अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण हे अस नेहमी नेहमी कस होउ शकतं???
ते बाबा एकदाच काहीतरी का नाही करत???
डॉक्टरांना दाखवायला पाहीजे ... कदाचित...

काय खर काय खोटं देव जाणे....
मला तर भीतीचं वातते या गोष्टींची.... मी पण अश्या गोष्टी ऐकल्यात...पण अनुभव नाही...त्यामुळे सान्गू शकत नाही...

@kaveri tyala doctors cha kahich parinam hot nvhta mhnun tr ti bhutbadha ahe asa nishkarsh kadhlela tasa maza pn vishvas nhiee ashya goshtinvr me phkt maza anubhav sangitla

kaveri to mulga ata normal ahe pn kadhi kadhi tyala tras hoto mg tyla tyachya nehmichya baba kde netat as aiklay me?

त्रास नक्कि कोणाला होतो? माझ्या माहिती प्रमाणे तो मुलगा झाड आहे, (ज्याच्या अन्गात सन्चार होतो त्याला झाड असे सम्बोधतात), असो . . .

त्रास नक्कि कोणाला होतो? माझ्या माहिती प्रमाणे तो मुलगा झाड आहे, (ज्याच्या अन्गात सन्चार होतो त्याला झाड असे सम्बोधतात), असो . . .>>> म्हणजे???
जरा सविस्तर सांगाल का???
भिती वाटत असली ...तरी अश्या गोष्टी ऐकू वाटतात...

जरा सविस्तर सांगाल का???
त्याचे असे आहे कि हा विषय अनुभवाचा आहे,तसेच एखाद्याला आलेला अनुभव दुसर्याच्या बाबतित तन्तोतन्त जुळेलच याचि खात्रि देता येत नाही, पण एक साधर्म्य आढळले आहे की जेव्हा सम्चार झालेला असतो तेव्हा त्या व्यक्तिच्या सर्व जाणिवा लुप्त झालेल्या असतात्,तो त्यावेळी काय क्रूती करत असतो हे त्या व्यक्तीला कळत नसते, जेव्हा सन्चार निघुन जातो तेव्हा त्याला कधी कधी थकवा जाणवतो,जसे वरिल उदाहर्णात तो मुलगा पळत सुटतो, असो . . .

@anirudh thank you chan info dilit trass mhnjech too vedyasarkha vagto sanchar zalay asa vagto ani tyachya baba kde nelyavr prt normal hoto ani tyachi doctor kde sarkhi treatment suru aste
mla as vatat ki kahi lok khup vegle astat tyamule ashya goshti phkt tyanvr ch hotat. mazi tai suddha ek example ahech tai baddal lihel kdhitri.

बरेच दिवसापासून माझ्याबाबत घडलेला किस्सा सांगायचा होता परंतु मराठी टायपिंगचा कंटाळा आणि याला अमानवीय म्हणावे कि नाही का पडलेला प्रश्न .... असो ...

हा किस्सा साधारण पणे १९९९ चा असेल, नाशिक मधला ... तर आम्ही कॉलेजच्या फायनल इयर प्रोजेक्ट साठी माझ्या मित्राच्या बंगल्यामध्ये एक छोटीशी लॅब तयार करण्याचे ठरवले ... त्याची स्वतःची फॅक्टरी आहे आणि त्याच आवारात तो बंगला पण आहे .. बंगल्याच्या खालील २ खोल्या वापरात नसटल्याने आम्ही तिथे लॅब सेट करायचा ठरवले ... ठरल्याप्रमाणे मी वर माझ्या इतर ४ मित्रांनी आपापले कॉम्पुटर आणून सेट केले... व दुसऱ्या दिवशी पासून काम सुरु केल ..
मी सहसा सकाळी कॉलेज नंतर उनाडक्या करून रात्री प्रोजेक्ट काम करत असे. दुसऱ्या दिवशी मी ११ वाजता प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात केली, बाकीचे दोघे झोप येते म्हणून वर जाऊन झोपले. थोड्यावेळाने मला असे वाटले कि पडीकडील खोलीच्या दाराआडून माझ्याकडे कोणीतरी बघते आहे परंतु मला माहित होते कि बंगल्याच्या खालील भागात कोणीच नाही म्हणून मी तिथे जाऊन पहिले पण कोणी नव्हते. मी परत माझ्या कामाला सुरुवात केली व पहाटे कधीतरी तिथेच झोपलो.
दुसऱ्या रात्री पण काम करताना सारखे असे वाटत होते कि कोणीतरी आपल्या कडे अगदी वाकून पाहते आहे .. किंवा कोणीतरी मागून खांद्यावरून कॉम्युटर कडे आणि माझ्या चेहऱ्याकडे बघते आहे ... थोडे विचित्र वाटले पण तरी मी तिथेच आतल्या खोलीत झोपलो ..
दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राला सकाळी सांगितले तर तो हसून म्हणाला म्हणजे तुला पण अनुभव आला का? मला काही कळले नाही तर तो म्हणाला तो त्या जागेचा मूळपुरुष आहे आहे आणि तो तिथेच असतो ... त्यांनी त्यांच्या गुरुजींकडून शांती केली होती पण गुरुजींनी सांगितले होते कि तो तिथून जाणार नाही आणि कोणाला त्रास पण देणार नाही ... काही लोकांना त्याचे अस्तित्व जाणवेल ... बस ...
माझे इतर मित्र हि गोष्ट ऐकल्या नंतर ११ नंतर कधीच तिथे थांबत नसत पण मी पुढे ३-४ महिने तरी तिथे काम केलं असेल ... नेहमी अवतीभवती कोणीतरी वावरत असे पण भीती नाही वाटली आणि प्रोजेक्ट पण पूर्ण झाला....
मी त्या आधी अमानवीय शोधात काही जागा पालथ्या घातल्या होत्या पण कधी काही दिसलं आठवा जाणवलं नाही पण हे मात्र काही ध्यानीमनी नसतांना अनुभवलं. आजही ती फॅक्टरी आणि तो बंगला तिथे आहे ... फॅक्टरी सुरु आहे परंतु बंगल्यात कोणी राहत नाही आता ..

अनुभव जबरी आहे भुत्याभाऊ तुमचा...
पण कमाल आहे तुमचि...माहीती कळूनही तुम्ही तिथे ११नन्तर काम करत होतात...
ग्रेटचं आहात अगदी...

Lol
जे एफबीवर नाहीत त्यांनी बघू नये. सिम्पल लॉजिक आहे >>> पण तुम्ही सान्गू शकता ना....
आणि त्यात तुम्ही लिहिलय पुणेकरांसाठी खास म्हणून उत्सुकता लागलीये जाणून घ्यायची... Wink

सान्गा बरं पटकन...हव तर धमकी समजा... Happy

खास पुणेकरांसाठी म्हणजे तो व्हिडीओ पुण्यातला आहे म्हणून. जे पुणेकर फेसबूक वर असतील त्यांनीच तो बघावा बाकीच्यांनी न बघताच घाबरावे Wink

अग्गबाई...अस आहे का ...जाउदे मग... Happy
विडिओ पाहून्च घाबरनार अश्यांमधील नाही मी...नुसत भुssssssतं भुतं म्हटल तरी घाबरते मी.. Lol

ही काल्पनिक कथा आहे. कदाचित त्यामुळे या धाग्यावर दिली हे योग्य झाले नसावे असे वाटले.
तसेही कुणी वाचतेय असे दिसत नाही.

बरं .
मग आवडत नसेल किंवा इंटरेस्ट नसेल. कारण धागे पण असेच वाहून जातात. कावेरिने कळवलंय स्पेसिफिकली म्हणून तिला पुढचे भाग पाठवीन असे म्हटले होते.

सपनाताई अहो असुद्या की काल्पनिक ...छान होति हो स्टोरी लिहा परत...सगळे वाचतील... Happy

@मॅडी,
....मग कोणिच पाहू नका....अस आता बोलतील दिपस्त....

ही काल्पनिक कथा आहे. कदाचित त्यामुळे या धाग्यावर दिली हे योग्य झाले नसावे असे वाटले.
तसेही कुणी वाचतेय असे दिसत नाही.>>>>मला या धाग्यावरिल बरेचसे अनुभव काल्पनिक वाटतात

काही नाहीये त्या लिंक वर .. निखिल गिरी नावाच्या माणसाचा प्रोफाईल दिसतोय फक्त! विडीओ नाही काही नाही.

Pages