कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तनुदि, दोन्ही गाड्या चांगल्या आहेत. तुम्ही पेट्रोल पाहाताय की डिझेल?
पर्सनली मला एतिऑस लिव्हा चं डिझेल एंजिन जास्त आवडतं पण इंटीरिअर फारच बोअर आहे.
ह्युंदै एक चांगला पर्याय आहे पण कॉस्ट वाईज महाग आहे अर्थात त्या बरोबरीनी क्वालिटीही आहेच...

इथेच मागे वाचलं होतं म्हणून विचारून ठेवते. नवीन इनोव्हा कशी आहे? तसंच एर्टिगा कशी आहे? बसले नाहीये मी त्यात.

टिम बीएचपीच्या साईट्वर सगळी माहिती व रिव्ह्यूज मिळतात का?

नवीन इनोव्हा मस्तच आहे. पण फार प्राईसी आहे. नवीन टोयोटा इनोव्हा क्रेस्टा चा टीम बी-एच्पी रिव्ह्यू इथे वाचता येईल.

एर्टिगाही चांगलीच कारण मारूती आहे आणि आफ्तर सेल्स सर्वीस मध्ये हात धरणारं कुणी नाही.

दोन्ही गाड्यांची लास्ट रो फार काही कामाची नाहीये.
२२ लाख क्रेस्टाला देण्यापेक्षा १५-१७ मध्ये एक्युव्ही काय वाईट? Wink

नवीन इनोव्हा फारच कॉस्टली वाटते,, पण शेवटच्या रो मध्ये त्यातल्या त्यात व्यवस्थित त्याच गाडीत बसता येते.

एर्टिगा सेव्हन सीटर मध्ये सगळ्यात स्वस्त आहे...

तुम्ही रेनॉ लॉजी किंवा निसान टेरानो पण बघू शकता, पण परत शेवटच्या सीटचा प्रश्न आहेच... आणि ह्या गाड्यांत बूट स्पेस बर्‍यापैकी कमी आहे..

मी आत्ता 'कारवाले' वर एर्टिगाचे रिव्ह्यूज बघत होते. मिश्र आहेत.

एनोव्हाची क्रेस्टा फारच महाग आहे की.

ह्युंदाईची 'तुसाँ' पण घातली नजरेखालून.

१५-१७ मध्ये एक्युव्ही म्हणजे कोणती? की एक्सयुव्ही म्हणायचंय?

रेनॉ ची लॉजी व टेरेनो पण बघते.

हो आडो, xuv5oo म्हणायचं होतं.
टरेनो, क्रेटा, तुसाँ, डस्टर, एकोस्पोर्ट, ब्रेझ्झा, एस-क्रॉस या ५ सीटर आहे.

३ र्ड रो आम्ही सामान ठेवण्यासाठीच वापरतो. सध्यातरी त्या रेंज मध्ये XUV ला पर्याय नाही. ती सुपर लक्झरी नाही, पण इंडियन लक्झरी आहे. व्हॅल्यू फॉर मनी, कारण त्यात लक्झरी गाड्यातील खूप सारे फिचर आहेत. ES, अ‍ॅटो फ्लोल्डींग मिरर, अ‍ॅटो स्टॉप / स्टार्ट , अ‍ॅम्बियन्स लायटिंग ६ एअर बॅग्स वगैरे कन्सेप्टच तेंव्हाही नवीन होती आणि अगदी आजही अनेक गाड्यांमध्ये हे फिचर्स नाहीत.

त्या रेंज मधील टाटाच्या स्टॉर्म पेक्षा खूप चांगली आहे. माझ्याकडे ती रिलिज झाली तेंव्हापासून आहे. ( रिलिज होण्याआधी नं लावला होता) आणि सुदैवाने पहिल्या क्लच डिझास्टर ( जो पहिल्या बॅचला होता, .५० MM थिकनेस) नंतर मला एकही, अगदी एकही प्रॉब्लेम आला नाही. तेंव्हा मी आनंद महिंद्राला ट्विट केला होता. आणि दुसरे दिवशी ६ लोकांची टीम घरी आली होती, नवीन गाडी देऊन त्यांनी माझ्या गाडीचे क्लच लगेच तीन चार दिवसात नविन डिझाईनचे लावून दिले. बहुदा त्यांनाही प्रॉब्लेम लक्षात आला होता. )

हे एक सोडले तर मी वेळच्यावेळी सर्व्हिसिंग करणे हेच एक काम असते, तेवढे रिलिजसली केले. ती गाडी अगदी लेह पासून तामिळनाडू सर्व रस्त्यांवर गेली आहे Happy तसेही मी स्वतःच माझ्या गाडीची काळजी घेत असल्यामुळे अजूनही बेस्ट कंडिशन मध्ये आहे.

मला माझी गाडी विकायची आहे. (वरचे सर्व अ‍ॅडव्हटाईजींग नाही. तो लाँगटर्म रिव्हू आहे. ) जर प्रि ओन्ड चालत असेल तर मला विपूत संपर्क करा. मग मी गाडीचे मायलेज, कंडिशन इत्यादीवर माहिती देईन.

केदार, चांगलं लिहीलंयस. तू वर जो क्लचचा प्रॉब्लेम लिहीलायस तोच एकाने रिव्ह्यू मध्ये लिहीलाय, निगेटीव्ह म्हणून. म्हणजे तुझा कसा लगेच जातीने लक्ष घालून सोडवला तशी सर्व्हिस त्याला मिळाली नाही म्हणून. असो..

मॅन्युअल आणि ऑटो ट्रान्समिशनचा फरक कुठे आणि किती पडतो?

मॅन्युअल आणि ऑटो ट्रान्समिशनचा फरक कुठे आणि किती पडतो? >> फारसा काही फरक नाही. आजकालच्या मॉडर्न ऑटोमॅटिक गाड्या सुद्धा मॅन्युअल इतक्याच मायलेज देतात. काही तर त्यापेक्षाही जास्त देतात. किंमतीतही फार म्हणावा असा फरक नाही.

मॅन्युअल आणि ऑटो ट्रान्समिशनचा फरक कुठे आणि किती पडतो? >>> कम्फर्ट च्या दृष्टीने ऑटो ट्रान्समिशन जास्त चांगले आहे.. ऑटो चा मायलेज बहुतेक वेला मॅन्युअल पेक्षा जास्तच मिळतो अर्थात एखाद दुसर्‍या किमीनेच जास्त.

किमतीच्या दृष्टीने बघितल्यास मात्र ऑटो कायमच मॅन्युअल पेक्षा महाग आहे. सगळ्या कंपन्यांच्या ऑटो कार्स ह्या मिड सेगमेंट मधेच आहेत. कुठलीही गाडी टॉप एंड मध्ये ऑटो नाहीये. एखादाच अपवाद. मिड एंड मॅन्युअल पेक्षा मिड एंड ऑटो साधारण १ ते सव्वा लाख महाग आहेत. पण टॉप एंड एवढीच किम्मत होते.

पेट्रोल विरुद्ध डिझेल -
तुमचे रनिंग किती आहे त्यावर पेट्रोल की डिझेल हे ठरेल. जर दिवसाला ५० किमी कमीत कमी गाडी पळणार असेल तर डिझेल उत्तम, पण जर तसे नसेल तर पेट्रोल उत्तम. नवीन इंजिन पेट्रोल काय किंवा डिझेल काय चांगल्या प्रतिचीच येतात, सर्व्हिसिंग मध्ये फार काही फरक नाही, पण बेसिक किंमतीतच फरक पडतो, टॉप एंड डिझेल टॉप एंड पेट्रोल पेक्षा लाख भर रुपयानी जास्त किमतीत येते. त्यामुळे सुरुवातीलाच जास्त इन्व्हेस्ट करायचे की कमी इन्व्हेस्ट करुन उरलेले पैसे पेट्रोल साठी खर्च करायचे, असे पर्याय आहेत.
अर्थात गाडी चालवताना काही जणांना पॉवर, टॉर्क ह्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात ते डिझेल ला जास्त प्रिफर करतात.

कुठलीही गाडी टॉप एंड मध्ये ऑटो नाहीये >> आहेत ना हिम्या.. सियाझ टॉप एंडमधे आहे ऑटो.. व्हेंटोला पण आहे. ऑटो ट्रान्समिशन आता बर्‍यापैकी रूळत आहेत भारतात..

रेनो क्विड चा रिव्ह्यू

क्विड १.० रिव्ह्यू

क्विड ऑटो रिव्ह्यू

रेनो चा आफ्टर सेल्स सर्वीस चा जरा प्रॉब्लेम सोडला तर एक चांगली सिटी गाडी.

बलेनो आर-एस. पिल्लावळीत संवर्धन. Wink
बलेनो आर-एस चा ऑफिशिअल टीम बीएचपी रिव्यू इथे वाचता येइल...

३ सिलिंडर ९९८ सीसी एंजिन असूनही ७५kW पॉवर + १५०Nm टॉर्क.
प्रिमिअम किंमत कारण मारूती हे एंजिन जपान मधून आयात करेल.

ही गाडी व्हीडब्लू पोलो जीटी टीएसआय, फिआट पुंटो अबर्थ आणि फिगो १.५ या गाड्यांसोबत स्पर्धेत राहील.

नोट -
बलेनोच्या या किंमतीपेक्षा लाइटनिंग फास्ट पोलो जीटी टी-एस-आय मात्र ५०,०००/- जास्त आहे
मारूती असल्यानी आफ्टरसेल्स सर्विस ला तोड नाहीये.
जरी इंजिन नवं असलं तरी कंपनीच्या म्हणण्यानुसार हे एंजिन त्यांनी ४ लाख किमी चालवून टेस्ट केलेलं आहे.

१. मारुती ऑल्टो विकुन (Exchange) के-१० घ्यावी का? मी ऐकल की आता नविन येणार्‍या गाड्या फारश्या दणकट नाहीत.
२. चाकात नायट्रोजन भरणे योग्य आहे का? काही अनुभव.
३. गाडी मॉडिफाय करणे कायद्याने गुन्हा आहे का? करायची असेल तर अंदाजे खर्च/ डीटेल्स. काय करावे व करु नये.

धन्यवाद

बलेनो ऑटोमॅटिक आता टॉप-मोस्ट ट्रीम मध्ये ही उपलब्ध केलीय मारूतीने.
सगळ्या स्मॉल हॅचेस या मिड ट्रिम मध्ये (ऑटो ट्रान्समिशन) अव्हेलेबल आहेत.
आता अपवाद बलेनो सिव्हिटी आणि व्हिडब्लू पोलो जीटी-टीएसआय

दोन दिवसापुर्वी फीयाट service ला गेलो होतो तिथे JEEP Compass पाहिली.
५ सीटर Small SUV पण Value for Money (15 लाख ते २० लाख Ex Showroom)
2 Petrol 4 Diesel Models

आपल्या बजेटच्या बाहेर Happy सो पास
ज्याना जरा हट्के Small SUV (Highest Model of Creta) बघत असतील त्यानी ही पहावी एकदा
JEEP ला अखेर भारतात मुहुर्त सापडला Happy
Compare to बाकी JEEP Models price ही worth deal वाटत आहे.

https://www.carwale.com/jeep-cars/compass/

http://www.jeep-india.com/jeep-compass-testdrive/?utm_source=google_sear...

होंडा जॅझ (VCVT) आणि सुझुकी बलेनो (दोन्ही ऑटोमॅटिक) मधली कुठली घ्यावी असा प्रश्न पडलाय. टेस्ट ड्राईव्ह मधे दोन्ही चांगल्या वाटल्या. जास्तीत जास्त वापर शहरातच असेल (पुण्यात). किंमत साधारण सारखीच आहे. इथे कुणाचे अनुभव आहेत का ह्या गाड्यांचे?

suggestion :
go for Honda Jazz जर budget problem नसेल तर

Honda specialty smoothness

mileage Jazz ला कमी मिळेल Baleno पेक्शा

As a MAruti resale value ़जास्त & Maintainance cost नक्कीच बलेनो चे कमी आहे.
----------------------------------------------------
Actual user कडून review येऊद्या
------------------------------------------------

>>बॅग्स; याच धाग्याच्या पान नं ५२ वर - Submitted by अँकी नं.१ on 4 November, 2016 - 12:10 ही पोस्ट आणि पुढल्या पोस्ट्स वाचा बरं...

खरच की. हे आधी चर्चिलं गेलंय.

>>go for Honda Jazz जर budget problem नसेल तर
>>Honda specialty smoothness
>>mileage Jazz ला कमी मिळेल Baleno पेक्शा
>>As a MAruti resale value ़जास्त & Maintainance cost नक्कीच बलेनो चे कमी आहे.

त्यामुळेच तर गोंधळ झालाय. हे का ते. होंडा घ्यावी असंच वाटतंय.

बॅग्ज, मी मत होंडा ला देइल ओवर बलेनो. याच दोघांची तुलना करणार असाल तर.
जॅझ मध्ये बलेनो पेक्षा बरीच जास्त जागा आहे. आणि शेवटी मॉडेल टू मॉडेल तुलना केल्यास काही फिचर्स जॅझ मध्ये जास्त असावेत.
तुमच्या लोकेशन वरही जरा फरक पडू शकेल. लहान गावांत सर्वीस चा प्रश्न एखादवेळेस येऊ शकेल पण पार्टस शक्यतो अवेलेबल करून देतात.

याच रेंज मधली आय१०/२० ऑटो ट्राय करून पाहा. फोर्ड फिगो या प्राईस रेंज मध्ये १.५ लि चं एंजिन देते.

धन्यवाद योकु.

फिगो/आय१०/आय२०: ह्यांच्यापेक्षा बलेनो/जॅझ आतील जागा + दिसायला + रिव्हर्स कॅमेरा इ. दृष्टीने चांगल्या वाटल्या. शिवाय मायलेजही बरं आहे. पुण्यात होंडाच्या सर्विस चा प्रोब्लेम यायला नाही पाहिजे.

खरं सांगायचं तर मला बलेनो जास्त आवडली होती. पण २-३ जणांकडून "सुझुकी पेक्षा होंडा घ्यावी" असा सल्ला मिळाला (इथेही). शिवाय जॅझमधे जागा, कलर्स, आणि रिव्हर्स कॅमेरा ह्या गोष्टी चांगल्या वाटल्या. आणि नेटवर काही जण म्हणतायत की बलेनो मधे वाईट सस्पेन्शन मुळे मागेच नाही तर पुढेही हादरे बसतात. ह्या सर्व गोष्टींमुळे जॅझकडे जास्त कल आहे. पण आता मला असं वाटू लागलय की हे सगळं असूनही इतकं कन्फ्युजन होण्यामागे "बलेनो आवडली" हेच कारण असावं. Lol

बलेनो चा फेस किलर आहे, माझ्यामते पण फ्युच्युरस्टिक नाहीय. उदा. होंडाची कुठलीही गाडी/ शेव्ह्रोलेच्या बीट वगैरे.
दोन्ही चालवून पाहिल्या असतीलच म्हणा, तरी ड्रायव्हिंग पोझिशन जॅझ मध्ये उजवी वाटते मला.

अजून एक, गाडी पाहायला जाताना, या बाबतीतलं अजिबात न कळणार्‍या व्यक्तीला सोबत न्यावं; ही व्यक्ती ड्रायविंग सीट आणि टेक रिलेटेड गोष्टी सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर (अर्थात त्या त्यांना वापरता येतात म्हणूनच उदा. एसी, म्युझिक सिस्टम, रंग, स्पेस, हेडरूम, नीरूम इ) आपलं अन्बायस्ड मत देतात; त्याचाही फायदा होतो डिसिजन मेकिंग मध्ये...

बलेनो वजनाने हलकी आहे,, त्यामुळे स्टॅबिलिटी कमी आहे.. जाझ चांगली आहे, पण माझा टेस्ट ड्राइव्हचा अनुभव फार काही चांगला नव्हता.. गाडी छोट्या चढावर पण सेकंड गियर मधे मोशन मध्ये असतानाही चढत नाही कम्पल्सरी पहिला गियर टाकावाच लागतो.. फक्त तीन माणसे बसलेली असताना..

Pages