‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी
..
‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !
..
- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
..
भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार
..
भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
..
चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__
..
गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी
..
‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे
..
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर
..
‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर
..
‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज
..
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन
..
अॅण्ड फायनली ...............
‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना
..
आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष
सॉरी अवांतर - जौहर काय आहे?
सॉरी अवांतर - जौहर काय आहे?
सती जाणे
स्वतःहून आगीत बलिदान.. इज्जत वाचवण्यासाठी..
जौहर का जोहार नक्की माहित
जौहर का जोहार नक्की माहित नाही. परंतू परकीय आक्रमकांपासून आपली आब्रू वाचवण्यासाठी पूर्वी स्त्रीया स्वतःहून आगीत बलीदान देत त्याला म्हणतात.
वाट बघून थकलो होतो, आला बाबा
वाट बघून थकलो होतो, आला बाबा एकदाच ऋ चा धागा. चलने दो.
पण झालंय काय? खिल्जी आणि
पण झालंय काय? खिल्जी आणि पदमीचा धडक धडक डॅन्स का तडक भडक रोमॅन्स दाखवलाय का सिनेम्यात? का पद्मीचे मिस्टर महाराज आणि खिल्जीचा पिंगा?
‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक
‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?">>> स्त्रियांबद्दल अशी भाषा वापरणारे कोणत्याही स्त्रीचा आदर करू शकत नाहीत!!
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’>>> जावेद अख्तरचे म्हणणे ह्यावेळेस पटले.
{{{ ‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली
{{{ ‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’>>> जावेद अख्तरचे म्हणणे ह्यावेळेस पटले. }}}
मग त्या अनारकलीच्या काल्पनिक कथेत बदल का केला? अकबराच्या इमेजला धक्का बसू नये म्हणूनच ना? अनारकलीला भिंतीत चिणून ठार करण्याचा आदेश देणारा अकबर मुगले आझम चित्रपटात मात्र भिंतीची मागली बाजू मोकळी ठेवून अनारकलीला जीवदान देण्याइतका दिलदार दाखवलाय मुगले आझम मध्ये.
जावेदची द्वितीय पत्नी शबानाच्या तोंडी मंडी चित्रपटात "नंगेसे भगवान भी डरता है" हे वाक्य टाकताना खुदा शब्द का वापरला नाही?
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’>>> जावेद अख्तरचे म्हणणे ह्यावेळेस पटले. >>> चित्रपटातील पात्राचे नाव राणी पद्मावती. रजपुतांची महाराणी. रत्नसेन आणि खिल्जि ही बाकीची पात्रे. आणि तरीहि म्हणायचे याचा इतिहासाशी संबंध नाही. असो बाकी इतिहासाची मोडतोड करुन राणी पद्मावतीचे किंवा कोणत्याही स्त्रीचे चरित्र् मलीन करायचे . हे खुप खटकते.
भूषण यांनी चित्रपट बघितला आहे
भूषण यांनी चित्रपट बघितला आहे वाटते तरीच इतक्या ठामपणे मोडतोड वगैरे बोलत आहे.
मग दशक्रिया चित्रपटात मोडतोड ना करता स्पष्ट खरं दाखवल्यावर त्यावर बंदीची मागणी का होत आहे?
दोन्ही बाजूने ढोल वाजवायचे ?
अनारकलीला जीवदान देण्याइतका
अनारकलीला जीवदान देण्याइतका दिलदार दाखवलाय मुगले आझम मध्ये. >> माझ्या मते अनारकली चित्रपटात तिला भिंतीत चिणलेलेसुद्धा दाखविले आहे.
जावेदची द्वितीय पत्नी शबानाच्या तोंडी मंडी चित्रपटात "नंगेसे भगवान भी डरता है" हे वाक्य टाकताना खुदा शब्द का वापरला नाही? >> मंडी चित्रपटाचा आणि जावेद अख्तर चा काय संबंध??? केवळ शबाना आझमीने काम केले म्हणून!!!!
इतिहासाची मोडतोड करुन राणी पद्मावतीचे किंवा कोणत्याही स्त्रीचे चरित्र्य मलीन करायचे . हे खुप खटकते.>>> चित्रपट पहाण्याआधीच कसे काय ठरविले तुम्ही की चारित्र्य मलिन केले आहे की नाही??? ‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’, "जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?" असली वक्त्यव्ये खटकत नाहीत का??
कशी खटकणार उलट हे लोक त्याचे
कशी खटकणार उलट हे लोक त्याचे समर्थन करतील.
कशी खटकणार उलट हे लोक त्याचे
कशी खटकणार उलट हे लोक त्याचे समर्थन करतील. >>> कुठे केले असेल तर बोला. उगाचच उचलली जिभ लावली टाळ्याला नको
चित्रपट पहाण्याआधीच कसे काय ठरविले तुम्ही की चारित्र्य मलिन केले आहे की नाही??? >>>सुमुक्ता ताई बाजिराव मस्तानीच्या वेळिही अश्याच प्रतिक्रिया आलेल्या पण शेवटी काय झाले. व्हायचे ते विद्रुपीकरण झालेच. शेवटी हतबल व्हावे लागते. यापेक्षा दशक्रिया चित्रपट पाहायला आवडेल. ‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’, "जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?" असली वक्त्यव्ये खटकत नाहीत का?? >> नाही खटकत ह्या पोकळ धमक्या असतात.
{{{ मंडी चित्रपटाचा आणि जावेद
{{{ मंडी चित्रपटाचा आणि जावेद अख्तर चा काय संबंध??? केवळ शबाना आझमीने काम केले म्हणून!!!! }}}
तसं तर जावेदचा आणि पद्मावतीचा तरी काय संबंध? पण काही भाष्य करायचंच असेल तर आधी घरच्या लोकांनी काम केलेल्या सिनेमापासून सुरुवात करावी.
इमॅजिणेशन वर सगळा विरोध होत
इमॅजिणेशन वर सगळा विरोध होत आहे. शुद्ध गाढवपणा आहे.
चित्रपटात काय आहे हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही मग कुठल्या आधारावर खिलजी व पद्मावती मध्ये प्रसंग दाखवले आहे , इतिहासाची मोडतोड केली आहे हे ही लोक बोलक्त आहे? आहे का कोणता पुरावा? की उचलली जीभ लावली टाळ्याला? इतर करत आहे म्हणून आपण ही स्वतःची पोळी भाजून घ्यावी असला प्रकार चालू आहे
छाटक भर माहिती नाही पण आव असा आणला जात आहे की पूर्ण चित्रपट पाहून आले आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेची भूमिका उत्तम आहे. चित्रपट लागू द्यावा त्यात काही आक्षेपार्ह असेल तर ते निर्मात्यांनी संवाद साधून काढून टाकावे. साधा उपाय आहे. परंतु काहींना त्यावर दंगाच करायचा असेल आणि सरकार चुपचाप तमाशा बघणार असेल तर प्रत्येक वेळी असेच चालणार
आजाच्या दैनिक सकाळ मधून
आजाच्या दैनिक सकाळ मधून
चांगला आहे लेख.
चांगला आहे लेख.
सिम्बा लेख पटला .
सिम्बा लेख पटला .
छाटक भर माहिती नाही >> छटाक
छाटक भर माहिती नाही >> छटाक असते ते.
मैत्रीत सल्ला.
तुम्ही पोगो बघा ओ
तुम्ही दिवसभर फॅशन टीव्ही बघत
तुम्ही दिवसभर फॅशन टीव्ही बघत असतात का? मैत्रीत नाही विचारले.
इंडिक कीबोर्ड च्या चुका आहे. इतकी समज असायला हवी नाही का?
खिल्जी आणि पदमीचा धडक धडक
खिल्जी आणि पदमीचा धडक धडक डॅन्स का तडक भडक रोमॅन्स दाखवलाय का सिनेम्यात? >>>> अस विरोधकान्नाच वाटतय म्हणून चाललाय त्यान्चा विरोध.
यांनी स्वतःच्या पोरी मुघलांना
यांनी स्वतःच्या पोरी मुघलांना दिल्या, बादशाह जावई करून घ्यायला.. शिवाजींना पकडायला हे मुघल सैन्यातर्फे आलेले, तेंव्हा कुठे गेला होता यांचा अभिमान...
पोकळ आहेत नुसते..
पण पद्मिनीची कथा ऐतिहासिक
पण पद्मिनीची कथा ऐतिहासिक नाहीच.
http://www.thehindu.com/todays-paper/tp-opinion/the-many-padmavatis/arti...
त्यामुळे मोडतोड करण्याचा प्रश्नच नाही.
सिम्बा वरचा लेख छान आहे.
सिम्बा वरचा लेख छान आहे.
पण खुद्द लेखकालाही या विषयावर बोलायचा मोह आवरला नाहीच तर
बाकी भन्सालीला उगाचच टारगेट केले आहे.
खाली भन्सालीने दिग्दर्शन केलेल्या चित्रपटांची लिस्ट आहे. सांगा कश्यात कितीसा असा वाद झाला आहे?
Khamoshi: The Musical, Hum Dil De Chuke Sanam, Devdas, Black, Saawariya, Guzaarish, Goliyon Ki Raasleela Ram-Leela, Bajirao Mastani, Padmavati
लेखात देवदासचे नावही उगाच घेतलेय, त्यात काय असा वाद झालेला? हा, आता मी मायबोलीवर असतो तर शाहरूखने दिलीपकुमारला खाल्ला म्हणत एखादा धागा काढला असता, चार लोकांनी मिळून शाहरूखला झोडपला असता, बाकी तेव्हा एवढेही काही झाले नसावे. लेखकानेच उगाच भन्सालीची हवा केलीय आणि स्वत:चा त्या हवेला नावं ठेवतोय
बाकी ते नाचगाण्याबद्दल लिहिलेलेही पटण्यासारखे नाही,
एक म्हणजे ऐतिहासिक व्यक्तींना नाचगाणे जमायचे नाही किंवा आवडायचे नाही हा सूनबाईशोध कोणी लावला?
दुसरे म्हणजे चित्रपटात नाचगाणे हे प्रतीक म्हणून वापरले जाते. ऐतिहासिकच कश्याला ईतर लव्हईस्टोर्यांमध्येही जे हिरोहिरोईनी बागेत झाडाभोवती गिरक्या मारत नाचताना आणि ऊत्स्फुर्तपणे गाताना दाखवतात ते प्रत्यक्षात घडते का? म्हणजे मी तरी बाबा माझ्या गर्लफ्रेंडबरोबर असले काही केले नाही. तसेही तिला आतिफ अस्लम आवडत नाही.
जबरी लिहीलेला आहे तो सकाळ चा
जबरी लिहीलेला आहे तो सकाळ चा लेख
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’>>> जावेद अख्तरचे म्हणणे ह्यावेळेस पटले.
>>>>>>>>>
मला तर जावेद अख्तर यांच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही.
चित्रपटात ईतिहासच दाखवला जाणे गरजेचे नसते... या चित्रपटात दाखवलेली कथा काल्पनिक आहे... की मूळ पद्मिनीची कथाच काल्पनिक आहे? नक्की काय म्हणायचे आहे त्यांना?
अवांतर - अनारकलीला भिंतीत गाढणे हे काल्पनिक होते का?
१. मूळ पद्मिनी कथा काल्पनिक
१. मूळ पद्मिनी कथा काल्पनिक आहे, इतिहास नव्हे.
२. चित्रपटाला इतिहास समजू नका असे करणीसेना छाप अटेन्शन ग्रॅबर्ससाठी सांगत आहेत
के. असिफ यांना दाऊद ने पैसे
के. असिफ यांना दाऊद ने पैसे दिले होते म्हणून अकबर ला सहिष्णू दाखवले असेल आणि अनारकलीला मागील बाजूने उदात्त अंतःकरणाने जाऊ देतो असे उद्या बिनडोक स्वामी म्हणाला तर आश्चर्य वाटणार नाही
आणि गम्मत म्हणजे यावर काही लोक विश्वास ही ठेवतील .
आणि गम्मत म्हणजे यावर काही
आणि गम्मत म्हणजे यावर काही लोक विश्वास ही ठेवतील . Wink
>>
जेव्हा लोकं एखाद्या गोष्टीवर अविश्वास दाखवत नाहीत तेव्हा त्यांनी त्यावर विश्वास ठेवला असाच अर्थ होत नाही.
हे आपले असेच अवांतर आणि जनरल म्हटलेय.
कसंए ना, आपल्या सुजलाम सुफलाम
कसंए ना, आपल्या सुजलाम सुफलाम देशात ना काही समस्या ना काही दु:ख! शेतकरी सुखात आहेत. स्त्रिया सुरक्षित आहेत. विद्यार्थी शिक्षकांना मान देतात. रस्त्यांवर लोक जिवाच्या आकांताने वाहतुकीचे नियम पाळतात. भ्रष्टाचार म्हणजे काय ते इथे कुणालाच माहित नाही. इथल्या रस्त्यांवरून गाड्या चालवतांना घर्षणशून्यतेचा अनुभव येतो. आपले सर्व शेजारी देश आपल्या आकंठ प्रेमात आहेत. प्रामाणिकपणा हा इथला नैसर्गिक गुण आहे.
समस्या आहेतच कुठे? मग गप्पा , चर्चा , दंगे करायचे कशावर ना?
ज्यांना स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायचंय त्यांच्यासाठी हा एक सोपा मार्ग सध्या उपलब्ध झाला आहे. एखादी कलाक्रुती घ्यायची आणि झोडपत रहायचं . मिडिया कव्हरेज तर मिळतंच शिवाय पिक्चरही फुकटात बघायला मिळतो.
मी इथे भन्साळीला अजिबात सपोर्ट करत नाहिये. कसलंही कन्स्ट्रक्टिव्ह काम न करता कला ,मनोरंजन , इतिहास अशा गोष्टिंचा (गैर) वापर करून प्रसिद्धी पावणार्या काही वॉन्ना बी राजकिय पक्षांबद्दल बोलतेय.
सिंबा,
सिंबा,
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए।
चा अँटिथिसिस.
Pages