‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी
..
‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !
..
- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
..
भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार
..
भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
..
चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__
..
गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी
..
‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे
..
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर
..
‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर
..
‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज
..
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन
..
अॅण्ड फायनली ...............
‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना
..
आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष
पद्मिनी खरेच होती का माहीत
पद्मिनी खरेच होती का माहीत नाही. ऐतिहासिक पुरावे तरी ती नसावी असेच आहेत.
>>>>
अरे देवा, पद्मावती होती की नव्हती ईथपासून सुरुवात आहे का?
हजारो वर्षांपूर्वीच्या रामायणात सीता होती हे आपण ठामपणे सांगू शकतो तर काही शे वर्षांपूर्वीच्या पद्मावतीचे सत्य का जाणून घेऊ शकत नाही? हा मला पडलेला प्रश्न आहे, कोणाला प्रतिवाद नाहीये.
हजारो वर्षांपूर्वीच्या
हजारो वर्षांपूर्वीच्या रामायणात सीता होती हे आपण ठामपणे सांगू शकतो तर >>>>>
बरोबर, तसेच पद्मावत काव्यात पद्मिनी आहे हे ठामपणे सांगू शकतो,
पण रामायण आणि पद्मावत खरेच घडले की नाही याबद्दल मतमतांतरे आहेत
ॠन्मेषचा खरच रामाची सीता कोण
ॠन्मेषचा खरच रामाची सीता कोण गोंधळ झालाय
दिलेली लिंक पाहिली कि नाही? पद्मावत काव्यावर भन्सालीचा चित्रपट आहे म्ह्स्णून नाव चेंज करायला सांगितलं सेन्सर बोर्डने आहे कि सगळं पॉईंट्वाइज, प्॑द्मावती फिक्श्॑न आहे/नाही य॑वरही झालय बरच बोलून , तरी उगीच धाग्याचा टीआरपी वाढवायला एवढे प्रश्नं विचारतोय !
हा हा दिपांजली, नाही.. म्हणजे
हा हा दिपांजली, नाही.. म्हणजे पद्मावत काव्यावर बोलून झालेय. मी ते सेक्स चेंज वगैरे पोस्ट मजेने लिहिलेली. मात्र पद्मावत काव्य हे सत्य नसून ते देवदास सारखे काल्पनिक आहे याबद्दल काही ठाम माहीत नव्हते. अजूनही गोंधळ आहेच. म्हणजे जे घडलेय त्यात मसाला घातलाय ईथवर ठिक आहे. पण पद्मावती नामक पात्रच काल्पनिक आहे हे अति झाले..
पण पद्मावती नामक पात्रच
पण पद्मावती नामक पात्रच काल्पनिक आहे हे अति झाले..>>>>>>
अरे त्यात अति के?
ऋन्मेष नावाचे काल्पनिक पात्र माबो वर इतके लोकप्रिय आहे, तर बाकीच्या काल्पनिक व्यक्तिरेखानी काय घोडे मारलंय?
(No subject)
New release date: Jan 25th.
New release date: Jan 25th.
Akki's 'Padma'n to clash with 'Padma'vat
हो आताच वाचली ही न्यूज..
हो आताच वाचली ही न्यूज.. बिचारा अक्षय, असे झाले तर प्याडमॅन टिकने कठीण आहे पद्मावत ई समोर
http://indianexpress.com
http://indianexpress.com/article/india/padmaavat-ban-in-six-states-staye...
चार जज्जेस चे अभिनंदन. त्यांच्यामुळे आज सुप्रीम कोर्ट देखील लाइनीवर आले.
सर्व भारतीयांचे अभिनंदन
सर्व भारतीयांचे अभिनंदन (जे प्रथम स्वता:ला भारतीय मानतात)
घूमर वर नाच करणार्या मुलांवर
घूमर वर नाच करणार्या मुलांवर करणी सेनेने हल्ला केला. एक जखमई.
(वाचलेली बातमी. खखोमाना)
भाजपा शासित राज्यांनी
भाजपा शासित राज्यांनी पद्मावती वर बंदी आणली होती ती आज कोर्टाने सणसणीत प्रश्न राज्यसरकार ला विचारून बंदी उठवली
कसली लेचेपेचे भाजपाचे मुख्यमंत्री आहे जे साधे चित्रपट रिलीज करू शकत नाही? अरे रे रे ही अवस्था? हेच का 56 इंची छातीचे प्रदर्शन करत गावोगावी फिरणाऱ्या नेत्याच्या कंट्रोल मधले सरकार ? लय दयनीय अवस्था आहे जे भाजपाचे सरकार गल्लीतल्या एक संघटनेला घाबरून चित्रपटावर बंदी आणते त्या पक्षाने यांव करू त्यांव कर अश्या फुशारक्या मारत फिरू नये.
पद्मावत ची फक्तं तमिळ तेलगु
पद्मावत ची फक्तं तमिळ तेलगु व्हर्जन्स्ची मार्केटींग चालु आहेत सध्या सगळीकडे, तिथे तरी डोक्याला त्रास न होता पैसे वसुल होतील अशी आशा असावी निर्मात्यांना !
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/india/sc-lifts-bans-clears-release-o...
दणके!
घुमर गाण्यात दिपिकाची कंबर
घुमर गाण्यात दिपिकाची कंबर दिसत होती जी व्हि एफ एक्स ने कव्हर करायला लावलिये नव्या गाण्यात..
लोक त्यावर तुटुन पडले होते ट्विटर वर .. पण खरं बघता ते दिपिकाला तसं दाखवायला नाही कुठे म्हणत आहेत.. त्यांचा आक्षेप त्यांच्या राणीला तसं दाखवण्यावर आहे.जो मलातरी ओके वाटला.. फक्त यागोष्टी बद्दाल बोलत आहे.. बाकी त्या धमक्या गोंधळं चुकीचचं..
बाजीरावचं पण वाटोळ केलं होतचं त्याला वाट लावली करायला लावुन..
पण खरं बघता ते दिपिकाला तसं
पण खरं बघता ते दिपिकाला तसं दाखवायला नाही कुठे म्हणत आहेत.. त्यांचा आक्षेप त्यांच्या राणीला तसं दाखवण्यावर आहे >>>>>
मग त्यांनी काढावा ना एक पिक्चर ज्यात त्यांना हवे ते दाखवावे. मला नाहि वाटत संजय लिला भन्साळि त्यांना विरोध करेल.
त्याला जे वाटते ते त्याने दाखवले, ह्या देशाच्या कायद्याप्रमाणे ते बरोबर आहे. तेव्हा हवे तर पहा, नाहि तर पाहु नका.
आक्षेप घेणे आणी टिका करणे यात फरक आहे, तुम्हि टिका करु शकता. दुसर्याने काय बोलावे, काय ख्यावे, काय प्यावे, काय लिहावे, काय पिक्चर काढावा ह्याचा त्याला अधिकार आहे जोपर्यत ते कायद्याच्या मार्गात बसते. आक्षेप घेण्याचा कोणालाहि अधिकार नाहि.
तुम्हि न्यायालयात जाउ शकता कायदेशीर मार्गाने आणी तुमचे म्हणणे माडु शकता अथवा लेख लिहुन टिका करु शकता. पण डायरेक्ट आक्षेप घेउ शकत नाहि दुसर्याने काय बोलावे, काय ख्यावे, काय प्यावे, काय लिहावे, काय पिक्चर काढावा , पिक्चरमध्ये काय दाखवावे याबद्दल.
>>>>>>>>>पण डायरेक्ट आक्षेप
>>>>>>>>>पण डायरेक्ट आक्षेप घेउ शकत नाहि दुसर्याने काय बोलावे, काय ख्यावे, काय प्यावे, काय लिहावे, काय पिक्चर काढावा , पिक्चरमध्ये काय दाखवावे याबद्दल.
>>>>>>>>>>>>>>
असहमत.. उद्या काही ऐतिहासिक गोष्टी ,,, त्याला प्रत्यक्ष्दर्षी लोक उरणार नाहित .. अशावेळी संधीचा फायदा घेउन .. लोकांच्या अज्ञानाचा वापर करुन तुम्ही काहिही दाखवु शकत नाही..
आधी म्हणल्या प्रमाणे बाहुबली काढा मग त्यात काही दखवा.. त्या काळात असं झालं तसं झालं म्हणुन..
पण उगाच मसालेदार बनवायच्या नादात खर्या इतिहासात काहीही दाखवले तर ते खपवुन नाहिच घेतले पाहिजे..
>>>>>>>>>मग त्यांनी काढावा ना एक पिक्चर ज्यात त्यांना हवे ते दाखवावे. मला नाहि वाटत संजय लिला भन्साळि त्यांना विरोध करेल.>>>>> हे वाक्यचं निरर्थक आहे.. संजय लिला भन्साळिला काय पडलय
असहमत.. उद्या काही ऐतिहासिक
असहमत.. उद्या काही ऐतिहासिक गोष्टी ,,, त्याला प्रत्यक्ष्दर्षी लोक उरणार नाहित .. अशावेळी संधीचा फायदा घेउन .. लोकांच्या अज्ञानाचा वापर करुन तुम्ही काहिही दाखवु शकत नाही..
आधी म्हणल्या प्रमाणे बाहुबली काढा मग त्यात काही दखवा.. त्या काळात असं झालं तसं झालं म्हणुन..
पण उगाच मसालेदार बनवायच्या नादात खर्या इतिहासात काहीही दाखवले तर ते खपवुन नाहिच घेतले पाहिजे.. >>>>>>>>>
काहिहि म्हणजे काय ? एकाचे काहिहि हे दुसर्यासाठी सत्य असु शकते, आणी दुसर्याचे काहिहि हे पहिल्यासाठी सत्य असु शकते, म्हणुन हे पहिला आणी दुसरा , तुम्हि आणी आम्हि, नाहि ठरवु शकत. काहिहि म्हणजे काय हे फक्त भारतीय कायदा आणी भारतीय संविधान ठरवते, आणी एकदा त्यांनी ठरवले कि काहिहि हे 'काहिहि नाहि' आहे, किंवा काहिहि हे 'काहिहि' आहे तर ते तुम्हाला आणी आम्हाला मानावेच लागेल. मग खपवुन न घेणे वगैरे घरी ठेवायचे.
हे वाक्यचं निरर्थक आहे.. संजय लिला भन्साळिला काय पडलय >>>> बरोबर . त्याला हे पडलेले नाहिच आहे. मग हेच बाकिच्यांनी देखील करावे आणी जे सेन्स्रोर बोर्डाने आणी आता सुप्रीम कोर्टाने देखील मान्य केले आहे ते पडुन घेउ नये.
कंबर दिसतेय त्याला आक्षेप
कंबर दिसतेय त्याला आक्षेप घेतला>>>>
खरे तर पूर्ण सिनेमात दीपिका चेहरा दाखवत वावरली आहे , त्यांच्या राणीला असे फिरताना दाखवले यावर त्यांनी आक्षेप घ्यायला हवा होता.
तेव्हाचे गोशा आणि पडद्याचे नियम पाहता , दीपिकाचे असे वावरणे इतिहासाला अजिबात धरून नाही.
हो हो
हो हो
खर तर थोबाड पण झाकायला हवे. पद्मावती कशी होती हे कुणाला माहिती नाही मग तिचा चेहरा कसा दाखवला? निषेध निषेध
पद्मिनी ही कश्मीरची राजकन्या
पद्मिनी ही कश्मीरची राजकन्या होती असे म्हणतात. चितोडमहाल दाखवणारे गाइड तरी तसे सांगत असत. राजकन्येला राजस्थानचा उन्हाळा सहन होईना म्हणून तिचा महाल एका छोट्या तलावात बांधला असेही ते सांगत. कश्मीरमध्ये इस्लाम १३२०च्यानंतर आला अल्लाउद्दिन खिलजीचा राज्यकाळ इ.स, १२९६ ते १३१६ इतका आहे. कश्मीरमध्ये पूर्ण बुरख्याची पद्धत इस्लामपूर्वकाळात होती काय? कोणी म्हणतात की ही गोषा किंवा स्त्रियांनी अंग झाकण्याची पद्धत आपल्याकडे इस्लाममुळे आली. दहाव्या अकराव्या बाराव्या शतकांत हिन्दू राजस्त्रियांचे आणि आम स्त्रियांचे पेहेराव कसे होते याविषयी कुठे लिहिलेले आहे काय? कुणाला माहीत असल्यास कृपया इथे लिहावे. मला खरेच उत्सुकता आहे याविषयी.
एका गतकाळातील राणीच्या
एका गतकाळातील राणीच्या सन्मानासाठी( जी सिनेमात ओतप्रोत असून देखील) उतरलेली संघटना आणि भाजप राज्यसरकार राजस्थान व हरियाणात मागील 48 तासात 6-8 बलात्कार घटनांवर चिडीचूप आहे.
इतकाच महिला सन्मान आहे तर राज्यात करणी सेनेने गस्त घालावी.
हा सिनेमा पद्मावत नावाच्या
हा सिनेमा पद्मावत नावाच्या कथा / काव्या वर आधारित आहे असे एकदा म्हणून नाव बदलल्यावर त्या हिरविणीचे पोट दिसले की थोबाड, त्याने कोणाच्या भावना का दुखायला पाहिजेत? काम ना धंदे!
पद्मिनी ही कश्मीरची राजकन्या
पद्मिनी ही कश्मीरची राजकन्या होती असे म्हणतात. >>> विकीपिडीया आणि इतरत्रही पद्मिनी श्रीलंकेची राजकन्या होती असं वाचलं आहे. काय खरं?
पद्मिनीचा तेराव्या शतकातला
पद्मिनीचा तेराव्या शतकातला काळ बघता भन्साळी नं दाखवलेले कपडे, दागिने, महालाचं इंटीरीअर वगैरे काळाशी सुसंगत नक्कीच नाहीत. पण भन्साळीकडून ही अपेक्षा करणं चुकीचंच नाही तर मूर्खपणा आहे. त्याचा भर प्रत्येक फ्रेम (आणि पर्यायानं संपूर्ण चित्रपट) सुंदर कशी होईल याकडेच असतो. इतिहास, संशोधन, सत्य वगैरे गोष्टींशी त्याचा दूर दूर पर्यंत संबंध नाही
. चित्रपट भव्य दिव्य म्हणण्यापेक्षादेखिल ग्लॅमरस कसा होईल याकडे जास्त लक्ष देतो तो. he is a presenter, not a 'movie maker'. लोकांनी देखिल हेच लषात ठेवून त्याचे चित्रपट बघावेत. या सगळ्या वादाचा त्याला पूरेपूर फायदा होईल. चित्रपट धो धो चालेल. भारताबहेर प्रदर्शित करून त्याचे पूर्ण पैसे वसूल होतील. At the end, he is going to be in happy palce
... लोक कशाला वाद घालत बसतात कोणजाणे...
सुरुवातीला वाटत होते
सुरुवातीला वाटत होते पब्लिसिटीचा फायदा होईल
पण आता कर्व खाली गेला आहे..
आता नुकसान किंवा कमी फायद्यात जाणार हा चित्रपट..
अर्थात तो कमी फायदा देखील काही करोडोंत असल्याने कळणार नाही ईतकेच.. पण सध्याची परिस्थिती त्याच्यासाठी नुकसानीत आहे
पद्मावती श्रीलंकेची राजकन्या
पद्मावती श्रीलंकेची राजकन्या होती असं वाचलय.
दंगा करणार्या लोकांसाठी सेन्सर बोर्डने डिस्क्लेमर टाकायला लावलाय, घुमर एडीट केलय तरी बॅन डिमांड करणार्यांना नक्की काय हवय स्वतःलाच माहित नाहीये .
मुळात तेराव्या शतकातला इतका अॅक्युरेङ पुराव्यासकट इतिहास उपलब्ध आहे का प्रश्नं आहे .
बॉलिवुड मधे तसेही कोण बनवतं इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक सिनेमे ?
ही “भन्सालीज पद्मावती “आहे लक्षात ठेवा आणि फक्तं सिनेमा एंजॉय करा.
मुळात तेराव्या शतकातला इतका अ
मुळात तेराव्या शतकातला इतका अॅक्युरेङ पुराव्यासकट इतिहास उपलब्ध आहे का प्रश्नं आहे .
. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, क्रिएटिव्हिटी लिबर्टी वगैरे वगैरे यू नो 

बॉलिवुड मधे तसेही कोण बनवतं इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक सिनेमे ?>>> अगदी १९ व्या /२० व्या शतकातला इतिहास उपलब्ध असला तरी प. पू. भन्साली त्याप्रमाणे चित्रपट बनवायला बांधिल नाहीत
बॅन डिमांड करणार्यांना >>> त्याचा चित्रपट बॅन करणे टोटल इडियटपणा आहे. मी तरी ही मागणी केलेली नाही
बाकी ती करणी सेना वगैरे लोकांना तरी नक्की इतिहास माहित आहे की नाही ही पण शंका आहेच. पदमावतीचं पोट दाखवा नाहीतर पाठ दाखवा तेव्हा काय वेषभूषा असायची यांना कुठे माहित आहे? उगाच स्वतःचा टीआरपी वाढवून घेत आहेत झालं. नाहीतर आत्तापर्यंत यांचं नाव तरी ऐकलं होतं क?
अगदी १९ व्या /२० व्या शतकातला
अगदी १९ व्या /२० व्या शतकातला इतिहास उपलब्ध असला तरी प. पू. भन्साली त्याप्रमाणे चित्रपट बनवायला बांधिल नाहीत >>>>
तुम्हि कोणताहि विषय आणा हो, इथे फुट पाडायला राइट विंग सज्ज आहे,
१९/२० शतक विसरा, या शतकातले आत्ताच्या सरकारमधले मंत्री आणी माजी लष्करप्रमुख यांच्या जन्मदिनावर पण वाद उकरुन काढला जातो, शास्त्री, सुभाष बोस यावर वाद उअकरुन काढले जातात फुट पाडण्यासाठी . त्यासाठी भन्साली ने पिक्चर बनवायला लागत नाहि. फुटच पाडायची असते, भांडणे उकरायची असतात आणी लोकांना मुर्ख बनवुन मते लाटायचा प्रयत्न असतो.
https://www.thenewsminute.com
https://www.thenewsminute.com/article/burn-and-vandalise-theatres-screen...
Controversial BJP MLA Raja Singh from Hyderabad has asked people to boycott film Padmaavat, and asked them to stop its screening in the city, even if it meant burning down and vandalising theatres.
"Protest as you want. Even if you want to burn or break the theatres, ensure that no one watches the movie," he concluded.
Pages