आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IIT Bombay, होस्टेल ११ मधेच असा प्रकार झाला असेल तर तो अपवाद म्हणुन समजेल.

भारतातल्या एका नावाजलेल्या विद्यापिठात सुवर्णपदक आणि शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी हा शाकाहारी आणि निर्व्यसनी असावा अशी पुर्व अट जाहिरातीतच वाचली होती. त्यामुळे असे प्रकार तुरळक होत नसावेत. नन्तर प्रकाराची सारवासारवी झाली. पण जाहिराती official circular मधे असे असणे अयोग्य आहे.
https://scroll.in/latest/857444/only-vegetarians-non-drinkers-will-be-el...

प्रत्येक नागरिकाला त्याच्या / तिला अन्न निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे. आहार निवड, शाकाहारी, मान्साहारी, मिश्रहारी किंवा अन्यथा, कोणत्याही पुरस्कारासाठी अपात्रता होऊ नये. पात्रता निकष वित्तपुरवठा करणार्‍या सस्थेने ठरवले असतीलही, परंतु मग विद्यापीठाने या अमानुष मापदंडाच्या अटींचे पालन का केले पाहिजे, जे मूलभूत मानवी हक्कांच्या विरोधात आहेत? कोणत्याही पुरस्कारासाठी निकष ठरवण्यासाठी विद्यापीठाचे स्वतःचे मानक आणि अंतिम शब्द असायला हवा.

विषय तोच आहे फक्त स्थळ आणि शैक्षणिक सन्स्था बदलली.

व्हेगन लोकांना का ही उठाठेव?>>>आपल्या कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे कनविन्स करणं किंवा मत मांडणं ची मुभा आहे.
जबरदस्ती करण्याची नाही.
बाकी वयक्तिक मतं असूच शकतात आणि एखाद्याला ती उठाठेव वाटूच शकते.ज्याला असे वाटत आहे त्याला हे एक्सप्लेन करायला/सांगायला जाऊ नये हे पर्सनल मत.

तुम्हाला प्रश्नच समजलेला नहीये. उठाठेव आहे की नाही, ती योग्य की अयोग्य हे नंतर बघू. तशी करावी का वाटते हा माझा प्रश्न आहे. संविधान कुठे आणताय विनाकारण? मुद्द्याचं बोला.

दुहेरी, तुम्ही आय आय टीत काय घडलं याबद्दल जे सांगितलंत, ते अमितव यांनी याआधीच सांगितलंय.
मी माझ्या मूळ लेखात बातमीतली वाक्य दिलीत, त्यात काही विद्यार्थ्यांनी अशी तक्रार केली असंच म्हटलंय. तेव्हा आम्ही इथे सगळ्या शाकाहार्‍यांना सुळी देतोय, असं समजणं सोडा. (यावरून आठवलं, गोरक्षकांबद्दल (गोराक्षसांबद्दल) बोलणं म्हणजे सगळ्या गोप्रेमींनी किंवा गोभक्तांना बोलणं, असा एक तर्क मागे वाचला होता).

<बऱ्याच IIT Bombayवाल्यांचे म्हणणे आहे की ही गोष्ट मेसच्या जनरल बॉडी मिटिंग मध्ये मांडता आली असती आणि चर्चेने सोर्ट झाली असती.ती तशी झाली नसती तर मग पुढली स्टेप हवी होती.पण कुणीतरी मध्येच ते फेसबुक वर टाकले आणि पसरले, politicise झाले.> मुळात ती तक्रार करणार्‍यांनी त्या मांसाहारी विद्यार्थ्यांशी संवाद साधायचा प्रयन्त केला होता का? प्रकरण सूचनेची ईमेल पाठवण्यापर्यंत तरी का पोचायल हवं होतं? मुळात त्या तक्रारीत तथ्य आहे का?
उलट हे प्रकरण बाहेर आलं ते चांगलंच झालं. (काही) शाकाहारी मांसाहारींबद्दल आणि त्यांच्या आहाराबद्दल काय विचार करतात हे समोर आलं आणि त्यावर चर्चा होऊ लागली.

तशी करावी का वाटते>> ह्याचे उत्तर माझ्या आधीच्या प्रतिसादांमध्ये आले.

ह्या लिंक मध्ये अधिक माहिती आहे ह्यात एक्सप्लेन केले आहे.ह्या लेखा मध्ये आणखीन तज्ञ लोकांच्या लिंक्स आहेत.
मी इथे मांडत नाही कारण मला इतकं सगळं नीट मांडता येणार नाही.

http://bitesizevegan.com/environmental-societal-impact/do-vegans-kill-mo...

अभि_नव तुम्ही जी माहिती दिली - i will look into it.
As per what i have read and understood, plants react and sense which is misunderstood as pain, suffering,fear etc. and there's lot of wrong research done on this line.आणि मोठ्या प्राण्यांना ज्यांची physiology किंवा nervous system जास्त well developed आहे त्यांना नक्कीच जास्त प्रमाणात संवेदना जाणवतात.
पण तुम्ही जी लिंक दिलीत i will surely look into it.धन्यवाद. Happy
आता विषय इथे थांबवुयात!

शाकाहारी प्रचारक लोक मांसाहारींना पापी समजतात अमानुष समजतात मागासलेले नीच समजतात त्यांना राक्षसांतून माणसांत आणण्यासाठीची सगळी उठाठेव आहे. आपल्यासारखे बनवण्याची तगमग. बाकी गोल्गोल शब्द फिरवुन दिलेले प्रतिसाद वाचत बसायची गरज वाटत नाही. Happy

26804873_1549663255126753_7054551443332519484_n.jpg
ह्या मुलाने जन्म घेताबरोबर त्याच्या बापाने शाकाहारीचा शिक्का लावून दिला. आजन्म शाकाहारीच राहिन असा. असे असतात वेजिटेरेरिस्ट्स. कशासाठी करतात हे सगळं?

18952710_1357062094386871_5297253445843293021_n.jpg

वेजिटेरेरिस्ट्स कसे असतात यासाठी खालच्या लिन्क वर जा व बघा.
https://www.facebook.com/pankhudii/photos?pnref=lhc

कोणाला असा नॉन-वेजिटेरेरिस्ट माहित असल्यास त्याच्याही प्रोफाइलची लिन्क द्या.

का विषय थांबवायचा? तुमच्या वेगन इज दा बेस्ट मांडणीत इतकी छिद्रं आहेत ती उघडी पडतील म्हणून?>>>
नाही.तुमच्या बऱ्याच प्रष्णांची उत्तर मी दिलेली आहेत जिथे शक्य नांहि तिथे लिंक दिली आहे.

व्हेज वालयांच्या प्रचाराला काहीं अर्थ नाही हे मी आधीही म्हंटले कारण dairy products च्या डिमांड मुळे गुरांचे mass scale artificial रिप्रोडक्शन होते आहे.इतक्या गुरांना शेवट पर्यंत जिवंत ठेवणे आणि पाळणे हे शक्य नाही त्यामुळे त्यांना slaughter करणे आजची गरजच आहे.त्यामुळे व्हेज आणि नॉन व्हेज ह्या दृष्टीने एकमेकांना पूरक आहेत.हे चित्र तेव्हाच बदलू शकेल जेव्हा काही प्रमाणात काही लोक कालांतराने व्हेगन होतील आणि आपोआपच डिमांड कमी होईल आणि सगळे व्हेगन झाले तरीही प्रॉब्लेम होईल.भारतात लोक व्हेगन होण्यासाठी प्रचारा पेक्षा डेअरी प्रॉडक्ट्सला पर्याय इसीली available असले पाहिजेत ज्याला बराच वेळ लागेल.तोस्तोवर इच्छा झाली तरी ते पाळणे अवघड, काही जणांना फक्त जमते. तूर्तास आपण एवढेच म्हणू शकतो की फार्म इंडस्ट्री ने नॉर्मस पाळावेत ते पाळल्या जात आहेत की नाही हे नीट बघितल्या जावे म्हणजे प्राण्यांना त्यातल्या त्यात नीट ट्रीट केल्या जाईल.

बाकी मी एकदाही कुणाला मागासलेला किंवा पापी किंवा अमानुष म्हटलेलं नाही. तरी माझा हेतू तुम्हाला तो वाटत असेल तर मी आणखी एक्सप्लॅनेशन देऊ इच्छित नाही.

मला सगळे व्हेगन होण्यापेक्षाही डेअरी प्रॉडक्ट मध्ये फेअर प्रॅक्टिसेस (ऑक्सिटोसिन इंजेक्शन न देणे, नीट हिरवा चारा खाऊ घालणे, एकाच गायीला दर वर्षी अमानुष रिप्रॉडक्शन सायकल मधून जायला न लावणे(गायी/म्हशी सर्क्युलेट करणे)), स्लॉटर हाऊस मध्ये परदेशातल्या सारखे कमी हाल होऊन/गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरे मारणे असे काही अपेक्षित आहे.
पण या सगळ्यावर लक्ष ठेवणे, कायदे आणणे अतिशय अशक्यप्राय आहे.

मला सगळे व्हेगन होण्यापेक्षाही डेअरी प्रॉडक्ट मध्ये फेअर प्रॅक्टिसेस (ऑक्सिटोसिन इंजेक्शन न देणे, नीट हिरवा चारा खाऊ घालणे, एकाच गायीला दर वर्षी अमानुष रिप्रॉडक्शन सायकल मधून जायला न लावणे(गायी/म्हशी सर्क्युलेट करणे)), स्लॉटर हाऊस मध्ये परदेशातल्या सारखे कमी हाल होऊन/गुंगीचे इंजेक्शन देऊन जनावरे मारणे असे काही अपेक्षित आहे.>>>बरोबर
पण या सगळ्यावर लक्ष ठेवणे, कायदे आणणे अतिशय अशक्यप्राय आहे.>>>अवघड आहे, अशक्य प्राय वाटत नाही ठरवले तर.एकदम इंटप्रूव्ह होणार नाही पण त्या दिशेने पाऊलं उचलता येतील किंवा प्रयत्न करता येतील असे मला वाटते.

मला सगळे व्हेगन होण्यापेक्षाही>>मी वर म्हंटले आहे सगळे व्हेगन झाले तरी प्रोब्लेमच होईल, थोडे फार जे होतील त्याने आपोआपच बॅलन्स येईल.

दोन्ही तायांनो,
सरकारला (सरकार चालवणाऱ्या पक्षाला सपोर्ट करणाऱ्या लोकांना) नॉनव्हेज खाल्लेलेच नको आहे. आशा परिस्थितीत, गुरे कशी मारावीत याचे नियम बनतील असे तुम्हाला वाटतंय का?

सरकारच ह्या बाबतीत सगळंच गोलमाल आहे एकीकडे म्हणतात गाय मारायची नाही पण म्हैस चालेल शिवाय आपण one of the largest exporters of beef आहोत सो सरकारचा ह्या बाबतचा दोगलेपणा उघड आहे.
शिवाय नॉन व्हेज काय खायचे नाही मुस्लिम आणि कित्येक हिंदू, ख्रिस्ती लोक नॉन व्हेज खातात हा त्यांचा आहाराचा भाग आहे. सो हे त्यांचे म्हणणे stupid आहे.

आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल आय आय टी मद्रास यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर आय आय टी मद्रासने कँटीनमध्ये शाकाहारी आणि गैरशाकाहारी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी प्रवेशद्वारे आणि वॉश बेसिन मार्क केल्याचा दावा केला आहे. फोटोजही दिले आहेत.

Food Apartheid चा नवा प्रकार
https://twitter.com/NaMo_SARKAAR/status/1156217070247268352

पं अमित शुक्ल
‏ @NaMo_SARKAAR

Just cancelled an order on @ZomatoIN they allocated a non hindu rider for my food they said they can't change rider and can't refund on cancellation I said you can't force me to take a delivery I don't want don't refund just cancel

>>>मांसाहारी व्यक्तींनी घरात जरी मांसाहार शिजवला तरी त्याच्या वासाचा त्रास वरील मजल्यावर राहणाऱ्या शाकाहारी व्यक्तींना होऊ शकतो.

मला नेहमी प्रश्न पडतो की जेव्हा असे वास सहन न होणारे बाहेर्च्याच्या देशात वगैरे जातात आणि तिथले लँडलॉर्ड्स त्यांना "आमच्या घराला करीचा स्मेल येतो" असं सांगून नाक मुरडतात तेव्हा त्यांना कसं वाटतं? हे व्हेजिटेरियन आणि नॉन-व्हेजिटेरियन दोन्ही प्रकारच्या भारतीयांना म्हणतात. भारतीयांच्या कपड्यांनासुद्धा असा वास येतो म्हणून तऱ्हे तऱ्हेचे रेसिस्ट शब्द आहेत.
अर्थात त्या त्या देशाच्या रेसिझमला आपण सगळेच नंतर अड्जस्ट होतो. पण तुमच्या कुकिंगमुळे आमच्या घराला वास येईल असे जेव्हा कुणी तोंडावर म्हणते तेव्हा कसे वाटते?
आणि मग अशा ठिकाणी जेव्हा व्हेजिटेरियन भारतीय राहायला जातात तेव्हा आजूबाजूच्या विविध देशांतून वगैरे आलेल्या लोकांच्या घरातल्या कुकिंगचे वास त्यांना कसे सहन होतात?

>>सई, मूळ लेखातलं कलम सात वाचा.
असं कसं म्हणू शकता तुम्ही?
मग सुंदर पिचाईचा फोटो लावलेले मीम कसे वापरता येणार?

Submitted by भरत. on 31 July, 2019 - 10:41

अन्नाला धर्म नसतो म्हणणे आणि प्रत्य्क्षात तसे असणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.

https://indianexpress.com/article/india/india-news-india/ujjain-madrasas...

वरील बातमी २०१६ ची आहे. धागकर्त्याचे या बातमीवरील मत जाणायचे आहे. खालील लिन्क ही पाहुन घ्यावी.

https://twitter.com/iAnkurSingh/status/1156460899114180608

Halaal meat is cut by muslim butcher only. Non muslim butcher is not allowed. This is example of religion based discrimination.
Zomato happily advertises this practice on their platform. And they also think they have the right to talk about food not having a religion. Typical liberal double standards.

मला त्या व्यक्तीने घेतलेला स्टँड पटला नाही की डिलिव्हरी बॉयच्या धर्मानुसार डिलिव्हरी घ्यायची की नाही हे ठरवायचं.
पण त्यावर थयथयाट करण्याचा नैतिक अधिकार झोमॅटोला नाही कारण ते हलाल संदर्भात भेदभाव अधिकृतपणे करत आहेत. लोक झोमॅटोवर बहिष्कार टाकत आहेत ते योग्यच आहे. गो फॉर स्विगी, दे आर द बेस्ट एनिवे.

हलाल मीट हे मुस्लीम लोकांच्या कुराणातील नियमानुसार कापले जाते. जसे कोशेर प्रकार ज्यू लोकांच्या नियमानुसार करतात तसेच हे देखील. butcher म्हणून व्यवसाय करायला कुणालाच बंदी नाही आहे फक्त हलालचे नियम पाळले नसतील तर ते 'हलाल' आहे या लेबलाखाली विकता येणार नाही इतकेच. असेच कोशेर बाबतही असते. हलाल नसलेले किंवा कोशेर नसलेले पर्याय दुकानात उपलब्ध असतातच. मला त्यात डिस्क्रिमिनेशन वाटत नाही.
डिलिव्हरी बॉयचा धर्म 'अबक' आहे म्हणून डिलिव्हरी नको हे जे आहे ते मात्र डिस्क्रिमिनेशन! कारण या कारणावरुन नकार म्हणजे त्याला नोकरी करायलाच अडचण !

Are Kay he.. kiti kathyakut karat ahet sagale. Me swata shakahari asalyamule sangate.. jyana lahanpanapasun mansahar khayachi savay nasate tyana khup tras hoto asha goshtincha. Are tumhala karaychay mansahar tar Kara na pn dusaryanchya bhavnancha pn vichar Kara. Tumhi mansahari asalyamule tumhala kahi vatat nahi. Pn khare sangate mazya Mitra maitrini jevha jevnachya table var nv Cha vishay jari kadhtat tari mala jevayachi ichha hot nahi. Pn keval tyana awkward feel hou naye Ani mala maze changale friends gamavayache nahit mhanun me kahi bolat nahi. So thode niyam mansahari lokani pn palale tar Kay harkat ahe mala kalat nahi

Pages