ती येतेय ................ पद्मावती !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2017 - 13:02

‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी

..

‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !

..

- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

..

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार

..

भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

..

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__

..

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी

..

‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे

..

‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर

..

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर

..

‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज

..

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन

..

अ‍ॅण्ड फायनली ...............

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना

..

आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव यांच्या कास्टिंग खोडसाळ आहे व ५ नं च्या संपूर्ण मुद्याला (विषेशकरुन हिंदूत्ववादी व सेक्युलर) +१००० अनुमोदन.

२. कास्टिंग खोडसाळ आहे. रणवीर शाहीदपेक्षा मोठा स्टार आहे. अनेक वर्षं त्याची दीपिकासोबत ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन पेअर आहे. मग त्याला रतन सिंग केलं असतं आणि खिल्जीचा रोल शक्ती कपूर किंवा प्रकाश राज टाईप चरित्र अभिनेत्याला दिला असता तरी फरक पडला असता.
>>>>>>>>>>>

काही अंशी सहमत आहे सनव.
तीन खानांच्या नंतर रणवीर सध्याचा उगवता स्टार आहे. त्याला खिलजीचा रोल देणे म्हणजे खिलजीला भाव देण्यासारखेच आहे.
पण यात माझेच एक मत असेही आहे की रणवीर हा प्रत्यक्षात माणूस म्हणून चांगला असेल पण त्याची ऑनस्क्रीन इमेज ही थोडीफार शक्ती कपूरसारखीच वाह्यात आहे. निरोधच्या जाहीरातीतही तो बिनधास्त दिसतो आणि सनी लिओनईतक्या सहजतेने वावरतो. पद्मावतीच्या ट्रेलरमध्ये पाहिले, खिलजीच्या भुमिकेत जो किळसपणा ठासून भरलेला दिसलाय त्याचा अभिनय रणवीर चांगला करू शकतो. त्यामुळे कास्टींग खोडसाळ आहे असेही ठामपणे म्हणू शकत नाही. बॉक्स ऑफिसवर पिक्चर हिट जाईल अशी नक्की आहे.

यावरून आठवले,
आजच मला व्हॉटसप ग्रूपवर एक जण म्हणाला, या लोकांची मुस्लिम राजांवर चित्रपट काढायची हिंमत होईल का?
त्यावर मी म्हटले, पद्मावतीमध्ये खिलजी मुसलमानच राजा आहे ना. तसेच हिरो न दाखवता व्हिलन दाखवलाय. तो देखील ईतका किळसवाणा. मग आणखी काय हिंमत हवी?
मला तर कमाल वाटते या देशात कोणी खिलजी समर्थक नाहीत का? त्याचे असे ओंगळवाणे रूप एकालाही खटकले नाही का? गेला बाजार ओवेसीने तरी आवाज उठवायला हवा होता...

मी नथु बोलतोय हे नाटक बरीच वर्षे चालू आहे. त्याला विरोध केवळ एक खुन्याचे उदात्तीकरण चालू आहे म्हणून केला जातोय विचार करा उद्या जर काश्मीर मध्ये "मी अफजल गुरू बोलतोय""मी बुऱ्हाण बोलतोय" असे नाटक काढून त्यांचे उदात्तीकरण केले तर तुम्हाला चालेल.?

असे नाटक काढून त्यांचे उदात्तीकरण केले तर तुम्हाला चालेल.?>>> जे लोक संपूर्णपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही खपवून घेत असतील तर त्यांना नथुराम असो वा बुर्हाण असो, कोणाच्याही उदात्तीकरणामुळे दुखावण्याचा नैतिक अधिकारच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. कोणत्या गोष्टींवर, किती प्रमाणात व कशा प्रकारे व्यक्त व्हावे यालाही काही बंधने असावीत. परंतू इथे मात्र चित्रपटाला होणारा विरोध विनाकारणच वाटतोय.
तसेही याविरोधामुळे माझ्यासारख्यांची उत्सुकता 'विरोध करण्यासारखं आहे तरी काय?' यामुळे वाढलीच आहे. त्यामुळे हे भंसाळी सेनेचं पिल्लू असल्यास टोटल यशस्वी म्हणावे लागतील.... नाहीतर टायगर तो जिंदा है ही Wink

२. कास्टिंग खोडसाळ आहे. रणवीर शाहीदपेक्षा मोठा स्टार आहे. अनेक वर्षं त्याची दीपिकासोबत ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन पेअर आहे. मग त्याला रतन सिंग केलं असतं आणि खिल्जीचा रोल शक्ती कपूर किंवा प्रकाश राज टाईप चरित्र अभिनेत्याला दिला असता तरी फरक पडला असता.
>>>>>>>>>>>
ड्रामा फॉर रजपूत आन बान शान एकवेळ समजु शकते पण फार आश्चर्य वाटतय या मुद्द्याचं Uhoh
खरच अशी मेंटॅलिटी आहे लोकांची ??
दीपिका रणवीरची ऑफस्क्रीन केमिस्ट्री किंवा इतर सिनेमात त्या दोघांनी काय केलय यावर अता तिसराच सिनेमा पब्लिक जज करणार ( सिनेमा न पहाता) ??
सिनेमा हा बिजनेस आहे , मोठा स्टार का घेउ नये खिल्जीच्या रोल मधे ? त्याचा रोल आहेच ना मह्त्त्वाचा पद्मावतीच्या कथेत ?
नेहेमी हिरोचे रोल करणारा जर व्हिलनचा रोल करु लागला तर लगेच उदात्तीकरण ?
मग उगीच चर्चा करायला , लेख लिहायला मात्रं मोकळे लोक कि अमुक एक अ‍ॅक्टर इमेज मधे अडकला, हॉलिवुडसारखे आपले अ‍ॅक्टर रिस्क घेत नाहीत इ.
कठिण आहे देशात जे काही चाल्लय एका सिनेमामुळे .

तीन खानांच्या नंतर रणवीर सध्याचा उगवता स्टार आहे. त्याला खिलजीचा रोल देणे म्हणजे खिलजीला भाव देण्यासारखेच आहे
<,

मला काही कळेना झालय Proud
आहेच ना खिलजी कॅरॅक्टर पद्मिनी इतकच मह्त्त्वाचं त्या कथेत ?
आता लिड कॅरॅक्टरलाच भाव नाही द्ययाचा तर गोष्ट कोणाची सांगणार फिल्म मेकर्स ? राजाच्या मागे भिंतीकडे तोंड उभं राहिलेल्या सैनिकांची ?

प्रिय भूषण, आधी आपल्या विधानाचा अर्थ सांगा, वीरांगना आणि नृत्यांगना विधानावर तुमचीच जीभ दातात फसली आहे, त्यामुळे तुमची फुसकी तोफ् माझ्याकडे वळवून उपयोग नाही. Happy

@नानाकळा, सिंबा
तुमच्या प्रतिक्रियांच्या भाषेला जरा आवर घाला. विशेषतः सरसकट एखाद्या जमातीबद्दल भडक विधाने करण्याअगोदर.

>>>>>>>पद्मिनीचा इतिहास म्हणा वा दंतकथा म्हणा, राजपुतांसाठी हळवी जखम आहे. शेवटी तो पराभव होता. पद्मिनी खिल्जीच्या हाती लागली नाही हे silver lining. पण anger, guilt, shame,honour या भावना आहेत. It is very sensitive touchy topic for them.>>>>>

पराभव ही प्रत्येक समुदायाची हळवी जागा असते, जशी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाची पानिपत आहे ,जशी प्रत्येक राजपुतांची हल्दीघाटी ची लढाई असेल, किंवा प्रत्येक भरातीयासाठी 1857 चा लष्करी उठाव असेल,
- उद्या यापैकी कोणत्या घटनेवर चित्रपट बनवायचा म्हंटले तर असाच विरोध होणार का?
- जो समूह विरोध करणार नाही, त्या समूहास आपल्या पूर्वजांबद्दल अभिमान नाही असा अर्थ काढला जाईल का?
- भावना जपायला इतिहासातील पराभवांचा उल्लेखही करायचा नाही, यात इतिहासाचे विकृतीकरण होत नाही का?

सनव पांइट ५ - पुर्ण एकतर्फी -- तुम्हि तेच वागता आहात ज्याच्या वीरोधात तुम्हि लिहिले आहे. जसे इंदु सरकार आणी नथुराम ला विरोध करणारे पद्मावती च्या वेळेस गप्प आहेत तसे पद्मावती आणी बाजीराव ला विरोध करणारे नथुराम आणी इंदू सरकार च्या वेळेस कुठे आहेत ?

आणी हे सगळेच An Insignificant Man च्या वेळेस कोठे नाहिसे झाले होते ??

आपल्या पूज्य व्यक्तींची, त्यातून ज्यांच्याशी अस्मिता वगैरे जोडल्यागेल्या आहेत अशा महापुरुषांची (अर्थात स्त्रियांनीही)
एक विशिष्ट छबी आपल्या डोक्यात बसली असते, आणि त्याच्या विरुद्ध जाणारी एखादी गोष्ट् वगैरे दिसली की इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटते. इतकी निरागस भावना होती. Happy
तरीही न्रुत्यांगणाचा अपमान करण्याचा हेतु नव्हता. कुणाचे वाईट वाटले असल्यास मनापासुन माफी मागतो.
आता नाना तुम्ही (तु) जे विधान केले बाजारु औरते वैगेरे. तो तुमचा(तुझा) शब्द् आहे. याबद्दल बोला. स्त्री बाजारु कशी किंवा. बाजारु औरते असा कोणताही कायदेशीर शब्द् नाही.तरिही अशा स्त्रियांविषयी बोलताना थोडाही सभ्यपणा नसावा का?
असो.

राहुल,
ते 5 पॉईंट सनव यांनी त्यांची वैयक्तिक मते म्हणून मांडले नाही आहेत,
नेमका कशाला आक्षेप आहे या प्रश्नाला त्यांनी मीडियात काय वाचले त्याचे कम्पायलेशन आहे, त्या मुद्द्यांशी त्या सहमत आहेत , नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले नाहीये
त्यामुळे पुढच्या डिस्कशनमध्ये सनव चे मत असेच आहे असे अझमशन ठेऊन डिस्कशन होऊ नये ही विनंती.

भुषण, तुझा(तुमचा) काय हेतु होता नव्हता ते स्पष्ट झालेच आहे. आता सारावासारव बंद कर (करा)

फुसकी तोफ घेऊन घरी जा बघू.

दिपांजली माझी पुर्ण पोस्ट वाचा. अर्धा भाग कोट करू नका. मी रणवीरच्या कास्टींगबाबत दोन्ही बाजू लिहिल्या आहेत.

तरीही एखादा कलाकार जेव्हा "हिरो" म्हणून ओळखला जाऊ लागतो तेव्हा त्याने ईतक्या नकारात्मक भुमिका करू नयेत.

अरे काय? परत उडवला का प्रतिसाद?
ओ वेमा, मला परत द्या बरं, फेसबुकवर टाकायचा आहे. मी सेव्ह केला नव्हता माझ्याकडे.

तुझा शाहरूख.... कोणीतरी तुझ्या भारतात असे म्ह्टल्यासारखे वाटले. सिंबा शाहरूख आपल्या सर्वांचा आहे. मी त्यावर हक्क सांगायचा प्रयत्न कधीच केला नाही. त्याने ज्या नकारात्मक भुमिका केल्या त्या अगदी सुरुवातीच्या काळात. तेव्हा तो हिरो म्हणून एस्टॅब्लिश झाला नव्हता. जसे की डर मध्ये सनी देओल हा तेव्हाचा नावाजलेला एक्शन हिरो होता आणि नकारात्मक भुमिकेत नवख्या शाहरूखला घेतले जे योग्यच होते. पण पुढे शाहरूखचा करिश्मा सनीला भारी पडेल याची खुद्द यश चोप्रांनाही कल्पना नसावी. तेच अंजाम बाबत. तो सुपर्रस्टार माधुरीचा स्त्रीप्रधान चित्रपट होता आणि शाहरूख नवखाच..
पण पुढे रोमांटीक हिरो इमेज झाल्यावर शाहरूखने कधीच असा अचरटपणा केला नाही.

शारूख, माझा वगैरे नाही, चक दे.. , डिअर जिंदगी वगैरे काही अपवाद वगळता तो डोक्यात जातो,
बाझिगर, डर, अंजाम हे 3ही चित्रपट एक मागे एक आले आणि तूट तो चढत्या क्रमाने खुनशी होत गेला होता,
त्याचा व्हिलन बनायचा प्लॅन स्पष्ट दिसत होता.
त्याने नेगटीव्ह भूमिका करायला नको होत्या

भुषण, तुझा(तुमचा) काय हेतु होता नव्हता ते स्पष्ट झालेच आहे. आता सारावासारव बंद कर (करा)
फुसकी तोफ घेऊन घरी जा बघू. >>>
तुमचेही स्त्रियांबद्दलचे मत अधोरेखित झालेच आहे .त्यामुळे तुम्हालाही हाच सल्ला. बाकी वेमांनी तुमची दखल घेतलीच आहे. Happy
अजुन एक येथे कोणत्याही स्त्री आयडिने माझ्या प्रतिसादाला आक्षेप घेतला नाहीयेय. तरीही मी माफी मागितली आहेच.

तरीही एखादा कलाकार जेव्हा "हिरो" म्हणून ओळखला जाऊ लागतो तेव्हा त्याने ईतक्या नकारात्मक भुमिका करू नयेत.
<<
रिअली ?? Biggrin Rofl
लुक हु इज टॉकिंग म्हणणार होते पण जाऊ दे .
तुझे तेव्ढेच वाक्यं कोट केले कारण तेव्ढ्याबद्दलच लिहायचं होतं, काँडमची अ‍ॅड करणे , बिंधास वावरणे म्हणजे काही शक्ति कपुरची इमेज नाहीच मुळात.
बाकी सिंबा ,
लिस्ट मधे Don , डॉन २ पण टाका .

पण पुढे रोमांटीक हिरो इमेज झाल्यावर शाहरूखने कधीच असा अचरटपणा केला नाही >>> डॉन २ कधी आला होता हो ?

चाललेंजिंग रोल आहे म्हणून त्याने ऍक्सेप्त केला असेल..
शाहिद फुसका स्टार आहे, नक्कीच तो रोल छोटा असणार.

पॉईंट सनव यांनी त्यांची वैयक्तिक मते म्हणून मांडले नाही आहेत,
नेमका कशाला आक्षेप आहे या प्रश्नाला त्यांनी मीडियात काय वाचले त्याचे कम्पायलेशन आहे, त्या मुद्द्यांशी त्या सहमत आहेत , नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले नाहीये

राईट. धन्यवाद सिम्बा.

- भावना जपायला इतिहासातील पराभवांचा उल्लेखही करायचा नाही, यात इतिहासाचे विकृतीकरण होत नाही का?

पद्मिनीवर कलाकृती बनवूच नये असा मुद्दा मला आढळला नाही, फक्त इतक्या संवेदनशील विषयावर कलाकृती बनवताना sensitive and sensible हाताळणी व्हावी हा आग्रह आहे. पिंगा नन्तर भन्साळीकडून कोणी तशी अपेक्षा ठेवत नाहीये. पृथ्वीराज संयोगीता व राणा प्रताप यांच्यावर अलीकडे हिंदी मालिका येऊन गेल्या पण त्यात काही आक्षेपार्ह दाखवले नसावे.

पद्मिनीवर कलाकृती बनवूच नये असा मुद्दा मला आढळला नाही, >>>
असा मुद्दा कसा असेल ? आम्हाला जसे आवडते तसे बनवायला हवे हा मुद्दा आहे. तुम्हाला काहिहि आवडत असेल, तुम्हि आम्हाला पटेल तेच बनवायचे नाहितर आम्हि नाक कापु, फतवे काढु, मारुन टाकु, जाळपोळ करु. ते तुम्हाला आवडले नाहि आणी तुम्हि त्याचा निषेध केला तर आम्हि तुम्हालाही जाळु, कापु, गोळ्या घालु.

फक्त इतक्या संवेदनशील विषयावर कलाकृती बनवताना sensitive and sensible हाताळणी व्हावी हा आग्रह आहे >>>> विरोध करताना मात्र हाणामार्या चालतात आणी सरकारे , लोक्प्रतिनिधी त्याच समर्थन करतात

आपण फार फास्ट बनाना रिपब्लिक बनत चाललो आहोत .

सनव हि तुमची वैयक्तिक मते असली तर तसे घ्या , नसतील तर तसे घ्या.

डॉन अमिताभचा होता. तोच शाहरूखने केला. त्यात नकारात्मक वगैरे काही नव्हते. साधा चोर पोलिस खेळ होता तो. त्या हिशोबाने मग रईसलाही जोडाल यात. पण त्याला काही अर्थ नाही.
डॉन 2 मी पाहिला नाही.
डर अंजाम बाजीगर बद्दल वर लिहिले आहेच.
माझा एक मित्र कभी हा कभी ना चित्रपटातील शाहरूखच्या भुमिकेलाही नकारात्मक बोलतो. तर बरेच जण कभी अलविदा ना कहना मध्ये दुसरयाची बायको पळवली म्हणून शिव्या घालतात. आणि यात काही बायकाही आहेत. आता काय बोलणार Happy

लुक हु इज टॉकिंग म्हणणार होते पण जाऊ दे .
>>>>>
असं का म्हणणार होता. मी स्वत: हिरो झाल्यावर व्हिलनची कामे केली अश्यातला प्रकार आहे का Happy

बाकी निरोध जाहीरात करणे यात शक्ती कपूर इमेज नाही हे मान्य. पण त्याला निरोधची जाहीरात मिळाली कारण त्याची जनमाणसातील इमेज बोल्ड आणि आचरट आहे. तीन खानांनंतर तो उभरता स्टार आहे. तरुणाईशी कनेक्ट होणारा. त्यामुळे तो जे करतो ते फॉलो होण्याची शक्यता आहे. खिलजीच्या भुमिकेने तो एक लेवल आणखी पुढे गेला आहे. किंबहुना यापुढे लेव्हल आहे का नाही हेच माहीत नाही.

डॉन अमिताभचा होता. तोच शाहरूखने केला. त्यात नकारात्मक वगैरे काही नव्हते. साधा चोर पोलिस खेळ होता तो. त्या हिशोबाने मग रईसलाही जोडाल यात. पण त्याला काही अर्थ नाही.
<,
अर्थ नाही ?
साधा चोर पोलिस खेळ ?
हो आणि रईस जोडल्याबद्दल धन्यवाद, तो ही गुन्हीगाराचाच रोल .
असो, एकंदरीत काय तर हिरोच्या इमेज वाल्यानी व्हिलन करु नये या तुझ्या स्टेटमेन्टला काही अर्थ नाही.

Pages