सर्व निसर्गप्रेमींना निसर्गाच्या गप्पांच्या ३२ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.
वसंत ऋतुचे कौतुक करून, ग्रीष्माच्या पाठवणीची तयारी करून, ’वर्षा ’च्या स्वागताला आपण सर्व सज्ज झालो आहोत.
वसंतात नेत्रसुख मिळालं. विविध रंगाने, गंधाने, न्हालेला निसर्ग बघून मन हरखून गेलं. कोकिळकूजनाने कान तृप्त झाले.
ग्रीष्मात रसना तृप्त झाली. आंबे, फ़णस, जांभळं, कलिंगड, करवंद, जांभ, द्राक्षं, अशा विविध, फ़ळांनी आपलं मन जिंकलं.
आणि आता सर्वांना उत्सुकता आहे ती,
"घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! "
खरं तर एकच गोष्ट, परत परत घडली तर आपल्याला कंटाळा येतो पण याचे मात्र आपण कौतुक करतो आणि म्हणतो,
" नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा ! "
अशा या पर्जन्यराजाची आपण सर्वच फ़ार आतुरतेने वाट पहात आहोत. आपणच नव्हे तर उन्हाच्या चटक्याने लाही लाही झालेली
ही धरा, आपले अनंत हात पसरून भेटायला येणार्या पर्जन्याची आतुरतेने, नटून थटून वाट पाहत आहे.
पशु, पक्षी, झाडे, वेली, सर्वांनाच आता वेध लागलेत ते पावसाचे. त्यात चिंब भिजण्याचे.
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की आपण लगेच पोहोचतो बालपणात. थुईथुई नाचनारा मोर, त्या कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडणं,
मोठ्यांचं लक्ष चूकवून पावसात भिजणं, आणि साठलेल्या पाण्यात उड्या मारून स्वत: व दुसर्याला भिजवणं. अनंत आठवणी!
"पाऊस" ! पाऊस म्हटलं की मला आठवतो आणि आवडतो तो कोकणातला पाऊस. पण त्याच संपूर्ण वर्णन मी शब्दात करूच शकत नाही.
तो ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पावसाचा थयथयाट, पाण्याचा खळखळाट.
पहिल्या पावसाबरोबर दरवळणारा मृदगंध, ते लाल, मऊ मऊ रेशमी किडे, अंगणभर ऊड्या मारणारी, पायाखाली येणारी, अगदी
नखाएवढी छोटी बेडकांची पिल्ले, आपला पिटुकला देह नाचवत तिरके तिरके पळणारे चामटे, (खेकडे,)
अंगणात पडणार्या पागोळ्या, त्यात हात पाय़ भिजवणं, हळूच पाणी पिणं, हळूच अंगणात धाऊन परत येणं, छत्री घेऊन पावसात फ़िरणं.
घरात गळणार्या पाण्याखाली लावलेली भांडी, आनंदाने डोलणारी हिरवीगार झाडं, छोटे छोटे निर्झर, अळवाच्या पानांवर नाचणारे मोती.
सकाळीच शेतावर खोळ घेऊन निघालेले शेतकरी आणि बैल, बैलांच्या गळ्यातल्या घुगुरांचा नाद, थोड्याच वेळात न्याहारी घेऊन जाणार्या कारभारणी, नदीला आलेला पूर, त्यात वाहून जाणारी झाडे, साप, साकव, आणि ह्या सगळ्यात नम्र होऊन वाचलेली लव्हाळे!
झाडाखाली उगवलेली छोटी छोटी रोपं, आणि त्यात ते काजूचं असेल तर त्यावर मारलेला डल्ला. सगळं कसं लख्ख उभं रहातं डॊळ्यासमोर!
तर अशा या पावसाचं आपण स्वागत करूया आणि एक वाक्य जरूर लक्षात ठेऊया,
"आला पावसाळा, तब्बेत सांभाळा! "
निसर्गाने आपल्याला मुक्त हस्ताने दान केलयं, "घेता किती घेशील दो कराने". पण आपण त्याची योग्य निगा राखली पाहिजे .
त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. त्याच संरक्षण, संवर्धन करायला पाहिजे.
वरील मोगर्याच्या अक्षरातील फोटो व मनोगत नि.ग. प्रेमी शोभा हिचे आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825
आमच्या बागेतील जास्वंद
कोकणातील भातशेती
कोकणातील भातशेती
वेदांती, सुंदर फुले.
वेदांती, सुंदर फुले.
मी ही घेतली तर चालतील का?
वेदांती तुम्ही कोकणातल्या का?
मस्त फोटो. मी वाटच पहातेय कोकणातल्या फोटोची. अजून असतील तरी दाखवा.
Plooma ...रंग कीती सुंदर आहे
Plooma ...रंग कीती सुंदर आहे जास्वंदीचा.......!!!!
वेदांती, सुंदर फुले.
वेदांती, सुंदर फुले.
मी ही घेतली तर चालतील का?
वेदांती तुम्ही कोकणातल्या का?
मस्त फोटो. मी वाटच पहातेय कोकणातल्या फोटोची. अजून असतील तरी दाखवा. >>>>> हो घ्या ना...हो मी
कोकणातलीच...मायबोली वर नवीन असल्याने पोस्ट करायला वेळ लागतोय.
प्लूमा, मस्त फोटो.
प्लूमा, मस्त फोटो.
कोकणातलीच.>>>>>>...वा! छान!
कोकणातलीच.>>>>>>...वा! छान!
मायबोली वर नवीन असल्याने पोस्ट करायला वेळ लागतोय.>>>>>...सावकाश शिका. इथे सगळी मदत उपलब्ध आहे.
कोकणात लहान झरे असतात..
कोकणात लहान झरे असतात.. त्यांना बांध घालून
भातशेतीला पाटाने पाणी देण्यात येते. तसाच हा ही एक बंधारा
वेदांती खूप खूप धन्यवाद!
वेदांती खूप खूप धन्यवाद!
मस्त फोटो. कोणतं गाव?
कोणतं गाव?>>>> तालुका लांजा .
कोणतं गाव?>>>> तालुका लांजा . लांजा पासून १६ किमी लांब आहे आमचं गाव.
लांजा पासून १६ किमी लांब आहे
लांजा पासून १६ किमी लांब आहे आमचं गाव.>>>>>>>छान. विपुमध्ये बोलू. (विपु= विचारपूस)
वेदांती ही गुलाबाची फुल बघून
@वेदांती, ही गुलाबाची फुल बघून खुप छान वाटल. माझ्या माहेरी होत झाड हे . खुप फुल यायची. त्याच्या गुलकंद पण केला होता घरी. मस्त झाला होता. आता सुकून गेल. अनेक वेळा नवीन लावायचा प्रयत्न केला, पण फांदीला अंकूर फुटत नाही.
@निर्झरा ...खूप फुले येतात...
@निर्झरा ...खूप फुले येतात.... एका एका फांदीवर १०-१२ फुलं येतात...... मीही मुंबईच्या घरी लावले आहे झाड ह्या वर्षी ....आता पावसाळ्यात बहराचा वेळ आहे.
मस्त मस्त फोटो वेदांती आनि
मस्त मस्त फोटो वेदांती आनि प्लूमा..
मी मैत्रीणीकडून ओवा , गोकर्ण आणि निशिगंधाचे कंद घेउन आली..रुमवर येऊन एकेकात लावले.. गोकर्ण आनि ओवा मस्त वाढतोय..निशिगंध अजुनही सेटल होण्यातच आहे.. ट्रांस मधे गेल्यासारखा गपगार पडलाय..
दोन छोट्या छोट्या युझ अँड थ्रो पेल्यांमधे तामण आणि जॅकरांदा च्या बिया लावलेल्या..एकातून रो बाहेर आलीए..शायद जॅकरांदा आहे तो.. तामण नाही रुजल्या शायद

घरी असताना बहावा रुजवावा म्हणुन लावला तर तोपन नाही रुजला.
आता रुमवर परत एकदा बिया रुजवायला ठेवल्याय..अजुनतरी काही खबरबात नाही पण यावेळी मी जरा जास्त पॉझिटिव्ह आहे..
वेदांती कोकणातले फोटो सुंदर.
वेदांती कोकणातले फोटो सुंदर.
प्लुमा सुंदर आहे जास्वंद.
मला एक शंका आहे.
मला एक शंका आहे.
मैत्रीणीकडून एक गोकर्णाचं रोपट आङून मी मध्यम साईझ च्या कुंडीत लावलं.. ते आता भराभर वाढतयं.. ते त्या कुंडीत जगेल ना? कि त्याला मोठी कुंडी हवी? एक जनरल साईझ जी आपण गुलाब लावायला घेतो तेवड्।ई आहे ती कुंडी..
पेट्रीया च्या बुडाशी एक टोमॅटोचं रोपट उगवलय..ते रिप्लँट करता येईल का?
टिना टोमॅटो सहज एका जागी
टिना टोमॅटो सहज एका जागी काढून दुसर्याजागी जगत. लागवड करताना टोमॅटोचा वाफाच केला जातो नंतर वाफ्यातली रोपे काढून दोन दोन लावली जातात.
गोकर्ण वाढेल कुंडीत.
ओके..थँक्स इतक्या लवकर
ओके..थँक्स इतक्या लवकर रिप्लाय दिल्याबद्दल जागु
बिया रुजवण्याकरता त्या
बिया रुजवण्याकरता त्या व्हिनेगर मधे घालुन ठेवायच्या असे कुठेतरी वाचले होते मी.
दादांनी (माझे वडील)
दादांनी (माझे वडील) प्लास्टिकच्या पिशवीत गोकर्णाच्या बिया रुजवल्यात आता बघु कुठे लावतात ते. कुंडीत लावली तर गॅलरीत ग्रिल मधे पसरेल ना? बाकीच्या झाडांना, (गुलाब ) त्रास होईल का? किती जागा लागते साधारण? (किती ते प्रश्न? चिंतातूर जंतू.) )
शोभा, कुंडीत छान वाढेल
शोभा, कुंडीत छान वाढेल गोकर्ण पण ती कुंडी इतर झाडांपासुन जरा दुरच ठेव. गोकर्णाची वेल झपाट्याने वाढते आणि इतर झाडांवर चढते. पार गुंडाळून टाकते. ग्रीलपाशी ठेवलीस तर ग्रीलवर जाईल. चिवट वेल असते. मी अनेकदा वेलीचा वरचा डोलारा काढून टाकते, खालची खोडाची बाजू जेमतेम तळव्याच्या उंचीची ठेवते तरी दर वेळी नवीन जोमाने वेल वाढतो
स्निग्धा, आमच्याकडे गॅलरी
स्निग्धा, आमच्याकडे गॅलरी नाहीच. फक्त ग्रीलमध्येच कुंड्या ठेवल्यात. म्हणूनच मला इतर झाडांची चिंता वाटतेय. बहुतेक खालीच (सोसायटीच्या बागेत) लावतील. तसही तिथल सगळं काम दादांचच असतं.
बिया रुजवण्याकरता त्या
बिया रुजवण्याकरता त्या व्हिनेगर मधे घालुन ठेवायच्या असे कुठेतरी वाचले होते मी.>> लोणचं होइल ना त्यांचं.
@ वेदांती,pluma प्रचि मस्त.
बंधा-याचा फोटो तर अगदी portrait आहे असं वाटतयं.
बिया रुजवण्याकरता त्या
बिया रुजवण्याकरता त्या व्हिनेगर मधे घालुन ठेवायच्या असे कुठेतरी वाचले होते मी.>> लोणचं होइल ना त्यांचं>> तेच पण असे नाहीये म्हणे. गुगलुन बघा.
कुहल्या बिया नेमक्या हे
कुहल्या बिया नेमक्या हे स्पेसिफाय केलय का त्यांची केपी?
केपी कोणत्या बिया रुजवायच्या
केपी कोणत्या बिया रुजवायच्या आहेत? बिया पूर्ण तयार असतील तर अशाच मातीत रुजतीलही.
कुठल्या असे नाही पण बहूतेक
कुठल्या असे नाही पण बहूतेक ज्या बिया पटकन रुजत नाहीत त्या करता असावे. जरा गुगलाभ्यास करायला हवा.
परत मला क्रोमात जाता येत
परत मला क्रोमात जाता येत नाहीये, त्यामुळे फोटो बघता येत नाहीत
बहाव्याच्या बिया सहज रुजत नाहीत. त्या २४ तास कोमट पाण्यात (का अजून कशात?) भिजवून ठेवायच्या, मग रुजवायच्या असं वाचलंय कुठेतरी. कडुनिंब, मोह या बिया फळ झाडावरून पडल्यावर फक्त काही दिवस (एखादा आठवडा) रुजतात, नंतर नाही. सोनसावर कशी रुजवतात माहित नाही. तिच्या बिया अजिबात रुजत नाहीत, आणि मोठ्या झाडाखाली येणारी बाळं दुसरीकडे लावलेलीही रुजत नाहीत अशी सगळी माहिती होती तिथे. पण कुठे वाचलं ते आठवत नाहीये. यापैकी मोहाचा, कडुनिंबाचा आणि सोनसावरीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलाय मी.
मागच्या भागात म्हटलं तसे सोनसावरीचे आणि कारवीचे सीड्बॉल घरीच रुजवले होते. दोन्ही प्रकारच्या बिया रुजल्या नाहीत माझ्या.
ही शेंग कशाची आहे सांगा बरं!
ही शेंग कशाची आहे सांगा बरं!

शिकेकाई ?
शिकेकाई ?
Pages