खेळ शब्दांचा १ - खाण्याचे पदार्थ

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:47

खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.

काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.

हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !

पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!

पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुका अपेक्षित होता,........ मिसळही तसे बरोबर आहे... पण अजून काही?
शब्दाची फोड करून वाचला तर तळणीचा बाल-पदार्थ होईल

चार अक्षरी भाजी. अप्रतिम चव, पण नावात मार खाणेत आलेला आहे. Proud

(भरत, तुम्ही पैलतिरावर कविता लिहून मग इकडे ऐलतिरावर या बघू! Proud )

फदफदं बरोबर. Happy

अगो, संयोजक लबाड आहेत - आपल्यालाच शब्द/क्लू द्यायला सांगून मोकळे झालेत. Proud

मी विचार करुन क्लू टाईप करेपर्यंत इथे दहा पोस्ट्स पडतील त्यामुळे मी आपली प्रश्नाची वाट बघते Happy

माहीम हलवा बरोबर.

माहीमचा हलवा आणीन तुला, गोमू आणिन तुला
नाय खाल्लास तर मारीन तुला.

ह्या तीन अक्षरी टिकाऊ पदार्थात एखाद्या पोक्त अनुभवी स्त्रीने हाताखालच्या मुलीला हा पदार्थ कसा करायचा त्याची सूचनाच दिली आहे जणू...
-ड-

Pages