आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मग आय आय टी वाल्यांना स्वच्छ धुतलेल्या ताटात आधी कोणी काय खआल्ल याने फरक कआ पडतो?
>>
वयक्तीत आवडी निवडी. प्राधाने. भारतीय घटनेने दिलेले अधिकार. ई. ई.

तसंच ते परदेशात , गेलाबाजार एमेनसीत गेले ,तर काय करतील?
>>
विषय आय.आय.टी. च्या मेस चा आहे. परदेशातला नाही.

आधी वेगळ्या ताटाचं कोल्ड लॉजिक मांडा.
>>
वयक्तीत आवडी निवडी. प्राधाने. भारतीय घटनेने दिलेले अधिकार. ई. ई.

वैयक्तिक आवड माझ्या ताटाबद्दल चालेल. दुसऱ्याच्या नाही. अशा आवडीनिवडी असणाऱ्यांनी घराबाहेर वा आपल्या कूपाबाहेर न पढलेले उत्तम.

परदेश का नको? पुढे जाऊन ते विद्यार्थी आपल्या आवडीनिवडींना तुच्छ पैशासाठी मुरड घालणार का?
पुढचा विचार करा.
माझा लेख व्यापक आहे. तुम्ही पूर्ण वाचला असेल अशी आशा आहे.

तुम्ही पूर्ण वाचला असेल अशी आशा आहे.
Rofl

फुरोगाम्यांना उत्तर देत बसण्याव्यतिरिक्तही खुप कामं असतात आम्हाला. देशभक्त असलो म्हणुन काय झाले! Light 1 Wink

मेन प्लेट हा diplomatically incorrect शब्द email मध्ये वापरल्यामुळे प्रॉब्लेम. मुलांनी मुलांना केलेली सूचना वाटते. वेगळ्या कलर कोडेड प्लेट वापरायला पाहिजे. पण स्वयंपाकघर, serving counter एकच असेल तर सगळं already पवित्रच आहे, हे येड्या (सो-कॉल्ड, म्हणजे आता झालेल्या) शाकाहाऱ्यांना कळायला पाहिजे.

Best solution - Everyone should bring their own plates and after finishing lunch/dinner they should clean it themselves. (this is followed in some youth hostel camps)

Clarifying its position, the mess council made a statement saying the email was only sent to restate a rule which is already in place and insisted that it was not meant to offend anyone.“All hostels anyway have separate plates for vegetarian and non-vegetarian food. So, I don’t know why this email was sent in the first place. What’s worse is that it is also being misunderstood by many,” said Soumyo Mukherji, dean, student affairs, IIT-B.

विषय न वाढवलेला बरा.
तेजोमहाल विषया सारखा वाटेल नाही तर...

https://www.peta.org/about-peta/faq/are-animal-ingredients-included-in-w...

साखर पण पहा ह ! नुसती ताटे विसळुन उपयोग नाहि होणार !

अजुनहि बरेच पदार्थ आहेत. पेटावर आहे माहिती.

इतके सोपे नाहिये खरोखर व्हेज होणे ( hypocrisy न करता).

दिल्लीत शाकाहारींच्या भावना दुखावू नयेत म्हणून मांसाहारी भोजनालयांना नॉन व्हेज डिस्प्ले लावण्यावर बंदी आलीय..
हा नियम सगळीकडे करावा.

पुढे जाऊन शहरांतला बहुतांश भाग नो नॉन व्हेज झोन जाहीर करून एखादा कोपरा नॉन व्हेजसाठी ठेवावि. नॉन व्हेज खाणाऱ्यांची वस्ती, विकणाऱ्यांची दुकाऩ तिथेच ठेवा.

पण नॉन व्हेज खावंच का म्हणतो मी. एकतर नको ते खायचं आणि मग कांगावा करत रहायचं Sad
जगातले सगळे वेगन का बरं होत नाहीत?

पुढे जाऊन शहरांतला बहुतांश भाग नो नॉन व्हेज झोन जाहीर करून एखादा कोपरा नॉन व्हेजसाठी ठेवावि.>>>
ह्या सगळ्या पुढे होणाऱ्या घटना किंवा भीत्या किंवा बदल:- हे हिंदू लोकांना वाटणाऱ्या भीती सारखे आहे किंवा त्यांना वाटणाऱ्या शक्यते सारखे आहे की काँग्रेस उद्या मुस्लिम लोकांना उद्या काय काय देईल , किती पाठीशी घालेल आणि ...

गट 1 ला वाटणाऱ्या शक्यता आणि गट 3 ला वाटणाऱ्या शक्यता...

दुहेरी , नॉन व्हेज डिस्प्लेचा काय इश्यू असेल?
आमच्या सोसायटीत व्हेजिटरियन्सच चालतील, असं लोक म्हणू शकतात, ते काय आहे?
आमच्या व्रताच्या वेळी कत्तलखानेच बंद ठेवा म्हणणं काय आहे?
माझ्या प्लेटमध्ये कोणीतरी कधीतरी अ़ड खआल्ल असेल या विचाराने मला जेवण न जाणं बरोबर आहे का?
सोयीसाठी नियम असायला हरकत नाही चटकन विभागणी, बिलिंग करता येईल... पदार्थ शिजताना वास लागू नये हे ठीक आहे. वेगळे मायक्रोवेव्ह.
पण तुम्हाला सहन होत नसेल, तर तुम्हीच काचपेटीत रहा. स्वतःची ताटवाटी आणा. इ.इ.इ.

माझ्या नवर्‍याचे दोन्ही मित्र मांसाहारी ( गोव्याचे ) एक ब्राह्मण दुसरा सारस्वत. पण गोव्यात सगळे ( निदान ९० टक्के धरुया) मांसाहारी असले तरी सोमवार, शनीवार हे लोक शाकाहार घेतात. त्याला ते शिवराक म्हणतात हे बर्‍याच जणांना माहीत असेल. पण तरीही यांची व्हेज - नॉनव्हेज आहाराची भांडी वेगळी असतात/ आहेत. खुद्द मांसाहारी लोक इतके पाळतात मग शाकाहारी, जे अंडे सुद्धा खात नाहीत त्यांनी तरी का पाळु नये?

मी शाकाहारी आणी नवरा मांसाहारी आहे. मागच्या रविवारी ( संक्राती आधीचा ) नवर्‍याने शिंपले आणी सुरमई आणुन ज्या कढईत शिजवले ती मी विम लिक्वीड वापरुन साफ केली, त्यात इतर भाज्या केल्या. लग्न झाल्यापासुन हेच चालले आहे. मला काहीच वाटेनासे झालेय. अगदीच वास येत असेल तर मी खुशाल पितांबरी पावडर टाकुन घासते म्हणजे कढईचा तेलकटपणा व वास जातो. नॉनव्हेज स्वयंपाक करतांना भांडी वेगळी वापरावी कारण त्यांचा वास खरच सहजासहजी जात नाही. मिक्सर मध्ये लसुण वाटला तर भांड्याला वास येत नाही, पण झाकण प्लॅस्टिकचे असल्याने त्याचा वास जात नाही. खरच मी त्या करता जुन्या मिक्सरचे भांडे पिदडते.

अवांतर :- बाकी स्वच्छता म्हणाल, तर त्याचे भारतीयांना वावडेच आहे. परवाच पाहीले की कचर्‍या साठी दोन स्टीलची बास्केट्स रस्त्याच्या कडेला बसवुनही लोकांनी सगळी घाण खाली रस्त्यावरच टाकली होती. आणी व्हॉटस अ‍ॅप वर व्हिडीओ पाहीला, ज्यात अहमदाबाद मध्ये अधिकार्‍यांनी टाकलेल्या धाडीत त्या हॉटेल मध्ये तव्यावर झाडूने पावभाजी परतत होते आणी ४ दिवसापूर्वीचे शिळे पालक पनीर आणी माखनी लोकांना दिली गेली होती.

माझ्या प्लेटमध्ये कोणीतरी कधीतरी अ़ड खआल्ल असेल या विचाराने मला जेवण न जाणं बरोबर आहे का?>>>> हे चुकीचेच आहे. स्वच्छतेचे नियम काटेकोर पाळले म्हणजे झाले.

दिल्लीत शाकाहारींच्या भावना दुखावू नयेत म्हणून मांसाहारी भोजनालयांना नॉन व्हेज डिस्प्ले लावण्यावर बंदी आलीय.. --- हम्म! केजरीवाल, सिसोदिया जैन आहेत ना! खूपच कट्टर असतात ते लोकं. कांदा, लसूण, बटाटा, सूर्यास्ताच्या आधी जेवण, रोज सकाळी आधी त्यांच्या देवळात जाऊन मगच कामाला बाहेर पडायचे. हर्षद मेहता पण कांदा, लसूण खायचा नाही.

भरत,
मी त्यावर भाष्य केलेलच नाही आहे.मी म्हणते आहे एका घटने वरून किंवा काही घटनांवरून उद्या काय काय होऊ शकतं (कित्येक पटीने जास्त) ह्याचे picture किंवा शक्यता जी तुम्ही दाखवत आहात ते म्हणजे काँग्रेस मुस्लिमांना (शाहबानो प्रकारणानंतर) कसे पुढेही पाठीशी घालेल आणि त्यांचे काय काय ऐकेल ह्या दाखवल्या जाणाऱ्या picture किंवा शक्यते सारखे झाले आहे.

दुहेरी , नॉन व्हेज डिस्प्लेचा काय इश्यू असेल?
आमच्या सोसायटीत व्हेजिटरियन्सच चालतील, असं लोक म्हणू शकतात, ते काय आहे?
आमच्या व्रताच्या वेळी कत्तलखानेच बंद ठेवा म्हणणं काय आहे?
माझ्या प्लेटमध्ये कोणीतरी कधीतरी अ़ड खआल्ल असेल या विचाराने मला जेवण न जाणं बरोबर आहे का?
>>> असं काय सगळीकडे झाले आहे का? किती घटना.
असे बोलत आहात जसे हे किती commonly होतय.
हे म्हणजे all muslims are terrorist म्हणण्या सारखे झाले.

दुहेरी, या घटना वैयक्तिक लेवेल ला होतातच, त्याला कोणी ओब्जेक्ट करू शकत नाही,
पण जेव्हा संस्था पातळीवर या होऊ लागतात, ते पण सराकारी संस्था, तेव्हा काळजी वाटते.

जसे उदाहरणार्थ IRCTC चा डिरेक्टर मुस्लिमांचा द्वेष करू शकतो, पण जर तो IRCTC चे काही निर्णय त्या बायस मधून घेत असेल तर ते गंभीर आहे .

आणि सरकारी पातळीवर असे होणे ,गैर नाही . असे लोक मोठ्याने सांगू लागतात तेव्हा हि काळजी वाढते

मी राहतो त्या मुंबैत हे प्रकार झाले आहेत.
परिचितांकडून डब्यात नॉन व्हेज ( म्यागीचं कआहीतरी)
आणलेल्या मुलाला बाकी मुलांनी रडवेलं केलं.
एका गुरूंच्या स़ंस्थेऩ चालवलेल्या शाळांत मुलांना मांसाहार करू नये असं शिकवलं जातं असं कळलं.

इको फ्रेंडली डिस्पोझेबल प्लेट वापरणे शक्य आहे कि. सध्या पत्रावळी किंवा तत्सम मिळतात. त्या व खरकटे कंपोस्ट करता येइल. आय आय टी एनर्जी एफिशिअंट होउ शकेल. फुकट पंक्तिप्रपंचाची गरज नाही.

{खुद्द मांसाहारी लोक इतके पाळतात मग शाकाहारी, जे अंडे सुद्धा खात नाहीत त्यांनी तरी का पाळु नये?}
यामागे सोय असेल. मानसिक धार्मिक कारणही असेल. स्वतःच्या घरात काय हवं ते करा.
मी वर म्हटलं तसं, तुम्ही कोणाकडे जेवायला गेलात तर.तुम्ही शाकाहारीसाठी वेगळी भांडी वापरता कका असं विचाराल का?
आपण आपल्या शुद्ध शाकाहारी पाहुण्यांसाठी कायम वेगळ्यवेगळ्या ताटवाट्या बाळगणार का?

दुहेरी, या घटना वैयक्तिक लेवेल ला होतातच, त्याला कोणी ओब्जेक्ट करू शकत नाही,
पण जेव्हा संस्था पातळीवर या होऊ लागतात, ते पण सराकारी संस्था, तेव्हा काळजी वाटते.
आणि सरकारी पातळीवर असे होणे ,गैर नाही . असे लोक मोठ्याने सांगू लागतात तेव्हा हि काळजी वाढते>>>
मी ही सरकार पातळीवरच बोलते आहे.मी काँग्रेसचे उदाहरण दिले ते हि सरकार पातळीवर. काँग्रेस कडून अमुक एक गोष्ट झाली त्याच्यावरून जे पुढपर्यंत निष्कर्ष काढले जातात की पुढे ते असे असे करतील तेव्हा त्यांना ही हेच म्हंटल्या जाते की असे काही नाही , त्यांनी मांडलेल्या काही शक्यताना outright reject केल्या जाते.असे किती वेळा झाले हे विचारल्या जाते.असल्या गोष्टींचे issues करताय आणि इतकी बाकी काम पडली आहेत त्याच्या कडे लक्ष दिले पाहिजे असे सांगितल्या जाते.थोडक्यात त्यांच्यासाठी ती शक्यता असते तर काहींसाठी ते fear mongering, आताही तेच आहे बाजू बदलल्या.
ह्या धाग्यावर ही एका गोष्ट जी वर clear झाली आहे की काय झाले त्याला ताणून आणखीन पुढे काय काय होईल हे बरंच मांडले आहे.

ह्या धाग्यावर ही एका गोष्ट जी वर clear झाली आहे की काय झाले त्याला ताणून आणखीन पुढे काय काय होईल हे बरंच मांडले आहे.>>>>>>>>>>

धाग्याचे हेडर शुध्द अतिशयोक्ती अलंकार वापरून तिरकस विनोद निर्मिती करणारे आहे, (पहा खिचडी सन्मान संहिता धागा )
याच सरकारचे इतर ठिकाणी घेतलेले निर्णय त्याला मसाला पुरवतात.

त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया जास्त भांडणार्या, किंवा प्रशासनाची बाजू कशी बरोबर आहे हे सांगणार्या आहेत.
काय वाट्टेल ते झाले तरी "वेज आणि non वेज मध्ये दिस्क्रीमिनेशन होणे स्वाभाविक आहे आणि बरोबर आहे " छापाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या वरून वाद चालू आहे.

होप तुम्हाला परत एकदा वाचल्यावर ते जाणवेल.

तुम्ही कोणाकडे जेवायला गेलात तर.तुम्ही शाकाहारीसाठी वेगळी भांडी वापरता कका असं विचाराल का? >>>>>> +१

बाहेर कुठेहि जेवायला जाउच शकणार नाहि .
काहिजण यात उगाचच अस्वछतेचा मुद्दा घुसवत आहेत. तो मुद्दा वेगळा आहे. अस्वछतेचा मुद्दा असेल तर आधी शाकाहारी खाल्लेले असेल वा मांसाहारी याने काहि फरक पडत नाहि.
पण वरिल उदाहरण हे शाकाहार केलेल्या भांड्यात मांसाहार न करणे ( कितीहि स्वछ ताट्/भांडे) असले तरी या मुद्द्यावर आहे. माझ्या मते हे जरा अतिरेकी आहे. ह्या माणसांची मेंटल स्थिती चेक करावी सायकोलोजिस्ट कडुन आय आय टि ने

माझा नवरा आणि मुलगा दोघेही नॉन व्हेज खातात मी खात नाही पण मी बनवून देते, मासे तळून देते.चिकन बनवते. नवऱ्याचे चालू असते एक तरी piece खाऊन बघ.मी अगदीच खात नाही असे नाही.पण mostly नाही.लग्ना आधी तर खात नव्हतेच आणि लहानपणी एकदा गोव्याला गेलो होतो तेव्हा माश्या च्या वासाने इतकी हैराण झाले की वाटलं वॉश रूम मध्ये वास येणार नाही पण तिथेही माश्याचा वास येत होता.लग्नानंतर कुणीही फोर्स न करता मासे marinate आणि तळू लागले मुलासाठी.
असो तर असे बरेच लोक बरेच पुढे निघून आले आहेत त्यामुळे हे चक्र मागे फिरेल असे वाटत नाही.शिवाय भाजपा ने हे जास्त करायचा प्रयत्न केला तर हिंदूच ह्याला ओपोज करतील कारण कितीतरी हिंदूच नॉन व्हेज खातात, कितीतरी ब्राम्हण सुद्धा नॉन व्हेज खातात.तेंव्हा हे खूप फोफावणार नाही.थोडे होईल इकडे तिकडे तेवढेच व्हेज वाल्यांचे थोडे ऐकल्या सारखे होईल आणि त्यांना बरं वाटेल पण इतकही वाढणार नाही की ह्यावरून फूट पडायला सुरुवात होईल आणि तसे होता कामा नये काही incidents मुळे. असो.

तेंव्हा हे खूप फोफावणार नाही. >>>>>
तुम्हाला अक्सेप्तेब्ल लेवेल काय आहे?
नेमके कुठे कुठे झाले कि तुम्ही खूप फोफावले आहे असे म्हणणार? आणि घाबरणार?

Pages