कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळे ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस आणि त्याचे फायदे-तोटे यावर पोस्ट लिहितो ३-४ दिवसात.
सध्या थोडक्यात सांगायचं तर -
cvt = मख्खन
amt = सिटी मधे स्वस्त आणि मस्त, स्पोर्ट्स मोड असेल तर हायवे ला पण
dct = हाय प्राईस, स्लो अन जर्की
टॉर्क कन्व्हर्टर = हेवी वेट, खराब मायलेज

भारतात नवीन कंपनी त्याची पहिली वहीली गाडी घेऊन उतरतेय. किया सेल्तोस.
एक गाडी पण तब्बल १८ व्ह्रेरिअंट्स आहेत. आज लाँच झाली. किंमत १० लाखांपासून ते १६-१८ ला टॉप मॉडेल.
लई मोट्ठी एक्विपमेंट लिस्ट आहे. अ‍ॅन्ड्रॉईड ऑटो; अ‍ॅपल कार प्ले, बोस म्युझिक सिस्टम, हेड युनिट इ. काही क्लास फर्स्ट्स.
३ एंजिन आणि ३ गिअर बॉक्स काँबीनेशन्स आहेत.

भारतीय रस्त्यांचा अणि इतर कंडिश्न्स चा तब्बल तीन वर्शे अभ्यास करून मग गाडी लाँच केलीय; असं म्हणतात.
भारतीय ऑटो जगतात बर्‍यापैकी धुरळा उडवणार ही.

दहा लाखात कोणती सब फोर एस यू व्ही चांगली आहे का ?
नवीन Submitted by शाहिर on 3 August, 2019 - 08:40
>>>>>> team bhp forum वर शोध घ्या. तिथे पब्लिकचे डीटेल्ड नॉनपेड रीव्हयू वाचायला मिळतील. तुमची काही शंका असल्यास तिथं बरीच अनुभवी मंडळी आहेत. नवी जुनी कोणतीही गाडी घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांना हे सजेशन आहे.

टाटा Nexon कोणी घेतली आहे का? अनुभव कसा आहे?

मी घेतली आहे पाच महिने झाले आजच. जवळजवळ सहा हजार किमी झालेत. XZA Plus Diesel Dual Tone... हौस करुन टाकली .
एकंदर समाधानकारक आहे.
कॉन्स - ए एम टी लॅग.. खास करुन ओव्हरटेक करताना, स्पोर्ट्स मोड चालू असल्यास थोडा कमी त्रास.
पण ऑफ रोडिंगला भारीच आहे. खाली लागायची भीती नच्छ

मी एर्टिगा २०१९ सी एन जी घेण्याचा विचार करतोय. भारत-६ नियम एप्रिल २०२० पासून लागू होणार आहेत. काही आर्टिकल्स/फोरम पोस्ट वाचल्या पण निश्चित कळत नाहीये की आत्ता घ्यावी की एप्रिल पर्यंत थांबावे. या विषयी ची मते?

धन्यवाद प्रचारक. मॅन्युअल चा विचार सुरु आहे पण काही ठिकाणी वाचले की गाडीचे पर लिटर ऍव्हरेज खूप कमी आहे. नवीन २०२० एडिशन घ्यावी की आता लगेच हे ठरत नाही आहे.

कोणत्या गाड्या घेतल्यात मंडळी? सध्या काय म्हणतंय मार्केट? कुणाची एकहाती वापर असलेली गाडी आहे का विकायला?

Ford Eco Sport Titanium ही गाडी घ्यायचा विचार करत आहे. कोणाकडे असेल तर कृपया मार्गदर्शन करावे

लॉकडाउन पूर्वी टाटा अल्ट्रोझ घेतली , पेट्रोल BS६ इंजिन , १२०० CC, गाडी चालवताना खूपच सुरक्षित वाटले. आधी वॅगन आर होती त्यामुळे पण फरक जाणवला. सुट्टी मध्ये लॉन्ग ड्राइव्हला जाण्याचा विचार होता, पण कोरोना मुळे सगळे प्लॅन फसले. गाडी इतकी कमी चालवली आहे आणि लॉकडाउन मुळे बाहेर पडत नसल्यामुळे, काहीवेळा पार्किंग मध्ये गेल्यावर लक्षात येत नाही गाडी बदलली आहे. Happy

Deciding between a new or used car is more difficult. In market, brand new cars much more affordable. There is a certain allure to owning a new car but buying used will often cost less overall and allows you to avoid the initial period of depreciation that first owners experience - the value the car loses as soon as it’s driven away from the showroom. So first visit online website and compare best cars in your budget with cars rating. And after review all about cars online you can visit your near buy showroom. For tractor price https://www.tractorjunction.com/tractors/

Ford Eco Sport Titanium Diesel गाडी आताच घेतली. ऑन रोड नासीक मध्ये 11.73 लाख. इथे मी विचारलं होत माञ कदाचीत Ford कोणी नसेल वापरत म्हणुन उत्तर नाही आलं. Xuv 300 आणि Brezza Diesel जवळच्या नातेवाईकां कडे आहेत. जानेवारी 2020 मध्ये घेतलेल्या. किमंत आणि फिचर्स च्या बाबतीत Eco Sport जास्त उजवी वाटते.

BS-IV Tiago पेट्रोल कोणी cng कन्वर्ट करून वापरलेली आहे का इकडे कोणी ?? काय पर्फोर्मन्स ? गॅसवर किती माइलेज मिळते ?
की BS-VI मॉडेल घेणे अधिक बरे होईल ?

इथे मी विचारलं होत माञ कदाचीत Ford कोणी नसेल वापरत म्हणुन उत्तर नाही आलं.
मी हे पाहिलच नाही. माझ्याकडे आहे पण पेट्रोल, येत्या मार्चला तीन वर्ष होतील.
हॅच्बॅक-सेडान-एसयुव्ही असा प्रवास केला आधीच्या दोन ह्युंडाई नी आता फोर्ड.

प्लेझर अन डियो मधली कोणती गाडी घ्यावी सुचवा प्लिज
जिला चालवायची आहे ती पहिल्यांदा गाडी चालवणार आहे शिवाय ही नवीन गाडी घेऊन शिकणार आहे त्यात कधी साधी सायकल पण चालवली नाही अशी व्यक्ती आहे.

प्लेझर वजनाने डियोपेक्षा हलकी आहे. प्लेझर मध्ये फायबर पार्ट्स जास्त आहेत. सहाजिकच प्लेझरच मायलेज जास्त आहे. नवीन शिकणार्याला मी प्लेझर घ्यावी असे सुचवीन. शहरात वर्दळीच्या ठिकाणी वापरणार असाल तर हलकी गाडी कधीही चांगली.
पण सुरक्षेच्या दृष्टीनें फायबर पेक्षा मेटल बरे हे ही खरे.

Skoda rapid diesel वापरली आहे का कुणी? काय रिव्ह्यू?

2012 ची गाडी आहे, 1,73000 किमी चाललेली.. कितीला घ्यावी?

पुणे मध्ये सेकंड हॅन्ड वॅगन R किंवा hyundai सँट्रो साठी कोणी चांगला एजन्ट माहित आहे का ?
त्या शिवाय दुसरे कोणत्या प्रकारे घेता येईल ? olx आणि कार साईट्स पाहून झाली आहेत पण अनुभव फारसा चांगला नाही , बऱ्याच जाहिराती ह्या एजन्ट लोकांच्या दिसल्या

2030 पर्यंत पेट्रोल डिझेल गाड्या पूर्ण बाद होणार आहेत म्हणजे सरकार बंदीच आणणार आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या येणार आहेत. आणि आता हळूहळू पेट्रोल डिझेलच्या किमती exponentially वाढणार आहेत. काही महिन्यात पेट्रोल 200 च्या पुढे असेल आणि 2030 पर्यंत दहा वीस हजार रुपये पर लिटर असेल. मी पण गाडी घेणार होतो. पण या कारणांमुळे नाही घेतली.

Autonomous driving car आली की घेऊ असं मी नवऱ्याला म्हटलं पण त्यांनी नाही ऐकलं.
Driving शिकायला नको आणि एक seat extra, मजा ना!
Adas veichles आलेत आताच भारतात, AD सुद्धा येणार!!

On a serious note, Adas car वापरली आहे का कुणी? भारतात नाही पण उसगावात असेलच उपलब्ध.

नवीन दहा लाखाच्या पुढची कोणतीही कार घेऊ नये. हे पैसे कुठे तरी गुंतवले तर त्याचे पैसे वाढत राहतील. नवीन कार तुम्ही १५ वर्षांसाठी वापरू शकाल. त्यानंतर जर रजिस्ट्रेशन रिन्यू केलं (जे आत्ता अव्वाच्या सव्वा फीस घेऊन केलं जातंय आणि दर वर्षी वाढवलं जाईल) तर अजून फक्त ५ वर्षे, ही गाडी घेण्यासाठीचा हप्ता किमान १७,००० ते २०,००० रूपये दरमहा होईल. इन्शुरन्स दरवर्षी दीड दोन लाखाच्या घरात जाईल. एकूण लाईफ मधला मेन्टेनन्स आणि रिपेअरचा खर्च १ ते २ लाखापर्यंत जाऊ शकतो. थोडक्यात महिना २५,००० रूपये खर्च कारसाठी गृहीत धरावा. ड्रायव्हर ठेवला तर वेगळा खर्च. आणि नंतर रीसेल व्हॅल्यू १५ वर्षाची मुदत जसजशी जवळ येईल तसतशी कमी कमी होत जाईल. १५ व्या वर्षी ग्राहक फुकटात सुद्धा मिळणार नाही.

अशा परिस्थितीत ऊबेर / ओला शिवाय पर्याय राहणार नाही. बॅटरीच्या कारलाही पुढे मागे असेच खर्च येतील. आत्ता प्रमोशन साठी सवलती देतंय सरकार. पण एकदा बॅटरीच्या कार्सचं जाळं विस्तारलं, चार्जिंग स्टेशन्सचं जाळं सुरू झालं की चार्जिंगसाठीच्या वीजेला कमर्शियल दर लागतील. सध्याच वीजेचा वापर जास्त आहे. सगळं वाहन क्षेत्र वीजेवर गेल्यावर अतिरिक्त वीज आणणार कुठून ? त्यासाठी अदानी साहेबांना कमर्शिअल अटींवर वीजनिर्मिती करा म्हणून गळ घालावी लागेल. त्याचे पैसे ते वसूल करतील. म्हणजे हा पर्याय भविष्यात स्वस्त अजिबात होणार नाही.

Pages