इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.
काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.
तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू.
याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.
किती वर्षे वापरणार?
किती वर्षे वापरणार?
धन्यवाद नरेन पण ती manual
धन्यवाद नरेन पण ती manual transmission आहे. ऑटोमॅटिक पाहिजे
शान्त माणुस, जो पर्यन्त
शान्त माणुस, जो पर्यन्त electric car affordable आणि long drive sathi practical होत नाही तो पर्यन्त. म्हणजे साधरण पुढची ८-९ वर्शे तरी वापरणार.
12च्या आसपास बजेट असेल तर
12च्या आसपास बजेट असेल तर निसान मॅग्नाइट बघा. Cvt आहे. होंडा जॅझ आणि मॅग्नईट दोन्ही cvt साठी आम्ही नुकत्याच टेस्ट ड्राइव्ह करून बघितल्या. होंडा जॅझ किमतीच्या मानाने फीचर्स फार काही इम्प्रेसिव्ह नाहीत. मॅग्नाइट मस्त वाटते. अजून एक पर्याय रेनॉ कीगर आहे पण कीगर cvt टेस्ट ड्राइव्ह साठी पुण्यात उपलब्ध नाहीये. आम्ही मॅन्युअल चालवून बघितली होती आणि डस्टर amt. शिवाय कीगरचे ergonomics जरा weird वाटले. AMT चालणार असेल तर ह्युंडाईची ग्रँड i10 nios asta amt टेस्ट ड्राइव्ह करून बघा.
टाटा नेक्सन ऑटोमॅटिक पण आहे,
टाटा नेक्सन ऑटोमॅटिक पण आहे, टॉप एन्ड नको असेल तर मिड वरिएंट पण आहे ऑटोमॅटिक मध्ये.
Best automatic transmission
Best automatic transmission मधे polo GT-TSI मिळेल पण हि Hatchback आहे . मे बी bootspace जास्त मिळणार नाही. पण तुमच्या बजेट मध्ये बसेल.
Bootspace जास्त पाहिजे असेल तर Tiguan TSI किंवा Scoda Kushaq TSI आहेत पण बजेटमध्ये बसणे थोडे अवघड आहे.
Honda Amaze Automatic / Polo
Honda Amaze Automatic / Polo TSI (it is too small but) / Skoda RAPID
My personal opinion -
Don't go for AMT if you need good pick up & driving experience. But AMT is economical.
If you want to buy Automatic buy fully automatic (No AMT). If you can increase budget go for Honda City.
Skoda RAPID discontinued आहे.
Skoda RAPID discontinued आहे.
Slavia नवा मॉडेल आहे scoda चा तो ऑप्शन पाहू शकता.
Skoda RAPID discontinued आहे.
Skoda RAPID discontinued आहे.
Slavia नवा मॉडेल आहे scoda चा तो ऑप्शन पाहू शकता.>> बरोबर मी विसरलो होतो.
धन्यवाद इतके पर्याय
धन्यवाद इतके पर्याय सुचविल्याबद्दल
लागतो आता अभ्यासाला
I have just purchased Honda
I have just purchased Honda amaze vx CVT top end. It's beautiful. On road price 10.85 lacs. Large boot space and very comfortable.
टाटा ची Nexon कुणी वापरली आहे
टाटा ची Nexon कुणी वापरली आहे का? कशी आहे?
टाटा nexon छान आहे गाडी,
टाटा nexon छान आहे गाडी, सेफटी 5 स्टार आहे. सर्विस पुण्यात चांगली वाटली. मी डिझेल चालवली आहे, ऑटो गिअर वाली. Easy to drive एकदम. 1500 cc आहे, मस्त ताकद, सुशेगाद चढ चढते.
मला आता EV घ्यायची आहे त्यातील.
thnx सुहृद...चांगली माहिती
thnx सुहृद...चांगली माहिती दिलीत...
महाराष्ट्रात सगळीकडे सारखीच किँमत असते का?की सांगली कोल्हापूर ला स्वस्त पडेल?
मूळ किंमत बहुदा सारखीच असावी,
मूळ किंमत बहुदा सारखीच असावी, पण डीलर मार्जिन भरपूर असते त्यामुळे डिस्काउंट किती खेचता येईल तितका उत्तम.
गाड्यांना आता वैटींग आहे
गाड्यांना आता वैटींग आहे त्यामुळे खूप डिस्काउंट मिळणे कठीण आहे
thanx you ..let me check
thanx you ..let me check
टाटाची सेदान सेगमेंट मधील
टाटाची सेदान सेगमेंट मधील सेकंडहॅण्ड गाडी शोधणे चालू आहे. एनी सजेशनस्?
Tigor
Tigor
Tata peksha Toyota sedan bari
किफायतशीर हवी सिडान सेकण्डहैण्डसाठी तर मारुती सियाज पेट्रोल अधिक बरी cng लावण्यासाठी.
डिझेल हवी तर करोला अल्टिस छान ... २ लाख चालली तरी मजबूत आणि भरवश्याची गाड़ी
टाटा झेस्ट
टाटा झेस्ट
डिझेल हवी तर करोला अल्टिस छान
डिझेल हवी तर करोला अल्टिस छान >> पण बजेट ह्याच्या सेकंड हँड किमतीपेक्षा टाटाची नवीन स्वस्त पडेल.
but Quality is not comparable
डिझेलगाडीला CNG kit बसवता
डिझेलगाडीला CNG kit बसवता येते का? अनेक बेस्ट बस अशा रुपांतरीत केलेल्या आहेत, काही पाण्याचे tanker, मोठे टेंपो सुद्धा दिसतात CNG वर चालणारे.
आणि जर डिझेलइंजिन वर CNG kit बसवलेच तर ते इंजिन CNG आणि डिझेल अशा दोन्ही इंधनावर चालू शकते का? की फक्त CNG वरच चालते? कारण डिझेल इंजिनला CNG मध्ये बदलणे खूप किचकट आहे, त्यासाठी इंजिनमध्ये खूप सारे बदल करावे लागतात, असे ऐकले आहे.
डिझेल इंजिन वर cng किट बसवता
डिझेल इंजिन वर cng किट बसवता येत नाही
जे ट्रक आहेत ते फक्त cng वर चालतात
टाटाची सेदान सेगमेंट मधील
टाटाची सेदान सेगमेंट मधील सेकंडहॅण्ड गाडी शोधणे चालू आहे. एनी सजेशनस्? >>>
बजेट
मेक
मॉडेल
किती जुनी चालेल ?
शहर
फोन नंबर (जमल्यास)
टाटाची सेदान सेगमेंट मधील
टाटाची सेदान सेगमेंट मधील सेकंडहॅण्ड गाडी शोधणे चालू आहे. एनी सजेशनस्? >>>
टाटाची मार्केट मधे सी-२ सेगमेंट सेदान नाहीये.
सी-१ सेगमेंट (सब ४ मीटर) सेदान या बरेचदा बी-१ सेगमेंट हॅचबॅकच्या मोठी डिकी वाल्या बहिणी असतात (टिअॅगो - टीगॉर, निऑस - ऑरा...) त्यापेक्षा मी सी-१ सेदानपेक्षा बी-२ हॅचबॅक रेकमेंड करीन.
टाटाचीच घ्यायची असेल तर बी-२ हॅच मधे अल्ट्रोज मस्त आहे. टर्बो इंजिन ऑप्शनही आहे (फक्त ऑटोमॅटिक अजून अॅव्हेलेबल नाही).
जर टाटापेक्षा वेगळी चालणार असेल तर आय-२० ट्राय करता येईल. ४ सिलेंडर इंजिनची स्टॅबिलिटी, मॅन्युअल-क्लचलेस-सीव्हीटी-डीसीटी असे गिअरबॉक्स ऑप्शन्स, टर्बो- नॉन टर्बो इंजिन ऑप्शन्स, ६ एअरबॅग्जचा ऑप्शन असे बर्यापैकी ऑप्शन्स आहेत.
जॅझ, पोलो, बलेनो या तीन्ही गाड्यांचे फेसलिफ्ट थोड्या महिन्यात अपेक्षित आहेत. त्यानंतर सध्याची मॉडेल्स सेकंड्स मार्केटमधे स्वस्तात येऊ शकतील.
सी-२ सेदानचा विचार करत असाल तर मात्र डोळे झाकून होंडा सिटी घ्या.
१ सप्टेंबर २०२२ पासून ८ जणां
१ सप्टेंबर २०२२ पासून ८ जणां पर्यंतची कपॅसिटी असलेल्या सर्व पॅसेंजर कार्सना ६ एअरबॅग्ज स्टँडर्ड फिटमेंट होणार आहेत. त्यामुळे सर्व गाड्यांच्या किमती २५-३० हजारांनी वाढण्याची शक्यता आहे.
पण सेफ्टीचा विचार करता हे एक चांगलं डिसीजन आहे. त्यामुळे नवीन गाडी घेणार असाल (अन त्या मॉडेलला आत्ता ६ एअरबॅग्ज नसतील) तर थोडं थांबून मग घेणं चांगलं...
मंडळी, फार चांगली माहिती
मंडळी, फार चांगली माहिती पुरवत आहात. सगळ्यांचे मनापासुन आभार. गाडी आली की सगळ्यात आधी इथे येऊन सांगणार.
मारुतीनी नव्या (येऊ घातलेल्या
मारुतीनी नव्या (येऊ घातलेल्या) बलेनोत अक्षरशः माती खाल्लेय माझ्यामते.
वॅल्यू फॉर मनी वेरीअंट जनरली (प्रिमिअम हॅच मध्ये) १० लाख मागेपुढे येतं. नव्या बलेनोत एएमटी देतायेत
हे फारच कॉस्ट कटिंग झालं. कमीत कमी आधीच्या गाडीत असलेलं (४ स्टेप का असेना) सिविटी ठेवायला हवं होतं.
१० लाख (प्रिमिअम प्राईसिंग, ते ही टॉप मॉडेल नाही) घ्यायचे अन जरा लोवर मॉडेल्स ला असलेला (३०-३५ हजार कॉस्ट असलेला) गिअरबॉक्स द्यायचा आणि
सिवीटी बॉक्स चालवायचा अनुभव आणि एएमटी चालवायचा अनुभव यात फार फरक आहे. सिविटी फार फार स्मूथ चालतं.
१.२ लिटर च्या गाड्यांत सिव्हिटी सोबत पॅडल शिफ्टर्स फक्त होंडा देतं (जॅझ, अमेझ)
(माझ्या मते) तसंही हे पेड्ल शिफ्टर्स वापरण्याची फारशी गरज नाही पडत.
How's the Maruti Swift? What
How's the Maruti Swift? What's the price? local ne kaam chalte ani busy life mule kuthe Jane hot nahi mhanun aata paryant vichar navta gadi ghyacha, pan covid mule local avoid karnyasathi gadi ghyaycha vichar chalu aahe.
It will be the first car so want simple to handle and drive.
Electric car kunakade aahe ka? Price ani pros cons Kay aahet,? Changli electric car model hi suggest Kara please.
Pages