कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्युन्देची क्रेटा कुणी घेतलीय का?
कशी आहे?
आमच्या गावाजवळ नवी शोरूम उघडतेय तिथे चौकशी केली तर ५२ वेटींग लिस्ट आहे म्हणे!
इतकी भारी आहे?

साती, गाडी एकतर ह्युंदाईची. त्यामुळे एक्विपमेंट लिस्ट भरमार आहे. त्यात ती आटूकमाटूक पण अव्हेलेबल आहे. आणि मुळात गाडी कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारात मोडत असली तरी एकोस्पोर्ट, क्वांटो सारखी नाही दिसत. लूक्सही मस्तच आहेत. म्हणून भारी! Happy

urenama shi अमेझ + इतरही गाड्या चांगल्याच आहेत, पण तुम्हांला तुमच्या गाडीमध्ये कायकाय फीचर्स हवे, पेट्रोल की डिझेल; अजून तुम्ही कुठल्या गाड्या पाहिल्यात इ प्रश्नांची तुलना करून मग निर्णयापर्यंत पोहोचता येइल Happy
सध्या सगळ्यांच गाड्यांवर दसरा- दिवाळीच्या ऑफर्स मिळतील तेव्हा भरपूर बार्गेन करा अन फायदे + फ्रीबीज मिळवा. हॅपी हंटीग...

Navryane amez book keli aahe.ajun vel aahe to paryant tumhi sarvani margadarshan kele tar bare hoil.
Ekada gheun zalyavar badal karta yenar nahi na mhanun.
Hi aamchi pahili CH gadi aahe. petrol chi havi aahe jast running nahi. Pan parat parat ghene honar nahi mhanun ghet aahe Hi gadi . Pl. Reply

मला २ व्हिलर घ्यायची आहे....कुठली घ्यावी.... अॅक्टिवा सवॅञ जास्त दिसते..
ज्युपिटर अॅक्टिवा बेटर ऑप्शन काय...कि अजुन काही....

The Chevrolet Trailblazer has been launched in India at a price of Rs. 26.40 lakhs (ex-Delhi).

>>

पयली लाइन पाहुनस थांबलो

भारत सरकार द्रुतगती महामार्गांवर कमाल वेगमर्यादा १४० किलोमीटर प्रतीतास करणार! Uhoh
इथे बातमी आहे - http://www.team-bhp.com/forum/street-experiences/174062-soon-you-will-ab...

ऐतेनच! मलातरी तत्वत: पटलं नाही.

का?

इनफॅक्ट कंट्रोल अ‍ॅक्सेसने खूप सारे एक्स्प्रेस वे बांधले जात आहेत / जाणार आहेत तर मग ह्यात वाईट काय आहे? मुंबई - नागपूर ८ तासाचा प्रोजेक्ट आहे. मुंबई पुणे - औरंगाबाद - नागपूर असा रस्ता. मग त्यात पुणे ते नागपूर कंट्रोल्ड हायवे असेल तर ८-९ तास सहज शक्य आहे.

भारत सरकार द्रुतगती महामार्गांवर कमाल वेगमर्यादा १४० किलोमीटर प्रतीतास करणार! >>>
रस्त्यांचं डिझाईन या स्पीडसाठी असेल तर हरकत नाही.

कमाल वेगमर्यादा १४० किलोमीटर प्रतीतास करणार >> नॉर्मली अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड रस्त्यांवरती काही हरकत नाही. तसाही आताची ८० किमीची मर्यादा कोण पाळतं? पण आपल्या लोकांचा अ‍ॅटिट्यूड, मेंटॅलिटी आणि सिव्हिक सेन्स बघितला तर यातून नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. १४० च्या वर गेल्यावर पकडणार कसं आणि पकडलंच तर पुढं कडक कारवाई करणार का हे स्पष्ट नाही त्या बातमीत. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर मी कधीही पोलिसांची पॅट्रोलिंग कार किंवा स्पीड गन्स बघितल्या नाहीयेत.

टीम-बीएचपी वरची ही कमेंट. बोल्ड केलेलं वाक्य खूप महत्वाचं आहे.
--------------------------------------------------------
While it's a positive change from the government it still has two sides to it.
On a positive note one wouldn't get fined for crossing the 100km mark anymore on empty expressways. And it will make a significant difference and reduced travel time for long journeys.

However there's a dark side to it as well...
For the general folk who may or may not have a detailed knowledge or experience of driving at such speeds can be extremely fatal! With the kind of road conditions and sheer disrespect for road manners that we have it may just lead to more accidents. Not to forget the absence of better emergency service during such mishaps.
Imagine little Alto's and Brio's packed with families doing 120kmph+ on expressways just because it is legal!
--------------------------------------------------------

मनीष, अनुमोदन. करायला हरकत नाहीच पण तू लिहिलेल्या पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे अडचणी आहेतच.

अ‍ॅक्सेस कंट्रोल्ड रस्ता हे नंतर येईल . आधी त्याची रचना किती वेगासाठी केली आहे हे महत्वाचं. अनेकदा ८० चा बोर्ड असलेल्या रस्त्यावर हा वेग न ओलांडताही वळणावर तारांबळ उडते. वळणावर रत्याचा बँकींग अँगल मेन्टेन केलेला असेल तर वळणावर अपघाताची शक्यता कमी होते. सिव्हील इंजिनियर्स चांगलं सांगतील.

मार्वत्तीच नवीन पिल्लू. अपग्रेड करणार्‍यांकरता अजून एक पर्याय. सब ४ मीटर्स मध्ये एकोस्पोर्ट, टियूव्ही १ ओ ओ च्या बरोबरीची व्हिटारा ब्रेझ्झा.

मारूती सुझुकी व्हिटारा ब्रेझ्झाचा ऑफिशिअल टीम-बिएचपी रिव्ह्यू इथे वाचता येईल

२०१०ची करोला अल्टीस डिझेल इंजिन कार (D4D G BS IV) आहे
९०००० किमी रनिंग झालेय.... Single Owner आहे

कितीला घ्यावी?
साडेसहा?

चांगली आहे बी-आरव्ही. पेट्रोलमध्ये सिटीचं १.५ लिटर्स च आयव्हीटेक एंजिन आणि सेम मोबिलिओ, जॅझ, अमेझ च १०० पीएस पॉवरचं डिझेल. पण बाकीच्या स्पर्धेत कशी काय तगेल ते पाहायला हवंय Happy
सिमिलर प्राईस पॉईंट्ला ब्रेझ्झा, एस-क्रॉस, डस्टर, एर्टिगा आहेत. या स्मॉल एसयूव्हींमध्ये थर्ड रो सीट्स तशाही काही फार कामाच्या नसतात.

मारूतीच्याच ब्रेझ्झा Vs एसक्रॉस मध्ये बर्‍याच लोकांचा गोंधळ आहे सध्या.

करोला एकदम स्टर्डी गाडी आहे.. आमच्याकडे पेट्रोल व्हेरियंट आहे..

मार्केट मध्ये त्या वेळेच्या गाडीचा सध्या रेट काय चालू आहे ते बघून सांगातो

मला कारमधे टच स्क्रीन + नॅव्हिगेशन असलेली सिस्टीम बसवून घ्यायची आहे. माझ्या एका मित्रानं कॅस्का (Caska)ची सिस्टीम सजेस्ट केली आहे. पायोनियरची पण सिस्टीम (६.२" स्क्रीन) जवळजवळ त्याच किमतीला मिळत आहे. कॅस्का बद्दल इथे कोणाला काही अनुभव आहे का?

Pages