कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

61kW = ~82Ps (for petrol)
>> kW वाचलंच नाही, सवयीनी Ps च असेल असं समजलो. पण चालवताना पॉवर कमी वाटली हे मात्र खरं.

विटारा ब्रेझ्झा चे इंटीरिअर्सही इग्निस सारखे प्लास्टिकी आहेत.
एकोस्पोर्ट जास्त रिलायबल वाटते. ट्राईड अन टेस्टेड आहे. पण मला पर्सनली दोन्हीची रिअर सीट लेगस्पेस गाडीच्या आकाराच्या तुलनेत कमी वाटते.

जर एकोस्पोर्ट किंवा ब्रेझ्झा किंवा क्रेटा च्या टॉप ट्रिम बद्दल विचार करत असाल तर त्याच प्राईस रेंजमधल्या एस क्रॉसचा जरूर विचार करा. बरीच मजल मारली आहे मार्वत्तीनं या गाडीत. बर्‍यापैकी चांगल्या क्वालिटीचे इंटीरीअर्स, राईड आणि हँडलिंग चांगलं. १.६ लिटर्स च्या एंजिन चा पर्याय (ज्याचं टॉर्क रेटिंग जेट्टा, ओक्ताविया च्या रेंजमधलं आहे). सोबत मारूतीची प्रोवन आफ्टर सेल्स सर्वीस Happy

पण मला पर्सनली दोन्हीची रिअर सीट लेगस्पेस गाडीच्या आकाराच्या तुलनेत कमी वाटते. <<< एकोस्पोर्टच्या बाबतीत हे अगदी खरे आहे.

लोकहो, ऑफिसच्या एका कलीग ला गाडी घ्यायची आहे.

कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि डिझेल हवीय.
शॉर्ट्-लिस्ट केलेल्यांपैकी - डस्टर, ब्रेझ्झा, एकोस्पोर्ट, क्रेटा, टीयूव्ही३ओओ, टेरेनो इ आहेत.
सध्याचा कल एकोस्पोर्ट कडे आहे पण फोर्ड्च्या ए.एस.एस बद्द्ल जरा शंका आहेत, त्यामुळे डिसिजन ला वेळ लागतोय...

कुणाचे अनुभव?

Sedan cars मधे ford aspire i10 grand swift desire and kuv100 and amaze काय better choice aahe

My exp of Kreta is not good. It feels like sitting in a rollercoster ride. Dont buy without trying sitting in passenger seats.

तनुदि, याच रेंज मध्ये असलेल्या फिगो अ‍ॅस्पायर चा नक्की विचार करा. चांगली गाडी आहे. डीझेल पाहाताय की पेट्रोल?

क्रेटा घेऊ नका रे भावड्यांनो. लै भंगार गाडी. दिसायला भारी, बाकी भंगार. त्यापेक्षा मारुती, रेनो बेस्ट आहेत त्या किंमतीच्या रेंजमध्ये.

योकु आणि इथले बाकी जाणकार,

समजा एखाद्या गाडी बद्दल काहीही माहिती नसलेली व्यक्तीला गाडी घ्यायची आहे, तर गाडी घेताना काय काय बघायला हवं ते सांगा ना. आणि एसयूव्ही कोणत्या चांगल्या आहेत ते ही सांगा. साधारण किती प्राईस रेंजमध्ये येतात ते ही. सगळ्याबाबातच अज्ञान आहे.

आडो, नक्की कशी गाडी घ्यायची आहे? किती माणसे बसायला जागा हवी आहे? कुठे चालवायची आहे?

ford aspire i10 grand swift desire and kuv100 and amaze>> ह्या सेडान कार्स आहेत? परत एकदा डेफिनेशन चेक करायला हवी आहे म्हणजे मला..

हिम्सकूल, गाडी मुंबईत चालवायलाच हवी आहे. जनरल गाडी व्यवस्थित चालवायला यायला लागल्यावर साधारण जितपत आऊटींग होऊ शकतं तितपत अपेक्षित आहे. ५-६ माणसं बसू शकतील अशी गाडी हवी आहे.

महिंद्रा एक्सयूव्ही चा शेवटचा रो काही कामाचा नाही असं मला अनुभव घेतल्यावर वाट्लं त्यामुळे ७ सीटर घेऊन उपयोग नाही. होंडा सीआरव्ही टाईप्स चालेल.

महिंद्रा एक्सयूव्ही चा शेवटचा रो काही कामाचा नाही असं मला अनुभव घेतल्यावर वाट्लं त्यामुळे ७ सीटर घेऊन उपयोग नाही. होंडा सीआरव्ही टाईप्स चालेल. >> लहान मूलं बरोबर असतील तर ७ सीटर चालू शकेल.

डस्टर, होंडा सीआर व्ही, फोर्ड इकोस्पोर्ट्स (मागचे एक्स्ट्रा व्हील फारच बाहेर वाटते पण) - भरपूर बूट स्पेस अपेक्षित असेल तर
होंडा जाझ, मारुती स्विफ्ट, बलेनो, टाटाच्या गाड्या चालणार असतील तर टाटा बोल्ट,

स्विफ्ट डिझायर, belleno, wagon R > तिन्ही वेगवेगळ्या सेगमेंट मधल्या आहेत. वॅगन आर, सिटी मधे उत्तम, पण पॉवर कमी आहे. बलेनो एकदम डिसेंट गाडी आहे. वेटींग पिरियड बघा किती सांगतात ते, आणि वजन कमी आहे, हायवेला शेजारुन ट्रक गेला की गाडी हालते, स्विफ्ट डिझायर सेमी सेडान, स्टर्डी गाडी, बहुतेक स्विफ्ट आणि बलेनोला इंजिन एकच आहे.

एकदा Team BHP चे रिव्ह्यूज चेक करा..

हिम्सकूल, सेदान नकोयत शक्यतोवर. ७ सीटरची फार गरज नाही खरंतर.

लहान मूलं बरोबर असतील तर ७ सीटर चालू शकेल. >>> लहान मुलं नसतील. हे मोठ्यांचा विचार करुनच लिहीलंय.

महिंद्रा एक्स यु वी स्पोर्ट्स परवाच घेतली.
पाठच्या सीटांना लेग स्पेस खरंच कमी आहे.
पण मग पाचच माणसांना लांबचा प्रवास करायचा असेल तर सामान ठेवायला वापरता येते.
आणि मागच्या दोन सीटांना जोडून लांब बेड करायची छान सोय आहे.
क्रूज कंट्रोल, वॉईस कमांड, रेनसेन्सर वायपर, अ‍टोमॅटीक साईड लँप्स आहेत.
२२०० सी सी असल्याने पीकप चांगले आहेत.
तीन मोबाईल चार्जिंग पाँईंट्स तीन्ही सीटांच्या लाईनला वेगवेगळे एसी वेंटस आहेत.

मोठया आणि सतत लांबचे प्रवास करणार्‍या कुटूंबाला छान आहे.

हिम्सकूल,
स्विफ्ट डिजायर सिडान आहे.
स्विफ्ट बाकीच्या हॅच बॅक आहेत.
आय १० ग्रँड्ची एक लिमिटेड सिडान एडिशनपण आहे.
बाकीच्या हॅच्बॅक आणि एक स्पोर्ट्स वर्जनपण आहे.

गाडीच्या मागच्या बुडावर मला बसता येत असेल तर ती सिडान आणि पोरं घसरू शकत असतील तर ती हॅचबॅक अशी आमची वर्किंग डेफिनिशन आहे.
Wink

Following is the classification of car Segments and types:
Car segments as per SIAM (Society of Indian Automobile Manufacturers)

The classification of segment is done on the basis of the length of the vehicle (Passenger car segment)
A1 Segment – Mini – Up to 3400mm (M800, Nano)
A2 Segment – Compact – 3401 to 4000mm (Alto, wagon r, Zen,i10,A-star,Swift,i20,palio,indica etc)
A3 Segment – Midsize – 4001 to 4500mm (City, Sx4, Dzire, Logan, Accent, Fiesta, Verna etc)
A4 Segment – Executive – 4501 to 4700mm (Corolla, civic, C class, Optra, Octavia etc)
A5 Segment – Premiun – 4701 to 5000mm (Camry, E class, Accord, Sonata, Laura, Superb etc)
A6 Segment – Luxury – Above 5000mm (Mercedes S class, 5 series etc)
B1 Segment – Van – Omni, Versa, Magic etc
B2 Segment – MUV/MPV – Innova, Tavera, Sumo etc
SUV Segment – CRV, Vitara etc
Classification of Cars based on body Shape

ONE BOX (VAN/MPV) – It means Engine area, Passenger area & luggage area all in one box. There wont be separate compartment. For eg. Omni, Ace Magic, Versa
TWO BOX (HATCHBACK) – It means Engine are has a separate cabin while Passenger area and luggage area are together. For eg. M800, Alto, Santro, i10, A*, Swift etc.
THREE BOX (SEDAN/SALOON/NOTCHBACK) – It means Engine area, Passenger area & luggage area all are having different cabin. For eg. SX4, City, Fiesta, Dzire, Ambassador, Indigo CS etc.
ESTATE/STATION WAGON – Its nothing but sedan whose roof is extended till the rearto create more boot space. For eg. Indigo Marina, Octavia Combi, etc.
SUV (Sports Utility Vehicle) – These vehicles have large tyres, higher seating, higher ground clearance. The engine area is separate, but the passenger & luggage area are enclosed together. Most of these vehicles are equipped with either 4 wheel drive system or has the option for that. For eg. CRV, SAFARI, GRAND VITARA, PAJERO etc
SEMI NOTCHBACK – Its a sedan whose boot door can be opened like a hatchback (wagon r, swift), where the rear wind sheild too opens along with the boot door. Unlike sedan whose rear wind sheild is always fixed. There are only few examples for SEMI NOTCHBACK – Skoda Octavia, Accent Viva.

गाडी घेतांना तुम्हाला त्या गाडीत काय पाहीजे आहे ते जास्त महत्त्वाचं. (अगदी पहिल्यांदाच गाडी घेणार असलात तरीही. आता सगळ्याच सेगमेंट्स मध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत.)
- अमुक फिचर्स हवेतच
- अमुक नसेल तरी चालेल
- अमुक फिचर वर तडजोड करायची तयारी आहे

यापुढे, लिस्ट करा १० गोष्टींची. यात तुम्हाला महत्त्वाचे असणारे आणि आवश्यक वाटणारे पॉईंट्सच हवेत. बजेट सकट. ब्रँड ही यात आलाच.
यानंतर गाडी शॉर्ट्लिस्ट करायला सुरुवात करा, तुमच्या लक्षात येईल की १० पैकी मॅक्स ८ ते ९ पॉईट्स एका गाडीत आहेत.

उदा. माझे पॉईंट्स -
- डिझेल
- १.३ लिटर्स च्या वर एंजिन/ ~१०० पीएस पॉवर
- आयआरविएम ऑटो अ‍ॅडजस्ट
- ऑटो एसी
- एबीएस
- किमान २ तरी एअर बॅग्स
- एएसएस समाधानकारक (After Sales Service)
- एसयूव्ही टाईप/ जास्त ग्राऊंड क्लिअरंस/ हाय सिटींग
- १० लाख बजेट. स्ट्रेच १० - २०%
- व्यवस्थित अंडर थाय सपोर्ट

मी जर गाड्या शॉर्ट्-लिस्ट करायला घेतल्या तर मला यातील ८ ते ९ पॉईंट्स (कदाचित कमीही) एका पर्टिक्युलर मॉडेल मध्ये मिळतील. त्यानुसार मग पुढे सर्च नॅरो डाऊन करता येईल.

सेवन सिटर च्या कुठल्याही पर्यायामध्ये लास्ट रो गंडलेली असतेच. लहान मुलांनाच (फारतर शॉर्ट अ‍ॅडल्ट्स) तिथे नीट बसता येतं.

>> आय टेन बंद होतीय असे ऐकलेय! >>> आय टेन बंद होतेय. आयटेन ग्रँड राहील. चांगल्या खपाची गाडी आहे ती ह्युंदाईची.

स्विफ्ट, डिझायर, बलेनो, इग्नीस, एसक्रॉस, एर्टिगा, सियाज या गाड्यांना एकच डिझेल इंजिन आहे (१.३ लिटर्स च फियाट सोर्स्ड मल्टीजेट डीझेल एंजिन. दोन ट्यून्स मध्ये ७५ पीएस पॉवर आणि ९० पीएस पॉवर)
पेट्रोलही सेमच १.२ लिटर्स च व्हिव्हिटी (वेरीएबल वॉल्व्ह टायमिंग).
अपवाद - एसक्रॉस, एर्टिगा, सियाज यांना डिझेल मध्ये ९० पीएस पॉवर च आणि पेट्रोल मध्ये १.४ लिटर्स ची एंजिन्स आहेत.
एसक्रॉस - फियाटच्याच १.६ लिटर्स च्या डिजेल मध्येही उपलब्ध आहे. पण हे एंजिन ते आयात करतात त्यामुळे या मॉडेल ची किंमत तुलनेनी जास्त आहे.

फोक्स्वॅगन अमिओ, स्विफ्ट डिझायर, फिगो अ‍ॅस्पायर, इंडिगो सीएस, टाटा झेस्ट, होंडा अमेझ, ह्युंदाई एक्सेंट या सेमी सेदान किंवा नॉचबॅक.
टॅक्स वाचवायला आणि गाडीची किंमत आटोक्यात ठेवायला या गाड्या ४ मीटर्स लांबीपेक्षा कमी असतात. एंजिनही १५०० सीसी (१.५ लिटर्स) पेक्षा कमी असतं.

याउप्पर अजून ऑटोमॅटिक्स मध्ये पर्यायही खूप आहेत सध्या अगदी सगळ्या सेगमेंटस मध्ये.

हे फक्त भारतातील गाड्यांबद्दल... Happy

धन्यवाद योकु. मला विचार करायला पर्याय दिल्याबद्दल. कारण मी या सगळ्याबद्दल पूर्णपणे ढ आहे. हम्म तर,

डिझेल
- १.३ लिटर्स च्या वर एंजिन/ ~१०० पीएस पॉवर
- आयआरविएम ऑटो अ‍ॅडजस्ट
- ऑटो एसी
- एबीएस
- किमान २ तरी एअर बॅग्स
- एएसएस समाधानकारक (After Sales Service)
- एसयूव्ही टाईप/ जास्त ग्राऊंड क्लिअरंस/ हाय सिटींग
- १० लाख बजेट. स्ट्रेच १० - २०%
- व्यवस्थित अंडर थाय सपोर्ट >>>>>

१. पेट्रोल आणि डिझेल मध्ये नक्की काय आणि किती फरक असतो? किंमतीत बर्‍यापैकी असतो हे माहितीये पण बाकी वापराच्या दृष्टीने काय घ्यावं/बघावं?
२. सेफ्टी फिचर्स महत्वाची आहेतच. एबीएस, ऑटो एसी तसंच रिअर एसी व्हेन्ट्स, आयआरव्हीएम ने काय होतं नक्की?
३. आफ्टर सेल्स सर्व्हिस चांगली असणंही तितकंच महत्वाचं.
४. भारतात ऑटोमॅटिक गाड्या कितपत महाग असतात, मॅन्युअल च्या तुलनेत?

मला लेग स्पेस मागच्या सीटलाही व्यवस्थित असणं अत्यंत आवश्यक वाटतं. कारण ती तशी नसेल तर हल्ली मलाच खूप त्रास होतो. जेष्ठ नागरिक बरोबर असतील तर त्यांना अगदीच गैरसोईचं होईल ते.

लुक्सवाईज मला होंडा सीआरव्ही, फोर्डची एज या गाड्या आवडतात. महिंद्राची एक्सयुव्ही पण, पण......:फिदी:

आपल्याकडे भारतात ज्या गाड्या ट्रॅव्हलच्या बिझीनेससाठी वापरतात त्या घ्यायला आवडत नाहीत म्हण्जे घ्याव्याश्या वाटत नाहीत. का कोण जाणे.

पेट्रोल आणि डिझेल मध्ये नक्की काय आणि किती फरक असतो? किंमतीत बर्‍यापैकी असतो हे माहितीये पण बाकी वापराच्या दृष्टीने काय घ्यावं/बघावं?

- डिझेल गाडी पेट्रोल पेक्षा सव्वा ते दीड लाखानी महाग असते. सर्वीस कॉस्टही महाग असू शकते.
- प्रत्येक वेळी पंपावर फ्यूल करता पैका जास्त मोजावा लागतो पेट्रोल करता.
- डिझेल चं मायलेज पेट्रोल च्या तुलनेत जरा जास्तच मिळतं
- डिझेल ला रिसेल वॅल्यू तुलनेनी कमी मिळते

तरीही जर जास्त रनिंग नसेल तर कॉस्ट च्या दृष्टीनी पाहाता पेट्रोल परवडतं.

आता जरा परफॉर्मन्स बद्दल
समजा १२०० सीसी चं पेट्रोल एंजीन असेल तर टॉर्क (गाडीची पुलिंग पॉवर)साधारण पणे १०० - ११५ एनएम मिळेल पण ४००० आरपीएम ला. म्हणजेच जर एंजिन ४००० आरपीएम ला असेल तरच इतकी पॉवर मिळेल. जनरली सिटी मध्ये आरपीएम २ - ३००० च्या वर जात नाहीत. म्हणजेच काही ठिकाणी पॉवर मिळवायला गीअर वर्काऊट करायला लागतात.

तेच जर १२००/१३०० सीसी चं डिझेल इंजिन असेल तर टॉर्क १९० एन एम मिळेल तेही फक्त एंजिनच्या २००० आरपीएम ला. म्हणजेच मॅक्सिमम पॉवर एंजिनच्या कमी आरपीएम ला उपलब्ध असते, त्यामुळे पिकअप आणि परफॉर्मन्स पाहाता हे इंजिन उजवं ठरेल.

पेट्रोल हे डिझेल च्या तुलनेत रिफाईन्ड फॉर्म ऑफ फ्यूल आहे. त्यामुळे एंजिन पार्टस कमी झिजतात (लाईफ जास्त असतं). गाड्याही चालायला स्मूथ असतात.
डिझेल हे तसं रॉ असल्यानी पार्टस ची झीज तुलनेनी जास्त असते. म्हणून मेंटेनन्स जास्त.

पण आजकालची मॉडर्न डिझेल्स बरीच सुधारलेली आहेत. सर्वीस इंटरव्हलही वर्शातून एक वर आला आहे.
ह्युंदाईच्या काही गाड्यांत बसल्यावर तर वाटतही नाही की गाडी डिझेलची आहे म्हणून; तर या लेव्हल ची रिफाईनमेंट आहे.
तसेच पैसा फॅक्टरही महत्त्वाचा आहेच.

एबीएस - अ‍ॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीम - यात कितीही इमर्जन्सी मध्ये ब्रेक लावल्यास चाक लॉक होत नाही. स्पेशली निसरड्या सरफेस वर जर चाक लॉक झालं तर ते घसरेल. (Wiki - An anti-lock braking system or anti-skid braking system (ABS) is an automobile safety system that allows the wheels on a motor vehicle to maintain tractive contact with the road surface according to driver inputs while braking, preventing the wheels from locking up (ceasing rotation) and avoiding uncontrolled skidding.)

ऑटो एसी - बाहेरच्या तापमानानुसार गाडीच्या आतले तापमान अ‍ॅडज्स्ट होतं (फॅनस्पीड ही). गाडी चालवत असतांना हे करणं त्रासाचं होतं थोडं. ऑटो एसी असेल तर हा त्रास वाचतो Happy

तसंच रिअर एसी व्हेन्ट्स - मागच्या लोकांकरता दिलेले एसी व्हेंट्स (काही मोठ्या गाड्यांत वेगळे कंट्रोल्सही दिलेले असतात)

ऑटो आयआरव्हीएम- गाडीच्या आत असलेला रिअर व्ह्यू मिरर. आपल्या गाडीच्या मागे हाय बीम वर असलेली एखादी गाडी असेल तर त्याच्या बीम चा आपल्याला त्रास होतो. ऑटो आयाअरव्हीएम मध्ये असा बीम आला तर मिरर डार्क होतो जेणेकरून बीमचा त्रास होत नाही. मागे असलेली गाडी / बीम हटला की आतला मिरर पुन्हा नॉर्मल होतो जेणेकरून मागचं नीट दिसत राहातं.

पेट्रोल हे डिझेल च्या तुलनेत रिफाईन्ड फॉर्म ऑफ फ्यूल आहे. त्यामुळे एंजिन पार्टस कमी झिजतात (लाईफ जास्त असतं). गाड्याही चालायला स्मूथ असतात. >>

हे मिथ आहे . जेंव्हा युरो १ / २ स्टॅन्डर्ड होते तेंव्हा हे काही अंशांनी खरे होते पण आता अजिबात नाही. आता पेट्रोल असो की डिझेल तेवढेच आयुष्य असते, अन तेवढीच स्मुथ गाडी चालते.

बायदवे अमेरिकेत डिझेल हे पेट्रोलपेक्षा महाग असते. डिझेल गाड्या इथे फक्त प्रिमयम मध्येच मिळतात. Happy ऑडी अन जॅग ह्यात पुढे आहे.

Pages