आठवणीतलं पुणं

Submitted by चिनूक्स on 27 March, 2017 - 03:17

गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.

जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाला "प्रभात चित्रपट सप्ताह" आठवतो का ? दर वर्षी एक आठवडाभर प्रभात टॉकीज मधे प्रभातचा रोज वेगळा चित्रपट दाखवत. शेवटच्या दिवशी "माणूस" असायचा असे स्पष्ट आठवते.

गोखले डॉक्टर कॅन्सरने गेले. पण अगदी शेवटपर्यंत पेशंट्स तपासत असत. ते गेले तेव्हा त्यांच्या पेशंट्सना इतके दु:ख झाले की जवळपास प्रत्येकालाच त्यांच्या घरी जावून भेटायचे होते. पण घरी जावून कोणाला भेटायचे? घरच्यांशी काही पेशंटसची फार ओळख नव्हती. म्हणून मग सगळ्यांनी त्यांना पत्रे पाठवली. ती एवढी होती की एक खोली भरून गेली होती पत्रांनी. ते जेष्ठ नागरिकांना तपासायला दवाखाना संपल्यावर स्कूटरवरून त्यांच्या घरी जात असत व नाममात्र पैसे घेत असत. असे डॉक्टर नंतर पहाण्यात आले नाहीत.

आता डॉ. गोखले हयात नाहित. तिथे आता डॉ दिलीप देवधर दवाखाना चालवतात. +१
दगडी चिरेबंदी घर आणि बाहेत पुष्करिणी वगैरे

माझी मैत्रीण एक परांजपे तिचे पण सुंदर घर होते भांडारकर रोडला. दगडी चिरेबंदी. आणि त्यापुढे बाग. फाटकाशी जाईजुईचे वेल. ती व तिची भावंडे पायरीवर बसून गप्पा मारत. भांडारकर रोड पण छान होता. आता किती लहान सा वाट्तो तेव्हा तो अगदी विश्वप्रदक्षिणे सारखा वाटत असे. साने डेअरी, रविराज हॉटेल( आली हासत पहिली रात Wink ) मग चालत चालत आले की एका साइडला एक मोठे ग्राउंड समोर बाल शिक्षण मंदीर, गिरिकंद ट्रावेल चे दुकान. तेव्हा ते तिकीट काढून अमेरिकेला जाणा रे, विसा पासपोर्ट ग्रीन चॅनेल वगैरे सफाईने बोलणारे लोक काय लै भारी वाटायचे. एक ग्लॅमर असे. पुढे एक पॅथ लॅब होती. मग लेफ्ट राइट करत डेक्कन ला परत.

नातूवाडा सपे त पण आहे, पण तो वेगळा. नुसतं नातूवाडा म्हणलं की पेठी पुण्यात शनिवारातला नातूवाडा अध्याहृत असतो.

सुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे पेशंट का? आमचे दोन तीन पिढ्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते (आणि त्यांचा मुलगा).

मॅजेस्टिकचं उन्हाळ्यातलं प्रदर्शन म्हणजे मेजवानी असायची. कायम पडीक असायचो तिथे.

प्रभात चित्रपट महोत्सवसुद्धा बघितला आहे. माणूस, तुकाराम, ज्ञानेश्वर, कुंकू, रामशास्त्री, इ.

व्वा, किती छान माहिति आहे, वाचायला भारी वाटते आहे. Happy
>>> कुणाकडे फोटो नाहीयेत का? रस्ते, बस स्टॉप, इतर परिसराचे? <<<< मी फेसबुक का कुठेतरी पाहिले होते काहि फोटो, गुगल्वर/संग्रहात असतील तर जरुर देईन. Happy

सुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे पेशंट का? आमचे दोन तीन पिढ्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते (आणि त्यांचा मुलगा). >>>> आम्ही पण जात होतो साठ्येंकडे पण नंतर माझा आत्तेभाऊ डॉक्टर झाला आम्ही सगळे त्याचे पेशंट्स झालो. तो नसला की आम्ही साठ्येंकडे किंवा त्यांच्या मुलाकडे जात होतो.

<<नातूवाडा सपे त पण आहे, पण तो वेगळा. नुसतं नातूवाडा म्हणलं की पेठी पुण्यात शनिवारातला नातूवाडा अध्याहृत असतो.>> तुम्हाला "नातूबाग" म्हणायच आहे क?

वाक साठयेंचा मुलगा ध. वा. साठ्ये. त्यांचा दवाखाना नंतर नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ होता. तिथे आता वृद्धाश्रम आहे.

नातूबाग वेगळी. चिमण्या गणपतीच्या ओळीला आणखी एक नातूवाडा आहे ना!

मारुतीजवळ होता. तिथे आता वृद्धाश्रम आहे>> अर्रे, तिथे घैसासांचा दवाखाना होता ना (साठ्ये आजोबांचा भाचा)? तळमजल्याला ध.वा. साठ्ये (खरंतर आम्ही काकाच म्हणायचो) प्रॅक्टिस करत ना? त्यांनी पण थांबवली का? ते सगळे राहायला तिथेच सर्वात वरच्या मजल्यावर होते.

Ho bahutek. Mi 3-4 varshanpurvi eka vruddhashramachya shodhat tithe jaun pochale hote. Ghaisas dr. Cha davakhana karvenagar la gela ahe bahutek. Dhananjay Sathye kadachit tya tin majali building madhe rahat astil. Pan bahudha tehi nahit tithe.

साने डेअरी, रविराज हॉटेल( आली हासत पहिली रात Wink ) मग चालत चालत आले की एका साइडला एक मोठे ग्राउंड समोर बाल शिक्षण मंदीर, गिरिकंद ट्रावेल चे दुकान >> रविराज हाटेलच्या समोर एक पायवाट होती जी गोखले ईन्स्टीट्युटपाशी निघे Happy आता ती पायवाट बंद केली आहे.

कोरेगाव पार्क ला बंड गार्डन ते ब्ल्यू डायमंड पर्यंत दुतर्फा दाट झाडी होती. उन्हाळ्यात पण सायकल चालवता यायची असे म्हणतात. अजून आहे, पण यापेक्षाही दाट झाडी होती आणि त्यामुळे सावलीचा बोगदा तयार व्हायचा. सिंहगड रस्त्याला पण अशीच झाडी होती. अजून कुठे होती का ? फर्गसन रस्त्याला होती बहुतेक.

लंपन,
ती पायवाट म्हणजे शासकीय मुद्रणालय / ग्रंथागाराच्या आवारातून जाणारी वाट होती तीच का? त्याला एका बाजूने गेट होते जे सदैव उघडेच असायचे.

प्रभात रस्त्यावर लिज्जत पापडाच्या जवळच एक ज म्बो आईसक्रीम चे दुकान होते त्याचा लोगो थोडाफार एशियाड्च्या अप्पू सारखा हत्ती आणि त्याच्या सोंडेत आईस कँडी असा काईतरी होता.

सपना माझ्यामते ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पुण्याचा गावठाण भाग / पेठा सोडल्या तर सगळीकडेच अशी झाडी होती. कर्वे रस्त्यावर देखिल होती. सहकारनगर, पद्मावती अरण्येश्वर तर खरोखरचे अरण्यच होतं. कर्वे नगर भागात आमराया होत्या. कोथरूड्चे पेरू प्रसिध्ध होते आतून लाल / गुलाबी रंगाचे.

कोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा केवढा तरी पसारा होता. अजूनही कर्वेनगरला लागून थोडी पेरूची बाग शिल्लक आहे. मनमोहन सोसायटीला लागून जो नवा रस्ता झालाय तिथे.
हो, जम्बो आईस्क्रीम तेव्हाचा प्रतिष्ठित ब्रॅन्ड होता. शनिवारवाड्यापाशी पण होतं एक दुकान ते आठवलं एकदम.

पेरूच्या बागा पाहिल्या नाहीयेत (पण कोथरूडचे म्हणून पेरू खाल्लेत) कर्वेनगरला माझा एक मित्र तिकडे रहायचा त्याच्याकडे गेलो अस्ता, आमरायांमधे मात्र मी अभ्यास केलाय / सूर पारंब्या खेळ शिकलो / खेळलो. मला वाटायचे वडाचे झाड असल्या खेरीज हा खेळ खेळता येतच नाही की काय Proud

लहान पणीच्या आठवणी येत असताना मला फार विचित्र फिलींग येतय (येऊन राह्यंलय Wink ) लिहून झाल्यावर हे खरंच आपल्या आयुष्यात घडलंय का माझा कल्पना विलास आहे असं वाटतंय .

हो म्हणजे सपनाने विश्वास बसत नाही म्हटल्यावर ती भावना प्रबळच झाली एकदम पण वरदाने कोथरूडला अजूनही पेरूच्या बागा आहेत म्हटल्याव्र जीव भां ड्यात पडला Happy

कोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा केवढा तरी पसारा होता. >>>>> आमची सोसयटी त्या बागेला लागूनच होती. आमची दुसरीच बिल्दिन्ग त्या प्रोजेक्ट मधली. अजून इतर बिल्डिन्ग्स बांधणे सुरु होते. तेव्हा भुजबळ बागेत शिरून पेरु, जांभळे, ऊस पळवणे हे आमचे सुट्टीतले उद्योग असायचे.
रस्त्याच्या शेवटाला डेड एन्ड , मग एक ओढा होता आणि पलिकडे आमराई ! या भागात नुस्ते गवत, टणटणी आणि कॉस्मॉस ची फुलांचे रान होते. तिथे पोपट, ओढ्याअवर आलेले बगळे, भर दिवसा टिटव्या पण असायच्या !! आम्ही उन्हाळ्यात तिथे जाऊन अंगत पंगत करायचो. ही गोष्ट १९८०-८५ मधली. ही आमराईची जागा म्हणजेच आताचे सिटी प्राइड चा भाग!! आता विश्वास बसत नाही !!

विश्वास बसत नाही म्हणजे तुम्ही सांगताय ते खरंच असणार. पण आजचे कोथरूड पाहीले तर खरंच वाटत नाही. पण माझ्या माहीतीत धायरीची भाजी पूर्वी खूपप्रसिद्ध होती. आता कुठे नावालाही भाजीचे शेत दिसत नाही. (च-होली बद्दल ऐकून आहे, पण त्या गावात जाणे होत नाही).

पटवर्धन बाग वगैरे नावे ही खरोखरीच्या बागेवरून पडली असतील बहुतेक...

नाही नाही सपना, ते केवळ तुम्ही विश्वास बसत नाही म्हटल्यामुळे नव्हे तर स्वतःचे स्वतःलाही क्षणभर असेच वाटलेले हे खरंच असं सगळं आपल्याच लहानपणी होतं, आपल्याच हयातीतले आठवतंय का मागच्या जन्मातले Wink

छान धागा! पुण्यात कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते पण ज्या काही २-४ फेर्या झाल्या त्यातून एकदम पुणे फॅन झालो होतो. विशेषतः शनिवार वाडा, लाल महाल, सिंहगड पहाताना अंगावर प्रचंड रोमांच उठलेले आठवतात. ज्या वास्तुंमध्ये शिवराय, बाजीराव, तानाजी वावरले त्या वास्तू बघून हरखून गेलेलो आठवते आहे. आताच्या पिढीला कदाचित बालिश वाटेल पण मुंबईत परत शाळेत गेल्यावर शिक्षकाना भेटून 'आम्हाला इतिहास पुण्यात शिकवा' अशी सूचना केली होती.

धायरी ला हुरडा खाल्लेला आठवतो आहे.

पुण्यातील जागांची नावे मजेशीर वाटायची लहानपणी. वडगाव-बुद्रुक, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसर, बिब्वेवाडी, धनकवडी, खडकवासला

कल्याणीनगरला राहत असताना आम्ही सर्व लहान मुलं नदीकाठी फिरायला जायचो. तिथे पक्षीतज्ञ सलीम यांच्या नावाने पक्षी अभयारण्य उभारलेलं होतं. छान फलक लावलेले होते. त्यावर मराठी / इंग्रजी मधे पक्षांची माहिती होती. हे सर्व पक्षी तिथे पहायला मिळायचे. आता बरीच वर्षे जाणे झालेले नाही. काय परिस्थिती आहे सध्या ? मी ऐकलेय की दहा वर्षांपासून अभ्यारण्याची स्थिती वाईट आहे. खरेय का हे ?

माझा काका (एकेरीच म्हणायचो ) पाषाण येथील टेकडीवर जायचा. तिथे रंगीत दगड मिळायचे. त्या दगडांचे कलेक्शन हा त्याचा छंद होता. पुढे या क्षेत्रातले लेक्चर्स ऐकताना कळाले की लाव्हापासून बनलेल्या या टेकड्यांवर रत्न सापडत. त्यामुळे अनेक जाणकार सुद्धा फिरायला यायचे. (कुणाला सापडले कि नाही माहीत नाही).

छान आहेत आठवणी सर्वांच्या!! मला इतके जुने अर्थातच माहित नाही.
पण आई बाबा सांगायचे कर्वे रोड म्हणजे कसं जंगल होते. आणि सगळे हसले होते आईबाबांना कुठे जंगलात लांब घर घेतले म्हणून. हे कुठे .. तर.. नवीन कर्नाटक हायस्कुलपाशी!! Lol

Pages