चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी परी बघुन आली..
NH10 मधली अनुष्का ती हिच का असली बेकार अ‍ॅक्टींग केलीए तिने...
नवीन Submitted by टीना on 9 March, 2018 - 03:40
>>>>>
लग्न केले की नायिकेचे करीयर संपते हा बाॅलीवुडचा अलिखित नियम आहे. Rofl अर्थात सन्माननीय अपवाद आहेत.

मी परी बघुन आली..
नवीन Submitted by टीना on 9 March, 2018 - 03:40
>>>>>
जस्ट क्युरॅसिटी म्हणुन... हे वाक्या "मी परी बघुन आले" अस हव ना ?..

>> जस्ट क्युरॅसिटी म्हणुन... हे वाक्या "मी परी बघुन आले" अस हव ना ?..
Lol

"जस्ट क्युरिऑसिटी म्हणून... हे वाक्य असं हवं ना? ..

परी चे पोस्टर म्हणजे मला विरुश्का आफ्टर मॅरेज अ रिअ‍ॅलि टी चेक असे वाटले होते. ती फार ओव्हर रेटेड आहे. आणि सध्या उगीच राणी बनून फिरते. ठिक्के पण वो मुखडा सुभे सुभे देखना बोले तो बेजारी आएंगी मेरेकु.

"रेड" मुव्ही पहिला . सत्यघटना आहे . १९८१ साली ऑकटोबर महिन्यात लखनऊ मधल्या एका काँग्रेस "एम एल ए" च्या बंगल्यावर इन्कम टॅक्स ची रेड पडते आणि त्या राजकारण्याने रेड थांबवावी म्हणून केलेले अथक प्रयत्न आणि त्या आयटी ऑफिसर ने इतके अडथळे येऊन सुद्धा त्याच्याकडून नेटाने केली कारवाई या खऱ्या कथानकावर बेतलेला सिनेमा आहे आणि एक उत्कृष्ट सिनेमा अचानक बघितला गेला हे सरप्राईझ मिळालं . हि बडी धेंड सामान्य माणसाला लुबाडून लुबाडून इतका पैसा साठवतात . कुठे कुठे साठवतात ( ज्याची सामान्य माणसाला कल्पना पण येणार नाही ) ते पडद्यावरती बघून सुद्धा शिसारी येते . किती पैसे लागतो एका माणसाला जगण्याकरता ? पण नाही माणसाची इतकी राक्षसी हाव बघून हबकायला होत .

सत्य घटनेचा आधार घेऊन हा सिनेमा बेतलेला आहे . जुलै १९८१ मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने काँग्रेस "एम एल ए" च्या कानपूरच्या बंगल्यावरती रेड घातली होती . ९० इन्कम टॅक्स ऑफिसर्सनी " शारदा प्रसाद पांडे " ( इन्कम टॅक्स कमिशनर ऑफ लखनौ ) यांच्या नेतृत्वाखाली हि रेड घातली होती . इन्कमटॅक्स ऑफिसर्स च्या सेफ्टी करता २०० पोलीस ऑफिसर्स तिथे प्रेझेंट होते . १८ तासापेक्षा जास्त वेळ हि रेड चालली नोट्स मोजण्याकरिता ४५ लोक तिथे बसली होते .

या घटनेवर सिनेमाची मूळ स्टोरी बेतलेली आहे आहे पण तरी सुद्धा जो काही मॉब व्हॉयोलन्स सिनेमात दाखवला गेलाय तो दुसऱ्या एका खऱ्याच पण दुसऱ्या स्टोरी वर बेतलेला होता . १९८९ मध्ये दोन इंडस्ट्रियालिस्ट एक पेपर मिल ओनर आणि दुसरा ज्वेलरी शॉप ओनर . त्यांच्या वर घातलेल्या " रेड" चा वेळी प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित आहे . त्या पेपर इंडस्ट्रियालिस्ट ने इन्कम टॅक्स ऑफिसर्स वर हल्ला करण्यासाठी मॉब ची अरेंजमेंट केली होती . या दोन घटनांची सरमिसळ करून सिनेमा बेतलेला आहे .

काँग्रेस "एम एल ए" च्या कानपूरच्या बंगल्यावरती घातलेली रेड हि ( त्या काळच्या पैशांचा हिशोब केल्यास ) भारतामधली सगळ्यात मोट्ठी इन्कम टॅक्स "रेड "समजली जाते. यातून शिकण्यासारखी एकच आणि महत्वाची गोष्ट "आपल्या आजूबाजूला कितीही भ्रष्टाचार असेल आपल्या मार्गात कोणीही कितीही अडथळे आणले तरी सुद्धा आपण ठरवलं तर हि ब्लॅक मनी विरुद्धची लढाई जिंकू शकतो " हि त्या आयटी ऑफिसर्सची जिगर बघण्यासारखी आहे
आताच्या राजकारणाचा संदर्भ लावला असता आताच्या प्राईम मिनिस्टर ने नोटबंदी का लावली याच उत्तर मिळत . या बड्या धेंड्यांच्या काळ्या पैशाचं रूपांतर एका झटक्यात कागदाच्या कपट्यात झालं .

ताई , शेवटच्या वाक्याची खरच गरज होती का ?उगाच इंफ्लेमेट्री स्टेटमेंट्स केलीच पाहिजेत का?
चित्रपटा बद्दल बोलताय तर त्याबद्दलच बोला ना,
उगा राजकारण कशाला आणता?
परत यालाकुनी उत्तर दिले, की मायबोली खरते मै ची ओरड सुरू कराल

आताच्या राजकारणाचा संदर्भ लावला असता आताच्या प्राईम मिनिस्टर ने नोटबंदी का लावली याच उत्तर मिळत . या बड्या धेंड्यांच्या काळ्या पैशाचं रूपांतर एका झटक्यात कागदाच्या कपट्यात झालं .

--- सो इनोसंट. अशा बाळबोध विचारांचे, ग्राउंड रिअ‍ॅलिटी शष्प ठाऊक नसलेले, सनिमा हेच सत्य समजणारे नागरिक दिसले की परिधानमंत्र्यांचं कसं फावतं याचं उत्तर मिळतं.

रामाधीर सिंहः "साला जब तक हिंदुस्तानमें सनिमा है.. तबतक लोक *त्या बनते रहेंगे"

"रेड" मुव्ही पहिला . >>> ह्म्म्म्म्म्म्म . काल मी पण पाहिला . मला जाम बोरिन्ग वाटला . फक्त , पैसे लपवून ठेवायच्या जागा जरा ईन्टरेस्टिन्ग वाटल्या .
सौरभ शुक्ला बापमानूस आहे . --^-- .
त्याच्या आईचे काम मस्त आहे . घरात एवढा पैसा आहे पण माझं "पथरी" च ऑपरेशन केलं नाही म्हणते . एलियाना अतिशय वात आणते .

परवा युट्युब वर जॅकी चॅनचा (डब्ड) २ फायटर्स बघितला . जुडवा २ यावरच आधारित आहे . काही काही सीन तश्शेच्या तश्शे उचलले आहेत .
( मी भाईजानचा जुडवा अजून पाहिला नाही)

"रेड" मुव्ही पहिला >>> आम्ही पण. आवडला.

सौरभ शुक्ला बापमानूस आहे >>> +१२३ भारी काम केलयं. त्याची आई तर नंबर वन Proud

"आम्ही दोघी" सिनेमा पाहिला. नक्की बघा, चुकवू नका असा आहे. कथानक आणि प्रिया बापटचे काम आवडले.>>> मुक्ता बर्वे आणि किरण करमरकर सुद्दा आहेत चित्रपटात.

परवा युट्युब वर जॅकी चॅनचा (डब्ड) २ फायटर्स बघितला . जुडवा २ यावरच आधारित आहे . काही काही सीन तश्शेच्या तश्शे उचलले आहेत .
( मी भाईजानचा जुडवा अजून पाहिला नाही)>>> ओरिजनल जुडवा २ फायटर्स चीच नक्कल आहे.

मिसळपाववर http://www.misalpav.com/node/33582 हा लेख ऑपरेशन थंडरबोल्ट वर वाचला होता. नुकताच ह्या विषयावर आलेला " 7 Days in Entebbe" हा चित्रपट पाहीला. प्रचंड निराशा झाली. हा लेख जितका थरारक, गतीमान होता त्याच्या १०% सुद्धा चित्रपटात तसे जाणवले नाही. पैशे फुकट जाणे म्हणजे काय याचा एक अनुभव आला.

चित्रपटात सुरूवातीलाच जास्त वेळ न घालवता विमान अपहरण झालेले दाखवले आहे. त्यामुळे चांगला चित्रपट बघायला मिळेल असे वाटले पण ५-१० मिनिटात त्यांनी मातेरे करायला सुरूवात केली. चित्रपटात दोन जर्मन अपहरणकर्त्यांचे जास्त उद्दातीकरण दाखवले आहे. त्यांच्यावरच जास्त करून चित्रपट रेंगाळतो. त्यांचे फ्लाशबॅक वगैरे दाखवलेत पण ते पण इतके तुटक पणे मांडण्यात आलेत की कशाचा कशाला पत्ता लागत नाही. ब्रिगेट कुल्हमन या जर्मन स्त्री अपहरणकरत्याचा रोल रोसमुंड पाईक या अभिनेत्रीने केला आहे. (तिने आधी बॉन्डपट डाय अनादर डे मध्ये काम केलेले आठवतेयं). पण इतका कंटाळवाणा रोल तिने केलाय की त्यापेक्षा आपल्या अलिया भट किंवा कतरीनाने नक्कीच चांगले काम केले असते असे वाटून गेले. शेवटी शेवटी तर ती स्वतः इतकी कंटाळलेली वाटली की तीच इस्रायलला "या लवकर आणि मारा आम्हाला" असे सांगेल असे वाटले. तिच्या बरोबर दुसर्‍या जर्मन अपहरणकर्त्याचा रोल पण थोडाफार असाच वाटला. कोठलाही तणाव या अपहरणकर्त्यांवर जाणवला नाही.

इस्रायलचे संरक्षणमंत्री शिमॉन पेरेस आणि पंतप्रधान राबिन यांच्यातील मतभेद थोडे बर्‍यापैकी दाखवलेत पण तेही तुटकपणे मांडले आहेत. नक्की पंतप्रधानांचा कल कशाकडे होता तेच उमगत नाही. हाईट म्हणजे संपूर्ण चित्रपटात आणखी एक साईड लाईन स्टोरी म्हणजे एक इस्रायली सैनिक आणि त्याची डान्सर मैत्रीण यांचे उगाच सिन्स टाकले आहेत. म्हणजे तो सैनिक देशासाठी लढतो म्हणून हिच्या डान्स कडे त्याचे दुर्लक्ष होते वगैरे वगैरे.. त्यात एक काहीतरी इस्रायली डान्स प्रकार दाखवला आहे ज्यात या सैनिकाची मैत्रिण असते आणि ती कायम त्या प्रकारात पडत असते. (का कोणास ठावूक). चित्रपटाची सुरूवातच ह्या डान्सने होते.

चित्रपटाचा कळस म्हणजे मेन ऑपरेशन थंडरबोल्ट म्हणजे इस्रायली सैनिकांनी कसे युगांडाला रात्री विमान उतरवून अपहरणकर्त्यांचा पाडाव केला आणि सर्व बंदीवान प्रवाशांना कसे सोडवले. पण त्याचे सादरीकरण इतक्या वाईट प्रकारे झालेय की डोके आपटून घ्यावे असे वाटले. त्या सैनिकाच्या मैत्रिणीचा डान्स (ज्यात ती साऱखी पडत असते) आणि मेन ऑपरेशन थंडरबोल्ट यांची सरमिसळ केली आहे. म्हणजे ५-१० सेकंद डान्स आणि ५-१० सेकंद सैनिकी ऑपरेशन असे आलटून पालटून दाखवले आहे. त्यामुळे मूळ सैनिकी ऑपरेशन पहाण्यातली मज्जाच निघून जाते. या दोघामध्ये काहीतरी अ‍ॅनॉलॉजी दाखवायचा प्रयत्न केलाय. योनाथन नेत्यान्याहूनला तर ऑपरेशनच्या सुरूवातीलाच मारलेले दाखवले आहे.

त्यातल्या त्यात एक दोन प्रसंग म्हणजे ज्यात इदी अमीन दाखवला आहे ते बर्यापैकी जमलेत आहेत असे वाटले. पण कंटाळवाणा अभिनय आणि स्लो पेस यामुळे चित्रपट केव्हा संपतोय असे झाले होते. (इथे बंगलोरला थेटरात दोन-तीन परदेशी होते. त्यांच्या भाषेवरून ते युरोपियन असावेत असे वाटत होते. त्यांच्यापैकी एक जण चक्क चित्रपट चालू असताना झोपला होता).

त्या पेक्षा हा लेख अजून दोन-चारदा वाचला असता तर बरे झाले असते असे वाटले.

आज स्टार वॉर्स एपिसोड VIII: द लास्ट जेडाय पाहिला,
खूप मस्त आहे! कॅरी फिशरचा, मार्क हॅमिलचा performance सुंदर आहे!! टिपिकल जुन्या स्टार वॉर्स सारखा वाटतो आणि त्यामुळेच मजा येते! Music score मोठ्या आवाजात खूप भारी वाटेल!

हो, सोनू के टीटू बद्दल बरेच ऐकलंय .मलाही पाहायचा आहे ? थेटरात आहे की नाही ते चेक करते .
तू कुठे पाहिलास श्री ?

सोनु के टिटु की स्विटी >>> मस्तच एकदम

मला नाही वाटत हा मुव्ही आता कुठल्या थेटरात असेल, किमान भारतात तरी.

सोनु के टिटु की स्विटी >>> मस्तच एकदम
मला नाही वाटत हा मुव्ही आता कुठल्या थेटरात असेल, किमान भारतात तरी.
Submitted by VB on 7 April, 2018 - 15:37

नासिक मधे एक शो चालू आहे. येता का?

नासिक मधे एक शो चालू आहे. येता का?>>>>>. हो का

बर्यापैकी जुना झाला की हा मुव्ही, मला नव्हते माहित नाशकात मुव्ही ईतके जुने होईस्तोर थेटरात असतात.

अन हो, जरा नाव सांगता का थेतराचे

नाही म्हणजे पुढच्या विकांताला असणारे तिकडे, तर फेरी मारेन म्हणते तिकडे

Pages