खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
मलिदा?
मलिदा?
बरोबर. पुढचा क्लू तुम्ही द्या
बरोबर. पुढचा क्लू तुम्ही द्या.
तांदूळ, साखर आणि इतर पदार्थ
तांदूळ, साखर आणि इतर पदार्थ वापरून केलेल्या ह्या गोडाच्या नावात भारतातल्या एका राजाचे नाव आहे.
अ---
मी ऑनलाइन नसले त्यामुळे उत्तर
मी ऑनलाइन नसले त्यामुळे उत्तर बघितले नाही तर खेळ अडकून राहील का? खेळ अडकून राहू नये म्हणून काही करता येईल का?
sanyojak @ maayboli . com
sanyojak @ maayboli . com या ईमेल वर उत्तर पाठवून ठेवा.
अनारसा? पण राजा लक्षात येत
अनारसा? पण राजा लक्षात येत नाही.
अनारसा नाही
अनारसा नाही
कृति बऱ्यापैकी अनारश्या सारखीच आहे.
संयोजक इमेल आयडी ला उत्तर
संयोजक इमेल आयडी ला उत्तर पाठवले आहे.
अरिसेलू? ओरिसा partially
अरिसेलू? ओरिसा partially नावात आहे.
राजाचे - king
राजाचे - king


राज्याचे - state नाही
ओरिसा नावाचा राजा असेल आणि मला माहित नसेल तर कोणीतरी clarify करा! प्लिज
आणखी एक क्लू. ज्या राजाच्या
आणखी एक क्लू. ज्या राजाच्या नावावरून ही पाककृती निगडित आहे त्या राजाच्या जीवनावर असलेला एक हिंदी सिनेमा खूप गाजला होता.
अकबर्या
अकबर्या
अशोक?
अशोक?
भरत. बरोबर. पुढचा क्लू तुम्ही
भरत. बरोबर. पुढचा क्लू तुम्ही द्या. थोडा सोपा द्या हो म्हणजे इतरांना पटपट खेळता येईल.
कोडं देणं हे सोडवण्यापेक्षा
कोडं देणं हे सोडवण्यापेक्षा जास्त कठीण आहे हो संयोजक.
देतो.
हिंसक नाव असलेला झणझणीत
हिंसक नाव असलेला झणझणीत पदार्थ.
ठेचा
ठेचा
किती शब्द आहेत हे आणि
किती शब्द आहेत हे आणि त्यातले किमान एक तरी अक्ष्रर क्लू मधे येऊ द्या.
फारएण्ड, पुढचा क्लू तुम्ही द्या.
(No subject)
बरोबर. जास्तच सोपा होता वाटतं
बरोबर. जास्तच सोपा होता वाटतं शब्द.
दुसर्याची अक्कल काढताना
दुसर्याची अक्कल काढताना वापरलेले संबोधन वाटणारा पदार्थ. दोन अक्षरी
म_
मठ्ठा
मठ्ठा
अकबर्या.. अकबराला त्याची आई
अकबर्या.. अकबराला त्याची आई हाक मारतेय असं वाटतंय.
भरत, रावण पिठलं?
भा. बरोबर. पुढचा क्लू?
भा. बरोबर. पुढचा क्लू?
टाईप करेपर्यंत उत्तर येऊन
टाईप करेपर्यंत उत्तर येऊन जुनं झालं.
ओरिसा नावाचा राजा असेल आणि
ओरिसा नावाचा राजा असेल आणि मला माहित नसेल तर कोणीतरी clarify करा! प्लिज >> नजरचुक आणि काय!!
'इथे राहतात की काय?' असं
'इथे राहतात की काय?' असं वाटायला लावणारा गोड पदार्थ.
--र-
गोड का तिखट
Clue नीट वाचला नाही
भरत किंवा राजसी, त्या अकबर्
भरत किंवा राजसी, त्या अकबर्याची रेसिपी पण यो जा टा.
इमरती
इमरती
Pages