अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

this incident happened in our home 2-3 years ago. only 3 people lives in our home me, my sister and my father.
that day my sister and my father went to work , i was alone at home whole day at home except maid came and went in 20 minutes. at home we sleep in three different rooms. at evening when i went to my sister room i found a white handprint on my sisters pillow. the pillowcase was of dark maroon colour and handprint looked was printed very clear on it.
it looked like it was made by very strong, tall person . the palm and fingers were so big .we compare our hands to it but our hands were no match for it. handprint was also very clear like it was made by real human hand. we dont know what to think of it
we are living in this house for 25 years never such thing happened to us

रीया, गंमतशीर आहे ती घटना. दुसरी घटना मैत्रिणीकडुन ऐकलेली. काहीतरी समारंभ होता म्हणून मैत्रिण तिच्या काकांकडे रहायला गेली होती. मैत्रिणीचे काका, काकु, बहिणी हे सगळेजण हॉल मध्ये खाली झोपले होते. म्हणायला हॉल तो, पण फार मोठा नव्हता. उन्हाळ्यामुळे खिडकी उघडी ठेवली होती. मैत्रिणीचे ( सीमा ) काका फार घाबरट आहेत, भुतांच्या बाबतीत. काही वेळाने काकुंना तहान लागली म्हणून त्या उठणार एवढ्यात त्यांना काकांचा नवा कोरा शर्ट , जो बाजूच्या भिंतीवर टांगलेला होता, तो हवेतुन हलत, उडत जातांना दिसला. शर्टाच्या दोन्ही बाह्या वर खाली होत होत्या. काकु ते पाहुन जोरात किंचाळल्या. सगळे उठले, पण काकू भुत भुत म्हणत नुसत्याच हातवारे करत होत्या, त्यामुळे काकांसकट कोणाचाही धीर होईना. मग तो शर्ट अचानक खाली पडला, सगळे दचकले. आणी बाहेर खिडकीतुन काहीतरी पडल्याचा आवाज आला.

शेवटी काकांनी धीर धरुन बाहेर बघीतले तर एक भिकारी पळुन जातांना दिसला. त्याच्या हातात काठी होती व तिला लांब तार वाकवुन बांधली होती. त्या काठीने त्याने तो शर्ट ओढण्याचा प्रयत्न केला असावा. मात्र हे लक्षात आल्यावर सगळे जे हसत सुटले की बस!

>> तिला लांब तार वाकवुन बांधली होती. त्या काठीने त्याने तो शर्ट ओढण्याचा प्रयत्न केला असावा.

Lol Lol Lol बिच्चारा ... अंगात घालायला पण काही नसेल त्याला. पण यांच्यापेक्षा त्याचीच जास्त दातखीळ बसली असेल Biggrin

कायप्पा वर आलेला व्हिडिओ पाहिला का कोणी ज्यात बागेतला झोपळा जोरजोरात हलत आहे, त्याच्या शेजारचा झोपाळा मात्र तसुभर पण हलत नाहिये.

हा प्रसंग मी आधी सांगितलाय कि माहिती नाही. पण लहानपणी मित्रमंडळीत खूप चर्चिला जायचा हा प्रसंग. शहरापासून (कोल्हापूर) गावाकडे येताना मध्ये एक छोटा घाट आहे (कात्यायनी). त्याकाळात तो भाग अत्यंत सामसूम आणि रस्ता सुद्धा अरुंद होता. तेंव्हा तर वाहने नव्हतीच जास्त. रात्री तर त्या घाटात काळामिट्ट अंधार आणि भयाण अशी स्मशानशांतता असायची. रात्री नऊ नंतर सगळेच वाहनचालक त्या घाटातून जाणे सहसा टाळत असत. रस्त्यात आडवे दगड टाकून लुटण्याचे पण प्रकार घडायचे. त्याच्या पण एकेक सुरस कथा आहेत ज्या अगदी चवीने चर्चिल्या जायच्या. त्यात बाईचे सोंग काढून रस्त्यात उभारून ट्रकवाल्यांना लुटणाऱ्या एका टोळीचा एक प्रसंग होता. अनेक ट्रक त्यांनी अशा पद्धतीने तिथे लुटले होते. मग एका ट्रक ड्रायवरने आणि क्लीनरने मिळून एकदा ठरवून एक प्लान केला. क्लीनर अंगाने मजबूत होता. दाराच्या अगदी तोंडाशीच बसला. हि "बाई" समोर रस्त्यावर उभी होती. तिने अपेक्षेप्रमाणे ट्रकला हात केला. प्लान ठरल्याप्रमाणे ड्रायवरने गाडी हळूच थांबवल्या सारखे केले. आणि काही ध्यानीमनी यायच्या आत क्लीनरने क्षणाचाही वेळ न दवडता त्या "बाई"च्या दंडाला धरून अवचित उचलून केबिन मध्ये ओढून घेतले. आणि ड्रायवरने ट्रक सुसाट पळवला. आजूबाजूला झाडीत लपलेल्या त्याच्या साथीदारांनी लगेच बाहेर येऊन मागून ट्रकवर जोरदार दगडफेक केली. पण काही उपयोग झाला नाही. बाईच्या साडीतला अर्थातच तो एक पोरगा होता. त्याला या दोघांनी धू धू धुतले.

एकदा म्हणे शेवटची एसटी (जिला रातराणी म्हणायचे त्याकाळात) शहरातून गावाकडे येत होती. घाटात आली तेंव्हा अकरा वगैरे वाजले असतील. पण त्या रात्री गाडीत प्रवासी नव्हते. ड्रायवर आणि कंडक्टर दोघेच. त्या काळातले एसटीतील ते टिपिकल गोल गोल पिवळे निळे मंद लाईट. ते लावून गाडी घाटातून चालली होती. तिथे एकच स्टॉप होता. खाली गाव होते. दिवसा पण कुणी फार नसायचे तिथे. पण तेंव्हा मात्र एक बाई उभी होती. तिने हात केला. रात्री बेरात्री हि इथे कशी असा विचार ड्रायवरच्या मनात आला. पण काहीतरी इमर्जन्सी असेल म्हणून त्याने गाडी थांबवली. बाई गाडीत चढली. उंच धिप्पाड बाई. काळाभिन्न राकट पुरुषी चेहरा. डोळ्यात कसलेच भाव नाहीत. आणि स्त्रीला शोभू नये अशी दणकट शरीरयष्टी. कंडक्टर मनातून थोडा चरकलाच. सगळी गाडी रिकामी असताना बाई मात्र मागच्या बाकावर बसली. मंद दिव्याच्या उजेडात ती अजून भेसूर दिसत होती.

गाडी सुरु झाल्यावर थोड्या वेळात कंडक्टरने तिकीट विचारले. तर बाईने भकास चेहऱ्याने त्याच्याकडे बघितले आणि कमरेच्या रुमालातून पैसे काढून बसल्या जागेवरूनच हात पुढे केला. दोन तीन सिटा ओलांडून तो हात लांब होत होत कंडक्टर पाशी आला. कंडक्टरने जाग्यावरच बोंब ठोकली आणि धडपडत ठेचकाळत उठायचा प्रयत्न केला. ड्रायवरने दचकून मागे बघितले. ते दृश्य बघून त्याचे स्टीअरिंगव्हीलवरचे नियंत्रण सुटले. गाडीने रस्ता सोडला. ड्रायवरने उडी मारली. जीवाच्या आकांताने वाट फुटेल तिकडे बोंबलत पळत सुटला. गाडी वेगात तशीच पुढे जाऊन पलट्या खात खात घाटात शेकडो फुट खाली दरीत कोसळली. ड्रायवरने जवळचे गाव गाठले. गावातल्या एकदोघांनी त्याला पळताना अडवले. त्याचा चेहरा पांढराफट्ट झाला होता आणि दातखीळ बसली होती. थोड्याच वेळात तो शुद्ध हरपला.

दुसऱ्या दिवशी घाटात शेकडो फुट खाली एसटीचा सांगाडा मिळाला. कंडक्टरचा मृतदेह पण सापडला. बाकी एसटीत तिसरी कोणतीही व्यक्ती असल्याचा कसलाही धागादोरा मिळाला नाही.

कायप्पा वर आलेला व्हिडिओ पाहिला का कोणी ज्यात बागेतला झोपळा जोरजोरात हलत आहे, त्याच्या शेजारचा झोपाळा मात्र तसुभर पण हलत नाहिये. >>> लिंक टाका

त्या पैंजणच्या आवाजावरुन आठवलं आमच्य अजुन्या घरात का य म बांगड्यांचे आवाज यायचे..
आई घरात असली तरी , नसली तरी...म्हणजे बांगड्या घालणारी तीच एकटी होती म्हणून तसं स्पेसिफिकली सांगतेय
आमच्या मजल्यावर दुसरी घरी नव्हती, आमचं घर शेवटच्या मजल्यावर होतं , त्या मुळे शेजारच्या किंवा वरच्या घरातून आवाज यायचं पण काही कारण नाही.

आम्ही आपलं लक्ष्मीचा वास असेल म्हणून गप्प बसायचो पण त्या घरात आम्हाला कायम आर्थिक विवंचना होत्याच... फक्त एक गोष्ट की त्या घरात आम्हाला कधीच कोणालाच कुठलंही आजारपण आलं नाही..

बाकी माझा या सगळ्यावर फारसा विश्वास नाही, भिती मात्र मला फार वाटते

बाप्रे !!

@ झोपाळा - कट पेस्ट अ‍ॅप असतं ना फोटोसाठी ? व्हिडीओसाठी पण आहे असं ऐकून आहे.

गाडी सुरु झाल्यावर थोड्या वेळात कंडक्टरने तिकीट विचारले. तर बाईने भकास चेहऱ्याने त्याच्याकडे बघितले आणि कमरेच्या रुमालातून पैसे काढून बसल्या जागेवरूनच हात पुढे केला. दोन तीन सिटा ओलांडून तो हात लांब होत होत कंडक्टर पाशी आला<< ही गोष्ट मी शाळेत असल्यापासुन ऐकतेय

तो कायप्पा वाला व्हिडीओ थोपूवर पण आलेला आणि पोस्ट करणा-याने कबुली पण दिली की दोरा बांधून झोपाळा हलवला आहे म्हणून.

>> ही गोष्ट मी शाळेत असल्यापासुन ऐकतेय

हो पण ती ओरिजिनली आमच्या इथल्या त्या घाटातच घडली होती Biggrin जोक्स अपार्ट पण लहानपणी ती इतक्या वेळा ऐकली आहे कि ती खरेच त्या घाटात घडली असेल असे कित्येक वर्षे वाटत होते. दंतकथा असेल असे मनातही नाही आले कधी.

<<ही गोष्ट मी शाळेत असल्यापासुन ऐकतेय >>>> आत्ता हा हात अजून चार सीट पुढे यायला हवाय<<<

आणि खरच तो हात इतका पुढे होता त्या गोष्टीत!
म्हण्जे कन्डक्टर ड्रायव्हरबरोबर गप्पा मारत बसलेला असतो. ड्रायव्हर सिटच्या अगदी पाठिमागेच. आणि ४-५ बायका
बसमधे चढतात आणि शेवटच्या सीटवरुन सर्वात पुढे असलेल्या कन्डक्टरच्या तोन्डापर्यन्त हात आणतात, असे होते. Lol

म्हण्जे कन्डक्टर ड्रायव्हरबरोबर गप्पा मारत बसलेला असतो. ड्रायव्हर सिटच्या अगदी पाठिमागेच. आणि ४-५ बायका
बसमधे चढतात आणि शेवटच्या सीटवरुन सर्वात पुढे असलेल्या कन्डक्टरच्या तोन्डापर्यन्त हात आणतात, असे होते. Lol >>>>> Lol

आर्या, त्या गोष्टीतही अशीच भर पडुन ती गोष्ट वाढत गेलीय हातासारखी.

हाच की असाच किस्सा अमानवीयच्या जुन्या धाग्यावर वाचलेला आठवतोय.>>>>> जुन्या, आधीच्या धाग्यावर मीच एक असा किस्सा टाकला होता, लिंक देते नंतर.

Pages