‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी
..
‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !
..
- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात
..
भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार
..
भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह
..
चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__
..
गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी
..
‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे
..
‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर
..
‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर
..
‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज
..
अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन
..
अॅण्ड फायनली ...............
‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना
..
आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष
२५०-५०० वर्षे जुन्या गोष्टी
२५०-५०० वर्षे जुन्या गोष्टी दाखवताना त्यांना आताच्या काळातल्या नीतिमूल्यांची फूटपट्टी लावायची का? त्या काळात जे होत होतं, त्यामागे जो विचार होता, तोच दाखवायचा की त्यातून आताच्या कालानुरूप संदेश द्यायचा?
हे आणखी किती मागे नेता येईल? (रामायणापर्यंत?) याच फूटपट्ट्या आणखी कोणकोणत्या कलाकृतींना (किंवा मनोरंजक कृतींना) लावता येतील? स्वामी? सध्याची संभाजीराजांवरची मालिका?
शिवाय चित्रपटाच्या विरुद्ध प्रोटेस्ट आणि बंदी राहू दे, पण कलाकारांना जिवे मारण्याच्या धमक्यांबद्दल लिहिणे सोडून दिग्दर्शकाच्या सो कॉल्ड पुरोगामीपणावर तुटून पडायचं - म्हणजे जो चर्चेतला मुद्दा आहे, तो सोडून त्याला स्वतःला सोयीचं वळण द्यायचं, हा पॅटर्न ठरू लागलाय किंवा माझ्या लक्षात आता आलाय.
-----------
लोकांना पिंगा आठवतो, पण डोला रे का आठवत नाही?
शिवाय चित्रपटाच्या विरुद्ध
शिवाय चित्रपटाच्या विरुद्ध प्रोटेस्ट आणि बंदी राहू दे, पण कलाकारांना जिवे मारण्याच्या धमक्यांबद्दल लिहिणे सोडून दिग्दर्शकाच्या सो कॉल्ड पुरोगामीपणावर तुटून पडायचं - म्हणजे जो चर्चेतला मुद्दा आहे, तो सोडून त्याला स्वतःला सोयीचं वळण द्यायचं, हा पॅटर्न ठरू लागलाय किंवा माझ्या लक्षात आता आलाय. >>>> +१११११
खालील गोष्ट वाचा म्हणजे
खालील गोष्ट वाचा म्हणजे विषयाचे गांभीर्य कळेल कदाचित >>>> चाललय काय ........!
As per so called Indiana
As per so called Indiana public..everthing must be accepted under fiction category..if Bajirao is great warrior in my eyes..why bhansali is ruining that with Bajirao's vulgar dance..tell me had anyone imagined Bajirao dropping water on the head of Kashibai in such sexy manner..this is utter nonsense..
<इतिहासाची मोडतोड करुन राणी
<इतिहासाची मोडतोड करुन राणी पद्मावतीचे किंवा कोणत्याही स्त्रीचे चरित्र् मलीन करायचे . हे खुप खटकते.>
हे कसं कळतं चित्रपट येण्याआधीच? उगा दहशत माजवायची धर्म, अन जातीच्या नावावर. सरकार याविषयी मूग गिळून गप्प आहे. सरकारचं जनतेप्रती काही दायित्व आहे की नाही असा प्रश्न या धमक्या वाचून पडतो.
असू दे हो.
असू दे हो.
नवराबायकोच चावटपणा करतात..
परवा एकाने बाजिरावाला नाचताना
परवा एकाने बाजिरावाला नाचताना दाखवला म्हणून भन्साळीची मापे काढली. अरे, काय प्रॉब्लेम आहे बाजीराव नाचला असं दाखवलं तर. नाचण्यात काय वाईट, दुत्त दुत्त असं आहे? उगाच बोंबलतात लोक. हिस्टॉरिकल फिक्शन म्हटलं की सगळं ऐतिहासिक सत्यच असेल असे नाही हे समजूनच लोक जातात ना बघायला?
tell me had anyone imagined
tell me had anyone imagined Bajirao dropping water on the head of Kashibai in such sexy manner>>>
अहो ते नवराबायको आहेत ना? आणि हे सगळं त्यांच्या खाजगी शयनगृहातच चाललं आहे, बाहेर चारचौघात नाही
आणि तसं म्हटलं तर जोधा अकबर
आणि तसं म्हटलं तर जोधा अकबर त्यांच्या मिलनाच्या रात्री गाणी गातात हेही पचायला जरा जडच जाईल की
तेव्हा नाही विरोध झाला? का अकबर ख्वाजाजी म्हणत गोल गोल नाचलेला चालतो, जोधा गाणी म्हणते ते चालतं, मग बाजीराव नाचला, काशीबाईने गाणे म्हटले वा पद्मावतीने फक्त नवरा आणि इतर बायकांच्यासमोर आदबशीर घुमर नाच केला तर काय हरकत आहे?
काशीबाईने गाणे म्हटले असं
काशीबाईने गाणे म्हटले असं नाहीये ते- लावणी नृत्य मंगळागौर सदृश कार्यर्कमात दाखवले आहे. त्यासाठी आक्षेप होता. मंगळागौर पूजा सरळ दाखवली असती तर आक्षेप घेतला नसता.
दुसरं म्हणजे चित्रपट पाहिला तर कळेल की ते पिंगा गाणं चित्रपटाच्या कथानकाशी विसंगत आहे. म्हणजे इतिहास जाऊ दे भन्साळी स्वतःच्या कथेशी प्रामाणिक नाही.
पण to his credit, त्याने काशी हे character सर्वात ग्रेसफुल बनवले आहे व प्रियांकाने सुंदर काम केले आहे. मस्तानीच्या ग्रे शेड भूमिकेच्या तुलनेत काशी सर्वांच्या
सहानुभूती व आदरास पात्र व्यक्तिरेखा ठरते. अगदी पिंगा नृत्य प्रियांका व दीपिकाने कुठेही चीप होऊन दिलेले नाही, मग शब्द व स्टेप काही का असोत. त्यामुळे पिंगा बद्दल भन्साळीला माफ केलेले आहे
पद्मावतीने फक्त नवरा आणि इतर
पद्मावतीने फक्त नवरा आणि इतर बायकांच्यासमोर आदबशीर घुमर नाच केला तर काय हरकत आहे? >>> वीरांगणा होत्या त्या नृत्यांगणा नाही.
Submitted by पुंबा on 22 November, 2017 - 18:55>>> हिडिस प्रकार होता तो. उगाच कशाचे पण समर्थन नको.
खालील गोष्ट वाचा म्हणजे विषयाचे गांभीर्य कळेल कदाचित >>>> चाललय काय ........!>> +11
वीरांगणा होत्या त्या
वीरांगणा होत्या त्या नृत्यांगणा नाही.
>> ह्म्म... ह्या ळॉजिकने, म्हणजे मंगळागौर इत्यादी घरगुती कार्यात ज्या महिला पारंपरिक नृत्य करतात त्या नृत्यांगणा (पक्षी बाजारु औरते?) असतात तर..?
तुमच्या आणि तुमच्यासारख्या स्वयंघोषित कचकड्याच्या संस्कृतीरक्षकांसाठी (ज्यांना ते नक्की कोणत्या संस्कृतीचे रक्षण करत आहेत हेच मुदलात माहिती नाही):
According to the tradtional rituals, newly married bride is expected to dance ghoomar on being welcomed to her new marital home. Ghoomar is often performed on special occasions, such as at weddings, festivals and religious occasions. which sometimes lasts for hours.
> ह्म्म... ह्या ळॉजिकने,
> ह्म्म... ह्या ळॉजिकने, म्हणजे मंगळागौर इत्यादी घरगुती कार्यात ज्या महिला पारंपरिक नृत्य करतात त्या नृत्यांगणा (पक्षी बाजारु औरते?) असतात तर..? >>> तुमच लॊजिक आहे ते.
People who are supporting
People who are supporting bhansali must watch "Fury", "A Beautiful Mind", "Into The Wild", "The Imitation Game", "Schindler's List"..etc. These movies has true stories with historical content but these did not contain any vulgar things ex..john nash doing dance after solving maths problem..
वीरांगणा होत्या त्या
वीरांगणा होत्या त्या नृत्यांगणा नाही. हे कोणी म्हटलंय?
अज्ञान आणि कावेबाजपणा उघडा पडलाय तर सारवासारव?
तुशार भौ, आपली आपली आवड असते.
तुशार भौ, आपली आपली आवड असते.
आणि कलाकाराची एक शैली असते स्वतःची. त्याला ती सादर करु द्यावी. ती ज्याला आवडेल त्याला आवडेल, नाही त्याला नाही.
शिनेमा हिट किंवा फ्लॉप करण्याचा पर्याय पब्लिक च्या हातात आहे. तुम्ही कशापायी स्वतःचं रक्त जाळताय?
People who are supporting
People who are supporting bhansali must watch Fury, A Beautiful Mind, Into The Wild, The Imitation Game, Schindler's List..etc. These movies has true stories with hist
orical content but these did not contain any vulgar things ex..john nash doing dance after solving maths problem..>>>
हे सर्व चित्रपट उत्तम आहेत हे तेरा वेळा मान्य आहे
पण त्यांच्या दिग्दर्शकाला जसं भावलं तसं त्यांनी सादर केलं ना? त्यांनी तसं केलं म्हणून भन्सालीने अमुक प्रकारेच त्याचा चित्रपट काढला पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?
विरोध करणाऱ्या पार्टी ने
विरोध करणाऱ्या पार्टी ने पद्मावती मध्ये नेमका विरोध कशाला आहे ते स्पष्ट करावे एकदा,
असे दाखवले असेल, तसे केले नसेल कशावरून वगैरे लॉजिक गंडलेले आहे.
नुसतेच अमुक तमुक पिक्चर बघा, त्यात सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे का? वगैरे कशाला विचारायचे, पद्मावती मध्ये तशी लिबर्टी घेतली आहे हे सांगणारे/सूचित करणारे सीन्स सांगा.
People who are supporting
People who are supporting bhansali must watch Fury, A Beautiful Mind, Into The Wild, The Imitation Game, Schindler's List..etc.
>>>>>
आई सपोर्ट दिपिका पदुकोन.
मी कुठल्या ईँग्लिश हिरोईनचा पिक्चर बघू
नवरा बायकोमधला रोमान्स दाखवला
नवरा बायकोमधला रोमान्स दाखवला होता ना? त्याचा पण आंधळा विरोध? कैच्याकै हास्यास्पद होत आहे
आई सपोर्ट दिपिका पदुकोन.
आई सपोर्ट दिपिका पदुकोन.
मी कुठल्या ईँग्लिश हिरोईनचा पिक्चर बघू>>>
आईपेक्षा बाबांचं मत घेणं चांगलं या विषयात
Sorry..Alibaba hanged
Sorry..Alibaba hanged comments..
ह्या ळॉजिकने, म्हणजे मंगळागौर
ह्या ळॉजिकने, म्हणजे मंगळागौर इत्यादी घरगुती कार्यात ज्या महिला पारंपरिक नृत्य करतात त्या नृत्यांगणा (पक्षी बाजारु औरते?) असतात >>> हा प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात येइल.
मंगळागौर हिंदु धर्मात साजरी केली जाते. नाना कीति हिंदु धर्माला मान देतात हे सर्वांनाच माहितिये. थोडक्यात त्यांनी हिंदु स्त्रियांविषयीच्या आपल्या भावना किंबहुना स्त्रियांविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.असो
People who are supporting
People who are supporting bhansali must watch Fury, A Beautiful Mind, Into The Wild, The Imitation Game, Schindler's List..etc. These movies has true stories with hist
orical content but these did not contain any vulgar things ex..john nash doing dance after solving maths problem..>>>
हॉलीवूड मध्ये बेडसीन्स किसिंग सीन्स असतात तेही आणायचे का?
ब्लॅक सारखे चित्रपट ही आले आहे . Beautiful mind भारतात कितीजनांनी बघितला? Fury किती शहरांत प्रदर्शित झाला? भन्साळी भारतीय जनतेला नजरेसमोर ठेऊन सिनेमा बनवणार आहे हॉलीवूड साठी जेव्हा बनवेल तेव्हा ब्लॅक पेक्षा नक्कीच वरचढ असेल.
उलट बाजीराव मस्तानी मुळे कित्येक जणांना बाजीरावाची शौर्यगाथा माहिती झाली. चित्रपटात मस्तानी व बाजीराव चे प्रेम जरी दाखवले गेले तरी बाजीराव यांचे शौर्य काय होते ते जनतेने पुस्तकातून माहिती घेऊन वाचला. लोकांना पण ठाऊक असते चित्रपटात जे दाखवतात ते 100% सत्य नसते . मग लोक इतिहासाची पुस्तके वाचून अजून माहिती मिळवतात. हा फायदा चित्रपटांमुळे होतो याकडे इथल्या USK स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांनी दूर्लक्ष सोयीने केले.
मोहेंजोदडो मध्ये काहीही दाखवले असले तरी बऱ्याच रितिक फॅन्स इतरांनी मोहेंजोदडो नेमके आहे काय यावर जास्त सर्च केला होता.
रुद्रामादेवी नामक साऊथ चित्रपटात राणी नाचताना, प्रणय करताना, गाताना दाखवली आहे. तेव्हा विरोध झाला नाही. महापुरुषांच्या गाथा चित्रपटाद्वारे जाणते समोर येतात .. लोकांना नव्याने ओळख होते.
उगाच आपले काहीतरी करायचे म्हणून चालू आहे
ह्या ळॉजिकने, म्हणजे मंगळागौर
ह्या ळॉजिकने, म्हणजे मंगळागौर इत्यादी घरगुती कार्यात ज्या महिला पारंपरिक नृत्य करतात त्या नृत्यांगणा (पक्षी बाजारु औरते?) असतात >>> हा प्रतिसाद नीट वाचला तर लक्षात येइल.
मंगळागौर हिंदु धर्मात साजरी केली जाते. नाना कीति हिंदु धर्माला मान देतात हे सर्वांनाच माहितिये. थोडक्यात त्यांनी हिंदु स्त्रियांविषयीच्या आपल्या भावना किंबहुना स्त्रियांविषयीच्या भावना सांगितल्या आहेत.असो
आपल्या पूज्य व्यक्तींची,
आपल्या पूज्य व्यक्तींची, त्यातून ज्यांच्याशी अस्मिता वगैरे जोडल्यागेल्या आहेत अशा महापुरुषांची (अर्थात स्त्रियांनीही)
एक विशिष्ट छबी आपल्या डोक्यात बसली असते, आणि त्याच्या विरुद्ध जाणारी एखादी गोष्ट , जसे बाजीरावाने काशी बाईंवर पाणी ओतणे वगैरे दिसली की आपल्याला इतिहासाचे विकृतीकरण झाले असे वाटते.
पण ही सगळी माणसेच होती ना? त्यांनाही देहधर्म होतेच ना? आणि त्यांना जी काही संतती झाली ती पुराणानुसार फळे खाऊन किंवा यज्ञ करून नाही झाली. त्यासाठी त्यांनी जे केले ते पडद्यावर दाखवले तर ते इतिहासाचे विकृतीकरण कसे होते?
हा, औचित्याचा मुद्दा येऊ शकतो, किंवा प्रोटोकॉल्स आडवे येऊ शकतात, पण त्यात त्या व्यक्तीचा अपमान कसा होऊ शकतो?
बरं हे सगळे अवांतर झाले.
पद्मिनी मध्ये नक्की आक्षेप कशाला आहे?
पद्मिनी मध्ये नक्की आक्षेप
पद्मिनी मध्ये नक्की आक्षेप कशाला आहे?
>>> करणी ला पब्लिसिटी पाहिजे आहे... फलतुगिरी आहे हो.
यावर पूज्य भन्साळी काय
यावर पूज्य भन्साळी काय म्हणतात? दीपिका बाई जोरात आहेत परंतु रणबीर किंवा कोण तो दुसरा हिरो यांची प्रतिक्रिया काय?
असाच एक वाद दशक्रियावर पण सुरु आहे ना त्याचे काय झाले ??
पद्मिनी मध्ये नक्की आक्षेप
पद्मिनी मध्ये नक्की आक्षेप कशाला आहे?>>> नुसता पब्लिसिटी स्टंट आहे. करणी वाल्यांना जे पाहिजेय ते मिळतंय. रातोरात तथाकथित हिंदूत्ववाद्यांचे स्टार बनलेत ते. बाकीचे सर्व धमक्या देणारेही यात मस्त तेल ओतून हात शेकतायेत. खिल्जी व राणी पद्मिनी मध्ये जर कोणते आक्षेपार्ह स्वप्नद्रुष्य दाखवले असल्यास व तशी खात्री असल्यास त्याचा योग्य मार्गाने होणारा निषेध समजू शकतो. परंतू नुसत्या गैरसमजूतीतून व ती गैर आहे हे वारंवार सांगूनही फुकटचे अकांडतांडव समजण्यापलीकडे आहे.
आता तर गुजरात सरकारनेही भावी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शांतता व सुव्यवस्थेच्या कारणाने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे.
विरोध करणाऱ्या पार्टी ने
विरोध करणाऱ्या पार्टी ने पद्मावती मध्ये नेमका विरोध कशाला आहे ते स्पष्ट करावे एकदा,
सिम्बा ,मी वाचलं त्यावरून -
१. घुमर ला विरोध आहे. दिवानी मस्तानी टाईप सिच्युएशन आहे पण पद्मिनी असं नृत्य करताना दाखवणं अयोग्य असं विरोध करणारे म्हणत आहेत.
२. कास्टिंग खोडसाळ आहे. रणवीर शाहीदपेक्षा मोठा स्टार आहे. अनेक वर्षं त्याची दीपिकासोबत ऑन स्क्रीन व ऑफ स्क्रीन पेअर आहे. मग त्याला रतन सिंग केलं असतं आणि खिल्जीचा रोल शक्ती कपूर किंवा प्रकाश राज टाईप चरित्र अभिनेत्याला दिला असता तरी फरक पडला असता. दीपिका रणवीर जोडी ही दीपिका शाहीद जोडीपेक्षा उजवी आहे. सर्वात महत्वाची भूमिका रणवीर म्हणजेच खिलजीवर फोकस असणार.
३. पद्मिनीचा इतिहास म्हणा वा दंतकथा म्हणा, राजपुतांसाठी हळवी जखम आहे. शेवटी तो पराभव होता. पद्मिनी खिल्जीच्या हाती लागली नाही हे silver lining. पण anger, guilt, shame,honour या भावना आहेत. It is very sensitive touchy topic for them.
४. Khilji lusting after padmini or khilji pasmini dream sequence - आता भन्साळी असं काही नाही म्हणत असला तरी त्याचं reputation पाहता कदाचित काही आक्षेपार्ह सीन असतील. मला तर रिलीज पुढे ढकलला म्हणून हेच वाटतंय की तो आता कात्री घेऊन बसणार आहे.
५. कर्णी सेनेला पैसा प्रसिद्धी हवी असणं, स्वतः भन्साळीने हे पसरवणं (प्रसिद्धीसाठी) या शक्यता आहेतच. पण ओव्हरऑल लोक वैतागले आहेत. हिंदुत्ववादी पद्मावती किंवा बाजीरावाला विरोध करणार. मग सेक्युलर त्या मुव्हीला घरचं कार्य समजून सपोर्ट करणार. मग इंदू सरकार किंवा नथुराम गोडसे बोलतोय किंवा मोहेंजोदरो किंवा विंची कोड च्या वेळी सेक्युलर खवळणार. तेव्हा एकदम हिंदुत्ववादी घरचं कार्य असल्याच्या तयारीत. आपली ती अभिव्यक्ती दुसर्याचा तो खोटेपणा.
चॅनलवाले आणि आम नागरिक पॉपकॉर्न सम्पल्याशी कारण म्हणून टेनिस मॅच बघत बसणार.
Pages