ती येतेय ................ पद्मावती !

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2017 - 13:02

‘शूर्पणखेप्रमाणे तुझं नाक कापू’
- करणी सेनेची दीपिकाला धमकी

..

‘पद्मावती’विरोधात १ डिसेंबरला भारत बंद
- करणी सेनेचा इशारा !

..

- राजपूत संघटनेकडून भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
- भन्साळींच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात

..

भन्साळीसारख्यांना फक्त चपलांची भाषा समजते
"जिन फिल्मकारों के घरों की स्त्रियां रोज अपने शौहर बदलती है वे क्या जाने जौहर क्या होता है?"
- चिंतामणी मालवीय, भाजप खासदार

..

भन्साळी आणि त्यांच्यासारखे दिग्दर्शक हिंदू देव-देवता आणि हिंदू योद्धे यांच्यावरच सिनेमा तयार करतात.
संजय लीला भन्साळींमध्ये इतर धर्मावर सिनेमा काढण्याची हिंमत आहे का?
- केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह

..

चित्रपटसृष्टीतील लोक पैशांसाठी नग्नही होऊ शकतात
साक्षी महाराज __/\__

..

गुजरात निवडणुका झाल्यावर ‘पद्मावती’ प्रदर्शित करा
- भाजपची मागणी

..

‘चित्रपट पाहिल्याशिवाय आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध वा निषेध करणार नाही’
- चित्रपट विरोध स्पेशालिस्ट मनसे

..

‘पद्मावती’ची कथा ‘अनारकली’ इतकीच काल्पनिक
‘चित्रपटांना इतिहास समजू नका’
- जावेद अख्तर

..

‘पद्मावती चित्रपटाला विरोध करण्यापेक्षा राजस्थानी महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या’
राजस्थानच्या महिलांचा साक्षरता दर सर्वांत कमी आहे.
- काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर

..

‘कलाकारांना धमकावले जात असताना देशात असहिष्णुता नाही, असे मानायचे का?’
- अभिनेता प्रकाशराज

..

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे दाद मागणार
- इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन

..

अ‍ॅण्ड फायनली ...............

‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच !!!!
- दीपिकाची गर्जना

..

आय सपोर्ट दिपिका पदुकोन !
- एक चित्रपटप्रेमी आणि दिपिका पदुकोनचा चाहता
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे,
रोज उठून मूर्खपणाची नवीन पातळी गाठतात हे लोक
आता करणी सेनेने भारतीय लष्करातील क्षत्रिय जवानांना आवाहन केले आहे.
सरकार पद्मिनी चा मान ठेवत नाही म्हणून जवानांनी एकदिवस आपली हत्यारे खाली ठेवावीत आणि मेस च्या जेवणावर एक दिवस बहिष्कार टाकला असे आवाहन करणी सेनेचे अध्यक्ष ,मकराना यांनी केले.

https://m.timesofindia.com/city/jaipur/boycott-mess-food-to-protest-padm...

या करणी सेने वर सैन्यात फूट पाडायचा प्रयत्न म्हणून देशद्रोहाचा खटला चालवला जावा.
भाजपाने भलतेच शेफारून ठेवले आहे. काँग्रेस चे सरकार असते तर रामदेव बाबाला जसा मध्यरात्री पळवून लावलेला तसे पळवून लावले असते पण शवराज आणि वसुंधरा यांच्या कुचकामी आणि वोटबँक च्या गलिच्छ राजकारणामुळे या करणी वाल्यांचे फावले आहे.
साधे राज्यात सुरक्षाव्यवस्था राखू शकत नाही , यांना फक्त व्यापम करायला जमते

आजच्या बातम्यांमध्ये करणी सेनेने कोणत्या तरी मॉलची तोडफोड केल्याचे व्रुत्त आहे. हे करणी वाले म्हणजे 'डोंगराला आग लागली पळा पळा' सारखे उद्योग करणारे लोक्स आहेत. तोडफोड करुन काय असुरी आनंद मिळतो यांना?

मध्यप्रदेश नी राजस्थान ची सरकारे सुप्रिम कोर्टात गेलेत परत कायदा नी सुव्यवस्था सांभाळता येणार नाही पद्मावत रिलीज झाला तर.
>>>>>
सिरीअसली Uhoh
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा....

तुम्हाला हिंदी मातृभाषेपेक्षा मोठी वाटत असेल तर तुम्ही चूक आहात
>>>>>
मला राष्ट्रभाषा मातृभाषेपेक्षा मोठी वाटते. जर हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर नो प्रॊब्लेम.

आता करणी सेनेने भारतीय लष्करातील क्षत्रिय जवानांना आवाहन केले आहे.
>>>>>

जराही आश्चर्य वाटले नाही.
करणी सेनेला हलके लेखायची चूक करू नका.
आमच्या व्हॉटसपग्रूपवरचे काही जण ज्यांनी आधी या सेनेचे नावही ऐकले नव्हते ते देखील या सेनेचे समर्थक झाले आहेत .. त्यांची बाजू घेऊन वाद घालतात

आता तर प्रविण तोगडिया ने पण म्हटलंय की पद्मावत प्रदर्शित होवू देणार नाही. तसेच हा फक्त राजपूतांच्या नाही तर हिंदूंच्या भावनेचा प्रश्न आहे म्हणे... कसली डोंबलाची भावना...बावळटपणा निस्ता!

करणी सेनेला हलके लेखायची चूक करू नका.
आमच्या व्हॉटसपग्रूपवरचे काही जण ज्यांनी आधी या सेनेचे नावही ऐकले नव्हते ते देखील या सेनेचे समर्थक झाले आहेत .. त्यांची बाजू घेऊन वाद घालतात>>>
ऋ, आपल्याकडचे हे एक फार भयाण वास्तव आहे. गटातटांत फुटलेल्या आपल्या समाजाला, तुमचा 'XYZ खतरे में!' अशी हाक बास होते.

A day after complete law and order failure was witnessed in many parts of Gautam Buddha Nagar district and with the release of the Padmaavat movie nearing, the administration on Monday imposed Section 144 CrPc in the district, which prohibits the assembly of four or more people.

According to the officials, the decision has been taken after the police failed to control the protest over the release of Padmaavat. The movie is slated for release on January 25.

"Section 144 will be implemented for the next 2 months in the district. This is a precautionary measure taken to maintain law and order," said BN Singh, District Magistrate

http://www.dnaindia.com/delhi/report-padmaavat-controversy-section-144-i...

राष्ट्रपती राजवट का नको?
सुप्रिम कोर्टानी आज मध्यप्रदेश नी राजस्थान च्या याचिका फेटाळून चित्रपट पूर्ण देशभर प्रदर्शित होईल असे सांगितले.
आज वाशी गावात रस्ते बंद केले होते रिलीज च्या विरोधात. टायर जाळले.
२५ साठी सतर्क रहावे लागणार. येडे लोक एक एक.

Sonu,
वाशी गाव वगैरे नाही,
सायन पनवेल हायवेवर टोल नाक्या जवळ ही जाळपोळ झाली म्हणे

करणी सेनेचे पितळ उघडे पडले
आज संध्याकाळ च्या शो चा रिपोर्ट आला
जबरदस्त अभिनय आणि कथा आहे म्हणे
ज्यावर ऑब्जेक्षण होता तसले काहीही चित्रपटात नाही.
करणी सेना चा बुरखा फाटला

वाशी सायन् पनवेल... हायला नवी मुंबई.. मुंबईच्या दाराशी हे लोण पसरले .. हे लोकं मार खाणारेत विकेंडला मुंबईकरांचा.. हिंमत असेल तर या आमच्या दक्षिण मुंबईत... मी आजवर बाजीराव मस्तानी पाहिला नाही, पण आता पद्मावत/ती बघणारच..

काल रात्र , अहमदाबाद
https://www.google.co.in/amp/www.dnaindia.com/india/report-padmaavat-pro...

"The cops just followed the mob. A fire brigade also followed them trying to douse the fire but no one tried to control the mob," said an eyewitness.

भाजपची विचित्र परिस्थिती झाली आहे,
SC च्या आदेशामुळे, आणि जगात हसे होण्याच्या भीतीने फिल्म सरकट बॅन करता येत नाही.

राजस्थानात राजपूत मते गमावण्याच्या भीतीने सरसकट पोलीस प्रोटेकशन देऊन फिल्म प्रदर्शित होऊ देता येत नाही.

त्यामुळे हे असले बोटचेपे धोरण ठेऊन ते सामान्य जनता, आणि सरकारी प्रॉपर्टी चा विध्वंस उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

पोलिस आणि अग्निशामक दल त्या हिंसक जमावाच्या संरक्षणासाठी असतील हो. शेवटी गुजरात आहे ते. Wink

बरं, ३ जानेवारीच्या महाराष्ट्र बंद मध्ये झालेल्या नुकसानीच्या नावाने गळे काढणारे नव-देशभक्त, नव-राष्ट्रवादी आणि नव-सुजाण नागरिक कुठे गेलेत?

भरत ज प्रश्न 25 च्या बंद नंतर विचारला जाणे जास्त संयुक्तिक होते.
पण आता तुम्ही विचारला आहेतच तर....
एक दिवसाचा बंद सरकारी रिपोर्ट प्रमाणे शांततेत पार पडल्यावर, WA वर मेसेजेस चा पूर आला होता, बंद करणे कसे वाईट, किती नुकसान होते, पब्लिक प्रॉपर्टी च्या नाश किती महाग पडतो, ते पैसे आमच्या टॅक्स मधूनच जातात ना?, बंदकऱ्यांकडून पैसे वसूल करा, तिरंगा शरमा गया, बंद करणारे कसे देशाच्या एकात्मतेला तडा जाऊ देत आहेत,
एक ना दोन...
कोणत्याही कारणावरून देशातील सामान्य जनतेला वेठीस धरणे हे पूर्णपणे चुकीचे आहे हे अगदी मान्य.....
मात्र....
आज एक फालतू फिल्म वरून रण पेटलंय,
केले सात दिवस कुठे ना कुठे जाळपोळ, रस्ता रोको, सरकारी मालमत्तेचे नुकसान होतंय, 25 ला मोठा उत्पात घडवून आणू अशा धमक्या दिल्या जात आहेत.
या सगळ्यांच्या विरोधात एक मेसेज पहिला का हो कुणी?
सरकारची कडक ऍक्शन पहिली का या आंदोलनकरणाऱ्या लोकांच्या विरोधात?
असे का?
दंगल आपल्या शहरात झाली किच आपल्याला त्यातले गांभीर्य कळते का?
की दंगलीचा विरोध करायचाय, पण रेडिमेड मीम, मेसेज fwd येण्याची वाट पाहताय,?

उठा, उघडा डोळे बघा नीट, थोड्या वेळात इकडे एक meme टाकायचा प्रयत्न करतो, जर दंगल, हिंसाचार याला मनापासून विरोध करत असाल तर कृपया fwd करा.

की दंगलीचा विरोध करायचाय, पण रेडिमेड मीम, मेसेज fwd येण्याची वाट पाहताय,? >>>>> वरुन आर्डर आल्याशिवाय नाहि करत निषेध ते.
सर्वजण गायब झाले आहेत जे भीमा कोरेगाव चा बंद वगैरे बद्दल लिहिल होते. ते अचानक नाहिसे झाले आहेत.

हो..
USK मधून करणीसेनेने किती नुकसान केले याचा सर्वे आला नाही ?

पुण्यात सिंहगड रोडला पहाटे पद्मावत विरोधात जाळपोळ झाली असं आता टीव्हीवर दाखवलं.
ज्या सिनेमागृहांमधे हा सिनेमा दाखवणार आहेत त्यांनी पोस्टर्स लावले नाहीत.
मनसेच्या शालिनी ठाकरे काल म्हणाल्या की आमचा या सिनेमाला विरोध नाही पण आता मनसेने म्हटले आहे की ही शालिनींची वैयक्तिक भुमिका आहे, मनसेची नाही.

राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी..
चिमूटभर लोकांना घाबरून राज्यात सुव्यवस्था राखू शकत नसेल तर अश्या भ्याड आणि पळपुट्या पक्षाच्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

ओ काहीतरी काय...
ब्लॅक मध्ये असेल 1000 वगैरे,
अगदी मेट्रो चे तिकीटपन 480 रुपये आहे फक्त

पद्मावत का एक टिकट मल्टिप्लेक्समें अंदाजन ₹३०० के आसपास होगा.

अर्थात सहपरिवार सिनेमा देखने गये तो टिकटों ₹१२०० खर्च.

सिनेमाघर में खानपान का खर्च कम नहीं होता एवं उसे आप टाल नहीं सकते. सबकी चाय, कॉफी, पॉपकॉर्न, वडा, समोसा, वगैरह का खर्च टिकटों के कीमत जितना ही हो जाता है.

आवागमन का खर्च अलग.

छह महीनों में जो किसी न किसी चॅनेल पर मुफ्त में दिख ही जायेगा ऐसे सिनेमापर अंदाजन ₹ २,५०० उडाने के स्थान पर उतनी रकम गरीबों में दान करें, पुण्य मिलेगा.

यह मेसेज आगे अवश्य भेंजें और गरीबोंका आशिर्वाद प्राप्त करें

पद्मावत सिनेमाचे तिकीट मल्टिप्लेक्समधे साधारण दरडोई ₹३०० च्या आसपास आहे.

म्हणजे सहकुटुंब गेलात तर ₹१२०० तिकीटाचा खर्च.

चित्रपटगृहात खाण्यापिण्याचा खर्च काही टाळता येत नाही. सगळ्यांचा चहा, कॉफी, पॉपकॉर्न, वडा, समोसा, वगैरे चा खर्च सहज तिकीटांच्या साधारण खर्चा एवढाच म्हणजे हजार-बाराशे.

प्रवासखर्च वेगळा.

सहा महिन्यांत कुठल्यातरी च्यानलवर फुकट दिसेल अशा एका सिनेमावर अंदाजे ₹ २,५०० उडवण्याऐवजी ते पैसे गरीबाला दान करा, पुण्य मिळेल.

हा मेसेज पुढे नक्की पाठवा व गरीबांचा आशिर्वाद मिळवा.

Pages