चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शनिवारी , “मिसिण्ग“ पाहिला आणि पैसे फुकट गेल्याच्या आणि झोप उडाल्याने चिडचिड झाली.

अतिशय हास्यास्पद मांडणी.
मनोज वाजपैयी ह्याला शोव्हत नसलेली भुमिका, डोक्यात(च) (नेहमीच) जाणारा अनु कपूर, थंड तब्ब्यु

' शादी मे जरुर आना ' जबरदस्त स्टोरीलाईन , जबरदस्त परफॉर्मन्स , सुंदर रोमांस , आणि राजकुमार राव के तो क्या कहने.

थोडाफार कंटाळतंच मुलांबरोबर गेल्या आठवड्यात "रेडी प्लेयर वन" बघायला गेलेलो. मुलांच्या ०.०१% हि विडियो गेम्स मध्ये मला इंटरेस्ट नाहि पण केवळ स्पिलबर्गचा सिनेमा असल्याने गेलो. अजिबात निराश झालो नाहि उलट सिनेमा चक्क आवडला. प्योर फिक्शन आहे पण विडियो गेम्स खेळलेल्या पिढीला आणि त्यांच्या (माझ्यासारख्या न खेळलेल्या पण मुलांचं बघुन शिकलेल्या) पालकांना मस्त रिलेट होईल...

शादी मे जरुर आना ' जबरदस्त स्टोरीलाईन , जबरदस्त परफॉर्मन्स , सुंदर रोमांस , आणि राजकुमार राव के तो क्या कहने. >>> येस्स... मला पण आवडला होता हा सिनेमा Happy

प्यार का पंचनामा हा सिनेमा नुकताच पाहिला. मला आवडला. थोडा एकांगी झालाय, मुली कशा फायदा घेतात टाइप्स. पण जे काही दाखवलय ते रंजक आणि प्रत्यक्षाच्या जवळचे आहे.
अर्थात समाजाच्या एका स्पेसिफिक सेक्शनचे हे चित्रण आहे तेव्हा हे सगळ्या भारतात होते का असे आर्ग्युमेंट करण्यात काही अर्थ नाही.

सोनू के टीटू की स्वीटी बघितला... amazon prime वर आलाय!
फारसा अपेक्षा न ठेवता आणि कोणतेही reviews न वाचता बघितला.... आणि चक्क आवडला!
(बरेली की बर्फी चे पण असेच झालेले)
मस्त आहे मूव्ही.... प्यार का पंचनामा ची टीम आहे बरीचशी.... तो हिरो मला अधुनमधुन अक्षयकुमारची स्टाइल मारतोय असे वाटत होते (स्पेशली ॲम्स्टरडॅमहून परत येताना त्या हूडवाल्या टी शर्ट मध्ये)
सोनू आणि स्वीटीमधली टशन भारी.... टीटूचा माठपणा पण मस्त घेतलाय!
आलोकनाथचा घसीटा पण कमाल!
(मला अधुनमधुन का कुणास ठाउक पण मेरे यार की शादी पण आठवत होता)

मुख्य म्हणजे शेवट गंडलेला नाहीये Wink

must watch movie!

सही न्यूज.. धन्यवाद!
अर्रे मला दिसत नाहीये Sad>>>> मलाही दिसत नाहिये..अ‍ॅमेझॉन.इन चं आणि .कॉम चं प्राईम वेगवेगळं असतं का? कारण .कॉम वर पाहिलं तर नाही दिसत Uhoh

अवेंज र्‍स इन्फिनिती वॉर पाहिला फस्स् डे फस्स शो . खूप लांबडा व खूप मारा मारी मस्त आहे. बारके सारके संवा दातले जोक्स छान आहेत. बाकी स्पॉयलर लिहीत नाही. मार्वेल फॅन्स नक्की बघा. आपले सर्व ला डके हिरो आहेत , विलन पन भारी आहे. तो सोल स्टोन हासिल करतो तो सीन फारच विदारक आहे. ग्रूट आहे, जरा मोठा झाला आहे. इतके सूपर हिरो आहेत की मला गोंधळ झाला. ब्लाक पेंथर व गँग पण आहे. मी टू डी पाहिला पण थ्री डी किंवा फोरडी नक्की बघा.

अवेंज र्‍स इन्फिनिती वॉर पाहिला फस्स् डे फस्स शो . खूप लांबडा व खूप मारा मारी मस्त आहे. बारके सारके संवा दातले जोक्स छान आहेत. बाकी स्पॉयलर लिहीत नाही. मार्वेल फॅन्स नक्की बघा. आपले सर्व ला डके हिरो आहेत , विलन पन भारी आहे. तो सोल स्टोन हासिल करतो तो सीन फारच विदारक आहे. ग्रूट आहे, जरा मोठा झाला आहे. इतके सूपर हिरो आहेत की मला गोंधळ झाला. ब्लाक पेंथर व गँग पण आहे. मी टू डी पाहिला पण थ्री डी किंवा फोरडी नक्की बघा.

अ‍ॅमेझॉन.इन चं आणि .कॉम चं प्राईम वेगवेगळं असतं का? कारण .कॉम वर पाहिलं तर नाही दिसत>>>>>> बहुतेक भारतातल्या प्राईम अकाऊंट ला दिसत असेल.

बहुतेक भारतातल्या प्राईम अकाऊंट ला दिसत असेल.>>> तसंच वाटतंय, कारण काल पुन्हा चेक केलं पण नाही आलाय वाटतं अजून. अवंजर्स ४डी पण आहे? भारीच की..

Avengers Infinity War एकदम भारी आणि कडक फिल्म!!! हजारवेळा थिएटर मध्ये पाहावा असा सुंदर बनवला आहे! रुसो ब्रदर्सनी आणि बाकी मार्व्हलच्या डायरेक्टर्स नी कमाल केली आहे! तुम्हा सगळ्यांना recommend करतो की प्लिज जेवढ्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर हा चित्रपट मोठ्या स्क्रीन वर, IMAX 3d मधेच पहा! आणि तो ही post credits scene पर्यंत!(नाहीतर थिएटर वाले असे भारी hollywood चित्रपट सुद्धा फक्त दोन तीन आठवड्यातच थिएटर मधून काढून टाकतात, मोठ्या शहरातच ते एक-दोन महिने चालू शकतात) Thanos अगदी कॉमिकमधून उचलून जसाच्या तसा फिल्ममध्ये सादर केला आहे आणि आतापर्यंतचा सगळ्यात जबरदस्त व्हिलन आहे! Finally, if you've seen all the previous MCU films then expect the unexpected before going to this film.

मुलगी कालच बघुन आली Avengers Infinity War.
अजुन भारावलेली आहे. Happy
काय बाय सांगतेय. पण मला काही कळत नाही Happy
फक्त आणि फक्त थॉर तेवढा कायमचा लक्षात राहणार माझ्या. Happy

Pages