आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रावणात माझा मित्र कांदा ही खात नाही मग त्या महिन्यात त्याच्या शेजारी राहणाऱ्यांना फ्लॅट सोडायला सांगायचे का दुहेरी? करण ते कांद्याची लसणाची फोडणी देतात त्या वासामुळे त्याला मळमळते.

>>अर्थात नॉन व्हेज लोकांचे प्रेफेरेन्स म्हणून हा फ्रीडम आहेच पण तात्पुरता हा मुद्दा सोडून
तोच तर मूळ मुद्दा आहे. मी काय खावं हे दुसऱ्याने सांगायचा प्रश्नच येत नाही.>>हे मान्यच आहे.जोस्तोवर प्राणी खात आहात आणि इतर माणसे खात नाही आहात तो पर्यंत ठीकच आहे.

>>>मी म्हणत होते हे बाजूला ठेवून म्हणजे>>>
>>>अर्थात नॉन व्हेज लोकांचे प्रेफेरेन्स म्हणून हा फ्रीडम <<< मी खाण्याच्या फ्रीडम बद्दल बोलत नाही तो आहेच पण त्या सोबत इतर काही गोष्टी ज्या घडत आहेत tyq बद्दल बोलते आहे. जसे uncontrolled industrialization मुळे फॅक्टरी सारखे कोंबड्या,वासर जसे treat केल्या जात आहेत.त्यांचे artificial reproduction केल्या जात आहे,त्यात व्हेज वालेही येतात कारण dairy industry veg मध्ये येते.तिथले flout होणारे नियम ह्या सगळ्या बद्दल.
बाकी देशांमध्ये प्राण्याला मारताना कसे मारल्या गेले पाहिजे ह्याचे नॉर्मस आहेत (कुठले मशीन असते त्यानी म्हणे एका झटक्यात जीव जातो) जेणेकरून प्राण्याला कमीतकमी त्रास होईल.ह्याचे कारण plants आणि animal च्या physiology मध्ये फरक आहे.plants ला nervous system नसते त्यामुळे त्यांना pain होत नाही-.ह्या बद्दल मी एक वाचले (No. Without a nervous system, plants have neither a mechanism for feeling pain, nor a brain to have emotions like suffering.

Can plants detect when they are damaged? Certain plants emit chemicals when their leaves are fed upon by insects that actually attract wasps that feed on those insects, or which signal other trees to boost production of anti-feeding chemicals but it is not pain. No nerves are involved. It's just chemistry, similar to how your skin increases melanin production when exposed to sunlight.)हे चुकीचे आहे का?असेल तर जरूर सांगा. हे असे नसेल scientifically तर तसे सांगावे मग त्यांना कसे ही मारले तरी चालेल.waste नीट dispose off केले की झाले. हो आणि ह्यात त्या प्राण्याला मारण्या बद्दल आक्षेप नाही तर कसे मारले पाहिजे ह्याचे नॉर्मस न पाळल्या बद्दल concern आहे.

शिवाय मारणे सोडा इतर बाबतीत देखील माणूस फायद्याच्या हाव्यासा पोटी घालून दिलेले नॉर्मस मोडून प्राण्यांवर जे अत्याचार करतो त्या बद्दल म्हणत होते .norms पाळले तर आपोआपच ह्या गोष्टींची काळजी घेतल्या जाईल.

ok, वाद जनरल veg चांगले की नॉनव्हेज चांगले या वळणावर जाण्यापूर्वी थांबू या हा मूळ मुद्दा नाही, मूळ मुद्दा वेगळा आहे , " शाकाहारी लोक आपला चॉईस मांसाहारी लोकांवर थोपतात का? असल्यास हे बरोबर आहे का?

माझ्या मते हो, शाकाहाराला आपल्याकडे कायमच ग्लॅमर मिळाले आहे, आणि ( परस्पर संबंधांवर आधारलेले घरगुती वातावरण सोडता) शाकाहारी लोक कायमच मांसाहारी लोकांवर दादागिरी करत आले आहेत.
जे बरोबर नाही

>>ते कुणीही बदलायला सांगत नाहीये.

तुमच्या खाण्याच्या सवयी बदला नाहीतर घर मिळणार नाही असं सर्रास सांगितलं जातं
>> अहो मग ज्याठीकाणी चालते तेथे घर बघा Happy जनरली गुज्जु जैन लोकान्च्या सोसायट्या सोडुन हा त्रास इतरत्र फारसा नसावा. otherwise drag that society into Court. Court will support you and then society has to allow you. पण सोसायटी तुमचा सामाजीक बहिष्कार करेल. त्याला कोर्ट पण काही करु शकत नाही. तेव्हा असल्या येड्या शाकाहारी लोकान्च्या नादी लागु नये.

मांसाहारि लोकांनी खाल्लेले ताट्/वाट्या (स्वछ धुतल्यानंतर हि ) चालत नसतील तर बाथरुम, संडास कसे चालते त्यांनी वापरलेले ?

सिम्बा,
बऱ्याच गोष्टी एकमेकांशी linked आहेत.त्यामुळे सर्वांगाने चर्चा होऊ द्या.काही गोष्टींना बगल देऊ नका.मग काही गोष्टी उगाच ( नॉर्मस पाळणे ) glamourise केलेल्या आहेत असे वाटणार नाही आणि त्या मागच्या कारणांचा विचार होईल..

मच्छीचे पाणी घरासमोर टाकत नाही.>>>>>प्रदीपके, हे आमच्या इथच होतय. आमच्या वरती रहाणारे एक कोकणी सद्गृहस्थ (???? यांना सद्ग्रुहस्थ कसे म्हणावे?) जेव्हा मासे शिजवतात, तेव्हा वरतुन आमच्या खाली समोर बागेत ते पाणी फेकतात. दोनदा तर माझ्या सासर्‍यांच्या अंगावर ते पाणी पडले तरीही या निर्लज्ज माणसाने सॉरी देखील म्हणले नाही. उलट हसून आत निघुन गेला. वय आहे ६५+ तरीही लहान मुलासारखे वागतात. सोसायटीत तक्रार करुनही उपयोग झाला नाही.

निर्लज्जपणा, हलकटपणा ही कुठल्या जातीवर नव्हे तर माणसाच्या प्रवृत्तीवर / संस्कारावर अवलंबुन असतो.

अहो मग ज्याठीकाणी चालते तेथे घर बघा  जनरली गुज्जु जैन लोकान्च्या सोसायट्या सोडुन हा त्रास इतरत्र फारसा नसावा. otherwise drag that society into Court. Court will support you and then society has to allow you. पण सोसायटी तुमचा सामाजीक बहिष्कार करेल. त्याला कोर्ट पण काही करु शकत नाही. तेव्हा असल्या येड्या शाकाहारी लोकान्च्या नादी लागु नये. ---- +1

मराठी लोकांना विशिष्ट लोकॅलिटी मधे त्रास होत असेल तर शिवसेना पण मदत करते. खरंखोटं माहीत नाही.
तसंच हा नियम सहसा कुठेही लेखी नसतो.

 मासे शिजवतात, तेव्हा वरतुन आमच्या खाली समोर बागेत ते पाणी फेकतात. दोनदा तर माझ्या सासर्‍यांच्या अंगावर ते पाणी पडले ---- माफ करा पण तुमचे हात केळी खायला गेलेत का तुमच्या घरांत सांडपाणी, घाण नाहीये! त्यांच्यावर टाकायला?

माझ्या मते हो, शाकाहाराला आपल्याकडे कायमच ग्लॅमर मिळाले आहे, आणि ( परस्पर संबंधांवर आधारलेले घरगुती वातावरण सोडता) शाकाहारी लोक कायमच मांसाहारी लोकांवर दादागिरी करत आले आहेत.
जे बरोबर नाही>>>जिथे ते उच नीच, आम्ही काही तरी स्पेशल आणि तुम्ही नाही किंवा दादागिरी ह्या भूमिकेतून येत असेल तर ते चूक आहे.

सिंबा

"माझ्या मते हो, शाकाहाराला आपल्याकडे कायमच ग्लॅमर मिळाले आहे, आणि ( परस्पर संबंधांवर आधारलेले घरगुती वातावरण सोडता) शाकाहारी लोक कायमच मांसाहारी लोकांवर दादागिरी करत आले आहेत."

हे वाक्य प्रचंड फार फेच्ड आहे. याउलट "चटणी तून नकळत खाऊ घाला साल्यांना, चिकन बिर्याणी चा खालचा खालचा भात द्या, त्यांना काय कळतंय, खातील." वाली वाक्यं कोणी ऐकली आहेत का?

नॉन व्हेज वाले अतिशय आवडीने खाणारे आमचे चांगले मित्र आहेत.आम्ही एका टेबल वर बसतो.शिजवलेले बकरा मटन(ईद स्टाईल) सोडून बाकी सर्व नॉन व्हेज चे वास व्यवस्थित सहन होतात.चांगल्या फिश च्या रेसिपी शेअर करतो.
पण व्हेज नॉन व्हेज ला वेगळ्या प्लेट वापरा म्हणणे इतके बिग डिल ऑफेंडिंग आहे असे मला अजूनही वाटत नाहीये.सेम काऊंटर वरुन सारख्या, स्वच्छ धुतलेल्या प्लेट मध्ये काहीही कोणाबरोबरही बसून खायला हरकत नाहीये.दोन्ही प्लेट चांगल्या आणि समान साइझ आणी क्वालिटी च्या असाव्या, एकत्र बसून हसत खेळत ज्याला जे आवडेल ते खावे हे महत्वाचे नाही का?

प्रत्येक गोष्टीत 'अस्तित्व खतरेमे' चा आरडा ओरडा केलाच पाहिजे का? आपण सगळे मिडीयाचा उपयोग फक्त जास्तीत जास्त तुकडे पाडायला आणि आरोप करायलाच करतोय हल्ली.

बाकी घरं घ्यायला शाकाहारी बना वगैरे नीच बाबींना आधी पण विरोध होता आणि जमेल तिथे विरोध असेल.

जशास तसे वागले असते तर मी इथे का लिहीले असते ते? माझे सासरे त्यांना एका शब्दानेही बोलत नाहीत, वरतुन मी आणी माझ्या सासुनेच बोलणी खाल्ली सासर्‍यांची. का तर मी त्या माणसाच्या बायकोला घरी आणुन सर्व दाखवले म्हणून. दोघेही नवरा बायको भांडखोर आ॑णी निर्लज्ज आहेत.

घरचेच आम्हाला पाठिंबा देत नाहीत तर बाहेरचे माजणार नाहीत का?

पण व्हेज नॉन व्हेज ला वेगळ्या प्लेट वापरा म्हणणे इतके बिग डिल ऑफेंडिंग आहे असे मला अजूनही वाटत नाहीये >>>>

तेच तर आहे ना. व्हेज नॉन व्हेज ला वेगळ्या प्लेट वापरु नका ( स्वच्छ धुतल्यावर) म्हणणे हे मात्र बिग डिल ऑफेंडिंग आहे , नाहि का !

मासे शिजवतात, तेव्हा वरतुन आमच्या खाली समोर बागेत ते पाणी फेकतात. दोनदा तर माझ्या सासर्‍यांच्या अंगावर ते पाणी पडले>>>>>

तुमच्या मते हा प्रश्न नॉनव्हेज खाणाऱ्यांमुले आलेला आहे? की बेसिक सिव्हीक सेन्स नसल्यामुळे आला आहे?
मासे शिजवणार्यांना जागा न देऊन हा प्रश्न सुटेल? की सोसायटीत कचरा न टाकण्याचे नियम करून सुटेल?

तेच तर आहे ना. व्हेज नॉन व्हेज ला वेगळ्या प्लेट वापरु नका ( स्वच्छ धुतल्यावर) म्हणणे हे मात्र बिग डिल ऑफेंडिंग आहे , नाहि का !

तेही चालेल ना.पण दोन पैकी कोणता चॉइस वापरावा,कोणता सोयीचा हे ज्या त्या ऑर्गनायझेशन वर सोडावे ना?

1. जैन लोक नॉन जैन लोकांना घरं न विकणं- हे 2004 नन्तर यूपीए काळात जेव्हा मुंबई पुण्यात घरांचे भाव झपाट्याने वाढत होते आणि बिल्डर्स प्रचंड माज करायचे तेव्हा चर्चेत होतं. काँग्रेसने तर तेव्हा जैनांना काही दम दिला नाही. उलट 2014निवडणुकीच्या जस्ट आधी काँग्रेस सरकारने जैनांना स्पेशल स्टेटस दिलं.
2. पर्युषण काळात कत्तली बॅन पण काँग्रेसने केलं. मग सत्ता गेल्यावर यालाच विरोध करायचंही नाटक केलं.
‎3. आयआयटी मधला हा नियमही कित्येक वर्ष जुना आहे.

वरच्या लेखात मोदींचं कार्यालय काय, राम माधव काय, वेद काय, परदेशात जाणारे लोक काय - काही संबंध आहे का?
काँग्रेसने घातलेले घोळ आहेत हे. मोदींचा काय संबंध?

आम्ही घरी व्हेज नॉन व्हेजला सेम प्लेट (काचेच्या ) वापरतो. पण प्लेट डिशवोशर स्वच्छ धुवून देतो.
इथे नियम जाचक वाटत होता, मान्य नव्हता तर तो बदलायचे सनदशीर मार्ग होते. पण तसं न करता नॉन व्हेज वाले सरळ नियमच मोडत होते असं दिसतंय. सनदशीर मार्ग किंवा प्रोसेस फॉलो करणं (नियम बदलण्यासाठी) हेच आता प्रतिगामी ठरलं असावं.

तुमच्या मते हा प्रश्न नॉनव्हेज खाणाऱ्यांमुले आलेला आहे? की बेसिक सिव्हीक सेन्स नसल्यामुळे आला आहे?>>>>बेसिक सिव्हीक सेन्स नसल्यानेच आला आहे. सोसायटीतले नियमांवर विश्वास ठेवत नाहीत.

बाकी दुपारी लिहीते, आता गडबडीत आहे.

सनव
पुरावे द्या उगाच काँग्रेस च्या नावाने बोंब मारू नका तुम्हाला सवयच आहे
भाजप्या लोकांनी हे चालू केले मीरा भाईंदर निवडणुकीत जैन मुनींनी मत भाजपला करा का सांगितले मग ? कारण भाजपाने वोट बँक साठी मांसाहार दुकाने कत्तलखाने बंद राहतील असे आश्वासन दिले मुंबईतील गुजराती जैन कट्टर लोक भाजपालाच सपोर्ट करतात हे जगजाहीर आहे त्यामुळे भाजप सत्तेवर आला की त्यांची थेर वाढतात.

जनरली गुज्जु जैन लोकान्च्या सोसायट्या सोडुन हा त्रास इतरत्र फारसा नसावा.
-- फारसा शब्द वापरुन सेफ साईड घ्यायची आहे का? मलाच अनुभव आहे. भाड्याचे घर शोधत होतो. दहा पैकी चार लोकांनी नॉनवेज शिजवलेलेखाल्लेले चालणार नाही असे स्पष्ट आधीच सांगितले. का तर त्यांचे घर आहे म्हणून. ते पवित्र राहिले पाहीजे. हे सगळे मराठीच लोक होते, ते तिथे आसपास राहतही नव्हते तरी. तुम्ही अमुक जातीचे आहात का हेही बघून घर भाड्याने द्यायची पद्धत आहे.

तेही चालेल ना.पण दोन पैकी कोणता चॉइस वापरावा,कोणता सोयीचा हे ज्या त्या ऑर्गनायझेशन वर सोडावे ना?
>>>>>> कोणती ऑर्गनायझेशन ? कोण ऐड्जस्ट होणार हाच खरा प्रश्न आहे.

भाजपाने वोटबँक साठी मांसाहार दुकाने कत्तलखाने बंद राहतील असे आश्वासन दिले >> मग? वोट बँकचं लांगुलचालन हाच आरोप आहे का फक्त? ही असली अर्ग्युमेंट हा ही स्लीपरी स्लोप आहे. तुम्हाला खरंच काही वाटतंय का मोदीवर राळ उडवून दिली की इतिकर्तव्य पूर्ण झालं? अर्थात मी सरळ दिसत असताना हे परत तुम्हाला का विचारतोय हा प्रश्न उरतोच.

स्वतः च घर भाड्याने देताना पण सहिष्णुता का बाळगायची! बाकी जो घरमालक सांगतो की नवीन-veg चालणार नाही त्याच्या नाकावर टीचचून खोटे बोलून त्याचे घर भाड्याने घ्यायचं आणि असतील, नसतील तेवढे सगळे प्राणिमात्र त्या घरांत शिजवून खायचे. बॅचलर मुलांना पण सहसा कोणी घर भाड्याने देत नाहीत, जरा बरी सोसायटी असेल तर.
कोणीतरी बॅचलर मुलांच्या अन्यायाला वाचा फोडा आणि सरकारला त्यांच्या वाइट राहणीमानासाठी जबाबदार धरा. का सगळ्यांनाच मान्य आहे बॅचलर - not allowed ok.

हे वरचं पूर्ण अवांतर आहे. व्यक्तीगत वि. सामाजिक. वरचं व्यक्तिगत आहे.

याबाबतीत मी भंपक बोटीत. माझं घर भाड्याने द्यायची वेळ आली की सिंगल नको, स्टेबल जॉब, आयटी असेल तर उत्तम असं कॉनझर्व्हेटिव्ह ओपिनियन. बाकी फुकाची वाफ अर्ग्युमेंट करताना लिबरल. सध्याचं घर रिमोटली मुस्लिम माणसाला भाड्याने दिलंय. पण मी स्वतः शोईंग केलं असतं आणि चॉईस असता तर मनातल्या मनात डिस्क्रिमीनेट केलंच नसतं का? असा प्रश्न स्वतः ला विचारला तर नक्की उत्तर देता येत नाहीये.

जे अमेरिकेतुन आणी कॅनडा मधुन टंकत आहेत त्यांचासाठी --- मसाल्यांचा / फोडणीचा/तेलांचा वास येतो म्हणुन तिथे जर घरे देणे बंद केले तर काय होइल ! ??
सहिष्णुता चांगली का भांडत बसायचे आणी फुटी पाडत रहायच्या हे बघा!

https://www.dailyo.in/politics/meat-ban-beef-bjp-ruled-states-paryushan-... >>>> बीफ बैन वर चर्चा वळवायची आहे का ??>>>नाही हो, सनव म्हणाल्या की काँग्रेस ने वोट बँक साठी हे सुरु केले म्हणून शोधून बघितले तर ही लिंक मिळाली, ह्यात काँग्रेस ने ही हे काही अंशी केले आहे ह्याचा उल्लेख आहे, ते वाचून आश्चर्य वाटले.ते खरे आहे का? हे विचारायचं होतं?

काल दुपारपासूनचे प्रतिसाद वाचायचे होते. सगळे वाचले नाहीत. अमितव यांचे प्रतिसाद वाचले.
दुहेरी, तुमचे प्रतिसाद वाचताना फुगडी घालत चकवा लागलेल्या रस्त्याने जात असल्यासारखे वाटते. आणि तुमच्याशी चर्चा करताना एखाद्या डोंगराच्या एका बाजूने चढून दुसरीकडून उतरून पुन्हा खालच्या बोगद्याने अलीकडच्याच बाजूला आल्यासारखे. मायबोलीवर येऊन इतकी वर्षंं झाली तरी मला अजून हजारी मनसबदार होता आलेलं नाही, तेवढ्यासाठी तुमच्याशी चर्चा करायला आवडेल मला. सध्या वेळ नाहीए.
गाडी रुळावर आणण्यासाठी :
१ ऑब्जेक्शन मेसच्या व्यवस्थापनाने घेतलेले नाही. आधीच असलेला नियम (की कॉमनसेन्स) : तुमचं मुख्य ताट शाकाहारीच असतं, मांसाहारी पदार्थ एका वेगळ्या ताटलीत दिले जातात. हा सोयीचा मामला आहे. अमितव यांच्या प्रतिसादातून कळलं की तिथे बहुसंख्य शाकाहारी आहेत. मांसाहार दररोज नसतो. वेगळा फुल्टु मांसाहारीमेन्यु नसतो जोडीला एखाददोन मांसाहारी पदार्थ असतात.त्यामुळे मांसाहारींसाठी वेगळ्या मेन प्लेट्सची सोय करायची गरज नसावी.
२ नेमकं ऑब्जेक्शन काय आहे? तर कुणा शाकाहारी व्यक्तीला वाटतंय की आज जे ताट घेऊन मी जेवते आहे, त्यात कोणीतरी कधीतरी काहीतरी सामिष खाल्लेलं असू शकतं.
{प्लेट स्वच्छ नसण्याचा प्रश्न निकालात निघाला आहे, असे मानतो }
मग या अशा प्लेटमध्ये आता मी खाल्ल्याने मला कोणत्या भयंकर दुष्परिणामांना सामोरं जावं लागेल? आणि ते का?

याचं कोणतंही पटणारं कारणं मिळालेलं नाही.
यात वैयक्तिक आवडनिवड,घटनादत्त हक्कांची पायमल्ली इ. असतील, तर तुम्ही तुमची प्लेट आणावी, त्यापासून तुम्हाला कोणी रोखलं, तर असाच कल्ला करावा. ज्यात कधीही मांसाहार झालेला नाही अशाच ताटातून मी जेवेन असा तुमचा आग्रह, तत्त्व, नेम असेल तर त्यासाठीचा मार्ग तुम्हीच शोधायचा आहे. दुसर्‍यांना माझ्या मार्गात येऊ नका असं सांगणं हा त्यावरचा उपाय खचितच नव्हे.

पण असं वाटण्यामागचं कारण गंभीर आहे. सिंबा, व्यत्यय, इ.नी म्हटल्याप्रमाणे काही शाकाहारींना आपण शाकाहार करतो म्हणजे आपल्याला काही उच्च नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे. असं वाटत असते. वर विक्षिप्त मुलगा यांच्या प्रतिसादाचा दाखला आहे.
शिवाय हे असलं माझ्या प्लेटमध्ये कधीही आलेलं नसावं, असं म्हणताना आपण त्या पदार्थांचा स्पर्श कधीकाळी माझ्या ताटाला झालेला असल्याने माझं आहारपावित्र्य भंग होतं, म्हणजेच माझं अन्न पवित्र आहे आणि तुमचं नाही, हा जो आविर्भाव आहे त्याला माझा आक्षेप आहे. दुसर्‍याच्या आहाराबद्दल असं बोलणं हा एक प्रकारचा मानसिक हिंसाचारच आहे.
धार्मिक कल्पना बाजूला ठेवू. पण काही शाकाहारींना तेवढ्यामुळे आम्ही नैतिक उच्चासनावर बसलो आहोत आणि मांसाहार करणारे अजूनही आदिमानवाच्याच काळात आहेत, असं वाट असतं की काय?

ता.क. : मोदी, राम माधव,वेद, परदेशगमन या मुद्द्यांची ठळक दखल एकट्या सनव यांनी घेतली. (बिचारा कन्हैयाकुमार राहिला. जिग्नेश, उमर, हार्दिक आल्यापासून तसाही तो मागेच पडलाय). सनव यांचे मनापासून आभार. हे सगळं शब्दखुणांमध्ये घ्यायचं का त्यावर विचार करतो.

हि एव्हढी चार पानांची चर्चा वाचुन मला प्रश्न पडलाय कि तक्रार नेमकि कोणी केलेली आहे - मांसाहारींनी (एकाच ताटात शाका/मांसाहार घेऊ न दिल्याने) कि शाकाहारींनी (भोजनशूचितेचा भंग)? Happy

Pages