ती येतेय ................ पद्मावती !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2017 - 13:02

‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी

..

‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !

..

- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

..

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार

..

भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

..

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__

..

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी

..

‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे

..

‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर

..

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर

..

‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज

..

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन

..

अ‍ॅण्ड फायनली ...............

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना

..

आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपांजली, तुम्ही सत्या, वास्तव, कंपनी हे चित्रपट पाहिले आहेत का? किंवा जुन्या काळात जात धर्मात्मा, दयावान वगैरे.. अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी विश्वाची कथा सांगणारया चित्रपटात त्या डॉनची भुमिका मध्यवर्ती असते आणि ती एखादा शक्ती कपूर टाईप्स कलाकाराला नाही देता येत. अश्या चित्रपटाला रुढार्थाने हिरो नसतोच. पण डॉन झालेल्या कलाकाराचे उदात्तीकरण होऊ नये याची काळजी घ्यायची असते.

दुसऱ्याच्या बायकांवर डोळा ठेवणे किंवा पळवणे >>>> ही तर शाहरुखची खोड आहे,
ती लक्षात घेता पद्मावती मध्ये त्याला खिलजी चा रोल द्यायला हवा होता.
डर, अंजाम, ddlj, कुकुहोहै, कभी अलविदा, कभी हा.., the लिस्ट इस बिग

दिपांजली, तुम्ही सत्या, वास्तव, कंपनी हे चित्रपट पाहिले आहेत का? किंवा जुन्या काळात जात धर्मात्मा, दयावान वगैरे.. अंडरवर्ल्ड आणि गुन्हेगारी विश्वाची कथा सांगणारया चित्रपटात त्या डॉनची भुमिका मध्यवर्ती असते आणि ती एखादा शक्ती कपूर टाईप्स कलाकाराला नाही देता येत. अश्या चित्रपटाला रुढार्थाने हिरो नसतोच. पण डॉन झालेल्या कलाकाराचे उदात्तीकरण होऊ नये याची काळजी घ्यायची असते.
<
पाहिले आहेत आणि माझा कोणि कुठले रोल्स करावेत याला ऑब्जेकशन नाहीच्चे , तूच ते म्हणणारा.
तर जसे तिथे त्यांची भूमिका मध्यवर्ती तशी इथे खिलजीची, इथे तरी शक्ती कपुर सारखा अ‍ॅक्टर कशाला? सुपरस्टारच हवा !
उदात्तीकरण केलय हे न बघता ठरवणार्यांनी बसा आता शांत Proud

DDlj, हा भारतात येतो तेव्हा सिमरन चे लग्न ठरले असते, याने तुला प्रोपोज पण केलेले नसते, अर्थात सिमरन वर त्याचा क्लेम नसतो.

कुकुहोहै :- आधी काजोल ला सोडून राणी शी लग्न करतो, परत काजोल आयुष्यात येते तेव्हा तिचे लग्न ठरलेले असते, तरी हा चोम्बडा तिच्या लग्नात घुसतो आणि सलमान बिचारा ऐन लग्नाच्या वेळी कुंवारा राहतो

कभी हा.. आना आणि क्रिस एकत्र आहेत, लग्न करणार आहेत हे माहीत असते त्याला, तरी तो क्रिस चा पत्ता क्त करायचा प्रयत्न करतो,

लुब्रा मेला...

मग काय,
माझ्या मनाला तीव्र धक्का बसला आहे,
त्यामुळे थोडे इकडचे तिकडचे विषय आले तरी चालवुन घ्या..

हा धागा पद्मावतीबद्दल आहे.
शाहरुख त्या तिथे पलीकडे. >>>> टाइम्स नावु ने ट्विट टाकले आहे - शाहरुख आणी आमीर गप्प कसे पद्मावती बाबत !

च्या मारी खा त्या शाखाच्या नावानी.
पदमी बद्दल लिहा लोक्स.
रण्वीर सिंग एकदम ढिन्च्याक आवडतो. सॉलिड एनेर्जेटिक. हे बजनेदे धडक धडक...
तीनही खानांशी तुलना नकोच.
त्याने खिलजीपण अपार मेहनत घेउन केलेला असणार नक्कीच. ट्रेलर मधे दिसतंयच ते.

अवांतर : बाजीराव पण मला आवडला होता. दुषमनची देखो जो वाट लावली असली तरी रण्वीर सिंगचा बाजीराव आवडला होता जबर.
आणि प्रियांकाची काशीबै पण. खर्‍या काशीबाईंना एवढी सुट मोकळीक होती का मला माहित नाही.
पण ह्या काशीबाइंचं कॅरेक्टर छान उभं केलं होतं. पिंगा असंच प्रियांकाचा एखादा नाच हवा एखादा म्हणुन असेल Happy
राहिली मस्तानी. तर दिपीका अशीच आवडत नाही. त्यात ती चित्रपटात गळेपडु मस्तानी वाटली मला. त्यामुळे नाही आवडली.

शाहरुख व अमिर देश चालवतात!? सरकार चालवतात? सरकार वर त्यांची मर्जी चालते?
मग टाइम्स नाऊ सारख्या चॅनल ने सरकारच्या मंत्र्यांनी का बोलले नाही असे विचारायला हवे? तथाकथित लोकप्रिय पीएम मोदींना तुम्ही का बोलत नाही हे विचारायला हवे!
शाहरुख व आमिर यांनी प्रतिक्रिया दिली तर धर्मांध लोक शांत होणार?

शाहरुख व आमिर यांनी प्रतिक्रिया दिली तर धर्मांध लोक शांत होणार? >>> ह्यांना ९ च्या कार्यक्रम करायला टाइमपास मिळेल पुढे २/३ दिवस म्हणुन उचकवणे चालु आहे.

According to the tradtional rituals, newly married bride is expected to dance ghoomar on being welcomed to her new marital home. Ghoomar is often performed on special occasions, such as at weddings, festivals and religious occasions. which sometimes lasts for hours. >>> पण झुबेदा मध्ये तर वेगळच दाखवल होत. रेखा ही राजस्थानमधल्या राजघराण्याची राणी असते. जेव्हा करिश्मा (जी रेखाची सवत झालेली असते ) लग्नानन्तर घुमर नृत्य करणार्या बायकान्बरोबर नाचते, तेव्हा रेखा तिला सान्गते कि राजघराण्यातल्या राण्यान्नी असे सगळयान्समोर नाचायचे नसते.

हॉलीवूड मध्ये बेडसीन्स किसिंग सीन्स असतात तेही आणायचे का?>>> तेतर Bollywood मध्ये कधीच आणले आहेत. तुम्ही आताचे चित्रपट बघत नाही का?

पण पुढे रोमांटीक हिरो इमेज झाल्यावर शाहरूखने कधीच असा अचरटपणा केला नाही?>>> निगेटीव्ह रोल्स करणे म्हणजे आचरटपणा? व्हिलनच्या भुमिकेत सुद्दा अभिनय असतोच की.

नवखे असलेल्यान्नीच निगेटीव रोल्स करावेत, पण Established नायक/नायिकान्नी निगेटीव भुमिका करु नयेत हे कुठल्या पुस्तकात लिहीलेय?

ज्याला वाटेल त्याने तो तो रोल करावा. आपण विरोध करणारे कोण? अभिताभने सुद्दा सुपरस्टार झाल्यावरही खलनायकी भूमिका केल्या होत्या की.

डॉन अमिताभचा होता. तोच शाहरूखने केला. त्यात नकारात्मक वगैरे काही नव्हते. >>> शाहरुखचा डॉन वेग़ळा होता. त्यात त्याने निगेटीव भुमिका केली आहे. तु तो चित्रपट पुर्ण नाही बघितला वाटत.

लुब्रा मेला.>>> शिव्या न देताही टिका करता येऊ शकते.

लुब्रा मेला.>>> शिव्या न देताही टिका करता येऊ शकते
>>>
अय्यो, अहो ऋन्मेष ला नाही हो म्हणालो,
जिथे तिथे नाक खुपसून दुसऱ्यांच्या बायका पळवणाऱ्या शारूख ला म्हंटले.
त्यांनी ही भावना दुखावल्या असतिल तर सॉरी बरं का,
पण संपादन करायची मुदत संपली आहे, can't help now

सिम्बा, बायको आणि गर्लफ्रेंड यात फरक असतो.
आपण एखाद्या मुलीवर प्रेम करत असू तर तिचे लग्न ठरलेय म्हणून माघार घ्यायची याला काही अर्थ नाही.
खरे तर विवाहीत स्त्री वर प्रेम करायलाही हरकत नाही. तुम्ही ते प्रेम मिळवायला कुठल्या मार्गांचा करता यावर तुम्ही कसे आहात हे ठरते.
प्रेम हि एक पवित्र भावनाच आहे.

बाकी तुमच्या लिस्टमध्ये वीर झारा सुद्धा घ्या...

>>>>खरे तर विवाहीत स्त्री वर प्रेम करायलाही हरकत नाही. तुम्ही ते प्रेम मिळवायला कुठल्या मार्गांचा करता यावर तुम्ही कसे आहात हे ठरते.
प्रेम हि एक पवित्र भावनाच आहे.>>>

हे विधान पद्मवतीच्या धाग्यांवर करायचे धारिष्ट्य तूच दाखवू शकतोस,

अरे, देखो देखो भाई क्या कह रहा है...

>>>>खरे तर विवाहीत स्त्री वर प्रेम करायलाही हरकत नाही. तुम्ही ते प्रेम मिळवायला कुठल्या मार्गांचा करता यावर तुम्ही कसे आहात हे ठरते.
प्रेम हि एक पवित्र भावनाच आहे.>>>

हे विधान पद्मवतीच्या धाग्यांवर करायचे धारिष्ट्य तूच दाखवू शकतोस, >>>>>> Rofl सिम्बा

बाकी स्वतःच्याच धाग्यावर विषयाला सोडून बोलल्याबद्दल आजकाल वेमा काही म्हणत नाहीत का? Wink

निगेटीव्ह रोल्स करणे म्हणजे आचरटपणा?
>>>>
तुम्ही तुमच्या हिरो ईमेजच्या करिश्म्याला व्हिलन रोलमध्ये वापरत असाल तर तो आचरटपणा झाला.

नवखे असलेल्यान्नीच निगेटीव रोल्स करावेत, पण Established नायक/नायिकान्नी निगेटीव भुमिका करु नयेत हे कुठल्या पुस्तकात लिहीलेय?
>>>>
सेन्सॉर नियमांच्या पुस्तकात लिहायला हवे खरे तर हे.

ज्याला वाटेल त्याने तो तो रोल करावा. आपण विरोध करणारे कोण?अभिताभने सुद्दा सुपरस्टार झाल्यावरही खलनायकी भूमिका केल्या होत्या की.
>>>>
अमिताभ हा काही आदर्शवादी हिरोचा बेंचमार्क नाही.

शाहरुखचा डॉन वेग़ळा होता. त्यात त्याने निगेटीव भुमिका केली आहे
>>>>>
फक्त शेवटला ट्विस्ट दिलाय बहुतेक. बाकी दोघांतही डबल रोल असून एक चांगला एक वाईट असे आहे.

खरे तर विवाहीत स्त्री वर प्रेम करायलाही हरकत नाही. तुम्ही ते प्रेम मिळवायला कुठल्या मार्गांचा करता यावर तुम्ही कसे आहात हे ठरते.
प्रेम हि एक पवित्र भावनाच आहे.
Submitted by ऋन्मेऽऽष on 23 November, 2017 - 06:19
<
घ्या, खिल्जी व्हिलन कि हिरो हा धाग्याकर्त्याकडूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह्ड Proud
आता या बीबीचा जोहार करायला हरकत नाही , वेमा !

वेमा पण मूळ विषय आहे काय?
ऋन्मेष ने गेल्या काही दिवसात लोकांनी दिलेली स्टेटमेंट्स लिस्ट केली आहेत, ना त्यावर प्रश्न विचारलाय, ना काही कंमेन्ट केलीये,

त्याचा वर quote केलेला प्रतिसाद पहाता, अल्लादिन ने विवाहित पद्मिनीच्या प्रेमात पडणे, आणि तिला हस्तगत करण्यासाठी (त्या काळचा योग्य पर्याय निवडून) चितोड वर हल्ला करणे त्याला मान्य आहे असे वाटते,

आता बोलायला विषयच काय उरतो?

हे विधान पद्मवतीच्या धाग्यांवर करायचे धारिष्ट्य तूच दाखवू शकतोस.
>>>>

काय चूक आहे या विधानात. उलट पद्मावती आणि खिलजीचे उदाहरणच समर्पक आहे मला काय बोलायचे आहे हे समजवायला.
खिलजीचे विवाहीत महिलेवरचे प्रेम आकर्षण वासना जे काही आहे त्यानुसार तिला मिळवायला तो बळजबरी आणि कपट करतो म्हणून तर तो नीच ठरतो.
रामायणातल्या रावणानेही असाच कपटीपणा केला होता.

ते प्रेम मिळवायला कुठल्या मार्गांचा करता यावर तुम्ही कसे आहात हे ठरते.
>>>

सिंबा दिपांजली ... या वाक्याचा अर्थ तुम्ही खिलजीचे समर्थन असा काढलात Lol

अहो वर मी रणवीरने अशी व्हिलन भुमिका केली म्हणून वाद घालतोय हे तरी बघा Happy

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/padmavati-mirror-sk...

घ्या, रतनसिंग ने पद्मिनीचे प्रतिबिंब खिलजी ला दाखवायला परवानगी दिली हा उल्लेख सर्व ठिकाणाहून वगळा अशी कारणी सेनेची मागणी. (खरे तर होणारी हानी टाळण्यासाठी रतनसिंग हा निर्णय घेतला होता)
चितोड गढ किल्ल्यात जिकडे ती आरश्यांची रचना दाखवली जाते त्या दालनात शिरून आरसे फोडले.

या पद्धतीने बहुदा " खिलजी चा पराभव झाला, त्याच्या आवडत्या गुलामाने स्वतः ला पेटवून घेतले, आणि त्याची आठवण राहावी म्हणून किल्ल्यावर राजपुतांनी जोहार कुंड बांधले" अश्या नव्या गोष्टी पर्यंत आपण पोहोचू.

<खरे तर विवाहीत स्त्री वर प्रेम करायलाही हरकत नाही. तुम्ही ते प्रेम मिळवायला कुठल्या मार्गांचा करता यावर तुम्ही कसे आहात हे ठरते.>
अतिअवांतरः अहिंसक आंदोलन, उपोषण हा मार्ग किती साळसूद वाटतो की नाही पण याच मार्गाचा वापर करून विवाहित स्त्रीचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न एकजण करतो आणि त्यात तिचा किती छळ होतो हे एका हरिशंकर परसाईंच्या कथेत आहे.

पुम्बा, तुम्ही पण लायन किंग फॅन का??
पण घेऊन घेऊन त्या डुकराचे नाव का घेतलेत? रफिकी किंवा मूफासा तरी घ्यायचेत Happy

Pages