ती येतेय ................ पद्मावती !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2017 - 13:02

‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी

..

‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !

..

- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

..

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार

..

भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

..

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__

..

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी

..

‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे

..

‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर

..

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर

..

‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज

..

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन

..

अ‍ॅण्ड फायनली ...............

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना

..

आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नीट आठवा सिंबा, त्या डुकरानेच तुम्हाला तगवलं, आशा, प्रेरणा दिली. हाकुना मटाटा हा दिव्य मंत्र त्याच्याकडूनच शिकलात. तुम्ही स्वागत करायला पाहिजे आमचं. :))) Wink
ऑन अ सिरियस नोटः पुंबा हे आख्ख्या लायन किंग मधलं माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर आहे.

हर काय वाचतो आहे मी??
रतन सिंग ला सोडवून आणल्यावर, अल्लाउद्दिन येण्या आधी,
पद्मिनीची इच्छा धरणार्या देवपाल ने चितोड वर हल्ला केला, आणि रतनसिंग त्यात मारला गेल्यावर पद्मिनी ने जोहार केला.

According to Jayasi’s Padmavat, being a famed beauty, Padmini has many suitors and Devapala is one of them. After her husband Rawal Ratan Sen is taken as Khalji’s prisoner to Delhi, Devapala, driven by his lust for Padmini, sends a woman messenger by the name of Kumudini, who beseeches Padmini to accept Devapala’s offer of marriage and forget about her captive husband. She entices Padmini by telling her how rich the prince is and how “one forgets Chittor when one goes to Kumbhalner”.

Padmini declines the offer and hatches a plan with the Rajput chieftains Gora and Badal to free Ratan Sen . The plan succeeds and Ratan Sen returns with his wife to Chittor, only to find Devapala has attacked his fort. In the fight that ensues between Ratan and Devapala, the former loses and is killed. Fearing that Devapala will rape her and other women of the harem, Padmini leads them to commit jauhar. By the time Khalji returns to Chittor, to reassert his control over Ratan Sen, all he finds are ashes.

https://scroll.in/article/858619/history-lesson-padmavati-was-driven-to-...

कोणी ओरिजिनल पद्मावत वाचले असेल तर प्लिज हे खरे आहे का सांगा

सिम्बा ,
कुशल प्रशासक इतिहासात होते आणि वर्तमानातही आहेत भारताबाहेरही होते भारतातही आहेत.
म्हणून त्यांची बाकी सर्व वागणूक माफ का?

हे ही तिथेच सापडले.
पद्मावती सिनेमाच्या निमित्तानं अलाउद्दीन खिलजी चर्चेत आला आहे. या खिलजीनं महाराष्ट्र तर लुटून नेलाच, पण महाराष्ट्राची होऊ घातलेली सूनही पळवून नेली.
https://www.bbc.com/marathi/india-42077727

मी खिलजी हिरो आहे असे अजिबात म्हणत नाहीये, किंवा त्याची बाजू घेऊन बोलत नाहीये,

पण "खिलजी पद्मावतीवर भाळला, आणि त्याने चितोड वर हल्ला केला" या वन लायनर डिस्क्रिप्शन च्या पलीकडे खिलजी कसा होता हे शोधायचा प्रयत्न करतोय,

खिलजी ने केलेला हल्ला हा पद्मावती साठीच होता का? एकी कडे वाचले त्याला गुजरातवर आक्रमण करायला मेवाड मधून फौज नेण्यास रतनसिंगने विरोध केला, हा रस्ता मोकळा करण्यासाठी त्याने चितोड वर आक्रमण केले,

शेवटी पद्मावती इतिहासात 100% खरे किंवा खोटे काय हे आपल्याला कधीच कळणार नाहीये,
पण खिलजी चे या भरतवर्षा साठी काही योगदान असेल (जे डॉक्युमेंटेड आहे) तर ते मान्य करायला काय हरकत आहे?

माझी कशाला हरकत असणारे
खिलजीचे या भरतवर्षा साठी योगदान - या विषयावर चित्रपट का़ढला तरी त्यास माझी काही हरकत नाही Proud

(जे डॉक्युमेंटेड आहे) तर ते मान्य करायला काय हरकत आहे?
माझ्यामते इतिहासात 100% खरे किंवा खोटे काही नसते असतो तो दृष्टीकोन
ते कोण नोंदवते आहे हा मुद्दा महत्वाचा तुम्ही कोणत्या बाजूने पहाताय तीच बाजू नोंदवली जाते.

पण विषय बाजीराव-मस्तानी असताना बाजीरावाची युद्धनिपुणता काढायची
विषय पदमावती असताना खिलजी 'कुशल प्रशासक' चा मुद्दा काढायचा

बोअर झालं इतकंच

BBC ची लिंक होती म्हणून वाचले पण

त्याच मी दिलेल्या वरच्या लेखात शेवटाकडे एक वाक्य " या घटनेवर प्रख्यात कवी अमीर खुसरो यांनी पूर्ण कविताच लिहली आहे. पण आता ही कविता किती काल्पनिक आहे आणि किती वास्तववादी आहे हे सांगता येणार नाही." हे ही आहे Proud

BBC Marathi - BBC ची 'बस नाम ही काफी है' वाली विश्वासार्हता कमी करणार वाटतंय.

पण खिलजी चे या भरतवर्षा साठी काही योगदान असेल (जे डॉक्युमेंटेड आहे) तर ते मान्य करायला काय हरकत आहे?>>>
आजिबात हरकत नाही. जुलमी इस्लामिक सत्ताधीशांचं उदात्तीकरण हे व्हायलाच हवं. खिलजी, अकबर, शहाजहान, औरंगज़ेब... मोठी लिस्ट आणि भरपूर स्कोप आहे. Proud

बोअर झालं इतकंच>>>>>>
बोअर तर झालेच आहे हो,
आजूबाजूला इतक्या महत्वाच्या गोष्टी होत असताना मीडियाला हाताशी धरून एका पिक्चर भोवती वाद उकरून काढला जातो,
आणि शहाणी सुरती जनता त्याला बळी पडते हे नेहमीचेच झाले आहे.

रास्नेभाऊ,
तुम्ही उल्लेखलेली सर्व नावे भारतीय आहेत बरे, Happy

या सर्व वादाचा निष्कर्ष हा असेल : पद्मावती सुपरहिट होईल, पैसे इकडून तिकडे योग्य जागी पोचवले जातील, भन्साली चित्तोडगड संवर्धनासाठी वा राजपूत संस्कृतीच्या संवर्धनासाठी देणगी देईल. कर्णी सेना आणि भन्साली मग गळ्यात गळे घालून डोला रे डोला, पिंगा आणि घूमर करतील. Happy

या सर्व वादाचा निष्कर्ष हा असेल : पद्मावती सुपरहिट होईल, पैसे इकडून तिकडे योग्य जागी पोचवले जातील, भन्साली चित्तोडगड संवर्धनासाठी वा राजपूत संस्कृतीच्या संवर्धनासाठी देणगी देईल. कर्णी सेना आणि भन्साली मग गळ्यात गळे घालून डोला रे डोला, पिंगा आणि घूमर करतील >> आणी बिजेपी गुजरात मध्ये निवडुन येइल

>>'पद्मावती' को मिला बॉलीवुड का साथ, कल पूरे भारत में 15 मिनट के लिए नहीं होगी शूटिंग<<

ऑसम; हॅव योर केक अँड ईट इट टू... Proud

राज तिकडे बसून इथे लोक काय भोगत आहे याची कल्पना कशी येते? दिव्यदृष्टी प्राप्त आहे का? की नेहमी प्रमाणे नुसती काडी टाकण्याचा प्रयत्न?

एरवी ज्या कलाकृती फारश्या पाहिल्या गेल्या नसत्या त्यांच्याकडे प्रेक्षकांना आकृष्ट करण्याचा हा मार्ग आहे..

कोणीतरी कॉमेंट लिहिली होती टाइम्स वर कि हे हत्तीचे नाव वाटतय Biggrin
खरच आहे, जरी काव्यं असले तरी Sounds like Airaavat Happy

आता शीर्षक बदला.. तो येतोय... पद्मावत...
>>>>

संपादनाची वेळ संपली आहे. आता नवीन धागाच काढू शकतो. पण राहू दे. पद्मावत एकेकाळी पद्मावती होता हे तरी लोकांना समजेल. महत्वाचा असा ऐतिहासिक दस्तावेज आहे हा धागा.

बाकी पद्मावतीचे पद्मावत केले म्हणजे नक्की काय केले? शाहीद कपूर पद्मावत दाखवणार का? सेक्स चेंज ऑपरेशन नुसते शीर्षकापुरते आहे की स्टोरीतही ट्विस्ट दाखवणार? ईतिहासाशी छेडखानी आजवर बरेचदा झाली आहे, पण हे तर सरळ सरळ सेक्शुअल हरॅसमेंट झाले ..

पद्मावत हे काव्य आहे ज्यात पद्मावतीची कहानी सांगितली आहे. म्हणुन जर भावना दुखवायच्या नसतील तर खर्‍या राजपुत लोकांच्या भावना समजावुन घेऊन हा चित्रपट पद्मावत या काव्यावर आधारित आहे असे स्पष्ट करा आणि शीर्षकात बदल करुन ते पद्मावत करा अस सेन्सॉर बोर्डान म्हटल जिथवर मला माहिती आहे..

टीना,
म्हणजे ते पद्मावत काव्य काल्पनिक आहे का? चित्रपट सत्यघटनेवर आधारीत नसून देवदास सारखा एखाद्या कांदबरीवर / काव्यावर आधारीत आहे अशी दिशाभूल करायचे आणि चित्रपट प्रदर्शित करायचा.. छान आहे.
पण त्या काव्यावर तरी जसाच्या तसा आधारीत आहे का?

पण त्या काव्यावर तरी जसाच्या तसा आधारीत आहे का?>> भन्सालीकडून या अपेक्षा ठेवण म्हणजे मुर्खपणा आहे नाही का Lol
मी स्वत: यावर खोदकाम केलेलं नाहीए पण ते मुळात काव्य आहे हे मात्र बर्‍याच लेखात वाचलयं..

आजूबाजूला इतक्या महत्वाच्या गोष्टी होत असताना मीडियाला हाताशी धरून एका पिक्चर भोवती वाद उकरून काढला जातो,
आणि शहाणी सुरती जनता त्याला बळी पडते हे नेहमीचेच झाले आहे.>>>>>

असा चित्रपट काढून तो योग्य वेळेस प्रदर्शनासाठी येईल यासाठी निर्मात्याला हाती धरले नाही का? तोच तर प्रमुख आहे या सगळ्यामगचा. त्याने चित्रपटासाठी पैसा पुरवला नसता तर मग ना राहे बांस, न बजे बांसुरी झाले असते.
कितीही मीडिया हाती धरला तरी काय उपयोग मग?

आता फक्त दोनच गोष्टींचे स्पष्टीकरण बाकी राहिलेय. राजस्थानी अस्मितेवर कथित हल्ला करणारा चित्रपट हाताशी धरून शहाण्या सुरती जनतेला मूर्ख बनवण्यापेक्षा एखादा गुजराती अस्मितेवर हल्ला करणारा विषय निवडून चित्रपट बनवला असता तर 150 चा आकडा गाठता आला असता का?

2019 मध्ये कुठल्या विषयावरच्या चित्रपटाला हाती धरणार ? तेव्हा वेगवेगळ्या प्रांतातल्या जनतेच्या अस्मिता पणाला लावाव्या लागणार. आपल्याकडे मेलं सौथीत कोण ऐतिहासिक लोक होऊन गेले याचे नोर्थीना सोयरसुतक नाही व नोर्थीत जे कोण होऊन गेले त्यांना सौथी हिंग लावूनही विचारत नाहीत. अशा वेळी एकच सर्वसमावेशक चित्रपट काढून काम फत्ते करता येईल की प्रांतीय अस्मितांचा जोरकस अभ्यास करून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चित्रपट काढावे लागतील?

पण त्या काव्यावर तरी जसाच्या तसा आधारीत आहे का?>>>>>>>>>>

काव्याशी प्रामाणिक राहायचे असेल तर,

खिलजी रतनसिंग ला कैद करून घेऊन जातो.
असहाय पद्मिनीला आपलीशी करण्यासाठी त्यांचा शेजारी राजा देवपाल पद्मिनीकडे दूत पाठवतो.
पद्मिनी त्याची ऑफर धुडकावून लावते, आणि रतनसिंगला सोडवून आणते.
देवपाल चितोड वर हल्ला करतो, लढाईत देवपाल आणि रतनसिंग मरतात. पद्मिनी सती जाते/ रत्नसिंग युद्धास जातो तेव्हा जोहार करते.
मागोमाग खिलजी चे चितोड वर आक्रमण होते, राजा राणी नसलेले चितोड तो जिंकून घेतो

असे दाखवायला लागेल,
पद्मिनीच्या जौहराची जबाबदारी राजपूत राजावर येईल मग, चालेल??

पद्मिनीच्या जौहराची जबाबदारी राजपूत राजावर येईल मग, चालेल??>>>>>

किती सोपे आहे ना असा निष्कर्ष काढणे?

पद्मिनी खरेच होती का माहीत नाही. ऐतिहासिक पुरावे तरी ती नसावी असेच आहेत. पण मुघलांविरुद्ध युद्धात उतरल्यावर विजयाची खात्री नसल्यास स्त्रिया जोहार करून स्वतःची पुढची धूळधाण टाळत होत्या याचे पुरावे आहेत. स्वतःचे मृत शरीरसुद्धा या नीचांच्या हाती लागू नये असे वाटावे इतक्या खालच्या पातळीचे अत्याचार ऐकले/पाहिले गेल्याशिवाय कोण माणूस जिवंतपणी स्वतःला आगीच्या हवाली करायचे धाडस करेल?

राणी लक्ष्मीबाईनेही स्वतःच्या मृत्यूनंतर मृतदेह जाळून नष्ट करावा अशी सूचना दिलेली, जी तिच्या साथीदारांनी पाळली. ती ब्रिटिशांविरुद्ध लढली, तिलाही मृत्यूनंतर शरीराला विरोचित सन्मान मिळेल याची खात्री वाटली नाही.

या नीच लोकांनी असे का केले, याचे समाजमनावर व भारतीय इतिहासावर काय परिणाम झाले याची चर्चा करणे दूर, इथे आपण त्यांच्या प्रशासकीय योगदानाबद्दल चर्चा करू इच्छितो. आपले काहीच नुकसान झाल्याचे आपल्याला दिसत नसल्याने, तेवढा आपला अभ्यासच नसल्याने आपण डोके शांत ठेऊन चित्रपट काढू शकतो ज्यात आपण या कारणे व परिणामांचा मागोवा न घेता केवळ भावनांशी खेळून पैसे कमावतो. __/\__

ज्या हॉलिवूडच्या दिग्दर्शकांची नावे हल्लीच्या भारतीय दिग्दर्शकांच्या ओठी खेळत असतात, आम्ही त्यांना आदर्श मानतो असे हे म्हणत असतात त्या हॉलिवूड दिग्दर्शकांनी इतिहासावर चित्रपट काढून पैसाही कमावला व इतिहासाशी प्रामाणिकही राहिले. भारतीयांना हे जमणार नाही. भारतीय प्रेक्षकाला चित्रपट म्हणजे 2 घटका करमणूक एवढेच माहीत आहे. दिग्दर्शकही तेवढेच द्यायचे आपले काम असे मानतो. प्रामाणिक चित्रपटाला दोघेही केराची टोपली दाखवतील.

भन्साळी सारख्यांना चित्रपट विकण्यासाठी ऐतिहासिक नावांशी साम्य हवे असते, ही गरज आहे त्याची. जी नावे विकण्यासाठी निवडली त्या नावांमागचा खरा इतिहास दाखवायची हिम्मत व ईच्छा मात्र त्यांच्यात नसते. तशी इच्छा झालीच तर त्या चित्रपटाचा गुजारीश होतो. (बाकी गुजारीशमध्येही भन्साळीचे कर्तृत्व कॉपी पेस्ट एवढेच…)

साधना, आपल्या प्रतिसादाचा रोख कळलं नाही, पण माझ्या प्रतिसादातील काही वाक्य quote केली असल्याने , तुम्ही मला उद्देशून बोलत आहात असे समजतो,

वर ऋन्मेष ने विचारले पिक्चर मूळ पद्मावत काव्याशी प्रामाणिक आहे काय? त्याला मूळ काव्यात पद्मावती ची काय कहाणी दिली आहे ते सांगितले. कहाणी नुसार पद्मिनीला वाटलेल्या भीतीचे करण देवपाल नावाचा राजपूत राजा होता.
उद्या या मूळ काव्याप्रमाणे जरी चित्रपट बनला तरी कोणतीतरी सेना राजपुतांचा भावना दुखावल्या म्हणून आंदोलन करणार नाही याची काही खात्री नाही.

पद्मावती पिक्चर मध्ये काय "इतिहास" आहे या बद्दल मला शून्य इंटरेस्ट आहे, आणि मीडिया आणि गुंडांना हाताशी धरून मूर्ख बनवल्या गेलेय जनतेबद्दल सहानुभूती आहे.

बाकी अवघ्या 200 वर्षांपूर्वी झालेल्या वेलडॉक्युमेंटेड लढाईबद्दल आज 180अंशात वेगळे views ऐकतोय, आणि आपला समाज दगडफेक करून कोणता पक्ष 200 वर्षा पूर्वी जिंकला हे ठरवतोय. तेव्हा 400+ वर्षांपूर्वी रचलेल्या काव्याबद्दल (आणि त्यातून कळणार्या (!!) इतिहासाबद्दल) काय प्रामाणिक आणि काय अप्रामाणिक याबद्दल कोणत्याच पार्टीने छातीठोकू नये हे उत्तम.

Pages