आहारानुरूप आचारसंहिता, व्यवस्था आणि आहारसवयींचे मुद्रांकन

Submitted by भरत. on 17 January, 2018 - 00:20

मुंबईच्या आय आय टी नामक कुठल्याश्या संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आहाराची सोय करून दिली. त्यांच्या आवडीचा आहार करायचे स्वातंत्र्य दिले. इतकेच नव्हे, तर त्यांच्या आहारानुरूप ताटवाट्या इत्यादीचीही व्यवस्था केली. "आय आय टीच्या संकुलातील सर्व भोजनगृहांत देण्यत येणारे मुख्य जेवण हे शाकाहारी असून ते मोठ्या ताटामध्येच देण्यात येते. या व्यतिरिक्त ज्यांना मटण, अंडे यांसारखे मांसाहारी जेवण हवे असल्यास ते बाजूला वेगळ्या ताटामध्ये दिले जाते. मात्र विद्यार्थी मुख्य ताटामध्येच मांसाहारी जेवण घेत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी भोजनगृहाला केली. त्यानंतर मांसाहारासाठी नेमलेली ताटेच वापरावीत, मुख्य ताटांमध्ये मांसाहार करू नये, अशी सूचना भोजनगृहातून विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून देण्यात आली."

इतकी साधीशी गोष्ट. पण राईचा पर्वत करणे , खोडसाळपणा, उगा आग आग म्हणून ओरडणे अशा सवयी लागलेल्या कुणा फुरोगामी टाइप विद्यार्थिनीनीने या निर्णयाबद्दल समाजमाध्यमांत आक्षेप घेतला. समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आणि त्याला उगाच हवा दिली जाते. (हा लेखही त्याच प्रकारातला असल्याची टिप्पण्णी अपेक्षित.) मुळात विद्यार्थ्यांचं काम शिकणं हे आहे, त्यांनी आपलं पूर्ण लक्ष त्याच गोष्टीत केंद्रित केलं पाहिजे. पण विद्यार्थी आजकाल अभ्यासाव्यतिरिक्त अन्य गोष्टींतच अधिक रममाण होतात, हे आपण कन्हैयाकुमार प्रकरणात पाहिलेच आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असलेले नियम पाळलेच पाहिजेत. शिस्तीनेच राष्ट्र मोठ्ठे होते; शिशुवर्गापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली गेलीच पाहिजे, हे आदर्णीय राम माधव यांनी नुकतेच ठणकावून सांगितलेच आहेच.
असो , तूर्तास आपण आहारसवयींबद्दल विचार करतोय. वेगवेगळ्या प्रकारच्या आहारासाठी त्या त्या प्रकारच्या प्लेट्स वापरणे हे खरे तर अत्यंत सोयीचे आहे. आपल्या वेदांत त्याबद्दल उल्लेख असेलच. पण हीच गोष्ट पुढे नेऊन आणखीही काही नियम केले पाहिजेत असे मला वाटते. ते पुढीलप्रमाणे.
१. शाकाहार्‍यांच्या वस्तीत मांसाहार्‍यांना घरेच देऊच नयेतच; हे तर आता बहुतांश लोकांना मान्य झाले आहेच.
२. आपण कोणा मांसाहार्‍याकडे पाहुणे म्हणून जात असू तर शाकाहार्‍यांनी आपली ताटवाटी सोबतच घेऊनच जावेच.
३. भोजनालये, उपाहारगृहे ही एकतर शुद्ध शाकाहारी किंवा शुद्ध मांसाहारी अशीच असावीतच; नसल्यास त्यात मांसाहारींच्या बसण्याची आणि अर्थातच भांड्यांची व हात- तोंड धुण्याची सोय वेगळीच असावीच. शाकाहारी स्वयंपाकघर आणि मांसाहारी स्वयंपाकघर वेगवेगळीच असावीतच आणि एकमेकांपासून पुरेशी लांबच असावीतच.
४. विमान , दूर पल्ल्याच्या रेल्वे आणि बसेसमध्ये आहारनुरूप सीट्स दिल्याच जाव्यातच. म्हणजे शाकाहारींना मांसाहाराचे दर्शन, गंध ,नाद यांचा उपद्रवच होणारच नाहीच).
५. आधार कार्डावर व्यक्ती शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंद केलीच जावीच. तंत्रज्ञान प्रगत होईल, तसे आपण काय काय खाल्ले त्याची माहितीही आधारच्या महासंगणकातच साठवलीच जावीच.
६.शाकाहारी आणि मांसाहारींच्या पासपोर्टच्या जाकिटांच्या किनारीचे डिझाइन वेगवेगळेच ठेवावेच. (अन्य गोष्टींसाठी वेगवेगळे रंग वापरून संपल्याने हा पर्याय)
७. आय आय टी मुंबई व तत्सम उच्च शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्रांत विद्यार्थी शाकाहारी आहे की मांसाहारी याची नोंदच असावीच. शाकाहारी विद्यार्थ्यांंच्या उदात्त, उज्ज्वल, सुंदर, मंगल, सुकोमल भावनांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन व्हावे याकरिता त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मांसाहारबहुल देशांतच जाऊच देऊच नयेच. बहुतेक प्रगत देश या देशांच्या दुर्दैवाने मांसाहारबहुल आहेत. पण विश्वगुरू हिंदुस्तान आपल्या महान संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार जगभर करतोच आहेच. लवकरच जगातले बहुसंख्य देश मांसाहारच सोडूनच देतीलच. त्याचीच सुरुवात झालीच आहेच.)

मायबोलीकर या सूचनांमध्ये भरच घालतीलच. त्यांचे संकलन करून त्या सूचना केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्रालय, पंतप्रधानांचे कार्यालय, महाराष्ट्रा शासनाचा शिक्षण विभाग व आदर्णीय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय यांना पाठवायचाही विचार आहेच.

धन्यवादच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक
The resolution was moved by councillors Raj Dutt and seconded by Nandini Sharma saying that food items displayed in the open posed a danger of “contamination” and also “hurt the sentiments of vegetarian public”.
>>> This is for non veg food item display and not pictures. I think this is fine and not a big deal for restaurateurs also. Even this should be banned for veg items also. But generally they are not displayed openly.

सायबा नियम केलाय ना?
म्हणजे उद्या कोणीही सोमीगोमी सेना जाऊन तिकडे तोडफोड करतील, आणि इकडे धागा काढल्यावर लोक "असा असा नियम होता , हॉटेल वाल्यानेच तो पाळला नाही, आता तुम्ही XYZ सेने बद्दल आवाज उठवून त्या हॉटेल वाल्याच्या गुन्ह्याचे समर्थन करताय का ? " असे विचारणाऱ्या पोस्टी येतील

मंदार्द,
अड्ड्यावर एक पोस्त टाकली आहेकायदेशीर मार्गाने दिस्क्रीमिनेत करण्या बद्दल, तिकडे बोलू हवे तर,

नियमात चुक काय आहे? जाऊदे ह्यामुद्यावर वाद घालण्यात अर्थ नाही. तसाही हा नियम अजुन लागु झाला नाही. विचाराधीन आहे.

मंदार्द,
अड्ड्यावर एक पोस्त टाकली आहेकायदेशीर मार्गाने दिस्क्रीमिनेत करण्या बद्दल, तिकडे बोलू हवे तर, >> बर

mandar,
फक्त खाणे कोन्तामिनेत होण्या बद्दल मुद्दा असला तर नियम बनवताना veg /non veg असा फरक नको होता असे तुम्हाला वाटत नाही का?

But generally they are not displayed openly.>>>>> नियम बनवताना १००% सिनरिओ विचारात घेतले जावे हि अपेक्षा चुक आहे का?

दुसरे कारण ज्याच्यावर आरडओरड होतेय , ते त्यांनीच उघडपणे दिले आहे, त्याबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही आहात. तुम्हाला ते मान्य आहे म्हणून? कि त्याच्या विरुध्ध काही डिफेन्स नाहीये म्हणून?

हे सरळसरळ डिस्क्रिमिनेशन आणि अ‍ॅपर्थाइड आहे. पन्नाससाठ वर्षांपूर्वी लहान शहरांत आणि खेडेगावांत अस्पृश्यांसाठी चहाचा कप, पाण्याचा पेला वेगळा असे. तो घरात घेतला जात नसे. इतकेच काय घरचे लोक त्याला हातही लावत नसत. जो त्यातून पाणी पिणार आहे त्यानेच तो पेला धुवून घ्यायचा. त्याने तो कितीही स्वच्छ- अगदी राखेने घासघासून घेतला तरी त्या भांड्याला घरात स्थान नसे. विटाळशीची भांडीसुद्धा तशीच वेगळी असत आणि विटाळ संपला तरी ती बाई त्या भांड्यांतून खात पीत नसे.
या मनोवृत्तीमागे कारण स्वच्छता हे नाही तर इतरांना हीन मानण्याचे छुपे कारण आहे.

दिल्लीत जे झालेय अगदी त्याचं टेम्प्लेट वर हा निर्णय दिसतोय

कारण पुढे करताना स्वच्छतेचे कारण दिले जातेय, ज्याचे मूळ उत्तर वेगळे आहे (दिल्लीत स्वच्छतेचे नियम दोघांना सारखेच लावणे, मुंबई मध्ये भांडी निट घासणे) मात्र हाच मुद्दा पुढे करून भावनिक मुद्दा पुढे रेटला जातोय (दिल्लीत उघडपण), मुंबई मध्ये अजून त्यांनी ते कारण अजूनतरी सांगितले नाही आहे).

आणि दोन्ही कडे समर्थक भावनिक मुद्दा अस्तित्वात नाहीच असे समजून युक्तिवाद करत आहेत

भावनिक मुद्दा अस्तित्वात आहेच.फक्त त्या भावनीक आहेत लॉजिकल नाही त्यामुळे भावनिक समजून त्या कितपत practically allowable किंवा acceptable/adjustable आहेत discrimination च्या पातळी पर्यंत न जाता/नेता हा प्रश्ण येतो. सुवर्ण मध्य काढता आला तर बरं.

मुळे भावनिक समजून त्या कितपत allowable किंवा acceptable/adjustable आहेत discrimination च्या पातळी पर्यंत न जाता हा प्रश्ण येतो..>>>>>>>
जेव्हा हा मुद्दा घरात असतो तेव्हा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, प्रत्येकाच्या विवेकबुद्धीवर हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो.
पण जेव्हा हा मुद्दा सार्वजनिक स्पेस मध्ये येतो गोष्टी ट्रिकी होतात

हो सिम्बा tricky होतात पण सामंजस्याने सोडवल्या तर सुटू शकतात, अशक्य नाहीत.काही आम्ही तुमचे ऐकतो काही तुम्ही आमचे ऐका sort of. कारण घर हा छोटा ग्रुप झाला आणि देश हा मोठा ग्रुप पण लोकांचाच. घरातील व्यक्तींच्या भावनांचा सोयीचा सवयीचा काही प्रमाणात आदर किंवा acceptance ठेवता येण शक्य असेल तर तो देशातल्या मोठ्या ग्रुप मध्ये ही शक्यच आहे.
आणि आपण बऱ्याच बाबतीत तसे करतो ही नाहीतर एवढे वेगवेगळे धर्म,जाती, culture घेऊन चालणे शक्यच नव्हते.

ताई, इन प्रिंसिपल तुम्ही बोलताय ते बरोबर आहे,
पण प्रत्यक्षात काय होतंय आता?
जर शाकाहारी लोक आपला प्रेफरन्स लादणार असतील तर संस्थानी हे बायस अजून घट्ट होतिल अशी भूमिका घ्यायची की काय करायचं

रस्त्यावर भाज्या वगैरे विकू नये .. माझ्या सारख्या मांसाहारी व्यक्तीच्या भावना दुखावतात. कोबी फ्लावर गवार भेंडी यांना तोडताना किती वेदना होत असतील? त्यांच्या जवळून जाताना कानात त्यांची किंचाळी ऐकायला येते. वर कुठल्याश्या डबक्यातले पाणी सतत मारून निर्जीव जीवाला ताजे दाखवण्याचा विकृत आनंद तो भाजीवाला घेत असतो ते बघून डोक्यात सनक येते.
आमच्या सोबत कोणी शाकाहारी जेवताना बसला तर त्याला हाकलून लावतो. आम्ही चिकन मटण खात असताना समोर असलं घासफूस कोणी खात असलेले बघवत नाही.

ताई, इन प्रिंसिपल तुम्ही बोलताय ते बरोबर आहे,
पण प्रत्यक्षात काय होतंय आता?
>>> असे म्हणताना असे वाटत आहे की असे सगळीकडे होत आहे आणि नको नको ते होत आहे.प्रत्येक्षात नक्की किती टक्के आणि नक्की काय/किती होत आहे?

जर शाकाहारी लोक आपला प्रेफरन्स लादणार असतील तर संस्थानी हे बायस अजून घट्ट होतिल अशी भूमिका घ्यायची की काय करायचं>>>
प्रेफरन्स लादणे म्हणजे काय? कुठली पातळी ओलांडली की त्यांनी त्यांचा प्रेफेरेन्स लादला हे होईल आणि mutual adjustment पलीकडे जाईल ?
उलट गेले 10 12 वर्ष व्हेज वाले नॉन व्हेज वाल्यांच्या प्रेफेरेन्स चा आदरच करत आहेत (ह्यात उपकार भाषा नाही)- घरीही आणि देशातही तेंव्हा नॉन व्हेज वाल्यांनी आपलेच घर आणि आपलाच देश असल्या सारखे करू नये त्यांनीही थोडी adjustment ची तयारी दाखवावी. शक्यतोर adjustment अशीही करता येईल की दोघांना मुरड घालावी लागणार नाही पण लागलीच तर काही बाबतीत एकाने घालावी तेच कुठल्या तरी दुसऱ्या बाबतीत दुसऱ्याने घालावी.mutual adjustment with understanding केले तर मग ते प्रेफेरेन्स लादल्या सारखे होणार नाही.

बरं एक एक उदाहरण घेऊ,
गेल्या 5 8 वर्षात नॉन व्हेज लोकांना घरे विकणार नाही अशी भूमिका बिल्डर घेत आहेत.
या बिल्डिंगीत घर हवे असेल तर घरात मास मच्छी शिजवता येणार नाही असे बिल्डिंग चा सेक्रेटरी सांगतो,
ही कोणी कोणा साठी केलेली अडजस्टमेंट आहे?

जेट एअरवेज, मुंबई अहमदाबाद रूट वर केवळ व्हेज जेवण सर्व करत असे (हे मी 4 5 वर्षांपूर्वीचे सांगतो आहे, आता जेवण सर्व करतात हीच बातमी ठरेल)
अर्थात यात त्यांनी काही कारण दिले नाहीये, पण कस्टमर पुल हे कारण आहे हे उघड आहे.

शाकाहारी वाल्यांनी स्वतःची कट्टरता घरात ठेवावी दुसऱ्यांच्या घरात काय शिजते ते डोकावून बघण्याचा हलकटपणा करू नये. मांसाहारी लोक काय तुमच्या डोळ्यासमोर कोंबडी कापत नाही आणि मच्छीचे पाणी घरासमोर टाकत नाही. मग कशावरून या शाकाहारी लोकांचा इगो दुखावला जातोय तेच कळत नाही? झाडे तोडून त्यांचा जीव घेतात ते कसे चालते?
रस्त्यावर कोळीवाड्यामध्ये लोखंडी बार वर लावलेल्या कोंबदयाना बघून म्हणे भावना दुखावतात. ! हास्यास्पद आहे कोणी मूर्खाने हे लॉजिक काढले ? बहुदा हे भाजप्येच असणार.
आमच्या ऑफिस मध्ये गुजराती मॅनेजर होता. तो स्वतः शाकाहारी होता. एकदा असाच त्याने ऑफिस मध्ये मांसाहार करू नये म्हणून फतवा काढला. का तर ऑफिस मध्ये देव्हारा आहे अमुक आहे कलेक्शन होत नाही धंदा होत नाही अशी कारणे द्यायला लागला.
1 आठवडा बघितले नखरे पुढच्या आठवड्यात बुधवारी सगळ्यांना मासे बिर्याणी वगैरे आणायला सांगितले आणि सगळ्यांनी ऑफिस मध्ये बसूनच खाल्ले.. त्याला धक्के मारून ऑफिस मधून हाकलले. बॉस कडे तक्रार केल्यावर आम्हीच सांगितले की इतकी वर्षे आम्ही इथे जेवण जेवतोय कधी धंदा मंदीत आला नाही आणि हे बेण गुजरात वरून येऊन आमच्यात मांसाहार शाकाहार करायला बघतोय. याला धंदा सांभाळता येत नाही आणि खापर जेवणावर फोडतोय. सगळ्यांनी असला सुनावला. तेव्हापासून त्याने दिलेली प्रत्येक वस्तू आम्ही रुमालाने साफ करायला लावतो मगच घेतो. त्याला स्वतः ची लाज वाटायला लावत आहे.
मुळात आमच्या इथे 60% शाकहारीच लोक आहे पण त्यांना कधी इतरांचा प्रॉब्लम झाला नाही पण हा इसम त्या गोष्टीचे भांडवल करून त्यांचा एक ग्रुप बनवण्याचा प्लान होता म्हणजे 60% लोक झुकली की इतरांवर राज्य करायला सोप्पे
या लोकांना वेळीच रोखायला हवे. असली लोक इतरांच्या मनात विष कालवून आपल्याच लोकांना एकमेकांशी भांडायला लावतात.

बरं एक एक उदाहरण घेऊ,
गेल्या 5 8 वर्षात नॉन व्हेज लोकांना घरे विकणार नाही अशी भूमिका बिल्डर घेत आहेत.
या बिल्डिंगीत घर हवे असेल तर घरात मास मच्छी शिजवता येणार नाही असे बिल्डिंग चा सेक्रेटरी सांगतो,
ही कोणी कोणा साठी केलेली अडजस्टमेंट आहे?>>>ती बिल्डिंग private ownership ची आहे का आणि बिल्डर असे सांगतो आहे का? मग ह्यात त्याचा businessचा अँगल येतो.व्हेज नॉन व्हेज हा मूळ मुद्दा रहात नाही.
गोवेर्मेंट कॉम्प्लेक्स आहेत आणि तिथे ते म्हणत असतील कि फक्त व्हेज वाल्यांना ब्लॉक मिळेल किंवा आर्मी ला अलोकेट केलेल्या सोसायटीत असे म्हणत असतील कि फक्त व्हेज वाले राहू शकतील तर मग हे प्रेफेरेन्स लादल्या सारखे किंवा दुसऱ्याचा हक्क / equal oppurtunity डावलल्या सारखे होईल.

माझ्या मते बाहेर रस्त्यावर काय डिस्प्ले करू नये-( बकऱ्यांची मुंडके,मास,शेपूट,कोंबड्यांची तंगड्या roast होताना डिस्प्ले करू नये.):- ही काय जाचक मागणी नाही सहज ऍडजस्ट होण्या सारखी आहे . पण त्याच्या हॉटेल च्या आत त्याने काय डिस्प्ले करावे किंवा काय सर्व्ह करावे हा त्याचा प्रश्ण आहे.किंवा goverment संस्थे मध्ये हा आग्रह धरणे कि व्हेजच खाल्ले पाहिजे आणि त्या साठी कायदा करणे हे चुकीचे किंवा ते नॉन व्हेज खाणार म्हणून त्यांना दुय्यम सोयी मिळतील (असून मिळणार नाहीत) हे चुकीचे.

व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल मार्केट हे सोयीस्कर वेगवेगळे ठेवले आहे आणि ते सहज शक्य आहे.

वेज, नॉनवेजकरता प्लेट्स सारख्याच असायला काहीच हरकत नाही. त्या स्वच्छ हव्यात मात्र (हे कोणत्याही जेवणाला लागू होतं). व्हेज, नॉनव्हेज पदार्थांचे सेक्शन्स किंचीत सेपरेट असल्यास हरकत नाही. ज्यांना शेजारी, समोर नॉनव्हेज जेवण जेवणारा बसलेला चालतो त्यांनी एकत्र बसावं आणि ज्यांना चालत नसेल त्यांनी बसावं वेगळ्या टेबलावर. रेस्टॉरंट्समध्ये बफे जिथे लावतात तिथे असंच असतं ना? आयुष्य इतकं काँप्लिकेटेड करायची गरजच काय?

>>समाजमाध्यमांच्या सहज उपलबधतेमुळे आजकाल कोणीही उठतो, काहीही लिहितो आनि त्याला उगाच हवा दिली जाते. >> ह्याच्याशी सहमत. मायबोली, फेसबुक जिथे तिथे हेच दिसतं.

>>ही काय जाचक मागणी नाही सहज ऍडजस्ट होण्या सारखी आहे

काय जाचक आणि काय नाही हे कोण ठरवणार?
माझ्या दुकानाच्या आत जी वस्तू विकतो तिला दर्शनी भागात डिस्प्ले करायचं की नाही हे सरकारने का सांगावं

>>आयुष्य इतकं काँप्लिकेटेड करायची गरजच काय?
खरंय, उगाच कशाला सेपेरेशन्स आणि पार्टीशन्स. सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं आणि ज्याला जे हवं ते खाऊ द्यावं. आपला सवतासुभा कशापायी?

इतकं गडाबडा लोळून हसण्यासारखं त्यात काही नाही हो व्यत्यय. नीट विचार केलात, रेस्टॉरंट्स डोळ्यासमोर आणलीत तर लक्षात येईल.

>>उलट गेले 10 12 वर्ष व्हेज वाले नॉन व्हेज वाल्यांच्या प्रेफेरेन्स चा आदरच करत आहेत (ह्यात उपकार भाषा नाही)-

कायच्या काय. उलट नॉन व्हेज वाले खूप मवाळ भूमिका घेत आलेत ज्यामुळे आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ पहातेय.

>>ही काय जाचक मागणी नाही सहज ऍडजस्ट होण्या सारखी आहे
काय जाचक आणि काय नाही हे कोण ठरवणार?>>>एक्साक्टली हे रेलटिव्ह आहे म्हणूनच ते सामंज्स्यास्याने adjustment करून सोडवले तर बरे.मग कायदे करायची गरज भासत नाही.

माझ्या दुकानाच्या आत जी वस्तू विकतो तिला दर्शनी भागात डिस्प्ले करायचं की नाही हे सरकारने का सांगावं
>>> हो कारण ते बऱ्याच वेळा अर्ध रस्त्यावर आलेलं असतं.

अरे काही ठिकाणी तर बील्डिंगी बाहेरून कश्या दिसाव्यात ह्या साठीही कायदे आहेत.तर हॉटेल च्या डिस्प्ले एरिया मध्ये काय ठेवावे आणि कश्या पद्धतीने ह्यावर guide lines असायला हरकत नाहीत कारण ते लोकांना दिसते त्यांना डोळे मिटून रस्त्यावरून जा हे म्हणणे म्हणजे त्यांच्यावर तुमचा प्रेफेरेन्स लादणे हे आहे.आता बोला.

>>आयुष्य इतकं काँप्लिकेटेड करायची गरजच काय?
खरंय, उगाच कशाला सेपेरेशन्स आणि पार्टीशन्स. सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं आणि ज्याला जे हवं ते खाऊ द्यावं. आपला सवतासुभा कशापायी?>>>जे हवं ते खाऊ देतच आहोत.त्या असं कुठे म्हणाल्या की नॉन व्हेज खायचे नाही.
व्हेज वाल्यांसाठी किचन सहज वेगळे ठेवणे शक्य असेल तर तरीही ते एकत्रितच असले पाहिजे हा अट्टाहास कशाला.

बरं दुहेरी,
तुम्हाला काय पुरावा दिला की तुम्हाला पटेल की नॉनव्हेज लोकांवर व्हेज पर्याय लादला जातो ?

>> हो कारण ते बऱ्याच वेळा अर्ध रस्त्यावर आलेलं असतं.
हा फक्त नॉन व्हेज चा प्रॉब्लेम नाही. दुकानाच्या बाहेर भाज्या/धान्याची पोती कित्येक जणं ठेवतात. अनधिकृत अतिक्रमण चुकीचंच आहे.

>>कारण ते लोकांना दिसते
अहो, ते लोकांना दिसावे हाच तर उद्देश आहे.

उद्या कोणीही उठेल आणि मला बघवत नाही म्हणून तक्रार करेल. कोणाला लटकवलेल्या साड्या बघून भ्रष्ट भावना वाटेल, कोणाला गाडी चालवताना दुकानातील चालू टीव्ही बघून लक्ष विचलित होईल, कोणाला मिठाईच्या दुकान बाहेर उकळणाऱ्या दुधाच्या वासाने मळमळेल, कोणाला चामड्याच्या चपला बघून मेलेले प्राणी आठवतील; या सगळ्यांवर तुम्ही प्रेफरन्स लादणार का? उगाच कायतरी अर्ग्युमेंट करायचं म्हणून करायचं

>> व्हेज वाल्यांसाठी किचन सहज वेगळे ठेवणे शक्य असेल
पुन्हा तेच. सहज की कठीण हे कोण ठरवणार? आतापर्यंत आपल्याकडे नॉनव्हेज लोकांनी नको तितकी मवाळ भूमिका घेतलीय म्हणून हे दिवस बघावे लागताहेत. परदेशात हे वेगळ्या किचनचे लाड चालतात का?

>>आधी वेगळ्या ताटाचं कोल्ड लॉजिक मांडा.<<

आयाय्टीची मेस असल्याने वेगळ्या ताटांची पद्धत हि रिलिजस वॅल्युज पेक्षा प्रोसेस ड्रिवन असण्याची शक्यता मला जास्त वाटते. म्हणजे, मांसाहारी ताटं/वाट्या शाकाहारी ताटं/वाट्यांपेक्षा जास्त ग्रीजी, स्टिकिंग असल्याने वेगळ्या डिशवॉशर मध्ये (किंवा सेपरेट बॅचमध्ये) लावली जात असतील... Proud

>>मांसाहारी ताटं/वाट्या शाकाहारी ताटं/वाट्यांपेक्षा जास्त ग्रीजी, स्टिकिंग असल्याने

अच्छा म्हणजे बटर पनीर पेक्षा बटर चिकन जास्त स्टीकिंग असतं की लोणचं, श्रीखंड, भरीत, पिठलं हे चिकट नसतात?

लेख आणि पहिल्या पानावरचे प्रतिसाद वाचले.

निरीक्षण १ - मांसाहारी लोकांना शाकाहारी ताट चालते.
निरीक्षण २ - काही शाकाहारी लोकांना मांसाहारी लोकांचे वापरून धुतलेले ताट चालते - याला आपण टाईप १ शाकाहारी बोलूया.
निरीक्षण ३ - काही शाकाहारी लोकांना मात्र मांसाहारी लोकांचे वापरून धुतलेले ताट चालत नाही - याला आपण टाईप २ शाकाहारी बोलूया.

एकूणात मांसाहारी लोकांना संत म्हणता येईल. ते अन्नात भेदभाव करत नाही. पण त्यांना तुर्तास बाजूला ठेवूया. आणि आधी फक्त शाकाहारी लोकांवर कॉन्सट्रेट करूया.

शाकाहारी लोकांमध्ये टाईप १ च्या शाकाहारी लोकांना या सेपरेट ताटवाटी नियमाची गरज नसावी.
टाईप २ चे शाकाहारी लोकांची सेपरेट ताटवाटी मागणी असली तरी ते तुलनेत अल्पसंख्यांक असावेत असा कयास.
आणि अल्पसंख्यांकाच्या मागण्या नेहमीच मान्य केल्या जाव्यात असे लोकशाहीचे लॉजिक सांगते.
त्यामुळे त्यांना सेपरेट ताटवाटी देण्यात मला प्रामाणिकपणे काही गैर वाटत नाही.

फक्त,
त्या सेपरेट ताटवाटीसाठी त्यांच्याकडून फी आकारली जावी. ते नक्कीच हसत हसत देतील.

जर कोणी मांसाहारी व्यक्तीही असा आग्रह करत असतील की आम्हालाही सेपरेट ताटवाटी हवी तर त्यांच्या ग्रूपलाही सेपरेट ताटवाटी देण्यात यावी.
अर्थात त्यांच्याकडूनही मग फी उकळली जावी.

थोडक्यात तीन ग्रूप पडले. आम्हाला फक्त शाकाहारीच ताट हवे. आम्हाला फक्त मांसाहारीच ताट हवे. आम्हाला कुठलेही ताट चालेल. तर सरळ तीन रंगाची ताटे घ्यावीत. याने राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागायलाही मदत होईल.

याऊपर कोणी राजाबाबू असेल, ज्याला कुठल्याही ग्रूपबरोबर जायचे नसून स्वत:चेच सेपरेट ताटवाटी हवी असेल तर त्यालाही ज्यादा पैसे आकारून ती सुविधा द्यायला हरकत नाही.

आता पुढचा विचार,
या मिळणार्‍या फी च्या पैश्यातून भांडी घासणार्‍याला परफॉर्मन्स बोनस देता येईल. तसेच छान आणि महागडी भांडी घासायची पावडर विकत घेता येईल. याबाबत पहिल्या पानावर सस्मित आणि अनू यांनी हलकीशी चर्चा केली आहे. त्यांची मते ईथेच लक्षात घेता येतील. लगेच वेगळा धागा काढू नका.

तर, एकदा का भांडी चकाचक दिसू लागली, की लोकांचे वेगळ्या ताटाचे हट्ट मागे पडतील.
मग तो दिवस फार दूर नाही जेव्हा शाकाहारी आणि मांसाहारी वर्गमित्र एका ताटात जेवून आपली मैत्री वाढवतील.

लाईफ खूप सिंपल आहे, आपण उगाच शब्दांचे खेळ करत कॉम्पिलिकेटेड करून ठेवतो Happy

Pages