कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच दिवसांनी हा बाफ वरती आला.
मी ह्यूदै क्रेटा बद्दल विचारले होते.
पण मग १८ लाखाची एस यू वी घेण्यापेक्षा फॅमिली कार म्हणून सिदानच घेतली.
ह्यूदैचीच फ्ल्युईडिक वर्ना - व्हीटीव्हीटी. अ‍टोमॅटिक ट्रानसमिशन.

इथल्या सगळ्या प्रतिसादकांना सूचनांबद्दल धन्यवाद!

नवीन गाडीबद्दल अभिनंदन साती!

संजय, बलेनो पेट्रोल की डिझेल? दोन्ही चांगल्याच आहेत म्हणा. स्विफ्ट पेक्षा चांगला लूक.
बलेनो चा ऑफिशिअल टीम बिएचपी रीव्ह्यू इथे वाचता येईल
यातलं समरीमधलं एक वाक्य बरंच बोलकं आहे - More substantial & premium Elite i20 is priced only Rs. 17,000 - 37,000 above!

जाग्याव, वर दिलेल्या गाड्यांमध्ये प्रत्येकाचे आपापले प्रोज/कॉन्स आहेत; जसे ते सगळ्याच गाड्यांचे असतात. तुम्ही पेट्रोलमधे पाहाताय की डिझेल?

ओके. Happy

अनुभवींना प्रश्न.
मर्सेडीझची सर्विसिंग, इन्शुरन्स वगैरे फार महाग पडते का? तसेच Genesis g80 आणि मर्स. इ-३५० ची तुलना करता येइल का?

मर्सेडीझची सर्विसिंग, इन्शुरन्स वगैरे फार महाग पडते का? >>

इन्शूरंस हा तुझ्या हिस्ट्रीवर जास्त अवलंबून आहे. नवीन गाडीला थोडा जास्त पडेल E क्लास ही मस्त गाडी आहे. जर सेडानच घ्यायची असेल तर गुड चॉईस. सर्व्हिसिंग थोडी महाग असते हे खरे आहे. तसेच बाकी गोष्टी जसे २ एक वर्षानंतर मॅप अपडेट वगैरे पण लेक्सस पेक्षा जास्त किंमत द्यावी लागते.

Genesis g80 ची तुलना नाही करता येणार. (लोकं करतात) पण मर्क नाव असल्यामुळे फरक पडतो. Genesis g80 ही एक जबरी कार आहे. व्हॅल्यु फॉर मनी. जर $१२-१४००० वाचवायचे असतील तर Genesis g80, पण एकंदरीत लक्झरी नेम ब्रॅण्ड हवा असेल तर मर्क.

BTW नविन ऑडी A4 पाहिलीस का? मस्त आहे.

थँक्स केदार. आज पाहिला प्रतिसाद.

मरसे- ई३५०(2014), जेनेसिस ८० आणि इक्वस (Hyundai EQUUS 2014) या चालवुन पाहिल्या. या सर्व नवीन फार महाग. या लग्झरी गाड्यांच्या किंमती एकदा गाडी रस्त्यावर आली की फार कमी होतात त्यामुळे २ वर्ष जुनीच पाहात आहोत.
तिन्ही मस्त आहेत. फिचरस कमालीचे आहेत. मर्से. व इक्वस चा अ‍ॅक्सिलरेटरवर पाय ठेवल्यावर ज्या पध्ध्तीने झपकन जराही धक्का बसता वेग वाढतो ते जबरदस्त वाटले. इक्वसची ची तुलना जालावर एस-५५० बरोबर केली आहे. इ पेक्षाही वर. पण आता ती जी९० नावाने येतीये. त्यामुळे खुप आवडली तरी घ्यावी की नको या पेचात आहोत.
ऑडी ४ अजुन पाहिली नाही. क्वात्रस काय प्रकार आहे अजुन काही वाचले नाही.
एकजण म्हणतोय बी एम डब्ल्यु ५ पण पहा. बजेटमधे बसेल त्याच पहात आहोत म्हणुन उड्या नाही मारत.

इक्वस बद्दल माहीत असेल तर अजुन सांग. त्यात जास्त मजा आली चालवायला.

BMW १५ दिवसांपूर्वी सलग १० दिवस होती माझ्या कडे. रेंटल घेतली होती. आय अ‍ॅम नॉट इम्सेंस्ड. बॅट दॅट्स मी. हॅण्डलिंग उच्च आहे. स्पीड एकदम मस्त, पण आता, ह्या टप्प्यावर लक्झरी जास्त आवडते. शिअर हॅन्डलिंग हवी असेल तर मग BMW ला पर्याय नाही. त्याच टाईपचे इंजिन असूनही रेशोज वेगळे असल्यामुळे झुम झुम फॅक्टर जास्त.

मला स्वतःला आता नविन मर्सेझिज आवडतात. त्यांच्या लाईन्स एक क्रिस्प आणि क्लिअर, हॅन्डलिंग मध्ये BMW पेक्षा थोडेसेच कमी पण टक्कर देणारी, आणि BMW पेक्षा ल्क्झरी.

Equas जबरीच गाडी आहे. चालवायला मजा येईलच, ४२५ + HP आहे. G90 फक्त नाव चेंज होतयं. तीन चार वर्षांपूर्वी इन्फिनिटीने पण त्याच गाड्या QX सिरिजने आणल्या होत्या, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही.

मला वाटलं तू ब्रॅन्ड न्यु घेत आहेस. पण प्रि ओन्ड घेत असशील तर जी जास्त आवडली ती घे.

बीमर म्हणजे लीन, मीन ड्रायविंग मशिन. तुम्हि "ड्रायविंग" एंजाॅय करत नसाल, तर बीमर तुम्हाला सूट होणार नाहि. लक्झरी हाच क्रायटेरीया असेल तर लेक्ससला पर्याय नाहि; इट बीट्स मर्स (इक्विवॅलंट क्लास) एनी गिवन डे...

एक्वस चा फुटप्रिंट इथे अगदि नगण्य आहे, हांडेची हि लक्झरी लाइन मार्केटमध्ये कुठपर्यंत तग धरुन राहिल सांगता येत नाहि...

तर लेक्ससला पर्याय नाहि; >>

मला पूर्वी लेक्सस आवडायच्या नाहीत. म्हातार्‍या लोकांच्या कार्स वाटायच्या. त्यांचे डिझाईनही अ‍ॅग्रेसिव्ह नव्हते. पण २०१६ ( ह्या वर्षाच्या रिडिझाईन नंतर) मला लेक्सस आवडायला लागली आहे. लक्झरी दाय नेम इज लेक्सस ! हे चालवल्याशिवाय नाही कळायचे हे मात्र खरे !

२०१७ ES 350 बाहेरून अतिशय मस्त दिसते, ( इन फ्लेश) पण मध्ये डॅशबोर्ड अजून जास्त चांगला करता आला असता असे वाटते. आणि RX ब्लोज युवर माइंड इन राईड !

होय, लेक्ससबद्दल तसेच वाटायचे, रिटायर झाल्यावर घ्यायची गाडी.
राज, असे असेल तर मग आम्ही नाहीच बीएमदब्लूवाले.

इक्वस - जेनेसीस यावर्षी हांडेपासुन वेगळे होतील. त्याने काय फरक पडेल ते काळच ठरवेल. पण मार्केट फार आहे खरं.

प्रचंड कन्फ्यूजन

या महिना अखेरीस जॉब बदलतोय. सध्याचं ऑफिस अन नवीन ऑफिस घरापासून साधारण सारख्याच अंतरावर (१५ किमी) आहेत. पण सध्याच्या ऑफिसचा रस्ता १/३ तुफान रशचा अन २/३ बर्‍यापैकी कमी गर्दीचा आहे. नवीन ऑफिससाठी १००% हेवी रशच्या रस्त्यावरनं जावं लागणार आहे.
सध्या २०१० ची मॅन्युअल एस्टार झेडएक्सआय चालवतोय. गाडी व्यवस्थीत मेन्टेन्ड आहे अन काहीही तक्रार नाही.
परंतू नवीन रस्त्याचा ट्रॅफिक लक्षात घेता ऑटॉ ट्रान्समिशन वाली दुसरी गाडी घ्यायचा विचार मनात आला. एकूणात रस्त्याची गर्दी अन पार्किंग चे प्रॉब्लेम्स लक्षात घेता हॅचबॅकचाच ऑप्शन आहे. त्यानुसार दोन गाड्या शॉर्टलिस्ट केल्या:
रेनो क्विड १.० ईझी-आर (एएमटी)
मारुती वॅगनआर एजीएस (एएमटी)

क्विड ला ३०० लिटर बूट, १८० एमएम ग्राऊंड क्लिअरन्स, बेटर माईलेज अन जीपीएस अन ब्लूटूथ एनेबल्ड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम हे स्ट्राँग पॉईंट्स आहेत तर सेफ्टी फीचर्स, रिअर पॉवर विंडोजचा आभाव, कमी वजन, नॉन रीट्रॅक्टिंग रिअर सीट बेल्ट्स आणि अनटेस्टेड गिअरबॉक्स मुळे थोडी वीक.
वॅगनआर जरी लाखभर महाग असली तरी रिलायबलिटी, एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, डीफॉगर, रिअर वाईपर, अ‍ॅडजेस्टेबल सीट हेडरेस्ट्स, बेज इंटीरिअर्स मुळे बेटर वाटते. शिवाय मारुती सर्व्हिसचाही फायदा साईडलाईन करता येत नाहिये.
पण पर्सनली मला वॅगनआर गाडी तितकीशी पसंत नाही. खूप कन्व्हेन्शनल अन ओल्डस्कूल डिझाईन वाटतं.

या कन्फ्यूजनमधून बाहेर येण्याआधी नवीन कंपनीतल्या एका मित्रानी डोक्यात आणखी एक किडा सोडला. दुसरी गाडी न घेता रोज ऊबर किंवा ओला करण्याचा. खर्चाचा विचार करता हा उपाय किफायती आहे (साधारण ५०० रुपये रोज). तसंच भयानक गर्दी अन ट्रॅफिकजॅम्स मधे ड्राईव्ह करायच्या स्ट्रेस मधूनही सुटका आहे.

तरीही येत्या काही दिवसात वरील दोन्ही गाड्यांच्या टेस्टड्राईव्ह घेणार आहे. (क्विड लाँच व्हायला अजून थोडे दिवस आहेत)

तुम्हाला कुठला ऑप्शन बरा वाटतो / इतर कुठली गाडी कन्सिडर करावी असं वाटतं?
प्लीज सजेस्ट.

वॅगन आर पॉवर मधे मार खाते ऑटो ट्रान्समिशनला.. चढावर तर एकदम पहिल्याव गियर मध्ये येते गाडी..

सेलेरिओचा पण ऑप्शन ट्राय कर..

धन्स रे हिम्या.

तू पूर्विच्या ऑटो ट्रान्समिशन वॅगनआर बद्दल बोलत असशील तर ते नॉर्मल एटी होतं (PRND2L).
२०१६ मॉडेल एएमटी आहे (सेम सेलेरिओ वाला मॅग्नेटी मरेली गिअरबॉक्स).

ऑटो ट्रान्समिशनच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉज्यांबद्दल माहिती इथे आहे.

सेलेरिओ कन्सिडर करत नाहिये कारण एक एस्टार असताना दुसरी गाडी परत त्याच प्लॅटफॉर्म वरची (नुसती बॉडी चेंज) नको आहे.

माझ्या वडिलांसाठी २ चाकी घ्यायची आहे. वय ७१. गावात वापरासाठी हवी. उपयोग कमी अंतरासाठी पण दिवसातून अनेकदा. गाडी हलकी आणि कमी मेंटेनंस वाली हवी. त्यांची आधीची ॲक्टिवा आहे पण ती आता जड पडते.
प्लीज एखादी चांगली औटोमेटिक गाडी सजेस्ट करा.

या कन्फ्यूजनमधून बाहेर येण्याआधी नवीन कंपनीतल्या एका मित्रानी डोक्यात आणखी एक किडा सोडला. दुसरी गाडी न घेता रोज ऊबर किंवा ओला करण्याचा. खर्चाचा विचार करता हा उपाय किफायती आहे (साधारण ५०० रुपये रोज). तसंच भयानक गर्दी अन ट्रॅफिकजॅम्स मधे ड्राईव्ह करायच्या स्ट्रेस मधूनही सुटका आहे.
<<

एस्टार राहू द्या व हे वापरा. भारी पडेल.

नानबा, दुचाकीसाठी इथे बघा.

Ameo आणि brezza मध्ये confusion झालंय.. डिझेल हवी आहे. Ameo top end model मस्त आहे पण ऍव्हरेज फारसं चांगलं नाही ब्रेझाची टॉपएंड बरीच महाग आहे मग ब्रेझाची मिडरेंज घेउन फीचर्स कमी मिळतील त्याच रेंजमधील ऍमीओच्या बेस्टपेक्शा!
Any expert comments, please ??

VW Ameo - 1.5L diesel which is not 'that' refined but has superb power delivery. However, the car is notchback
Vitara Brezza - 1.3L MJD, refined but not that great compared to VW's 1.5. Though, the car is SUV like. PLUS its a Maruti, to whom no one beats in ASS.

Try SCross too...

Ameo can be equivalent to Dzire not Breeza. I will go for Maruti for any given day than VW. They cheated on Diesel Engine Happy

७ सिटर मधॅ काय सुचवाल?

मला इनोव्हा खुप पटते...

नवर्याला एर्टि गा आवडलेली आहे....

अज्ञान सागराइअतके अथांग आहे

लई पर्याय आहेत.
होंडा बी- आर व्ही
एर्टीगा (ही सिएनजीवरही अव्हेलेबल आहे)
एंजॉय
इनोव्हा (पण नवीन आलेली कैच्याकैच महाग आहे)
स्कॉर्पिओ
एक्स्यूव्ही 5OO
लॉजी
नुवोस्पोर्ट्/क्वांटो

मुंबईच्या दृष्टीनं चालवायला, हाताळायला आणि मेंटेनन्स करता एर्टिगा बेस्ट.

Pages