आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ६

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 August, 2017 - 14:22

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१७४८..

हिंदी
५०-६०
क्ल्यु ची आवश्यकता नाही हाच क्ल्यु.
सिनेमाचे नाव गाण्यात आलेले आहे!

सोडवा कावेरी आता पटकन पाहू!

अ म ट प क अ
न अ फ क स
अ म द अ न क
न ज ब क न ज न ज

कृष्णाजी छानच गाणं दिलतं. आणि काय टोप्या घालता हो, म्हणे क्ल्युची आवश्यकता नाही हाच क्ल्यु.

फंटूश/किशोर कुमार

ऐ मेरी टोपी पलट के आ
न अपने फ़न्टूश को सता
ऐ मेरे दिलबर इधर नज़र कर
न जा बिछुड़ कर
न जा न जा ऐ मेरी टोपी …

मला किशोर कुमार आणि टोपी अस वाटलेलं पण सिनेमाबद्दल कल्पना नसल्याने शांत बसले..
थँक्स टू ताई... Happy

मी देते आता...नविन नाही देणार पळून नका जावू....

१७४९,हिन्दी,१९९३-१९९९
प क न ह क
ल अ स य क ह
ह अ द म र ह

क्ल्यु :
१) कोड्यात सिनेमाच नाव आहे
२) नायक : आता याचा मुव्ही रिलिज झालाय..ज्याअत मेन नायकाचा डबल रोल आहे

१७५० हिंदी (५५-६५)
च क स म प प
क ह क त
क ह ज घ ख ब
र र

आणि हो जी नको फारच हे वाटत बाई

१७५१
हिंदी ( १९८० - ९०)

ज ज भ त ब म ल ह ह
य ज च स ब न अ ह ह

जिंदगी जब भी तेरे बज्म में लाती है हमे
ये जमी चांद से बेहतर नजर आती है हमे

द्या कुणीतरी पुढले

१७५१ हिंदी ( १९८० - ९०) -- उत्तर
जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें
ये जमीं चांद से बेहतर नजर आती है हमें

१७५२ हिंदी ७०-८०
अ, म भ म च प प प
च ज न भ ख
अ अ स स अ ल
ह म ग म
ब ब ब ढ ढ ढ

फार अर्थपूर्ण शब्द असलेली गाणी गुणगुणून पाहू नका...

हे मला विचारलेय का? मला सैगल,, कविता कृष्ण्मूर्ती नाही आवडत,
नाकात गाणारे जुने स्त्री / पुरूष गायक कमी आवडतात ( अपवाद माणिक वर्मा ).
गायकापेक्षा, शब्दांना जिथे छान अर्थ आहे अशी गाणी जास्त आवडतात.
गाण्याचा 'भाव' फक्त गायकीतून पूर्ण पोचतो, व्हिडिओ न बघता अशी आवडतात. मग काहीही असो, विरह, प्रेम, मस्करी, टिवल्याबावल्या.

व्हिडिओ न बघता अशी आवडतात. मग काहीही असो, विरह, प्रेम, मस्करी, टिवल्याबावल्या.------
मला पण पहायला नाही आवडत..ऐकायलाच मजा येते... Happy

क्ल्यू --- हा टपोरी कॉलेज तरूणांचा वीकेंड / इव्हिनिंग प्लॅन असू शकतो
रिपीट झालेली अक्षरे आवाजाशी संबंधित आहेत.
बाय

गाण्याचा 'भाव' फक्त गायकीतून पूर्ण पोचतो >>> अगदी.... मी कित्येक गाणी अजून पाहिलेली नाहीत त्यामुळे इथे क्लू द्यायच्या आधी नायक नायिका शोधव्या लागतात Lol

मन्नु भाई मोटर चली पम् पम् पम्
चौपाटी जाएगे भेल पुरी खाएगे
----
बॅड बाजा बाजेगा ढम ढम ढम

देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा

१७५५.हिन्दी (१९६०-१९७०)

अ ह त स म ल च
द झ ज अ ब म ल च

Pages