कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून एक, गाडी पाहायला जाताना, या बाबतीतलं अजिबात न कळणार्‍या व्यक्तीला सोबत न्यावं; ही व्यक्ती ड्रायविंग सीट आणि टेक रिलेटेड गोष्टी सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर (अर्थात त्या त्यांना वापरता येतात म्हणूनच उदा. एसी, म्युझिक सिस्टम, रंग, स्पेस, हेडरूम, नीरूम इ) आपलं अन्बायस्ड मत देतात; त्याचाही फायदा होतो डिसिजन मेकिंग मध्ये...>>>>>>>>>>>>>>>

Happy Happy योकु, हे सहि आहे Happy Happy

अ‍ॅक्टीवा ४जी आणी ज्युपीटर ZX या दोन्ही पैकी कोणती गाडी चांगली आहे.

वापर तसा जास्त नाहीये. फक्त शनिवारी किंवा रविवारी च थोडीफार चालवली तर.

अजून एक टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावर जॅझ फायनल केली.

नवीन Submitted by Bagz on 17 February, 2018 - 19:25
______________________________________________________________
अभिनन्दन

टू व्हीलर कोणती घ्यावी? या धाग्यावर अजून माहीती मिळेल.
मला विचाराल तर दोन्ही उन्नीस-बीस फरकानी सारख्या आहेत; ज्युपीटर/वेगो ला सीट न उघडता फ्यूल भरता येतं हा एक प्लस पॉईंट. तुलनेनं या गाड्या स्वस्तही आहेत.

स्विफ्ट VXI AMT चा अनुभव कसा आहे? ही मुळ मॅन्युअल गिअर वर ऑटो माउंट केलेय त्यामुळे ऑटो चा मेन्टेननस याला अजिबात लागत नाही असे शोरूमवाला सांगतोय.

जुनी गाडी घेताना टाटा सफारी पेट्रोल आणि टोयोटा क्वालिस डिझेल ह्यामध्ये काय निवड करावी ?
कारवाले साइट सफारी तुलनेत स्वस्त दाखवतायेत् तर त्यामागे काय कारणे असतात. टाटाला मुळात रीसेल कमी असल्याने हे आहे की सफारी क्वालिटी मध्ये दुय्यम असल्याने आहे ?

डूडायडू,
पेट्रोल गाडी नेहेमी स्वस्त असते. टाटाची डिझेल च गाडी घ्यावी पेट्रोल नाही.

लोकहो नव्या संट्रो चे काय रEव्यु आहेत सीएनजी वाल्या. सध्या आय10 वापरतोय सो ह्युंडाई लाच पसंती आहे.

स्विफ्ट VXI AMT चा अनुभव कसा आहे? ही मुळ मॅन्युअल गिअर वर ऑटो माउंट केलेय त्यामुळे ऑटो चा मेन्टेननस याला अजिबात लागत नाही असे शोरूमवाला सांगतोय.>>

इथे कुणाला अनुभव दिसत नाही म्हणून टेस्ट ड्राईव्ह मधला माझा अनुभव इथे लिहिते.

ऑटो पाहिजे असेल तर फुल ऑटो घ्या. AMt च्या वाट्याला अजिबात जाऊ नका. गिअर शिफ्ट होताना काही सेकंदाचा गॅप पडतो तेव्हा स्पीड काही सेकंद झपकन कमी झाल्याचा भास होऊन प्राण कंठाशी येतात :).

गर्दीच्या शहरात जिथे गाडी चालवणे म्हणजे सतत क्लुच ब्रेक करावे लागते, 60 च्या वर स्पीड जायची शक्यता शून्य असते तिथे ही गाडी बेस्ट आहे. मॅन्युअल च्या मेंटेनन्स मध्ये ऑटोचा फायदा.

Swift disel V's tiago diesel
कुठली अधिक बरी ?
ड्राइव्ह करताना तसेच मागच्या सिटचा प्रवासी म्हणून असे दुहेरी प्रकारात स्विफ्टचा आरामशीरपणा लॉन्ग रुटवर अनुभवलेला आहे.
पण टिअगो अजून चालवलेली नाही त्यामुळे त्या टाटा मॉडेलबद्दल प्लस माइनस ऐकायला आवडेल.
आगावू धन्यवाद !

एएमटी ट्रान्समिशन चा हा अनुभव मी वॅगन आर वर घेतलाय. नकोरे बापा अशी गत असते. त्यातही सिंगल लेन हायवे वर ऑव्हरटेक करताना अक्षरशः प्राण कंठाशी गत. सिटी ड्राईव करताच हे ठीक आहे.

होन्डा जाझ आनि मारुती बलेनो (दोन्ही पेट्रोल) यामधे कुठला पर्याय निवडावा ? वापर शहरी भागात आणि कधीतरी (उदा. महीन्यातुन एकदा) हायवेवर होइल (उदा. मुम्बै नाशिक). सुरक्षा आणि comfort यांना प्राधान्य.

मारुती बलेनो वापर नाशिक ग्रामिण मधे कसा राहील?
किंवा ८ लाखा पर्यंत दुसरी अजून कोण्ती गाडी सुचवा.. पेट्रोल.

टाटा टियागो जबरदस्त आहे. बिल्ड क्वालिटी सॉलिड आणि फिनिश आहे एकदम. जुना टाटाचा मजबूती सोडला तर कुठलाच दुर्गुण नाहीये. पेट्रोल इंजिन होंडा इतके रिफाईन नसले तरी चांगलेच स्मूथ आहे. पेट्रोलला सिटी 18 आणि हायवे 24 पर्यंत मायलेज मिळते. हरमनची साउंड सिस्टीम 8 स्पिकरसहित सुपरब आहे. एक्सझेड अथवा प्लस मॉडेल घेतले तर सगळ्या फॅसिलिटीज अलॉय व्हील, अडजस्टबाल स्टीअरिंग आणि ड्राइविंग सीट, एबीएस इबिडी आणि 2 एअरबॅग सहित 7 लाखाच्या आत येते. लूक फारसा क्रिएटिव्ह अथवा एकदम न्यू नसला तरी डिसेंट आहे.

जॅझ मध्ये खूपच जास्त जागा मिळेल. पण ती ८ लाखात आहे का? माझ्या माहीतीप्रमाणे त्यांनी फक्त २ टॉप मॉडेल्स ठेवलेत जे एक्स शोरूमच ८ लाख + असावेत.
या दोन्ही गाड्यांचे टीम-बीएचपी साईट वरचे रिव्ह्यूज नक्की वाचा.

बाकी इंजीन मोअर ऑर लेस बलेनो आणि जॅझ च सिमिलर आहे. तुम्हाला काय आवडतंय ते घ्या. Wink

बीएस, पेट्रोल की डिझेल?

बलेनोचा सस्पेंशन प्रॉब्लेम होता जो 2019 च्या re vamped मॉडेल मधून काढला गेलाय असे सेल्स मॅनेजरने सांगितले होते. तो प्रॉब्लेमही स्विफ्टशी तुलना करता तेवढा सिरीयस नाही. हाई स्पीडवर रस्त्यात खड्डा आल्यास स्विफ्ट जितके दणके देईल त्यापेक्षा दोन दणके बलेनोत जास्त बसतील इतकेच.

बाकी जॅझ बघितली नाही त्यामुळे तुलना करता येणार नाही पण स्विफ्टच्या तुलनेत बलेनोमध्ये मागच्या सीटवर जास्त जागा व बूट स्पेस पण जास्त आहे. मला बलेनोच घ्यायची।होती पण मुलीला जो रंग हवा होता तो नसल्याने स्विफ्ट घेतली.

परवाच मित्राने नवीनच घेतलेली अर्टिगा हायब्रीड मॉडेल चालवून बघितली.... मस्का गाडी आहे!
हायब्रीड ही कंसेप्टच भारी आहे Happy

अल्टो के १० बद्दल काय मते आहेत? आहे का कुणाकडे? रोड मायलेज किती पडते?
अन मुख्य म्हणजे २०१९ च्या मॉडेलमध्ये एबीएस ईबीडी आहे ना?

त्याचप्रमाणे रेडी गो अन क्विड बद्द्ल काय चर्चा आहे?
या दोनही गाड्या एबीएस इबीडी सहीत सेंट्रल लॉक, अन पॉवर विंडो असलेल्या आहेत. किंमतीही चांगल्या आहेत.

नुकतीच मारूती सुझूकी नेक्सा ची इग्नीस १.२ लीटर पेट्रोल मॉडेल घेतले आहे.

सर्व सेफ्टी पिचर्स आहेत. गाडी स्पेशीअस आहे. टायर रुंद मोठे आहेत. ग्राउंड क्लिअरंस १८० मीमी आहे. स्टेअरींग, गाडीचे हॅंण्डलींग, रस्त्यावरची पकड सर्वोत्तम आहे. मायलेज शहरात १५ च्या आसपास मिळालेले आहे. हायवेवर अजून जास्त मिळेल.

वेगातही हॅन्डलींग जबरदस्त आहे. उगाचच मोठ्या मॉडेलसाठी न जाता शहरातल्या ट्रॅफीक अन पार्कींगच्या समस्येवर मात करण्यासाठी उपाय साधायचा असेल तर मारूती सुझूकी नेक्सा चे इग्नीस मॉडेल अतिशय योग्य आहे.

टाटा टिॲगो आवडली आहे . फ्रंट लुक , ड्युअल टोन छान वाटते. पण डिझेल ऑन रोड ७ पर्यंत जाईल असे दिसते. कुणाला अनुभव आहे का? लेग रुम, बुट स्पेस,रुफ, ग्राउंड क्लिअरन्स ,इंजिन रिस्प्पोन्सिव्हनेस,एसी बद्दल अनुभव जाणून घ्यायला आवडेल.

मारुतीनी स्विफ्ट अन डिझायरला जरा डाऊनग्रेड केलंय (वॅगन आर च्या लाँच नंतर). सीट्स मधे अ‍ॅडजेस्टेबल हेडरेस्ट येत नाही आता कुठेच. मागचं आर्मरेस्टही गायबलंय. स्टीअरिंगला फक्त टिल्ट अ‍ॅडजेस्ट करता येतं. मागचा वायपर गायबलाय. वगैरे वगैरे.

टाटानीही xza+ आणि xz+ आल्यावर टियागो अन टीगोरच्या xza आणि xz मॉडेल्समधे बरेच बदल केलेत.

बलेनो - स्विफ्ट - जॅझ च्या स्पर्धेत कधीही जॅझला मत. पण दिवाळीपर्यंत थांबायची तयारी असेल तर टाटाची अल्ट्रोझ येतिये.

Pages