ती येतेय ................ पद्मावती !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2017 - 13:02

‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी

..

‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !

..

- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

..

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार

..

भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

..

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__

..

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी

..

‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे

..

‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर

..

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर

..

‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज

..

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन

..

अ‍ॅण्ड फायनली ...............

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना

..

आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे भाजपाचे नेतेच म्हणत हवा तितका हवा तसा हिंसाचार करा पेटवापेटवी करा.
कुठे गेले भीमा कोरेगाव बंद च्या नुकसानी वरून गळा फाडून रडणारे रुदाली लोक?
आता सरकारी पब्लिक प्रॉपर्टी चे नुकसान होते म्हणून बोलून दाखवा

सुरुवातीला वाटत होते पब्लिसिटीचा फायदा होईल
पण आता कर्व खाली गेला आहे..
आता नुकसान किंवा कमी फायद्यात जाणार हा चित्रपट>>>>>> भन्सालीला already फायदा झाला आहे. वरुन त्याने 600 करोड चा insurance काढला आहे असं ऐकलं आहे.

वरुन त्याने 600 करोड चा insurance काढला आहे असं ऐकलं आहे.
>>>>
इन्शुरन्स काढावा लागला म्हणजे नुकसानच ना?
माझे अर्थशास्त्र कच्चे आहे..
बाकी जर नुकसान झालेच तर मग कोणाचे होणार? इन्शुरन्स कंपनीचे का?

इथे भाजपाचे नेतेच म्हणत हवा तितका हवा तसा हिंसाचार करा पेटवापेटवी करा.
>>>>
लिंक आहे का या बातमीची?
आणि कोणते नेते म्हणत आहेत? पक्षाने त्यांच्या विधानांची जबाबदारी घेतली आहे का? की ते त्यांचे वैयक्तिक मत आहे?

लिंक आहे का या बातमीची? >>>> तुम्हि खुप धागे काढता आणी खुप लिहिता, पण निट वाचत नाहि ! असो. वाचा नीट मग लिहा. लिंक, नाव, सगळे दिले आहे

तुम्हि खुप धागे काढता आणी खुप लिहिता, पण निट वाचत नाहि !
>>>>>
हे सारे खरे आहे. पण नाही दिसले म्हणूनच विचारले ना..
तरी आता मागे पाहिले तर त्या आशयाची ईंग्लिश पोस्ट दिसली. आणि मी बरेचदा ईंग्लिश पोस्ट स्किप मारून पुढे जातो Happy

रुंम्या घरी tv असेल तर बातम्या बघत जा नाही तर ऑनलाईन बघत जा स्वतः च्या धाग्यावरचे पण प्रतिसाद वाचत नाहीस मग कशाला धागे काढतोस? बंद कर

स्वतः च्या धाग्यावरचे पण प्रतिसाद वाचत नाहीस
>>>
ईंग्लिश नाही वाचत सगळेच Happy
मायबोली आहे, मराठी लिहा, लिंकही मराठी वृत्तपत्राच्या द्या... नक्की वाचेन.
लोकांनीही शक्य असेल तिथे मराठीच माहितीच्या पोस्ट आणि लिंक दिल्या तर बरे नाही का? वाटल्यास यावर एक वेगळा धागा काढू का? Happy

तुम्हि कोणताहि विषय आणा हो, इथे फुट पाडायला राइट विंग सज्ज आहे,
१९/२० शतक विसरा, या शतकातले आत्ताच्या सरकारमधले मंत्री आणी माजी लष्करप्रमुख यांच्या जन्मदिनावर पण वाद उकरुन काढला जातो, शास्त्री, सुभाष बोस यावर वाद उअकरुन काढले जातात फुट पाडण्यासाठी . त्यासाठी भन्साली ने पिक्चर बनवायला लागत नाहि. फुटच पाडायची असते, भांडणे उकरायची असतात आणी लोकांना मुर्ख बनवुन मते लाटायचा प्रयत्न असतो. >>>> Uhoh
चालू दे...

ईंग्लिश नाही वाचत सगळेच Happy
मायबोली आहे, मराठी लिहा, लिंकही मराठी वृत्तपत्राच्या द्या... नक्की वाचेन.
>>>>
इथे हिन्दी व्रुत्तपत्राची लिन्क दिलि आहेच्स https://www.maayboli.com/node/63597
इथे इन्गजी वुत्तपत्राची https://www.maayboli.com/node/64264

दोन्ही तुझ्याच लेखनाच्या लिन्क आहेत , आता कोलान्टिउडी मारशिलच!

वेबसाईट ची लिंक तुझ्या कोणी मराठीत दिलेली का बे? लहान नाही आहेस आता ... झालास मोठा.. उगाच फाटे फोडू नकोस..

दीपिकाच्या कंबर झाकली
खिलजी व पद्मावतीचे एकत्र सिन नाही
चित्रपटाचे नाव बदलले
चित्रपट सगळ्या ऐतिहासिक घराण्यांच्या लोकांना दाखवून झाला सगळ्यांनी चित्रपट उत्तर आहे सांगितले.
सेन्सर ने पास केला तज्ज्ञांनी बघितला
श्री श्री रविशंकर सारख्याला देखील दाखवला

इतके सगळे केले मग त्या फुटकळ संघटनेचा विरोध नेमका कशाला आहे? की आता खंडणी दिली नाही म्हणून ही नाटक चालू आहे.
भाजपाच्या एकही राज्यात चित्रपट ला सुरक्षा देण्यात आली नाही इतके घाबरले आहे. सगळी मतांसाठी चालू असलेली खेळी आहे आणि वर पकोडामॅन सांगतोय की आम्ही मतांसाठी कधी लांगुलचालन करत नाही फक्त विजास विकास विकास करतो ( विद्या बालन सारखे ENTERTERMENT ).
मी राष्ट्रपती असतो तर असले भित्रे सरकार कधीच बरखास्त केले असते आणि यांना पकोडा विकायला लावले असते. धड एक काम नीट करता येत नाही. सगळे सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिल्यावर करत आहे

वेबसाईट ची लिंक तुझ्या कोणी मराठीत दिलेली का बे?
>>>>>
अहो, लिंक मराठी म्हणजे मराठी वृत्तपत्राची लिंक. . त्यातले डब्ल्यू डब्ल्यू डॉट कॉम मराठी नाही Happy

प्राजक्ता,
म्हणून तर मी म्हणालो आहे,
"""" लोकांनीही शक्य असेल तिथे मराठीच माहितीच्या पोस्ट आणि लिंक दिल्या तर बरे नाही का?""""
शक्य असेल तिथे हा प्रयोग मुद्दाम केला आहे. कारण बरेचदा शक्य होत नाही. कधेतरी मलाही शक्य झाले नसेलच.

तसेही मराठीच लिंक द्या असा माझा हट्ट नाहीयेच. फक्त माझे ईंग्रजी कच्चे असल्याने मी सहसा ईंग्लिश पोस्ट आणि लिंक वाचत नाही. अगदीच येत नाही असे नाही, पण वेळ आणि कष्ट जास्त वाया जातात. म्हणून त्यांनी दिलेली ईंग्लिश पोस्ट मी वाचली नाही ईतकेच.

बाकी मी कुठे ईंग्लिश लिंक शेअर करत असेल तर ती ईतरांसाठी असते. ईतरांचे ईंग्रजी थोडी ना माझ्यासारखे गंडलेले आहे. ते वाचतीलच या अपेक्षेने देतो Happy

आणि तुम्ही हिंदी लिंकला का आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत आहात? हिंदी आपलीच राष्ट्रभाषा आहे. आधी राष्ट्रभाषा मग मातृभाषा Happy
(अधिकच्या संदर्भासाठी चक दे बघा )

वाचला नाहीस ना मग या पुढे प्रश्न विचारू नकोस
समोर जे पडते ते वाचायचे नाही तर गपगुमान पुढे जायचं

वाचला नाहीस ना मग या पुढे प्रश्न विचारू नकोस
>>>>
आता तुम्ही मागच्या पोस्ट पुन्हा वाचा.
मी प्रश्न विचारला आहे ते तुमच्या त्यानंतरच्या मराठी पोस्टवर Happy
उत्तर नसेल वा देता येत नसेल तर ईट्स ओके. मला तुम्ही इग्नोर करू शकता. मी ईतरांना तोच प्रश्न विचारतो.
...
भाजपाचे कोणते नेते म्हणत आहेत - हवा तितका हवा तसा हिंसाचार करा पेटवापेटवी करा.
आणि पक्षाने त्यांच्या विधानांची जबाबदारी घेतली आहे का? की ते त्यांचे वैयक्तिक मत आहे?

नाही मी इग्नोर करत नाही अजिबात नाही करत
बातमी लाव, त्यात जे सांगतात ते ऐक, समजून घे , आणि मग प्रतिसाद लिही

बातम्या मायबोलीवरच वाचतो..
घरी लोकं सिरअली बघतात.
असो शुभरात्री.. घोडा मैदान जवळच आहे.. खरेच काही दंगे होताहेत की नुसते शोबाजी चालूय ते लवकरच समजेलच .. तेवढा सकाळीच अंदाज आला तर ऑफिसला दांडी मारता येईल म्हणून या चौकश्या Happy

मग मायबोलीवर tp करण्यापेक्षा बातम्या मोबाइलला मध्ये बघ.
बातम्या न बघता प्रतिसाद देऊ नकोस. इथे बातम्या सांगायला सुधीर चौधरी बसलेला नाही

मोबाईलवर कश्या बघणार बातम्या? माझे 2 जी आयडीया आहे. जीव जातो त्यात काही बघायचे म्हटले तर. त्यापेक्षा मायबोलीवाचन सोयीचे पडते. आपल्याला ज्याबद्दल जाणून घ्यायचेय त्या विषयाच्या धाग्यावर जाऊन वाचायचे.

जोक्स द अपार्ट सुधीर चौधरी कौन? जोशी म्हणायचे आहे का आपल्याला?

वेबसाईटवर वाच
मोबाईल वर tv पाहायला कोणी सांगितले? थोडाफार कोमनसेन्स असेल अशी अपेक्षा होती. पण तू इतका धेडगुजरी असशील वाटले नव्हते.

आधी तुम्ही बघ म्हणालात
आता वाच बोलत आहात Happy
असो, मोबाईलवर बातमी वाचायला काही प्रॉब्लेम नाही. पण नेमक्या बातमीपर्यंत पोहोचायला प्रॉब्लेम आहे. म्हणजे शोधायचे म्हटले की छळ होतो. तिथे आपल्याला नको त्या हजारो बातम्या असतात. तुम्हाला आजकालचा मिडिया माहीत आहे. साध्या बातमीलाही असे शीर्षक देतात की बस्स रे बस्स. आणि क्लिक करून आत जावे तर फुस्स. काहीतरी फुसकी बातमी असते. पत्रकारीतेची अशी दशा झाल्याने माझा विश्वास फक्त मायबोली आणि मायबोलीकरांवर Happy

पद्मावती च्या ह्या कथेत एक प्रश्न मला नेहमी पडतो.
असे म्हणतात की १६००० स्त्रियांनी जोहार केला. काही ठिकाणी ७०० स्त्रियांचा उल्लेख आहे. ह्यावरुन एक मुद्दा तर स्पष्ट आहे की बर्याच मोठ्या संख्येने स्त्रियांनी जोहार केला . असं म्हणतात की खिलजी जेव्हा किल्ल्यात आला तेव्हा त्याला एकही जिवंत व्यक्ती सापडली नाही.

जोहार करणार्या स्त्र्यियांनी आपल्या लहान मुलांचं काय केलं असेल?

मध्यप्रदेश नी राजस्थान ची सरकारे सुप्रिम कोर्टात गेलेत परत कायदा नी सुव्यवस्था सांभाळता येणार नाही पद्मावत रिलीज झाला तर.
सुप्रिम कोर्टाने सांगितले पाहिजे की तुम्हाला तुमचे काम जमत नसेल तर सरकार बरखास्त करा नी राष्ट्रपती राजवट लावा, बरोबर सरळ येतील.
काय वाट्टेल ते करताहेत बकवास इश्यू साठी.

मध्यप्रदेश नी राजस्थान ची सरकारे सुप्रिम कोर्टात गेलेत परत कायदा नी सुव्यवस्था सांभाळता येणार नाही पद्मावत रिलीज झाला >>> देशाची वाट लावणे चालु आहे

हे म्हणजे - आम्हाला कायदा आणी सुव्यवस्था सांभाळता येणार नाही स्त्रीया घराबाहेर पडल्यातर म्हणुन स्त्रीयांच्या बाहेर पडण्यावर बंदी घाला असे आहे, किंवा आम्हाला चोर पकडता येत नाहि म्हणुन लोकांच्या पैसमिलवण्यावरच बंदी आणा असे आहे,

ऋन्मेश, परतपरत हिंदीला राष्ट्रभाषा म्हणत जाऊ नका. हिंदी राष्ट्रभाषा आजिबात नाही. ती केवळ अधिकारिक भाषा आहे जो दर्जा इंग्रजीला देखिल आहे.
तुम्हाला हिंदी मातृभाषेपेक्षा मोठी वाटत असेल तर तुम्ही चूक आहात आठव्या शेड्युलमधील सर्व भाषांचे महत्व एकसमान गणले जावे असे संविधानाचे मत आहे.

Pages