निसर्गाच्या गप्पा (भाग ३२)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 July, 2017 - 05:46

सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,

"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "

खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,

" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "

अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्‍या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्‍याला भिजवणं. अनंत आठवणी!

"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्‍या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्‍या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्‍या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. Happy सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,

"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "

निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.

वरील मोगर्‍याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Teaser3.pngहां, अजून टाइम असला तरी पण इकडे लक्ष असू द्या बरं का मंडळी!!
आपल्या उत्सवात काय काय कार्यक्रम असणार, स्पर्धा असणार, त्यांचे नियम काय, यांच्या घोषणा लवकरच येत आहेत!!

सुप्रभात मंडळी.

सगळीकडे आता रानफुले डोकाऊ लागली आहेत. कुर्डूचे तुरे आणि तेरडा जागोजागी दिसतोय. नजर ठेवा तुमच्या एरीयात पण आणि आनंद घ्या.

कोण म्हणतं मायबोलीचं वय वाढलं आहे?!
मायबोली तर आता पुढच्या पिढीला पण आपलंसं करून घेणार आहे!
तर बाकीच्या कार्यक्रमांसोबतच घेऊन येत आहोत आपल्या छोट्या भावी मायबोलीकरांसाठी काही खास उपक्रम !
अधिक माहिती आणि घोषणा - लवकरच !!

teaser kids.pngmaboganesh utsav.jpg
या आणि इतर आगामी घोषणांसाठी इथे वाचत रहा

जी अनुराग पहिला फोटो रानतीळ, दूसरा भारींगा. ही फुले आता सगळीकडे मस्त फुलली आहेत. ही पेणच्या डोंगरात आहेत का?

फोटो मोबाईलवरून लोड केला आहे त्यामुळे उलटा कसा झाला कळले नाही.

जी. अनुराग कधी येऊ तुमच्या शेतावर?

नविन भागाकरिता खुप खुप शुभेच्छा!!!

हे माझ्या कडुन...
गेळाचे फुल ... नाव दिनेश दां कडुन समजले.

या फुलाची गम्मत म्हणजे हे दुपारी ४ ते ४.३० ला उमलते... आणि दुसर्‍या दिवशी चक्क पिवळे धम्म होते.. सुगंध अगदी अनंता च्या फुला सारखाच... मि ज्या नर्सरीतुन घेतले त्याने मला पिवळे अनंत म्हणुनच दिले.

शोभा मनोगत छानच!! गुलबाक्षीची जाळी पण सुरेख!!!
शोभा ही तुझ्या करता... Happy

पेण मधेच आहे ना? कुठल्या एरियात? नवरात्रात आमची फेरी असते देवळात पेणला.

खाटीक
\DSC01355-001_0.JPG

जागू,
तेरडा मस्तच.. घरी आम्ही याला गुलछडी म्हणतो.

सायु गेळाचे फुल प्रथमच पाहीले. सुंदर आहे.>>>+१
फारच वॉव आहे..आणि असा तसा नाही तर अख्खा सॉल्लीड्ड पिवळा रंग होतो गं.. मज्जा आहे बा सायमायची Happy

सगळे फोटो खूपच सुंदर.
G.Anurag, कोकणात भारींगाच्या कोवळ्या पानांची आणि फुलांची भाजी करतात. चव कडू असते म्हणून चिरल्यानंतर धुवून घ्यायची. छान लागते.

शोभा, मनोगत सुंदर.
सायु गेळाचे फुल प्रथमच पाहीले. सुंदर आहे.>>>+१

आईच्या अंगणातली गुलबक्षी
IMG_20170311_190915.jpg

Pages