कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स योकु.

पण एर्टिगा, उगाच काढायची म्हणुन काढल्यासारखी वाटते रे.

याचा वापर मुख्य्तः बाहेर्गावी वापरायला होणार आहे. नाहीतर माझी वॅगन आर मस्त चालली आहे

नुसतं सिटींगच नाही तर बूट्स्पेस सुद्धा. तिसरी रो असेल तर बूट अगदीच कमी मिळतो.
हा प्रॉब्लेम सगळ्याच सेव्हन सिटर्स चा आहे.

लो पॉवर ७ सीटर हवी असेल तर अर्टिगा बर्‍यापैकी रिलायबल आणि स्टेबल आहे. (लॉजी, बीआरव्ही च्या तुलनेत).
या सर्व गाड्या सेदान प्लॅटफॉर्म वर बेस्ड आहेत.
होंडा तर आता जॅझ प्लॅटफॉर्मवर बेस्ड डब्ल्यू आरव्ही पण आणतंय. पण ती गो प्लस टाईप्स असणार. नावापुरती ७ सीटर.

जर खरीखुरी पॉवरफुल ७ सीटर हवी असेल (इनोव्हा, एक्सयूव्ही, टाईप्स) तर स्टेबिलिटी अन परफॉर्मन्स मधे इनोव्हा उजवी आहे. पण किंमत फार जास्त आहे.
थोडं थांबायची तयारी असेल तर टाटा हेक्सा चा रिव्ह्यू येईपर्यंत वाट पहा. बुकिंग्स ओपन झाली आहेत.

झाडू...एस्टार राहू द्या व हे वापरा. भारी पडेल.
>>>

सध्या हाच विचार जोर पकडतोय. ट्रायल बेसिस वर थोडे दिवस करून पाहिन आणि मग कॉल घेईन दुसर्‍या कार बद्दल.
पण दोन्ही मॉडेल्स च्या टेस्टड्राईव्ह्ज घेऊन ठेवीन.

वॅगनआर, सेलेरिओ आणि क्विड तीन्ही एएमटी मॉडेल्सच्या टेस्ट ड्राईव्ह्ज घेतल्या. अन सेलेरिओ जवळपास कन्फर्म केलिये. शक्यतो २०१७ जानेवारीत घेऊन टाकीन.

वॅगनआरला ओव्हरऑल फील एक जनरेशन आधीच्या गाडीचा आहे. अन बूट स्पेस फारच कमी.
क्विड तशी मस्त आहे, पण मॅन्युअल गिअर सिलेक्शन, गिअर इंडिकेटर अन क्रीप मोड नसल्यानी फुली. तसंच एबीएस अन पॅसेंजर एअरबॅगही नाहिये.
सेलेरिओ मधे टचस्क्रीन नसला तरी ब्लूटूथ टेलिफोन कनेक्टिव्हिटी आहे. स्टिअरिंग माऊंट कंट्रोल्स आहेत तसंच डॅशबोर्ड वर मायलेज इंडिकेटर, गिअर इंडिकेटर अन रेंज इंडिकेटर आहे. बूटस्पेस (२३५ लि.) अन रिअर लेगरूमही बर्‍यापैकी वाटली. बेज इंटीरिअर्समुळे रूम ब्राईट अन मोठी वाटते.
पण स्टाईल एलेमेंट मात्र शून्य. पुढून इटिओस, मागून ऑल्टो अन बाजूनी एस्टार दिसते.

रिअर लेगरूम
<<

लेगरूम पाहताना, सीट किती मोठे (डीप) आहे ते नक्की पहात जा. आपल्या बुडापासून गुडघ्याच्या खालपर्यंत जो भाग आहे, त्यातला किती भाग सीटवर आहे, त्यावर लाँग ड्राईव्हची कंफर्ट ठरते. अन्यथा, एका लोखंडी पाईपवर (उदा. बसस्टॉप) बसून समोर भऽरपूर लेगस्पेस असली, तर काय होईल?

बहिणीचं टोयोटा करोला आल्टिस घ्यायचं चाललं होतं. पण आसपासच्या बहुतेक सर्वांनीच त्याऐवजी इनोव्हा घे म्हणून सजेस्ट केलं. ती आणि तिचा नवरा दोघेही कन्फ्युज्ड आहेत. कारचा फील इनोव्हाला नाही. पण इनोव्हा सारखा कम्फर्ट कारमधे नाही. या दोन्ही वाहनांची तुलना केली जाऊ शकते का ?

करोला आणि इनोव्हा या दोन्ही वेगळ्या सेगमेंट्स च्या गाड्या आहेत. करोला सेदान तर इनोव्हा एमपीव्ही प्रकार. इनोव्हाची तुलना एर्टीगा, हेग्झा तर करोला ची ओक्ताविया, सिव्हिक इ गाड्यांशी होऊ शकेल.

पण इनोव्हा सारखा कम्फर्ट कारमधे नाही.>>> हे वाक्य फारच धाडसाचं आहे... कारण दोन्ही गाड्या पूर्णत: वेगळ्या आहेत. करोला मधे राईड कम्फर्ट आणि सिटींग कम्फर्ट एकदम मस्त आहे.. तिच्यात लाँग ड्राईव्ह (दिवसाला साधारण ४०० किमी - स्वानुभव) करुन आल्यावर पण थकवा जाणवत नाही.. इनोव्हा मध्ये पण साधारण तसेच होते पण मागे बसणार्‍यांना थोडे त्रासदायक होऊ शकते.. विशेषतः शेवटची रांग.. बसायची जागा करोला मध्ये ५ जण बसू शकतात तर इनोव्हा मधे ७ जण बसू शकतात.. करोला पेट्रोल डिझेल मधे येते तर इनोव्हा फक्त डिझेल आहे. त्यांची गरज पाच माणसांच्या गाडीची आहे की ७ माणसांच्या त्याच्यावर कुठली घ्यायची ते ठरवा...

कार घ्यायची असेल करोला चांगली आहे.इनोव्हाला जी हाय सिंटींग पोझिशन मिळते ती कारमध्ये मिळणार नाही,प्लस कार ऑफ रोडला लो ग्राऊंड क्लिअरन्समुळे बाद ठरते तिथे इनोव्हा हाय क्लिअरन्समूळे चालून जाते.आपपल्या प्रायोरीटीज काय आहेत त्या मांडल्या तर इथले धुरंधर चांगला सल्ला देऊ शकतील.

माझ्याकडे इनोव्हाच आहे. पन बहिणीला मी अजिबात सजेस्ट केलं नाही. मी उटीला जाऊन आले होते. अजिबात थकवा जाणवला नाही. अर्थात तेव्हां चारच जण होतो. नंतर वडोद-याला गेलो तेव्हां सात जण होतो. नाही झाला त्रास. वडोद-याहून मी ट्रेनने आले बाकिचे पुढे शिमल्याला गेले. रात्रीचे झोपणे पण तिच्यातच होते. आल्टिस मधे झोपता येत नाही.

पण पळायला आल्टिस इनोव्हा पेक्षा केव्हांही सरस वाटते.

नवीन मार्वत्तीचं पिल्लू - इग्निस.

इथे ऑफिशिअल पेज आहे

- सगळे सेफ्टी फिचर्च सगळ्या वेरिएंट्स मध्ये आहेत.
- ही गाडी प्रिमिअम हॅच असून नेक्सा डिलरशीप मधून विकल्या जाईल.
- सेम स्विफ्ट चे एंजिन ऑप्शनस मिळतील - १.२ लिटर्स के सिरीज पेट्रोल आणि १.३ लिटर्स फियाट नी डेवलप केलेलं डिझेल (७४ पीएस पॉवर).
- मॅन्युअल आणि एएमटी गीअरबॉक्स चे पर्याय उपलब्ध.
- उपलध पर्याय - सिग्मा; डेल्टा; झीटा आणि अल्फा

मला मार्वत्ती पयशे देत न्हायी आनि मी त्या कुंपणीत कामही करत न्हायी. उगा म्हायती म्हून टाकलं... Wink

पर्सनली मला गाडीचा शेप (रादर काहीही) आवडलेला नाही. यापेक्षा बलेनो आणि एस-क्रॉस जास्त छान दिसतात.

इग्निसकडून खूप अपेक्षा होत्या. पण पूर्णपणे फोल.
सोमवारी चालवून आलो.
इंटीरिअर्स खूप प्लास्टिकी आहेत. कचकड्याचे वाटतात. क्वालिटी खूप वाईट.
अल्फा सोडलं तर बाकी कुठल्याच मॉडेलला टचस्क्रीन अन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल नाही. पण त्या ऐवजी जे कंट्रोल पॅनेल्स / स्विचेस लावलेत ते डिझाईन दृष्ट्या खराब आहेत. मेकशिफ्ट वाटतात.
दरवाजे खूपच हलके वाटले. (ए स्टारचे ही जास्त हेवी आहेत).
ए एम टी झीटा मॉडेलची टेस्टड्राईव्ह घेतली. इंजिनची पॉवर खूपच कमी वाटली.
तिथेच लगेच सीव्हीटी झीटा बलेनोचीही टेस्टड्राईव्ह घेतली. त्यालाही पॉवर लॅग जाणावला. ओव्हरटेकिंग पॉवर मोड वरही खूप फरक जाणावला नाही. अर्थात इंटीरिअर्स इग्निसच्या तुलनेत खूपच चांगले आहेत.

आणखी खोलात जाऊन पाहिल्यावर दिसलं की ऑफिशिअल ब्रोशर्स मधे १.२लि. पेट्रोल इंजिनसाठी इग्निसची मॅक्स पॉवर ६१ (@६००० आरपीएम) तर बलेनो ची ६६ आहे. हेच इंजिन स्विफ्ट अन रिट्झ ला ८४-८९ बीएचपी देतं.
मायलेज वाढवण्यासाठी मारुतीनी हे उद्योग केलेले दिसताहेत.
मात्र, कारवाले अन इतर समस्त ऑटोपोर्टल्स यालाही ८५-८६ बीएचपी पॉवर दाखवताहेत.
गाडी चालवल्यावर मात्र ६१ / ६६ च बरोबर वाटतं.

परतीच्या वाटेवर होंडा जॅझ व्ही सीव्हीटी चालवली. मच मच मच बेटर बेट दॅन बलेनो इन एव्हरी वे. (सासर्‍यांना रिपोर्ट दिला, त्यांनी मंगळवारी बुक केली).

माझं सध्या उबर की जय चालू आहे. ५०० रु. रोज मधे इनोव्हा नी ये जा. Happy
कुठल्याही ऑटोमॅटिक हॅच / काँपॅक्ट सेदान मधे हा आराम मिळणार नाही.

अरे...१५०० पोस्ट नंतर पण आजुन ठरल नाही "कोणती गाडी घ्यावी?" कि घेतली एकदाची गाडी?

बर Tesla Model S घेउन टाका... ३०० horsepower आणि पेट्रोलची चींता नाही... फुल एलेट्रीक...

अजय, मारूती सुझुकी विटारा ब्रेझ्झा चा टीम-बीएचपी रिव्ह्यू इथे वाचता येईल.

माझ्यामते, यापेक्शा सेम एन्जिन असलेली (आणि सेम प्राईस ब्रॅकेटमधली) एस-क्रॉस उजवी. हेच एंजिन (डिडिआयएस २००, फियाट च एंजिन, ९० पीएस पॉवर) मारूती एर्टिगा, सिआझ मध्येही वापरते.
याला दुसरे पर्याय - फोर्ड एकोस्पोर्ट, डस्टर, महिन्द्रा नुवोस्पोर्ट, टीयूवी, होंडा बीआरवी, ह्युंदाई क्रेटा, तूसाँ (ही जरा वरच्या प्राईस रेंज मध्ये) इ.
यात डस्टर, क्रेटा, तूसाँ, एकोस्पोर्ट मध्ये ऑटो/एएम्टी गीअरबॉक्सचे पर्याय मिळतील. तर एर्टिगा, बी आर व्ही, नुवोस्पोर्ट मध्ये ७ सिटर पर्याय मिळेल.
फ्रेश एन्ट्री वाल्या टाटा हेग्झा चाही विचार करता येईल.

क्रेटा किंवा फोर्ड इकोस्टार मध्ये कुठली गाडी चांगली आहे? गावाकडे वापरली जाणार आहे>>> सर्व्हिसिंगची काय सोय आहे ते बघा... दोन्हीचे स्पेअर्स महाग आहेत..

फोर्ड इकोस्टार >> हे एकोस्पोर्ट हवं Happy

क्रेटा ही प्रिमिअम/ अप्पर क्लास म्हणता येईल या सेगमेंट मध्ये. याच्याच बरोबरीच्या ब्रेझ्झा, एसक्रॉस, डस्टर वगैरेही आहेत...

नाही बहुधा... पोलो ही प्रिमिअम/ अप्पर क्लास हॅच म्हणता येईल. बरेच पर्याय उपलब्ध आहेत यात.
पोलो पेट्रोल / डिझेल
पोलो ऑलस्टार
क्रॉस पोलो
पोलो जीटी टीएसआय
पोलो जीटी टीडीआय
आणि
पोलो जीटीआय

Pages