‍ॅनिमेटेड पिच्चर पाहिला... म्युझिकल आहे आणि मस्त आहे.. अधेमधे आलेली मेक्सिकन फोडणी मस्तच..
लहान मुलांना घेऊन पाहण्यासारखा आहे नक्कीच..
ती छोटी छोटी गाणी ठेका धरायला लावते मस्त..
लहान मुलांच म्हातार्‍या आज्ज्यांसोबत असलेलं कनेक्शन बघताना अगदी अगदी रिलेट झालं.. अतिशय सुंदर अनुभव.

बिगिन अगेन नावाचा सिनेमा पाहिला..
स्टारिंग मार्क रुफालो आणि किरा नाईटली... खुप खुप मस्त म्युझिकल आहे.. सोबत चवीला अ‍ॅडम लिवाइन सुद्धा आहे.
स्वतःच्या कौटुंबिक प्रॉब्लेम मुळे सर्व पातळीवर नैराश्येच्या गर्तेत दारुच्या आहारी गेलेला टॅलेंटेड म्युझिक प्रोड्युसर डॅन अन एक सिंगर + साँगराईटर असलेली ग्रेटा यांची कहानी.. संगीत या दोघांना एकत्र आणून त्यांना कसं तारत हे बघायला मज्जा येते..
नक्की बघावा असा चित्रपट..
यातल्या 'लॉस्ट स्टार्स' या गाण्याकरता अकेडमी अवॉर्ड चं बेस्ट ओरिजिनल साँगच नॉमिनेशन सुद्धा मिळालय..
थोडक्यात मस्तम मस्त बघणेबल पिच्चर.. Happy

विन्ड रिव्हर आवडला असेल तर unlocked पण बघा. तोही आवडेल. दोघांमधे काहि साम्य नाही फक्त दोन्ही एका मागोमाग पाहिले नि आवडले म्हणून लिहितोय.

कीप क्वायेट ही डॉक्युमेंटरी फिल्म आज नेटफ्लिक्सवर पाहिली.

चानाद सेगेदी (Csanad Szegedi) या हंगेरियन युवकाची ही एखाद्या फिल्मी कथेपेक्षा अधिक ट्विस्ट असलेली कथा. ८२ साली जन्मलेला हा हंगेरियन युवक २००६च्या आसपास पूर्ण उजव्या/राष्ट्रीय विचारधारेचा एक प्रमुख सदस्य बनला होता. योबिक (Jobbik) या फार-राइट नॅशनलिस्ट ज्यु द्वेषी म्हणजे ज्याला अगदी क्लासिक निओ-नाझी पार्टी/संघटन म्हणता येईल त्या संघटनेचा अगदी पहिला पहिला शिलेदार. हंगेरियन गार्ड या हिटलरच्या एसएसवर बेतलेल्या दायेमुड, बायेमुड संघटनेचा संस्थापक व प्रथम प्रमुख. हे हंगेरियन गार्डवर पुढे सरकारने बंदी आणली.
योबिकचा उदय झाला तेव्हा हंगेरीत सोशालिस्ट (समाजवादी) पक्षाचे सरकार आले होते. मात्र ते फार यशस्वी होणार नाही हे दिसू लागले होते. फिदेस हा प्रमुख विरोधी पक्ष स्वतःच उजव्या विचारसरणीचा होता व थोडक्यात निवडणुक हारला होता. योबिकने फिदेसच्याही उजव्या बाजूची जागा पटकावून आश्चर्यकारकरित्या पार्लमेंटमध्ये १०%पेक्षा जास्त मते मिळवली.
२०१०पासून हंगेरीत फिदेसची सत्ता आहे आणि तिचा नेता विक्टर ओर्बान पंतप्रधान आहे. अनेकांना फिदेस आवडत नाही पण पर्याय म्हणून योबिक अजूनच कडवे अन माथेफिरु तर सोशालिस्ट देशाला/अर्थव्यवस्थेला गाळात नेतील म्हणून फिदेस बाय डिफॉल्ट चॉइस आहे. सध्या तरी फिदेसला पर्याय नाही
चानाद सेगेदी या पार्श्वभुमीवर एक तरुण नेता म्हणून उदयाला येत होता. २००८मध्ये तो युरोपियन पार्लमेंटमध्ये योबिकच्या तिकिटावर निवडून आला व स्ट्रासबोर्गला पार्लमेंटच्या सेशनला हंगेरियन गार्डचा गणवेश घालून गेला होता.

आता त्यानंतर १-२ वर्षात चानादची आजी (आईची आई) ही ज्यु आहे अशी एक बातमी आली. सुरुवातीला तिचा निषेध झाला. पण ते खरे ठरले. चानादने आजीला विचारले व तिने हे कन्फर्म केले. ही आजी आउश्वित्झ सर्वायवर होती. तिच्या हातावर औश्वित्झचा नंबर गोंदवलेला होता. ती आउश्वित्झमधून परतल्यावर एका ख्रिश्चन कुटुंबाच्या छायेखाली गेली, स्वतःचे ज्यु असणे तिने दाबून टाकले.
चानादला आजी ज्यु असणे हा मोठा धक्का होता. ज्यु धर्मप्रथेनुसार ज्यु बाईची मुले/मुली ही ज्यु असतात आणी त्या न्यायाने चानाददेखील ज्युच होता. वांशिक वर्चस्ववाद हा मध्यवर्ती मुद्दा असणार्‍या योबिकमध्ये त्याचे ज्यु असणे ही शेक्सपिअरची शोकांतिका ठरली. ते काय काय झाले हे डोक्युमध्ये बघाच.

हा चानाद एका राब्बीच्या बरोबर माहिती घेत, त्याच्याबरोबर चर्चा करत आता धर्म-कर्मकांडे पाळणारा कोशर ज्यु बनला आहे. ही डॉक्यु निर्माण करत होते तेव्हा तरी अनेक ज्युंना त्याच्या सच्चाईबद्दल शंका होती/आहे. त्याच्या आत्ताच्या विकीपिडिया एन्ट्रीनुसार चानाद इस्रायेलमध्ये इमिग्रेट व्हायच्या प्रयत्नात आहे असे लिहिलेले दिसते.

दुसर्‍या महायुद्धात हंगेरी ज्युद्वेष्टी होती व त्यांनी जर्मनांना मनापासून मदत केली. आजही विशेषतः पूर्व भागात (मिस्कोल्च, डेब्रेचेन) ज्युद्वेष व रोमाद्वेष ठासून भरलेला आहे. त्याचप्रमाणे अनेक लोक समंजस, लिबरल पण आहेत. एकुणात परिस्थिती सध्या इतरत्र आहे तशीच आहे.

मला सर्वात वाईट वाटले ते हा चानाद जेव्हा त्याला आपल्यात ज्यु रक्त आहे असे समजले तेव्हा तो लंबकाच्या दुसर्‍या टोकाला जाऊन ज्यु झाला. तो कदाचित ज्यु आतंकवादी/झिओनोस्ट होणार नाही. पण त्याचे हे टोकाचे ज्यु होणे मला खटकले. म्हणजे या मनुष्याला कुठल्यातरी समुहाशी जोडले असणे हे अधिक महत्त्वाचे वाटत राहिले.
उद्या तो वेस्ट बँक सेटलमेंटमध्ये अधिकाधिक जमीन बळकावत अरबांना बाहेर काढण्याचे काम इमाने इतबारे करेल कदाचित आणि तो या शोकनाट्याचा दुसरा अंक असेल.

मस्त माहिती टण्या. बघायला हवा. सबटायटल्स इंग्लिश आहेत का?
>>मला सर्वात वाईट वाटले ते हा चानाद जेव्हा त्याला आपल्यात ज्यु रक्त आहे असे समजले तेव्हा तो लंबकाच्या दुसर्‍या टोकाला जाऊन ज्यु झाला.>> हे नुसतं वाचूनच मला अशक्यप्राय वाटतंय. म्हणजे आत्ताच्या मिनिटाला तुम्ही ज्यु द्वेष्टे होतात आणि आपल्यात ज्यु रक्त आहे हे कळल्यावर लगेच तो ज्यु होऊन त्यांचा कळप जॉईन करतो? मनाचं परिवर्तन इतक्या इझिली होतं?

हे नुसतं वाचूनच मला अशक्यप्राय वाटतंय. म्हणजे आत्ताच्या मिनिटाला तुम्ही ज्यु द्वेष्टे होतात आणि आपल्यात ज्यु रक्त आहे हे कळल्यावर लगेच तो ज्यु होऊन त्यांचा कळप जॉईन करतो? मनाचं परिवर्तन इतक्या इझिली होतं?

>> परफेक्ट आहे ते माझ्यामते. वंशश्रेष्ठत्व, वंशभेद, वगैरे कट्टर विचार असणाराच तो माणूस. तो ज्यु असला काय की नॉर्डिक असला काय? थोडक्यात हिंदु असला काय किंवा मुस्लिम असला काय कट्टर धार्मिक असेल तर तो कोणत्या धर्माचा आहे याने फरक पडत नाही. ते फक्त त्याचे मूळचे नैसर्गिक कट्टर विचार व्यक्त होण्याचे एक साधन असते.

लोक विशिष्ट धर्मामुळे कट्टर होत असतात हा आपल्याकडच्या विशिष्ट हिंदूंमध्ये फार गोडगैरसमज आहे. धार्मिक कट्टर सगळ्याच धर्मात असतात. ती एक प्रवृत्ती आहे ज्याला धर्माचे लेबल लावता येत नाही. पण दुर्दैवाने अनेकांना हे पचत नाही म्हणा..

नानाकळा, मला अशक्यप्राय ह्या करता वाटलं म्किंवा वाटतंय कारण तो ज्युंचा द्वेष करतो. नुसता वंशभेद नाही. आपलं रक्त ज्युंचं आहे हे कळल्यावर त्याच्या मनातून ज्युद्वेष नाहिसा झाला?असं होणं मला तरी सोप्पं वाटत नाही.

>>आपल्याकडच्या विशिष्ट हिंदूंमध्ये फार गोडगैरसमज आहे. धार्मिक कट्टर सगळ्याच धर्मात असतात. ती एक प्रवृत्ती आहे ज्याला धर्माचे लेबल लावता येत नाही>> माझ्यामते धर्माचं लेबल लावूनच अशा कट्टर प्रवृत्तींमागे लपून वेडेपणा करता येतो. धर्म कोणताही असो पण काळाप्रमाणे बदल न करता आपलाच कट्टरपणा जपत राहणार्‍या लोकांकडे मी तरी नाक मुरडते.

असं होणं मला तरी सोप्पं वाटत नाही.
>> आता झालंय तर खरंच. सोप्पं तर नसेलच. अगदी दिवाळीबल्बसारखा क्षणार्धात हिरवा टू निळा झाला नसेलच. बट ही हॅड नो ऑप्शन...

माझ्यामते धर्माचं लेबल लावूनच अशा कट्टर प्रवृत्तींमागे लपून वेडेपणा करता येतो

>> आपण दोघे एकच बोलत आहोत. Happy

Pages