Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डिस्कवरी चॅनल वर काही
डिस्कवरी चॅनल वर काही वर्षांपूर्वी एक डॉक्युमेंट्री बघितलेली. जर्मनी मधील गोष्ट आहे. हिटलर सत्तेवर आला आणि त्याने ज्यू लोकांचे हाल करणे सुरु केले. त्याच्या दहशतीमुळे ज्यू लोक भूमिगत झाले. त्यापैकी काही कुटुंबांनी जमिनीच्या खाली बंकरमधे (किंवा भुयार , अचूक शब्द माहित नाही ) राहायला सुरुवात केली. त्यांनी जमिनीखाली जवळ जवळ लहान वसाहतच बसवली. हलाखीत दिवस जातच होते. त्यात हिटलरला या वसाहतीचा सुगावा लागला. त्याने अतिशय क्रूर निर्णय घेतला. त्याने त्यांच्या वसाहतीत विषारी गॅस सोडला आणि त्यांचे वर येण्याचे सगळे मार्ग बंद केले. सगळ्यांचा तडफडून खूप भयाण मृत्यू झाला. अनेक दिवस त्यांची शवे हि तशीच पडून होती. त्यानंतर खूप वर्षांनी सरकारने ती जागा प्रेक्षणीय स्थळ (जर्मनी आणि ज्यू लोकांच्या इतिहासातील एक महत्वाचे ठिकाण ) म्हणून घोषित केले. तिथे खूप लोकांना फिरताना अमानवीय अनुभव आले. त्यापैकी २ लक्षात असलेले अनुभव
१. ज्यावेळी एखादी गर्भवती स्त्री तिथे फिरायला जात असे त्यावेळी एक लाल कपडे घातलेली बाई, त्या गर्भवती बाईला धक्का मारून पडण्याचा प्रयत्न करी. अनेक स्त्रियांनी हि गोष्ट अनुभवली होती. असे म्हटले जाते कि गर्भावस्थेत तिचा अतिशय भयानक मृत्यू झाला. त्याचा सूड उगवण्याचा ती प्रयत्न करते.
२. एक म्हातारी बाई खुर्चीवर बसलेली दिसायची. हातात एका तरुण मुलाचा फोटो घेऊन, स्वेटर विणताना दिसायची. तिने काही त्रास दिला नाही कोणाला,पण ती खूप लोकांना दिसली होती. तिच्या मुलाला हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प मध्ये उचलून नेण्यात आले होते अशी समजूत आहे.
टीप - ठिकाण, नाव, कालावधी याबद्दल काही आठवत नाही.
चॉकलेट बॉय तुम्ही लिहिलेले
चॉकलेट बॉय तुम्ही लिहिलेले किस्से एकसे एक आहेत.
चॉकलेट बॉय तुम्ही लिहिलेले
चॉकलेट बॉय तुम्ही लिहिलेले किस्से एकसे एक आहेत. >>धन्यवाद . मी जाणीवपूर्वक अशेच किस्से लिहितोय जे साधारणपणे लोकांना माहित नाहीयेत .अमानवीय जग हा माझा आवडता विषय आहे. तसे अजून बरेच किस्से आहेत पण ते सगळ्यांनाच माहित आहेत जसे , रिक्षा मध्ये उलटे पाय वाला माणूस , घाटात गाडी थांबवणारी मुलगी इत्यादी. अजून थोडेफार किस्से आहेत पण पूर्ण नीट आठवलेकीच पोस्ट करेन.
रिक्षा मध्ये उलटे पाय वाला
रिक्षा मध्ये उलटे पाय वाला माणूस , घाटात गाडी थांबवणारी मुलगी इत्यादी>>>> असे किस्से नका पोस्टु. ते आधी च्या पानावर वाचुन झालेत.वर लिहलेला किस्सा आहे तसे काहीतरी वेगळे टाका.
किस्से कुठे गेलेत ... मला
किस्से कुठे गेलेत ... मला वाटतं संपले बहुदा
खालील गोष्ट पूर्णपणे काल्पनिक
खालील गोष्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. माझ्या आजीने मला लहानपणी सांगितलेली गोष्ट आहे. ती खरी आहे असे माझे तरी मत नाही. तरीही मनोरंजनासाठी इथे पोस्ट करत आहे. काही शंका अथवा टीका असल्यास मी त्यांचे स्पष्टीकरण देण्यास असमर्थ ठरेन.
एका गावामंध्ये एक जोडपे राहत होते. नवरा आणि बायको , अतिशय सुखात दोघांचा संसार चालू होता. त्यांचे घर गावाच्या नदीकाठाजवळ होते. नदी ओलांडताच दुसरे गाव होते. तेथेच त्या विवाहित मुलीची आई राहत असे. सुखाने दिवस जात असताना त्यांना होणाऱ्या बाळाची चाहूल लागली. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अश्यातच नवऱ्याला बाहेरगावी नोकरीची संधी चालून आली. होणाऱ्या बाळाच्या भविष्याचा विचार करता नवऱ्याने नोकरी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या आईने बाळंतपणाची जबाबदारी स्वीकारली. नवरा बाहेरगावी गेला आणि मुलगी घरात एकटी राहू लागली. आईचे वय झाले असल्याने तिने हट्टाने आईला ,आईच्या घरी राहायला लावले. जेव्हा गरज पडेल तेव्हा नक्की बोलावें असे आश्वासन आईला तिने दिले. रोज नदीकाठी येऊन ती आपल्या आईला हालहवाल कळवत असे. तिची आई दुसऱ्या नदीकाठावरून तिची चौकशी करत असे. ( दोन काठांमधील नदीचे अंतर खूपच कमी आणि संवाद साधण्याइतपत असावे असे गृहीत धरावे) मुलीचे दिवस भरत आले आणि अचानक एके दिवशी तिची आई तिच्या घरी आली. मुलीला आश्चर्य वाटले, कि न बोलावता आई कशी आली. तिने आईला विचारले कि अजून पूर्ण दिवस भरले हि नाहीत आणि आधीच तू कशी आलीस. आईने सांगितले कि मला चाहूल लागली आहे कि तू आजच बाळंत होणार आहेस. जुनी माणसे माहितगार असतात, असे समजून मुलगी काही बोलली नाही. आणि काही वेळातच तिच्या पोटात दुखू लागले. तिच्या आईने सोपस्कार रित्या तिचे बाळंतपण नीट पार पडले. तिला गोंडस मुलगा झाला. मुलीच्या आईने बाळाला हातात घेतले , तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हसू उमटले. तिने मुलीला आराम करण्यास सांगितले. अचानक मुलीचे लक्ष आईच्या पायांकडे गेले. आणि तिला दरदरून घाम फुटला कारण तिचे पाय उलटे होते. ज्या नदीकाठाजवळ मुलीचे घर होते , तेथेच जवळ एक पिंपळाचे झाड होते. त्या झाडावर एक हडळ होती. अनेक दिवसांपासून ती उपाशी होती. रोज ती दोघी मायलेकींचे बोलणे ऐकत असे. नवजात अर्भकाला खाण्यासाठी ती खूप दिवस वाट बघत होती. परिस्थितीचे गांभीर्य जाणून मुलीने स्वतःला सावरले. तिच्या आईचे रूप घेतलेली हडळ सारखी तिला झोपण्यास आग्रह करत होती. शेवटी तिने एक युक्ती केली. आईला तिने सांगितले कि ,' मला फारच अशक्तपणा आलाय मला जायफळ घातलेले दूध दे , म्हणजे मला झोप येईल , जायफळ माडीवर आहे ' ( जायफळ माडीवर का ठेवले होते याचे लॉजिक मलाही माहित नाही ) मुलगी झोपणार या आनंदात ती हडळ लगबगीने माडीवर गेली आणि जायफळ शोधू लागली. ती जाताच क्षणी मुलगी बाळाला घेऊन घराबाहेर पळाली आणि घराबाहेर येताच तिने घराला आग लावली. होडीने नदी ओलांडून ती आपल्या आईकडे सुखरूप पोहोचली ( नदीकाठी होडी आधीच होती ). त्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या घरातून नेहमी किंकाळ्या ऐकू यायच्या ,'मला भूक लागलेय , मी उपाशी आहे माझी शिकार द्या '
( दोन काठांमधील नदीचे अंतर
( दोन काठांमधील नदीचे अंतर खूपच कमी आणि संवाद साधण्याइतपत असावे असे गृहीत धरावे)

( जायफळ माडीवर का ठेवले होते याचे लॉजिक मलाही माहित नाही )
( नदीकाठी होडी आधीच होती ). त्यानंतर त्या अर्धवट जळालेल्या घरातून नेहमी किंकाळ्या ऐकू यायच्या ,'मला भूक लागलेय , मी उपाशी आहे माझी शिकार द्या '>>>>> भिती वाटण्याएवजी मला कल्पना करुनच जाम हसु येतय....
@ चॉकलेटबॉय ..मस्त ....खूप
@ चॉकलेटबॉय ..मस्त ....खूप दिवसांनी धागा वर आलाय .....
@ चॉकलेटबॉय भारीच किस्सा...
@ चॉकलेटबॉय भारीच किस्सा...
@ कावेरी उगाच इतर कोणी शंका
@ कावेरी उगाच इतर कोणी शंका काढायच्या आधी मीच स्पष्टीकरण देऊन टाकलं. शक्य तितका तपशीलवार लिहिण्याचा प्रयत्न केला जेणेकरून काही अर्धवट न राहावं, पण कदाचित ते विनोदी वाटत असावं. पुढच्या वेळी नीट मांडणी करून लिहीन. पण आजीने हि सत्यकथा आहे असच सांगितलं होता. मला स्वतःला हे तिन्ही प्रश्न पडले. आणि कदाचित मी तस लिहिलं नसता तर, खूप जणांना तसेच प्रश्न पडले असते, म्हणून मी तस नमूद केल.
@ प्रभास , प्रिया खूप आभार
हीच गोष्ट मला थोड्या वेगळ्या
हीच गोष्ट मला थोड्या वेगळ्या पदधतीने माहीत आहे.
चॉकलेट बॉय .. छान आहे किस्सा.
चॉकलेट बॉय .. छान आहे किस्सा.
हीच गोष्ट मला थोड्या वेगळ्या
हीच गोष्ट मला थोड्या वेगळ्या पदधतीने माहीत आहे. >म्हणजे कदाचित खरी असावी मलाच उगाच काल्पनिक वाटली. अंकु तुम्ही काही खुलासा केलात तर गोष्ट खरी आहे कि नाही हे पडताळून बघता येईल.
खूप लिहायचं होतं. पण मराठी
खूप लिहायचं होतं. पण मराठी type करायचा कंटाळा येतो.
ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. आम्ही उन्हाळ्याच्या सुटीत आजोळी जात असू. माझ्या आजोबांची भलीथोरली हवेली होती. काही भागात दिवसासुध्या जायला भीती वाटत असे. त्यामुळे भुतावर पण विश्वास बसला होता. आजोबांकडे एक म्हातारी भिल्लीण भांडी घासायला येत असे. तिचा एक हात लुळा होता. तिचं म्हणणं होत तो हडळीमुळे झाला आहे ही घटना तिच्या तरुणपणीची आहे. तिने सांगितलेला किस्सा असा-
एके दिवशी भिवरीआजी (असे आम्ही तिला म्हणत असू) रात्री घरात झोपलेली होती. तिच्या दारावर टकटक झाली आणि तिला तिच्या मैत्रिणीचा आवाज आला कि पहाट झाली आहे तर परसाला जाऊ या, त्याकाळी बायका पुरुष मंडळी उठण्याआधीच बाहेर जाऊन येत असत. भिवरीआजीने दरवाजा उघडला आणि ती मैत्रिणीला म्हणाली मला ज्वारी दळायची होती मदत करतेस का? मग दोघीही जात्यावर ज्वारी दळायला बसल्या. दळताना त्या बाईने जोराने हिसका दिला. भिवरीआजीचा हात खूप दुखायाला लागला. तर ती बाई म्हणाली चल आता आपण परसाला जाऊन येऊ या नाहीतर मग उजाडेल आणि खूप उशीर होईल. दोघीही घराच्या बाहेर पडल्या आणि लांबवर गेल्या जिथे बायका जात असत. भिवरीआजीला इतर बायका दिसल्या नाही तिने तस बोलूनही दाखवलं. ह्या दोघी समोरासमोर बसल्या तेव्हा भिवरीआजीला त्या बाईचे पाय दिसले तिने लोटा फेकला आणि धावत रसत्यावर आली. ती बाई मागून ओरडत येत होती. जोरात पळणारी आजी एका माणसाला धडकली. तो दुसऱ्या गावाहुन परत येत होता. रात्री वाहतुकीचे साधन नसल्याने चालत जात होता. तो माणूस तिला म्हणाला कि ती अशी मध्यरात्री गावाबाहेर काय करतीय. त्यावेळी भिवरीआजीला कळलं की ती गावापासून बरीच लांब आली होती आणि ती पहाटेची वेळ नसून रात्र होती. त्या बाईने मारलेल्या हिसक्यामुळे भिवारीआजीचा हात कायमचा लुळा झाला. पण जीवावरचा प्रसंग हातावर निभावला असे मानून भिवरीआजी देवाचे आभार मानीत असे.
पण झोपेतुन उठुन ज्वारी का
पण झोपेतुन उठुन ज्वारी का दळावी म्हणते मी?
हा ऐकलेला किस्सा आहे .
हा ऐकलेला किस्सा आहे .
मी आधी विक्रोळीला राहत होते तेव्हाचा. मी ५ वीत होते तेव्हा आमच्या ट्युशन मध्ये एक दादा होता तो मराठी मुसलमान होता त्याच इम्रान नाव १० वीत होता .... झालं असे एकदा रात्री हा झोपेत बडुबडु लागला घरातल्यानी एवढं मनावर घेतलं नाही. हळू हळू त्याच वागणं थोडं बेताल होऊ लागल चिडचिडे पण , डाफरन , वेगळाच आवाज काढणं , एके रात्री तर तो सरळ चाकू घेऊन घरातल्यांच्या अंगावर धावून गेला त्याच्या भावाने धरलं होत म्हणून नाहीतर तर त्याला आवरण अवघड होत. मग मात्र घरातले घाबरले . सतत ताप येत असे त्याला म्हणून डॉक्टर केले पण काही फरक नाही . संपूर्ण परिसरात त्याच्याविषयी माहित पडलं . शाळा सोडून घरात बसायचा आणि सतत बाहेर पळून जाण्यासाठी धडपड करायचा १ महिना झाला त्याच्या अवस्थेला काय करावं घरातल्याना सुचत नव्हतं शेवटी माझी मावशी जी आमची ट्युशन टीचर पण होती तिने त्याला दर्ग्यात न्यायचं ठरवलं पण तिथे विना तमाशाच त्याला घेऊन जाणं कठीण होत . त्याचा मोठा भाऊ आणि मावशी यांनी त्याला विचारलं तुला कुठे जायचंय का पाळतोस सारखं! तर बेरक्या नजरेने त्याने रेल्वे स्टेशन सांगितलं .. मावशी म्हणाली ठीक आहे मी तुला नेते चल आणि त्याला रिक्षात बसवलं आणि दर्ग्याजवळ नेलं तशी त्याची चुळबुळ वाढली तिथे मावशीच्या ओळखीचे काझी आधीच तयारीत होते रिक्षा थांबवली तसे त्यांची काही माणसं पुढे आली आणि इम्रान ला पकडून ठेवलं त्याला तसाच फरफटत दर्ग्यात नेलं . तिथे नेहमी प्रमाणे भूत उतरवण्याचा प्रोग्रॅम झाला . तेव्हा घडलं असे ...एका रिंगणात इम्रान ला बसवलं आणि विचारण्यात आलं तू कोण आहेस आणि का इम्रान ला त्रास देतोयस . इम्रान ने गोंधळ घातला पण त्या काझींनी धाकाने आणि मंत्राने थोडं बोलत केल्यावर समजलं .. १ महिन्यापूर्वी इम्रान दर्ग्यात चालला होता संध्याकाळी तेव्हा कचरापेटीजवळ मी त्याला पकडलं माझं नाव समीर मी मूळचा पुण्याचा माझी आई आणि बहीण तिथे दोघीच असतात मी कामासाठी इथे होतो कामावरून येत असताना इथेच कचरापेटीजवळ एका ट्रकने ने मला उडवलं आणि तो पसार झाला मी कचरापेटीपलीकडच्या नाल्यात पडलो मला खूप लागलं होत सुन्न झालं होत हळू हळू शुद्ध जात होती फक्त एवढाच मनात होत मला जर काही झालं तर आई आणि सोना च कस होणार मला खूप जबाबदाऱ्या आहेत काम आहेत . माझं इथे कोणीच नाही त्यांना माझ्याबद्दल कस समजेल आणि तिथेच मला इम्रान भेटला म्हणून मी त्याचा वापर करायचा ठरवलं मला पुण्याला जायचंय आईला सोनाला भेटायचंय महिन्यापासून ते माझी वाट पाहत असतील माझ्यामागे त्यांना कोण सांभाळनार असेल एकट्या पडतील दोघी ....मला जाऊद्या, मला सोडा, माझं कर्तव्य मला करायचंय मग मी इम्रान ला सोडेन आणि खिशातली पुण्याची तिकीट यान बाहेर काढलं एवढं ऐकून मावशीला फार वाईट वाटलं पण काझी भडकला होता तो त्याच्या मागेच लागला सोड इम्रान ला नैतर तुझं काही खरं नाही पण हे मावशीला पटलं नाही तिथे त्या समीर ला मावशी म्हणाली तू जरी तिथे गेलास तरी त्या दोघी तुला पाहून खुश होतील असे तुला का वाटत ? कारण हे शरीर इम्रान च आहे त्या विश्वास ठेवतील तुझ्यावर त्यापेक्षा मला पत्ता दे मी जाईन तिथे भेटेन बोलेन त्यांच्याशी तुझ्या बहिणीची जबाबदारी घेईन (मावशी समाजसेविका पण होती) तेव्हा समीर याला तयार झाला आणि त्या दिवसांनंतर इम्रान नीट वागू लागला त्याने १० विची परीक्षा सुद्धा दिली आणि पास हि झाला ... आता यात मी इम्रान च्या विचित्र वागण्याची आणि नॉर्मल होण्याची मी साक्षीदार आहे पण बाकीचं ऐकलं इतरांकडून बाकी देव जाणे .......
म्हणजे कदाचित खरी असावी मलाच
म्हणजे कदाचित खरी असावी मलाच उगाच काल्पनिक वाटली. अंकु तुम्ही काही खुलासा केलात तर गोष्ट खरी आहे कि नाही हे पडताळून बघता येईल.>>>>> मला माहित असलेले हे व्ह्रर्जन आहे.
ती मुलगी गर्भार असते.नवर्याला एके दिवशी बाहेर जाव लागत.रात्री च्या वेळी हिच्या पोटात कळा सुरु होतात.एकटी अस्ल्यामुळे हिला काय कराव ते सुचत नसत.आनि (अचानक ?)तिच्या घरी एक बाई येते, तिला बाळंतपण करुन देइन म्हणते.त्याप्रमाणे तिचे बाळंतपण सुखरुप पार पाडते.आनि त्या नवजात अर्भकाला आईजवळ न देता स्वत:ताच्याच हातात ठेवते.त्यावेळेपर्यंत (अचानक ?) त्या मुलीची आई घरात येते.मुलीची आई आनि त्या बाईमधे झटापट होते.मुलीची आई बाळाला मुलीजवळ देते.आनि स्वतः चुलीतले पेटते लाकुड घेऊन तिच्या मागे पळत त्या बाईला (हडळीला) तिथुन हुसकावुन लावते.आनि मग स्वतःच्या मुलीची काळजी घेते.तिला न्हाऊमाखु घालते.आनि स्वतः ही थोड्या वेळाने निघुन जाते.मुलीला कळत नस्ते की आई लगेच का निघुन गेली.मग नंतर बाहेरगावावरुन आलेला तिचा नवरा तिच्या आईची मृत्यु ची बातमी घेऊन येतो.
म्हणजेच स्वतःच्या मुलीला संकटातुन सोडवण्यासाठी त्या आईचा आत्मा येतो आनि हडळीला पळवुन लावतो.अशी ही गोष्ट मला माहित आहे.
Manaskanya सकाळी सकाळी उठून
Manaskanya सकाळी सकाळी उठून डायरेक्ट दळण ... काहीही हां
@राया @भुत्याभाउ: पूर्वीच्या
@राया @भुत्याभाउ: पूर्वीच्या काळी पहाटे घरातील स्त्रिया जात्यावर धान्य दळत. पहाटे ओव्या म्हणत धान्य दळण्याची पद्धत खूप कॉमन होती.
@प्रिया येवले: तुम्ही
@प्रिया येवले: तुम्ही सांगितलेला किस्सा मला अलीकडच्या काळात जे किस्से या धाग्यावर सांगितले आहेत त्यात सर्वात जास्त थरारक वाटला. (अर्थात, सत्यासत्यता हा भाग वेगळाच. पण तो येथील सर्वच कथनांना लागू पडतो) पण मावशी पुण्यातील त्या पत्त्यावर गेली का आणि समीरच्या नातेवाईकांना भेटून खात्री केली का यासंबंधी पण उल्लेख असता तर किस्सा परिपूर्ण झाला असता असे वाटते. असो. किस्सा सांगितल्याबद्दल धन्यवाद.
मावशी गेली होती त्या पत्यावर
मावशी गेली होती त्या पत्यावर त्याच्या बहिणीचं लग्न ठरवलं होत तिच्या मामाने.... मावशीने त्याच्या अपघाताची माहिती दिली ..खूप काही घडलं जस कि पोलीस आले होते त्यांनी नाल्यातल्या त्या मृतदेहाला बेवारस ठरवलं होत मग त्याच सामान घरी सुपूर्द केलं गेलं आता मी लहान होत एवढं आठवत नाही शिवाय नंतर आम्ही तिथून शिफ्ट झालो नवी मुंबई मध्ये ....त्यामुळे जास्त डिटेल माहित नाहीत
@राया @भुत्याभाउ: पूर्वीच्या
@राया @भुत्याभाउ: पूर्वीच्या काळी पहाटे घरातील स्त्रिया जात्यावर धान्य दळत. पहाटे ओव्या म्हणत धान्य दळण्याची पद्धत खूप कॉमन होती.>>>> बरोब्बर.
हा किस्सा मी ३०-३५ वर्षांपूर्वी ऐकला होता . त्यावेळी त्या बाईचं वय साधारण ६० असेल म्हणजे ६०-६५ वर्षांपूर्वीचा किस्सा आहे.
किस्से संपले का? अजुन
किस्से संपले का? अजुन असल्यास रतिब घाला कि राव....
गेलि कित्येक दिवस वाचतोय..... मस्त एन्जोय केले........
अर्धवट लक्षात असलेले किस्से
अर्धवट लक्षात असलेले किस्से नको वाटतं टाकायला. खरं म्हणजे लहान असताना ज्यांच्याकडून किस्से ऐकायला मिळायचे त्यातले बरेचसे वयपरत्वे निवर्तलेले असतात आणि इतरांशी संपर्क पण राहिलेला नसतो. काही दिवसांनी असे किस्से नाहीसे होतील कि काय असे वाटते.
संपले वाटतं सगळे किस्से ....
संपले वाटतं सगळे किस्से ....
माझे वडील २०१४ ला ओफ झाले मला
माझे वडील २०१४ ला ओफ झाले मला रोज त्याची आथवन येते पण काल रात्री जरा जास्तच आली आणि मी रडत होति कि अचानक मला मातीचा सुग्न्ध आला १० मिनिटे. पहिल्या पावसात येतो तसा नन्तर बन्द झाला याचा अर्थ कुणी सान्गु शकाल का ???? की माझा भास होता...... ही माझी पहिलीच पोस्ट आहे
sonali४५ आपल्या वडिलांबद्दल
sonali४५ आपल्या वडिलांबद्दल ऐकून वाईट वाटले .... आपल्याला भास झाला असावा असे मला तरी वाटते
mla marathi fastly typ krya
mla marathi fastly typ krya yet nhi so barach time gela asta so me english mdhech typ krto kissa mazya gavatla ahe
me ekda gavala astana eka lahan mulachya angat bhut ghuslay ashi news aikli hoti ani gavachya thod lamb ek elementry school hoti tithe to sarkha dhavat dhavt jaychya ani tyala pakdayla akkhya gavatil mul ani tyache aai vadil barich gardi tyachy maage dhavat jaychi tyla pkdun prt ghari anayche
Tyala dhavat jatana me suddha pahilel pn hyavr maza vishvas nvhta ha dhong krt asel
Mg me nkki ya mulala zalay kay? Kakana vicharl tr tr to mulga ekta tya shalevr gelela unhalyache divs kunich shalet nhi tithe ani shalechya mage purn jungle area hota so tyla khitri bhutbadha zali tithun to ghari alyvar velyasarkhach kru lagla, angavr var kru lagla , chicken mutton mangyla lagla , tyanchya gharche srv shakahari astana suddha
Mla tr anek prashn padle ki itkya lahan mulachya angat bhut ghusto kasa mg ek divs too prt dhavat yetana mla disla to khup javlun gela mazya tevha me tyachya chehryavril expressions pahile tevha te khup bhitidayk hot karan te expressions 7 -8 varshyachya mulache nakkich nvhte tyanntr tya shalech barech kisse kakani mla sangitle pn he me swata anubhvlel ahe
Pn ata science vr vishvas thevava ki hya amanviy goshtinvr ?prashn ahe
त्यआ मुलाचं काय झालं????
त्यआ मुलाचं काय झालं???? काही कल्पना???
@kaveri to mulga ata normal
@kaveri to mulga ata normal ahe pn kadhi kadhi tyala tras hoto mg tyla tyachya nehmichya baba kde netat as aiklay me
Pages