चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच राजी पाहिला. खुप मस्त आहे . no useless songs, dances, melodrama....just pure story of a spy with facts....
सगळ्यान्चि कामे पण खुप मस्त झालि आहेत.

तिकडे टिपापावर टाकलेलेच पोस्ट इकडे
राझी पाहिला. आवडला.
स्पाय मूव्ही म्हटल्यावर बरेच स्टिरियोटाइप्स येतात डोक्यात. पण ते हाय स्पीड चेस, अ‍ॅक्शन, कधी विमानातून खाली जमिनीवर तर कधी जमिनीवरून विमानात उड्या मारणारे सलमान अक्षय असे डोक्यात असेल तर तसे काहीही नाही यात. भारत -पाक युद्ध किंवा भारत - पाक लग्न म्हटल्यावर गदर वगैरे आठवला, त्यातली ती काजळ घातलेली , क्रूर, स्व्तःच्या मुलीचाही घात करणारी कर्कश्य कॅरेक्टर्स वि. तेवढाच कर्कश्य भडक देशभक्तीपर डायलोग बोलणारा सनी देओल आणि ओपानली पंगा घेऊन ट्रक, ट्रेन उडवणे इ. वाटत असेल तर तसेही काहीही नाही यात. इटस ऑल अबाउट मॉरल कॉन्फ्लिक्ट. माझ्या मनातल्या वर्षानुवर्षांच्या स्टिरियोटाइप्स मुळे मी बरेच काही अंदाज बांधत होते पण त्यातले बरेचसे काहीही झाले नाही Happy जास्त काही लिहीत नाही. एक हार्टवार्मिंग सिनेमा. जरूर बघा असे म्हणेन.
आलिया पर्फेक्ट शोभली आहे त्या रोल मधे. नाजूक तरुण काश्मिरी दुल्हन म्हणून फार सुंदर दिसलीये. तिचे सिंपल काश्मिरी कशिदाकाम केलेले ड्रेस, शाली, नाइट गाऊन पण फार सुंदर आहेत. तिचे काम तर छान आहेच आणि बाकी सर्व सपोर्टिंग कास्टचीही कामे फार सुरेख.

१०२ पाहिला , ठिक आहे

ॠषे कपूर आवडला. स्टोरी काही नवीन नाही आणि एकांगी वाटेल पण दोन कलांकारासाठी पाहिला.

Love per square feet नावाचा सिनेमा पाहिला. सई परांजपे कुळातले स्टोरी टेलिंग. मला आवडला.

कालच राजी पाहिला. खुप मस्त आहे . no useless songs, dances, melodrama....just pure story of a spy with facts....
सगळ्यान्चि कामे पण खुप मस्त झालि आहेत.
तिकडे टिपापावर टाकलेलेच पोस्ट इकडे
राझी पाहिला. आवडला. >>>> धन्स अनघा आणि मैत्रेयी. Happy

तिकडे टिपापावर टाकलेलेच पोस्ट इकडे >>> टिपापा?

सोनू के टीटू .... पहिला,
पूर्ण पिक्चर फ्रेश आणि इंटरटेनिंग आहे, पण शेवटी गंडल्या सारखा वाटतो,
दोघे चढत्या क्रमाने पंगे घेत असताना शेवट अगदीच इमोशनल ब्लॅकमेल करणारा केलाय ,
शेवटी काही मस्त स्पिन दिला असता तर जास्त आवडले असते

102 नॉट आउट,
TP आहे, पण रिशी कपूर आणि तो दुसरा हेल्पर जास्त लक्षात राहतात, अमिताभ उगीच आहे.

राझी विषयी सहमत...खरोखर पहाण्यासारखा. पहिल्यांदा अलिया भट ची अ‍ॅक्टींग आवडली. सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. अलिया सोडून बाकी कोणी इतके मोठे स्टार नाहीत त्यामुळे हा चित्रपट पहायला आणखी बरे वाटते.

शं-ए-लॉनी सुंदर संगीत दिले आहे. ऐ वतन वतन आणि दिलबरो गाणी कितीदा ऐकली तरी समाधान होत नाही.

कथेमध्ये काही लुपहोल्स आहेत. (उदा. राझी पाकिस्तानला जाऊन सहज गच्चीवर जाऊन तारयंत्रासाठी वायर लावते. लष्करी अधिकार्‍याच्या बायकोने असे केलेले उद्योग बाहेरील सैनिकांच्या लक्षात कसे येत नाहीत? आणखी उदाहरण म्हणजे चित्रपटाच्या सुरूवातीला भारतीय हेरप्रमुख मिर याचा फोटो दाखवला आहे आणि त्यावर नजर ठेवावी लागेल असे पाकिस्तानी अधीकारी म्हणतात पण तोच हेरप्रमुख सहजपणे रजतकपुरला भेटत असतो त्यावरून पाकिस्तानी लोकांना रजतकपूरवर संशय कसा येत नाही?). पण ते चालून जाते.

आजच राझी पाहिला. खूपच छान..
आलिया बद्दल तर काय बोलणार... जबरदस्त अभिनय.!!
फक्त शेवटी एक शंका येतेय.. की तिच्या सासऱ्यांना माहित पडतं.. ती गुप्तहेर आहे मग ती भारतात आहे आणि जिवंत आहे हे त्यांना समजणार नाही का?

Bharat Ane Nenu पाहिला तेही तेलुगू, आवडला. या विषयावर हिंदी मध्ये पण नायक आणि राजनीति निघाला​य पण तरीही वेगळा वाटला (राजनीति पेक्षा तर भारीच आहे).

गेल्या आठवड्यात राझी पाहिला . आवडला . २-३ च गाणी आहेत , छान आहेत.
आलियाच काम मस्त , दिसतेही सुन्दर . विकी ला मात्र वाया घालवलं ...

काय आवडलं ...
आलिया , तिचे कपडे , तिचं दिसणं , वागणं .
सासर पाकिस्तानी पण ती भारतीय , म्हणून तिचा कोणी द्वेश करत नाही , तिच्याशी तोडून वागत नाही . आता ती ईथलीच झालीय अशा प्रेमाने तिला वागवतात . सासर्यांशी ती ईतक्या प्रेमाने वागते , बोलते , की बसं आणि त्यांचंही तिच्यावर फार जीव दाखवला आहे.
तिच्या गुप्तहेरगीरीच्या काही सीन्समध्ये आपल्याला उगाचच टेन्शन येतं .
आपली अमृता फारच गोड दिसते .
पाकिस्तान , तिथला बाजार सगळ्याचं चित्रण छान जमलयं .
भाषा .. घरात सगळे जे एकमेकांशी बोलतात ते फार गोड वाटतं .
आलियाचा प्रशिक्शक पण मस्त जमून आलाय .
विकी कौशल जाम भारी दिसतो . मला तो मसान मध्ये पण आवडलेला .
विकी आणि आलीयाचे सीन्स आवडले .

काय खटकलं ..
घरात तिघे लष्करातले लोक असूनही , घरात काय चाललयं याचा पत्ता कोणाला लागू नये ?
गुप्तहेर असले तरी कुठेही कसाही प्रवेश मिळवता येतो हे जरा अतर्क्य वाटलं .
विकी दिसतो छान , पण त्याचा लष्करात असण्याचा काही रूबाब वाटत नाही .
तिथे तो फार मेंगळट वाटतो . नुसता आपला , अपरात्री मोठ्या मिटीन्गस ना जातो , बाकी काही करताना दिसत नाही .
चलाखही वाटत नाही . ( आठवा: बशीर अहमद घरी भेटायला येतो तो सीन Happy )
सेहमत घरातून बिन्धास्त फोन वगैरे करते , ते कोणालाच काही समजत नाही.
मुनिराच कॅरेक्टर ही वायाच वाटतं , महत्वाच्या वेळी गायब असते.
सेहमत , शेवटी सुरैयाला फोन करते तिथपासून ते तिला भेटून ती घरी परत येते त्या पूर्ण सीन च प्रयोजन कळलं नाही .

चित्रपटाची बांधणी छान आहे . बघताना गुंगतो , गुन्ततो , पण थिएटर मधून बाहेर पडल्यावर फार परिणाम जाणवत नाही .
पण खर्या सेहमत ने सगळं कसं निभावलं असेल याचा विचार केला तर अंगावर काटा येतो , नक्की.

सेहमत , शेवटी सुरैयाला फोन करते तिथपासून ते तिला भेटून ती घरी परत येते त्या पूर्ण सीन च प्रयोजन कळलं नाही .
मला वाटतं मुनिराला पोलिस चोकशी पासून वाचवलं म्हण्जे सेहमतची पण चोकशी होणार नाही..म्हणून ती सुरैयाला भेटते..

पण खर्या सेहमत ने सगळं कसं निधावलं असेल याचा विचार केला तर अंगावर काटा येतो , नक्की. + १

>>पण थिएटर मधून बाहेर पडल्यावर फार परिणाम जाणवत नाही .
पण खर्या सेहमत ने सगळं कसं निधावलं असेल याचा विचार केला तर अंगावर काटा येतो , नक्की.<<

+१. आणि कादंबरी (कॉलिंग सेहमत) पब्लिश होइस्तोवर ती उजेडात का आली नाहि (सुरुवातीचा काळ भूमिगत होणं एक्वेळ मान्य करता येइल) याचीहि उकल झाली नाहि. शेवटी तिच्या मुलाला आर्मि ऑफिसरच्या युनिफॉर्ममधे पाहुन त्या कुटुंबाचा खुप अभिमान वाटला...

माझं नेमकं उलट झालं राझी बघून! सेहमतचा विचार डोक्यातून गेला नाही रात्रभर. मला पटलं दाखवलंय ते - इक्बाल तसा मृदू स्वभावाचा दाखवला आहे. हिदायत डबल एजंट आहे हे माहीत नसल्याने सेहमतवर कोणी शंका घेत नाही हे ठिक वाटतं. 1970 चा विचार करता तंत्रज्ञान आणि युद्धनीती इतके पक्के नव्हते हे पटतं. She spies on an unsuspecting family. छान आहे सिनेमा!
Real Sehmat (we don't even know her real name) must have suffered from ptsd and probably never got counseling Sad तिच्या विषयी उत्सुकता वाटून calling Sehmat विकत घेतले आहे.
अनेक दिवसांनी श्रवणीय गाणी सापडली - दिलबरो आणि ए वतन दोन्ही सुरेख आहेत!

much awaited बकेटलिस्ट काल पाहिला. तुम्ही माधुरीचे फॅन असाल (असाल म्हणजे काय ?? कोण नाहीये !!) तर सिनेमा आवडेल. एकदा पाहण्यासारखा आहे. खरंतर फार अपेक्षा घेऊन गेलो होतो, सगळ्या पूर्ण झाल्या नाहीत. एकच पूर्ण झाली, संपूर्ण सिनेमात.. जीन्स टॉप असो, कुर्ता-लेगिन्स असो, साडी - नऊवारी असो.. माधुरी कमाल दिसलीये ! विशेष उल्लेख रेणुका शहाणेच्या घरी ती पहिल्यांदा येते त्या वेळच्या साडीच्या :डोळ्यात बदामः
बर्‍याच गोष्टी खटकल्या, पण स्पॉयलर्स टाकायची घाई नाही.. तेव्हा नंतर..

Parmanu : story of pokhran - ok movies. Simple presentation fast paced. Vajpayee's clips used nicely. Better than Akshay kumar's deshbhakti doses.

मी सुद्दा वीरे दी वेडिंग पाहीला. अतिशय बकवास असा चित्रपट वाटला.

बोल्डपट म्हणून काहीतरी वेगळे पहायला मिळेल असे वाटले होते. पण चार उच्चभ्रु मुलींचे जीवन, त्यांचे लग्न आणि सेक्स लाईफ याविषयी काहीतरी असेल असे वाटले होते पण एकही गोष्ट व्यवस्थितरित्या मांडता आलेली नाही. बर्‍याच विनोदांवर अजिबात हसू आले नाही. थेटर मध्ये बर्‍याच मुली होत्या आणि त्या प्रत्येक फालतू जोक्स वर खो खो हसत होत्या. स्वरा भास्करला पाहून उगाचच सर्वजण खिदळत होते आणि ती सुद्धा फालतू बोल्ड डायलॉग मारून लोकांना हसवत होती. चित्रपटात "फ**" चा मुक्त वापर होता पण हिंदी शिव्या मात्र व्यवस्थितरित्या त्या सारख्या उच्चार असणार्‍या शब्दांनी कव्हर केल्या होत्या. मध्ये मध्ये ओढून ताणून आणलेले इमोशनल सिन्स टाकले होते. ओव्हरऑल बकवास चित्रपट वाटला.

खरंय.... तद्दन फालतू चित्रपट वाटला वीर दि वेडिंग....फक्त करीना साठी पहिला थेटर मध्ये...नाहीतर ती सोनम आणि स्वरा भयंकर डोक्यात जातात... आणि फक्त शिव्या,दारू,सिगारेट, सेक्स अस दाखवलं की खूप श्रीमंत का..शी...डोकच फिरलं आहे हा सिनेमा पाहून... व्हाट्स अप वर एक ऑडियन्स फीडबॅक देताना म्हणत होती 'वो स्वरा भास्कर हर पिच्चर मे गरीब ही दिखाई गयी हे ना.. पेहेली फार इतना आमिर बनी हे इसिलीये उस्को अमीर बननेका habit नही हैं इतने दिनोसे वो लाचार बिमार तो इतने पॅसें आये तो उस्को समजा नहि वगैरे' Biggrin अशक्य हसले मी..बरोबर बोलली ती ..

मी गुरुवारी डेडपुल २ पाहिला.. मला आवडला..

त्यानंतर शनिवारी सकाळी 'वीरे दि वेडींग' पाहिला..खुप कन्फ्युज्ड वाटला.. आवडला नाही.. सुमित व्यास आवडला त्यातला.. करिना छान दिसते परत एकदा आणि सोनम हसताना अधे मधे छान दिसते.. त्यातल ते भंडारी पात्र म्हणजे छपरीपणाचा कळस होता..अतिशय इरिटेटींग पात्र..

मग रात्री 'परमाणु' पाहिला.. लो बजेट फिल्म.. ठिके पण खुप काही दाखवता आलं असत..
डायना पेंटीला उगाच एक हिरोईन पाहिजे म्हणुन घेतलं असं वाटल.. त्या ऑपरेशन मधे जितका दम होता त्यामानाने तो अजिब्बात स्क्रिनवर मांडता आला नाही.. जॉनच्या आधीच्या काही चित्रपटांमुळे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या..
ज्या काळात हे सारं घडत होतं त्यावेळेसची फॅशन तरी जराशी मेंटेन करता आली असती तरी बरं वाटलं असत.. असो..

आता 'इन्क्रेडिबल्स २' ची वाट पाहतेय..
संजू चं ट्रेलर बघीतलं पण ज्या पद्धतीने त्याला ग्लोरीफाय केला आहे त्यावरुन तो अज्जिब्बात बघायचा नाही हे नक्की केलय..

फर्जंद बघितला. खूप आवडला. सहकुटुंब नक्की पहावा असा आहे. बघायला जाताना फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या पण त्यामुळे अजूनच भावला.
शिवाजी महाराजांच्या सरदारांपैकी एक असलेल्या कोंडाजी फर्जंदने अवघ्या ६० मावळ्यांसह जिंकलेला बलाढ्य पन्हाळा. मुलांबरोबर मलाही उत्सुकता लागून राहिली की कसं जिंकून घेणार? शेवटपर्यंत खिळून ठेवलं सिनेमाने. पहातांना रोमांच येत होते. गाणी छान आहेत. आम्ही तर ' शिवाजी राजा मल्हारी' गात गातच घरी आलो.

फर्जंद बघितला. खूप आवडला. सहकुटुंब नक्की पहावा असा आहे. बघायला जाताना फार अपेक्षा ठेवल्या नव्हत्या पण त्यामुळे अजूनच भावला. >>>>> अगदी अगदी.

काही ठीकाणी बहीर्जीला उगीच फुटेज दिअलय अस वाटल आणि मेलोड्रामा टाळता असता तर बर झालं असतं. तशा काही त्रूटी आहेत पण इतना तो चलता है. बाकी, सगळ्यांची अ‍ॅक्टींग अतिशय भारी. समीर धर्माधिकारी ने व्हिलन चांगला उभा केलाय.
चिमा महाराजांचा रोल कसा निभावतोय याची उत्सुकता होती आणि त्याने निराशा नाही केली.
बायको बरोबर असतानाही शिट्ट्या मारून पाहीलेला चित्रपट. चिरंजीव वय वर्षे ५, जाताना नको नको चाच धोशा लावलेला, अ‍ॅव्हेंजर पाहू असा हट्ट होता. पण पुर्ण चित्रपट टक लावून पाहीला. दुसर्‍या दिवशी पुन्हा फर्जंद पाहायला जाऊ अशी लाडीगोडी लावत होता.

Pages