ती येतेय ................ पद्मावती !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2017 - 13:02

‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी

..

‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !

..

- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

..

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार

..

भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

..

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__

..

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी

..

‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे

..

‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर

..

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर

..

‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज

..

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन

..

अ‍ॅण्ड फायनली ...............

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना

..

आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इमॅजिणेशन वर सगळा विरोध होत आहे. शुद्ध गाढवपणा आहे.>>>>
नाही पावसकरा. जाणूनबुजून उभा केलेला तमाशा आहे. कोण करणी सेना ? माहित होती कुणाला? आता जवळजवळ अख्ख्या देशाला माहित झाली आहे.

पद्मावतीचे प्रदर्शन आता लांबणीवर टाकण्यात आले आहे. दीपिका, रणवीर आणि भन्सालीला मारण्याच्या धमक्या येत आहेत. दीपिकाला जिवंत जाळणार्‍याला एक कोटीचे इनाम कोणी भाजपच्या मंत्र्याने जाहीर केले आहे असे वाचले Sad

भाजपा? सत्ताधार्यानीच धमकी द्यायला सुरुवात केली आहे. मोदी नेहमी प्रमाणे चिडीचूप बसणार. एरवी जगात काही छोटी घटना झाली तरी ट्विट करणारे आज काल त्यांची बोट अखडली आहे

दीपिकाला जिवंत जाळणार्‍याला एक कोटीचे इनाम कोणी भाजपच्या मंत्र्याने जाहीर केले आहे असे वाचले

>>>>

खरे असेल तर अफाट शॉकिंग आहे.

मागे काय कोणीतरी मोहम्मद नावाचा चित्रपट काढणार होता ... असा ऐकलं आहे कि आर्धा चित्रीकरण झालयावर अख्ख्या युनिटला धरून ठोकला आणि मग एका समाजाच्या भावना दुखावतील म्हणून तो चित्रपट बंद पडला ... त्यावेळी कुठे गेले होते रे हे लोकं तेव्हा काही नाही झाली बोंबाबोंब ... कसं आहे कि आपल्याकडे आपला तो कार्ट्या आणि दुसऱ्याचा तो बाळ्या असा झालाय .... विशेषतः जर हे बाळ हिरवे असेल तर मग विचारायलाच नको ....
दीपिकाला फक्त तिच्या पैसा कडे पहाटे आहे बाकी काही नाही ..
आता माझी प्रतिक्रिया भडक वगरे वाटेल परंतु जरा इतिहास पहा वाचा कदाचित माझे म्हणणे पटेल

योग्य वेळी, योग्य ठिकाणी थैल्या पोचवल्या कि असे प्रसंग उद्भवत नाहित.

ऐकिवात आहे कि खिलजी-पद्मावतीचा एकहि सीन या चित्रपटात नाहि तरीहि एव्हढा गोंधळ. मराठ्यांकडुन सहिष्णुता शिका म्हणावं; मस्तानी-काशिबाईंना एकत्र पिंगा घालायला लावला आणि आम्हि ते गाणं डोक्यावर घेतलं...

मागे काय कोणीतरी मोहम्मद नावाचा चित्रपट काढणार होता ... असा ऐकलं आहे कि आर्धा चित्रीकरण झालयावर अख्ख्या युनिटला धरून ठोकला आणि मग एका समाजाच्या भावना दुखावतील म्हणून तो चित्रपट बंद पडला ...
>>>>>>>>

कुठे चर्चा नाही झाली या बातमीची. माझ्या कानावर आली असती तर नक्की धागा काढला असता.

भाजप हरयानाचे मंत्री सूरज पाल अमू यांनी भन्साली आणि दीपिकाला मारणार्‍याला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

पद्मावतीच्या प्रदर्शनाच्या दिवशी भारत बंद पाडू अशी धमकी राजपूत संघटनांनी दिली आहे.

योग्य ठिकाणी थैल्या पोचल्यात म्हणून हा थयथयाट सुरु आहे. चित्रपटांना विरोध करुन त्यांची फुकट प्रसिद्धी करुन देणे हा वर्षानुवर्षे जुना धंदा आहे.

कालच एक न्युजक्लिप बघितली ज्यात एक राजपूत स्टुडियोत तलवार काढून दाखवत होता, अ‍ॅन्कर त्याला गलत कर रहे है वगैरे झापत होता. इतकी नाटकं च्यायला. कोणत्याही स्टुडियोत कोणाला हत्यार घेऊन जाऊच देत नसतात. हा तलवार घेऊन गेला, काढून नाचवली म्हणजे सगळं प्लान्ड आहे.

आमीरचा फनाह किंवा शाहरूखचा माय नेम इज खान कुठे कुठे प्रदर्शित होऊ दिला नव्हता. त्यात त्यांचे नुकसानही झाले. नुकसान प्लानड असते का?

बाकी न्यूज चॅनेल स्वतःच्या प्रसिद्धीसाठीहे पिलानड करू शकतात.

मागे काय कोणीतरी मोहम्मद नावाचा चित्रपट काढणार होता ... असा ऐकलं आहे कि आर्धा चित्रीकरण झालयावर अख्ख्या युनिटला धरून ठोकला आणि मग एका समाजाच्या भावना दुखावतील म्हणून तो चित्रपट बंद पडला ... त्यावेळी कुठे गेले होते रे हे लोकं >> म्हणुन आता धमक्या, कापाकापी, जाळपोळ करणे बरोबर आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का ?

@राहुलका

मारामारीचे समर्थन नाही परंतु चुकीला चूक म्हणणे बरोबर नाही का? तसाही हिंदू समाजाचा सहिष्णू सहिष्णू म्हणून खूप फायदा घेतला जातो ... मला इतकेच म्हणायचे आहे...
खालील गोष्ट वाचा म्हणजे विषयाचे गांभीर्य कळेल कदाचित

गुरुजी : तर ही गोष्ट आहे….
संत एकनाथांची, एकदा नदीवर स्नानास गेले असता बाहेर आल्यावर एक यवन (मुसलमान) त्यांच्यावर थुंकला. त्यांनी परत नदीत बुडी मारली
आणि बाहेर आले. यवन परत थुंकला त्यांनी परत बुडी मारली, अस १०८ वेळा घडल. नाथांनी न त्याला शिव्या, शाप दिले न काही बोलले.

शिक्षकांनी ही गोष्ट वर्गात सांगितली आणि त्यांनी यावरून या गोष्टीच तात्पर्य कुणी सांगेल का….? असा प्रश्न केला
ज्याने त्याने आपापल्या बुद्धी प्रमाणे पुढील उत्तर दिली :
१ - नाथ किती महान होते ते कळत.
२- नाथांची क्षमाशील वृत्ती दिसून येते.
३ - माणसाने कसे वागावं ते ही गोष्ट शिकवत
४ - एखाद्याला जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका
५ - रागावून त्रास तुम्हालाच
६ - शिक्षा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही ते काम परमेश्वराच
७ - दुसर्याला माफ करण्यातच खरा आनंद लपला आहे

अशी एकसो एक उत्तर विद्यार्थ्यांनी दिली पण एक विद्यार्थी मात्र गप्प होता. शिक्षकांनी त्याला विचारले, तू काही उत्तर देत नाही, त्यावर तो विद्यार्थी
उठून उभा राहिला आणि म्हणाला, “गुरुजी माझ्या मित्रांनी जी उत्तर दिली, ती त्यांना शिकवण्यात आलेल्या शिकवणुकी नुसारच दिली . पण, नाथांची ही गोष्ट ऐकल्यावर माझ्या लक्षात आल ते अस….“की हिंदू समाज तेव्हाही निद्रिस्त होता आणि आज ही आहे “. शिक्षक म्हणाले, काय बोलतोस तू…? नाथांना चूक ठरवतोस…..?
तो विद्यार्थी म्हणाला, “ नाही गुरुजी मी नाथांना चूक ठरवणारा कोण….?, नाथ जे काही वागले ते त्यांच्या संन्यस्त वृत्तीला साजेसच होत. या कृती
मुळे ते संत पदाच्या सर्वोच्च स्थानी बसले पण…?, तो यवन जेव्हा १०८ वेळा थुंकत होता त्यावेळी हिंदू समाज निष्क्रीयतेने पाहत होता. त्याला या
गोष्टीचा विरोध करावा असे मुळीच वाटले नाही. नाथ संत असले तरी तो हिंदू समाज संत नव्हता, जर वेळीच चोप दिला असता तर तो यवन
नाथांवर १०८ वेळा थुंकला नसता. नाथांनी जस त्याचं काम केल तस हिंदूंनी त्याचं काम करण योग्य होत, न की,नाथांच्या या कृतीचा चुकीचा अर्थ विचार लोकात पसरवण . हे बाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी होता :

।।विनायक दामोदर सावरकर।।
.........................................................................
विषयाचं गांभीर्य समजेल अशी आशा आहे ...

@ नानाकळा - मग तुम्ही सांगा खऱ्या कथा .... आम्ही तयार आहोत ऐकायला ... आपला सावरकरांबद्दल किंवा तत्सम कुठल्याही महापुरुषाबद्दल जास्त माहिती असल्यास सांगा आमच्या पण ज्ञानात तेव्हडीच भर ...
परंतु इथे मुद्दा काय आहे ते आपल्या लक्षात आलेले दिसत नाही ...

आपला सावरकरांबद्दल किंवा तत्सम कुठल्याही महापुरुषाबद्दल जास्त माहिती असल्यास सांगा आमच्या पण ज्ञानात तेव्हडीच भर .

>> जास्त हा शब्द टाकून आपण काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? सावरकरांवर हक्क सांगताय का?
चला फुडं....
असल्या चवन्नीछाप ष्टोर्‍या सावरकरांच्या नावावर खपवू नका....

चित्रपटाला विरोध व्हायचे मुख्य कारण आहे की म्हणे त्यात खिलजी आणि पद्मावतीचे एक स्वप्नदृश्य दाखवलेले आहे. असे म्हणणार्‍यांपैकी कोणीही हा चित्रपट पाहिलेला नाही. भन्साली आणि दीपिकाने सांगितले आहे की असे काहीही चित्रपटात नाही. रजत शर्मा आणि अर्णब गोस्वामी यांना भन्सालीने चित्रपट दाखवला आहे आणि त्या दोघांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. खिलजीचे कुठेही उदात्त्तीकरण करण्यात आले नाहीये, तो खलनायकच दाखवला आहे, पद्मावती आणि राजपूत संस्कृतीचा गौरव चित्रपटात केला गेला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. मग विरोध का होतो आहे हा प्रश्न आहे.

मग विरोध का होतो आहे हा प्रश्न आहे.>> तेच तर कुणालाच समजत नाहिये. मला तर हे करणी सेना व भंसाळी सेना दोघेही गरम तव्यावर आपआपल्या पोळ्या भाजताना दिसतायेत. कोणाला कालपर्यंत माहितही नसलेली ती करणी सेना अचानक देशभर (कु)प्रसिद्ध झाली. तसेच भंसाळी साहेबांनाही गेल्या काही चित्रपटांपासून असल्या प्रकारच्या प्रसिद्धीचा फायदाच झाला आहे. त्यामुळे हे पिल्लू बॉलीवूडच्या कळपातूनही आले असण्याची शंका आहे.
बाकी हिंदू धर्म हा पूर्वापार सहिष्णूच आहे व तीच त्याची खरी ताकदही आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच तसा या सहिष्णूतेचाही. नाहीतर अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोड नावाने श्रद्धास्थानांच्या टिंगल-टवाळ्याच चालू होण्याची शक्यता असते.

आणि राजपूत संस्कृतीचा गौरव चित्रपटात केला गेला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. मग विरोध का होतो आहे हा प्रश्न आहे.

नक्की कसला गौरव आणि कसलं उदात्तीकरण भन्साळी करणार आहे हा मुद्दा एका स्त्रीवादी चर्चेत वाचला. हिंदू अस्मिता वगैरे बाजूला ठेवा जरा.
१. पतिनिधनांनंतर अग्नीत सती जावे. ते स्त्रीसाठी गौरवास्पद आहे.
२. बलात्काराची शक्यता असल्यास आधीच स्वतःला संपवून टाकावे. ते honorable आहे. (याची corollary म्हणजे आता देशात जे बलात्कार होतात त्यातील पीडित महिलांची नन्तर जगण्याची हिंमत कशी होते?)
३. सर्व प्राईड,इज्जत, अस्मिता आणि काय ती सगळी बाईच्या चारित्रयाशी निगडीत. काचेचे भांडे अँड ऑल दॅट?

खिलजी आणि त्याच्या सैनिकांच्या तावडीत सापडून रोज नवे मरण मरण्याऐवजी आधीच आत्महत्या करावी हा विचार तसं पाहिलं तर लॉजिकल आहे, माणूस पेन कमी करण्याचा विचार करणार हे नैसर्गिक आहे. इंटेलिजन्ट आहे.
पण भन्साळी ते तसं दाखवणार का वर मी लिहिलं आहे तसं उदात्तीकरण करणार हा प्रश्न आहे.
अमिताभ बच्चन - तापसी पन्नू अभिनित पिंक चित्रपट आला होता तो अतिशय मह्त्वाचा मेसेज देणारा चित्रपट आहे पण भन्साळी पुरोगामीत्वाची झूल पांघरून नक्की काय मेसेज देणार आहे?

ओह.. सनव यांच्या वरच्या पोस्टमधील मुद्दे लक्षात घेता, उद्या जर या चित्रपटामुळे जोहार, सती आदी रुढींचे उदात्तीकरण होणार असून त्यासाठी चित्रपट विरोध करु असा इशारा एखाद्या स्त्रीमुक्ती संघटनेने दिल्यास नवल नको वाटायला. Uhoh
म्हंजे ह्यो राडा लय वाढणार दिस्तंय!

सती उदात्तीकरण वगैरे जरा ओव्हरथिंकिंग वाटतेय. इतके काही होईल असे वाटत नाही. बाजीराव मस्तानी पाहून कोणी दोन बायका कराव्या असे म्हटले नाही आणि सवतीबरोबर पिंगा नाचण्याइतके तिला अ‍ॅक्सेप्ट करा असाही फतवा आला नाही. गोष्ट आहे जोहार केल्याची तर दाखवेना का. लगेच आपण आगीत उड्या टाकयला हव्यात असे नाही.

अगदी बरोबर मैत्रेयीजी, ओव्हरथिंकींगच आहे हे व लिहीलंयही उपहासत्मकच. पण प्रसिद्धीचा हव्यास किंवा करणी सेनेसारख्या राडा घालण्यातच रस असणार्यांसाठी असलेच फालतू विषय पुरेसे असतात.

पण भन्साळी पुरोगामीत्वाची झूल पांघरून नक्की काय मेसेज देणार आहे?
>>>>
पद्मावती मेसेज द्यायला बनवला आहे? मला नाही वाटत !
आणि मेसेज द्यायला म्हणून जे घडले आहे ते बदलले तर पुन्हा ईतिहासाशी छेडखानी म्हणून गेला ना बाराच्या भावात.

जे काय पाहिलं न्युजमधे ते अगदीच होपलेस, तालिबानी !
या भडक आणि बिनडोक प्रोटेस्टमधे कोणाचा काय हेतु माहित नाही पण हे अतिच होतय, उलट्या दिशेनी देशातलं वातावरण अधोगतिकडे चाल्लय नक्की !
अजुनही लोक जगण्या मरण्याइतकं महत्त्व देत असलेल्या १७६० जाती , उपजाति , धर्म यामधे सगळे इतके पेटलेत पण वर वर म्हणायला अनेकतामे एकता वगैरे नारे, इंग्रजांनी आपले वीकनेसेस बरोब्बर ओळखले होते , अजुनही तेच चालु आहे दिसतय !
स्वतः फिल्म मेकर्स निगेटिव पब्लिसिटी ट्रिक वगैरे करतील हे निदान मला तरी अजिबात नाही पटत, इतकी मेहनत करून बनवलेली कलाकृति पडद्यावर आणायची वेळ झाली आणि या लेव्हलची निदर्शने पाहून मनःस्ताप होणार नाही हे आकलनापलीकडचे आहे.
असो, सोडून द्या देशातल्या रिलिज डेट्स, भारताबाहेर करा म्हणावं प्रिमिअर !

Ramesh Srivats @rameshsrivats

#Padmavati
Approximately 4 weeks from now, I expect one number speech from Modi in which he talks in general terms on how art should be appreciated, and violence has no place in society.
We can all clap then.

6:25 PM 19 Nov 17

>>पण भन्साळी ते तसं दाखवणार का वर मी लिहिलं आहे तसं उदात्तीकरण करणार हा प्रश्न आहे.<<

भन्साळी हा एक्दम प्रेडिक्टेबल आहे, त्याच्या चित्रपटाच्या आखणी बाबत, म्हणजे त्याच्या चित्रपटातले प्रोटॅगनिस्ट नाच करणार म्हणजे करणारंच; मग ते कुठलंहि कॅरेक्टर असेना का. इतिहास-बितिहास गेला तेल लावत. तर या चित्रपटा बाब्त मला एक शक्यता वाटतेय कि, खिलजी-पद्मावती स्क्रीन शेअर करत नाहि म्हणुन हा पठ्ठ्या खिलजीच्या जनानखानातल्या एकिला पद्मावती सोबत नाचवेल किंवा कव्वाली तरी म्हणायला लावेल. बघुया माझा अंदाज खरा ठरतो का... Proud

चित्रपटाला विरोध व्हायचे मुख्य कारण आहे की म्हणे त्यात खिलजी आणि पद्मावतीचे एक स्वप्नदृश्य दाखवलेले आहे. असे म्हणणार्‍यांपैकी कोणीही हा चित्रपट पाहिलेला नाही.>> When they are shooting in Jaipur Deepaka's dance sequence was shot in front of Ranveer. So this Karni sena believes that this is dream of Khilji. Later Bhansali clarified that there is noting like that in the movie. However no one trust Bhansali due to his previous reputation Happy . A great warrior Bajirao shown as lover boy and Pinga etc. Now Bhansali is in trouble as he may have to release the film along with Tiger Zinda Hai. Further if north indian states ban this film who will watch it. Releasing overseas only will not be profitable for producers.

व्यत्यय,
चान्स आहे लवकरच ते भाषण व्हायचा.

http://indianexpress.com/article/entertainment/bollywood/amid-padmavati-...

Deepika Padukone, who is at the centre of a row over “Padmavati”, has pulled out of the Global Entrepreneurship Summit (GES), that will have US President Donald Trump’s daughter Ivanka and Prime Minister Narendra Modi attend the inauguration on November 28.

तिला बोलावलच नव्हतं नी कायकाय पण बातम्या येताहेत म्हणा त्यामुळे काय खरे काय खोटे कोण जाणे. तिच्या आईवडिलांनाही सुरक्षा पुरवण्यात आलीय या गोंधळामुळे.
देशाबाहेरच्या मिडियामधे पण बातम्या येऊ लागल्यात.
भारत माता की जय!

Pages