अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"ही कथा थोडी मोठी असेल पण सत्यकथा आहे आणि ग्रामीण भागातील असल्यामुळे शहरी मित्रांना समजावी यासाठी जास्त तपशीलाद्वारे स्पष्ट केली आहे...

माझ्या गावी म्हणजे माजगाव मध्ये साधार 4 ते 5 वर्षापुर्वी घडलेली ही एक सत्यकथा आहे..

मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच की, उन्हाळ्यात गावी 12 तास लोडशेडीँग असते.. मग शेतांना पाणी पाजण्याचे काम लाईट असेल, तेव्हा म्हणजे कधीही अमावस्या असो वा पौर्णिमा रात्री अपरात्री करावे लागते.. अगदी मीही काहीवेळा पूर्ण रात्र जागलोय.. अशाच एका अमावस्येच्या रात्री आमच्या शेजारिल पाटील काका त्यांच्या मोठ्या भावासोबत उसाच्या शेतास पाणी पाजण्यास गेले..

काकांचे शेत डोँगराच्या अगदी जवळच होते.. काकांनी सर्व सरीँना समान पाणी सोडले.. सर्व सरी भरण्यास वेळ लागणार होता.. मग त्यांनी शेतातच रिकाम्या जागेत एक शेड तयार करून तिथे खाट ठेवली होती, तिथे ते दोघेही झोपले.. आता मध्यरात्र झाली होती.. तेवढ्यात काकांना अचानक कोणीतरी हलवले.. पाहतात तर काय तो त्यांचा खास मित्र होता तोच चेहरा तोच आवाज तिच शरिरयष्टी तो काकांना जागे करत होता..

काका उठल्यावर म्हणाला, 'पाटला, झोपलायस काही काम नाही का?'.. काका म्हणाले, 'अरे सर्व सरीँना पाणी सोडलेय.. वेळ लागेल म्हणून झोपलो थोडा वेळ.. पण तु इथे काय करतोयस?'.. तो, 'अरे तुझ्याकडेच आलोय.. जनावरांच्या सपरासाठी (शेडसाठी) एक सागाचे लाकूड हवे होते.. दिवसा डोँगरात फॉरेस्ट(वनरक्षक) असतो.. चल आता घेऊन येऊया.. तुलाही आता तसे काही काम नाही आता'.. तो काकांचा खास मित्र.. मग काकाही म्हणाले, 'चल ठीक आहे, जाऊया'..

(मित्रांनो अशावेळी मनुष्य कसलीही शहानिशा विचार करत नाही कदाचित त्या वाईट शक्तीँचा प्रभाव पडत असावा)

काकांनी बॅटरी टॉवेल घेतला.. दोघेही निघाले गप्पा मारत ते कधी डोँगरात पोहोचले.. काकांनाही समजले नाही.. काका त्याला बोलले, 'बर चल तोड आता तुला हवे ते लाकुड'.. तो म्हणाला, 'जरा पुढे चल.. पुढे चांगली मोठी लाकडे आहेत'.. असे करत करत तो काकांना खुप पुढे घेऊन गेला..

आता कसे काय माहीत काकांचे नशीब म्हणा किँवा देवाची कृपा, काकांना काहीतरी विचित्र वाटायला लागला होते.. त्यांना दरदरून घाम फुटला होता.. अचानक ते जागेवर थांबले आणि त्या मित्राला म्हणाले, 'कोण आहेस तु?? कुठे नेतोयस मला?'.. आता तो मित्रही थांबला.. पण आता त्याचा आवाज बदलला होता.. आता तो काकांचा मित्र नव्हता.. त्याला काकांना त्याच्या एरियात न्यायचे होते.. पण काका शुद्धीवर आले होते.. तो काकांना म्हणाला, 'वाचलास तू'.. आणी क्षणार्धात गायब झाला.. त्याचा तो अवतार पाहून काका खुप घाबरले, आणि काट्याकुट्यातून जीव मुठीत घेऊन पळत आपल्या भावाजवळ येऊन झोपले..

सकाळी त्यांची हालत खुपच खराब झाली होती.. त्यांना शेतातून बैलगाडितून घरी आणावे लागले.. तब्बल ६ महीने ते हॉस्पिटलमध्ये होते..

आता ते ठिक झाले आहेत त्यांनी शेतात ठीबक बसवले आहे.. ते आता रात्री शेतात जात नाहीत.. तो प्रसंग सांगताना आजही त्यांचे हातपाय थरथरतात..

मित्रांनो तुम्हाला पटो किँवा न पटो पण ही सत्यकथा आहे काकांची ती हालत त्यांचे भय मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीले आहे अनुभवले आहे.."

खूप वेळाने लक्षात आलं की या बंगलीवर कुठूनही सूर्याची किरणे पडत नाहीत, म्हणून ते फोटो घेतले. चौथ्या फोटोत नीट पहा. अलिकडे प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचला आहे, पलिकडे एका ठिकाणी आहे, गवत पूर्ण वाळलेलं आहे. अर्थात झाडं हिरवीगार आहेत,>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> असे काही नाही, तुम्ही सान्गितलेल्या फोटोत उजव्या बाजुला दिवाळावर TIO लिहिले आहे त्याबाजुला कोपर्‍यातील दिवाळावर व वर तोकेरी कौलावर आहे सुर्यकिरण

तुम्ही दुसऱ्या बाजूने फोटो काढून पाहिलेत का? कधी कधी त्याने पण फरक पडू शकतो आणि आपण उगाचच भूत भूत म्हणत बसू

वैभवजी, तुमचे म्हणणे खरे आहे. पण मी तिथे उभी राहून पाह्यले. खूप कमी वेळ तिथे किरणे पडली.

भुभा
तिथे भूत आहे असे मी म्हटलेले नाही. त्या घराला राऊंड मारला होता मी.

मनिमाऊ
कँपमधे जाऊन पहायला पाहीजे. (लांबूनच). त्या बाजूला काम निघेल तेव्हां फोटो घेईनच.

आजोबा आणि ती - हडळ
वेडा कल्पेश | 3 December, 2016 - 00:40

आज मी तुम्हाला माझ्या आजोबांबरोबर घडलेल्या एका विचित्र घटनेबद्दल सांगू इच्छितो ..
गोष्ट ४० वर्षापूर्वी ची आहे. माझे आजोबा तेव्हा Under Construction Building contractor होते .त्यामुळे Builder ने त्यांच्या राहण्याची सोय तिथेच Ground Floor च्या एका रूम मध्ये केली होती. घरात आजोबा, आजी, माझी आई आणि ४ मामा असा ७ जणांच कुटुंब राहत होत . त्यांच्या रूमच्या बाजूला अजून एक कुटुंब राहत होत. ते सुद्धा तिथेच काम करणारे होते. नवरा बायको आणि ३ मुली अस त्याचं कुटुंब होत. दिवस थंडीचे होते. तर झाल अस कि शेजारच्या ३ मुली शेकोटी करत बसल्या होत्या. लहान असल्यामुळे जे काही हातात भेटेल ते आणून मुली त्या शेकोटीत टाकत होत्या. अचानक त्यातील सर्वात मोठ्या मुलीला लाईट चा बल्ब दिसला तो तिने काहीही विचार न करता त्या आगीत टाकला. बल्ब गरम झाल्याने तो फुटला आणि त्याच्या काचेचे तुकडे उडाले त्यातील एक तुकडा बाजूलाच बसलेल्या लहान बहिणीच्या डोळ्यात गेला आणि रक्त वाहू लागले हे पाहून बाजूलाच काम करत असलेले माझे आजोबा आणि त्या मुलीची आई धावत आली . रक्त फार वाहत होते. आजोबा लगेच त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले . सोबत मुलीचे आई बाबा सुद्धा होते तिला हॉस्पिटल मध्ये भरती करून आजोबा परत घरी आले आणि कामाला लागले. आणि त्या मुलीचे आई वडील तिथेच राहिले .

संध्याकाळी जेव्हा आजोबा घरी आले तेव्हा त्यांनी पहिले कि शेजारी अजून हॉस्पिटल मधून आले नाही आहेत . ते आपल्या रूम मध्ये आले आणि आजी ला काय झाल ते सांगत होते . चर्चा झाल्या नंतर रात्रीचे जेवण आटोपून सगळे झोपून गेले होते. पण आजोबाना मात्र झोप येत नव्हती. अचानक बाहेर कोणाच्या तरी बांगड्याचा आवाज त्यांना येवू लागला. त्यांनी विचार केला कि बाजूचे आले असतील म्हणून त्यांनी आवाज दिला. ताई आलात का हॉस्पिटल मधून बूट बाहेरून काहीच उत्तर आले नाही . तेव्हा त्यांनी अजून एकदा आवाज दिला कि ताई मुलगी कशी आहे .तेव्हा त्यांना बाईच्या रडण्याचा आवाज आला तेव्हा त्यांना वाटले कि मुलीच काही बर वाईट तर झाल नाही म्हणून ते धावत दरवाजाकडे गेले आणि दार उघडल पण बाहेर कोणीच नव्हत. त्यांना वाटल त्यांना भास झाला असेल म्हणून त्यांनी दरवाजा लावला आणि परत येवून बिछान्यावर पडले . काही वेळ विचारात गेला असेल इतक्यात पुन्हा बाहेरून कोणी तरी पाणी ओतत असण्याचा आणि बांगड्यांचा आवाज झाला . यावेळी आजोबांनी आवाज दिला नाही ते हळूच उठले आणि दरवाजा जवळ गेले तर त्यांना कोणी तरी चालत पुढे जातंय याचा आवाज आला त्यांनी हळूच दरवाजाची कडी उघडली. आणि पाहून थक्क झाले बाजू वाली बाई हातात पाण्याने भरलेला एक डब्बा जो आपण शौचास वापरतो घेऊन समोरच असलेल्या खाडी जवळ च्या जंगलात जात होती . आजोबांनी विचार केला एवढ्या रात्री हि बाई एकटीच शौचास जंगलात का जातेय म्हणून ते तिला आवाज देणार तेव्हड्यात मागून आजी आली आणि त्यांना विचारले कि एवढ्या रात्री तुम्ही इथे एकटेच काय करताय . ते म्हणाले अग ती बघ बाजूवाली एकटी कुठे चालली आहे जंगलात आजीने समोर नजर टाकली पण तिला काहीच दिसले नाही आजी म्हणाली तिथे तर कोणीच नाही आहे. तेव्हा आजोबा म्हणाले तू वेडी आहेस का हि काय मला इथे समोरच जाताना दिसतेय ती थांब आवाज देतो. तेव्हा आजीने सांगितले कोणीच नाही आहे तिथे तुम्ही आधी घरात चला आणि ती आजोबाना खेचत घरी घेऊन आली .

ती रात्र ते दोघ पण झोपले नाहीत. दुसर्या दिवशी सकाळी त्या बाईचा नवरा घरी आला तेव्हा आजोबांनी विचारलं कशी आहे मुलगी आणि ताईना ऐकतच घरी का पाठवलास रात्री तेव्हा तो म्हणाला मुलगी बरी आहे आणि हि तर रात्रभर हॉस्पिटल ला होती . तू काय भूत बित पाहिलास कि काय आणि तो हसायला लागला पण आजोबा मात्र विचारात पडले कि मग रात्री नक्की मी पाहिलं ते काय होत .विचार करत करत आजोबा आपल्या कामावर निघून गेले . दुपारचे १२ वाजले असतील आजोबा घरी परत येत होते २ मिनटांच्या अंतरावर घर आले होते. अचानक त्यांना आजी भेटली त्यांनी तिला विह्कॅराल तू कुठे निघाली . तेव्हा ती हसली आणि म्हणाली तुम्हालाच आली आहे. चला दुसर्या माळ्यावर एक बाई पडली आहे रक्त येत आहे खूप तीच आजोबांनी विचार केला बिल्डिंग तर Under Construction आहे मग तिथे कोण कस गेल.आणि पडल .......

आणि असा काही झाल असेल तर मालक आपल्यालाच ओरडेल कि तुम्ही नीट लक्ष देत नाही म्हणून . आजोबा आणि आजी धावत निघाले त्या दिशेने. building जवळ आली तशी आजी आजोबाना बघून हसू लागली आणि त्यांच्या पेक्षा वेगाने धावू लागली आजोबा हे पाहून चाट झाले पण त्यांना पटापट वर जावून झालेला प्रकार बघायचा होता. ते आजीच्या मागे धावत गेले. 1st floor चढला. तशी आजी बोलली लवकर या आणि पहा आजी त्यांच्या पुढे होती ते 2nd floor वर आले. पाहिलं तर तिथे काहीच नव्हत त्यांनी आजूबाजूला पाहिलं सगळ सामसूम होत आणि त्यांच्या लक्षात आल कि आजी सुधा दिसत नाही आहे. तेव्हा ते तिला आवाज देणार इतक्यात खालच्या फ़्लॊर वरून आजी धापा टाकत वर आली आणि आणि बोलली तुम्ही धावत वर का आलात काही झाल आहे का इथे. तेव्हा आजोबाना कळून चुकल कि इथे काही तरी धोकादायक आहे . आणि लगेच त्यांनी आजीचा हाथ धरला आणि म्हणाले खाली चल इथून .त्याच दिवशी ते सगळे त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी शिफ्ट झाले. पण ते काय होत याची विचारपूस जेव्हा त्यांनी आजूबाजूला केली तेव्हा एका काम गाराने सांगितलं कि तुमच्या आधी इथे एक कामगार आणि त्याच कुटुंब राहायचं आणि बिल्डिंग मध्ये काम करता करता इथली बाई दुसरया माळ्यावरून खाली पडली होती. ती थेट तुमच्या घराच्या दरवाजा समोर .

तेव्हा आजोबाना कळून चुकल कि ते सगळ काय चालू होत.

टिप - या अगोदर हि कथा मी माझ्या फेसबुक पेज वर अपलोड केलेली आहे - लिखाणात काही त्रुटी असल्यास समजून घेणे
-------------------------------------------------------------------------
अमानवीय जखिण आणि ताई
वेडा कल्पेश | 15 July, 2015 - 08:46

खालील घटना तंतोतंत सत्य आहे आणि माझ्या डोळ्या देखत घडलेली आहे या आधी हि मी ती फेसबुक वर शेअर केली होती. पण आता मी सुधा मा.बो कर झालो आहे त्यामुळे ती मी इथे पोस्ट करत आहे

"मी कल्पेश मूळचा मुंबई मधील गोरेगाव चा. तब्बल १३ वर्षापूर्वी माझ्याबरोबर घडलेली एक घटना आज येथे शेर करावीशी वाटली..
.
.मी तेव्हा 13 वर्षाचा होतो . आणि गावा वरुन आत्ये भावच्या लग्नाची पत्रिका नुकतीच आली होती.मे महिना होता. आणि शाळेला भरपूर सुट्ट्या सुधा होत्या . त्यात गावाला जाण म्हणजे आनंदाची पर्वणीच माझ्यासाठी. एकदाचे आम्ही गावाला येऊन पोहचलो . लग्न असल्यामुळे सगळी भावंड अगोदरच गावाला आली होती. आणि तेव्हा मी सगळ्यात लहान असल्यामुळे माझे लाड होत असत......

आत्याच गाव चिपळूण पासून सुमारे 12 की. मी अंतरावर आहे गावाच नाव केळने. गाव डोंगराच्या मधे असल्याने निसर्गाने जणू सगळी सुंदरता त्यात भरली होती. आत्ता मैं स्टोरी ला सुरवात करतो.......

तो लग्नाच्या आधीचा म्हणजे हळदिचा दिवस होता घरात लग्न असल्यामुळे सगळे वेगवेगळ्या कामात व्यस्त होते. सगळ्या भावंडानी काम वाटून घेतली होती. मी आणि माझी ताई रेखा आमच्या दोघांवर पाणी भरण्याचे काम सोपवण्यात आले. पाणी भरण्या साठी विहरीवर जाव लागत असे. ती विहीर घरा पासून 5 मिनटांच्या अंतरावर होती. आणि ती विहीर जमिनीला लागून होती म्हणजे तिच्या बाजूला सुरक्षा कड नव्हती . त्या मुळे लहान मूलाना सहसा तिथे जाऊ दिले जात नव्हते. विहीर तशी खोल नव्हती 4 ते 5 फुट पाणी असेल त्यात.आणि विहरीच्या बाजूला एक मोठे चिंचेचे झाड होते..

तर झाल अस की रेखा ताई आणि मी दोघ निघालो पाणी भरण्यासाठी दुपारचे 12. ते 12.30 वाजले असतील काही वेळात पोहचलो विहरी जवळ तेवा तिथे कोणीच नव्हते. आमच्या गप्पा चालू होत्या ताई विहरीतून पाणी काढून हंडा भरत होती आणि मी त्या विहरीत वाकून बघत होतो. विहरीत समोरच्या चिंचेची पान पडत होती. सगळ वातावरण एकदम शांत होत . तेवढ्यात ताई म्हणाली तुला माहीत आहे का कल्पेश या झाडावर जखिण राहते अस म्हणतात. ते ऐकून मी ताई ला चिडवत म्हणालो राहते ना मग बोलव मी नाही घाबरत कोणाला . तर मस्करी म्हणून ताई जोरात बोलली ए जखिणी ये आणि धर आमच्या कल्पेश ला. ती हे बोलताच आम्ही दोघे पण हसायला लागलो आणि ताई ने भरलेला एक हंडा माझ्या डोक्यावर दिला आणि म्हणाली हो पुढे आणि ती तिचा हंडा उचलू लागली तसा मी घरच्या दिशेने वळलो. मी 4 ते 5 पावल टाकली असतील अचानक धाड असा मोठा आवाज झाला.. अचानक अंगातून एक शीरशिरी उठली . मी मागे वळून पहिले तर ताई कुठेच दिसत नव्हती. मी घाबरलो पाय थरथारू लागले पण ताई चा विचार करून हिंमत केली आणि विहारी जवळ गेलो आणि खाली डोकवून पहिले. आणि जे पहिले ते कधीच विसरू शकत नाही

ताई विहरित उभी होती पूर्ण ओले केस डोळे लाल लाल झलेले होते आणि एक विचित्र हास्य तिच्या तोंडावर होते आणि सारखी मान वाकडी तीकडी करत होती तेव्हा
आणि अचानक तिने मला आवाज दिला की ये खाली ये मी तुला घ्यायला आली आहे . हे ऐकून माझी टरकलि . अंगात जेवढी शक्ति होती तेवढी एकवाटून मी घरच्या दिशेने पाळायला लागलो. धापा टाकत अंगणात येऊन पडलो माझी ती गत बघून सगळे माझ्या दिशेने धावत आले मला उचलले आणि पाणी पाजले मी बोललो ताई बावडीत पडली आहे हे ऐकून मामा , आणि दोन चार मोठी मंडळी विहरीच्या दिशेने धावले. अर्ध्या तासाने ते सगळे लोक ताई ला पकडून घेऊन आले . ती जोर जोरात किंचाळत होती. ओरडत होती. की मला तो पाहिजे ते ऐकून मी अजुन घाबरलो मोठ्या मंडळीनी लगेच गावातील एका मंत्रीक बाबाना बोलावले . आणि ताई ला त्यांच्या समोर बसवले काही मंत्र उच्चारण केले आणि ताई ला विचारले कोण आहेस तू आणि का या मुलीच्या मागे लागली आहेस. तेव्हा ती जोरजोरात हसायला लागली आणि म्हणाली मी चिंचेची शेंद्री जखिण आहे . हिने मला बोलवल आहे. त्या मुलाला घेऊन जाण्यासाठी आता मी या दोघाना पण सोबत घेऊन जाणार. तेव्हा सगळेच घाबरले मग मंत्रिकने काही अजुन मंत्र म्हटले आणि तिला विचारल या मुलांकडून चुक झाली त्याना क्षमा कर आणि त्या बदल्यात तुला हव ते देतो . तेव्हा ती म्हणाली नाही मला अजुन काहीच नको मला हे दोघ हवे आहेत माझी मस्करी करतात याना मी घेऊन जाणार तेव्हा मंत्रिकाने काही मंत्र म्हटला आणि त्याच्या पिशवीतून एक रखेची पुडी बाहेर काढली आणि ती तिच्या कपाळाला लावली तशी ती रडू लागली तिला त्रास होऊ लागला मंत्रीक पुन्हा म्हणाला जातेस की नाही तेव्हा ती म्हणाली मला हिरवी साडी आणि मांसाहाराच जेवण पाहिजे तरच मी याना सोडेन . मंत्रिकने ते कबूल केल द्यायच आणि मामाना एक साडी आणि मटनाच ताट घेऊन बावडी जवळ ठेवायला संगितल ते सर्व होई पर्यंत मंत्रिकच मंत्र बोलन आणि ताई च माझया कडे रागाने बघन चालूच राहील . मामा सगळ्या विधी करून घरी आला तसा मंत्रिकने ताई कडे बघितल आणि ओरडला जेया आता तुझी मागणी पूर्ण झाली आहे. आणि परत तो अंगारा काही मंत्र बोलून तिच्या आणि माझ्या कपाळाला लावला तसा ताई शांत झाली आणि पडली.......

मंत्रिकने एक दोरा आमच्या हाताला बांधला आणि निघून गेला. सगळ शांत झाले थोड्या वेळाने रेखा ताई उठली आणि म्हणाली अरे आपण इथे कसे आपण तर पाणी आणायला गेलो होतो ना ......... तेव्हा मामा बोलले हो पण तुला चक्कर आली म्हणून तुला घरी आणून झोपवले पाणी भरून झाल आता .... तिकडे जायाच नाही दुसर्या दिवशी लग्न आटोपल तसेच आम्ही मुंबई ची गाडी पकडली कारण अजुन काही विपरीत होऊ नये म्हणून आणि त्या दिवसाला आज १३ वर्ष झाली मी परत कधीच अत्याच्या गावाला गेलो नाही ...."

समाप्त
---------------------------------
या दोन लिन्क्मधील मजकूर
http://www.maayboli.com/node/60996
http://www.maayboli.com/node/54661

ते कँपमधलं हाँटेड हाऊस नेमकं कुठे आहे ? नेहरू मेमोरियल कडून आंबेडकर पुतळ्याकडे आल्यानंतर डाव्या बाजूला जायचे का ?

सपना जी, वरील दोन्ही अनुभव मायबोलीवरच पण वेगळ्या धाग्यांवर आहेत. इथे वाचता यावेत म्हणून टाकले आहेत. Happy

नुकतेच माथेरानला जाऊन आलो तेव्हा रिसॉर्टच्या मागच्या रस्त्यावरून शार्लोट लेकला गेलो होतो. तिथून संध्याकाळी परतताना थोडा उशीर झाला. अगदी थोडा संधीप्रकाश उरला होता. पाऊण वाट चालून आलो आणि समोरून येणार्या एका माणसाने 'ह्या रस्त्याने ह्या वेळेला का आलात? हा रस्ता बेकार आहे.' असं म्ह्टलं. का म्हणून विचारलं तर म्हणाला इथे भुतांचा वावर आहे. मग आम्ही विचारलं की तुम्ही तर जाताय की ह्या रस्त्याने तर म्हणाला आमची नेहमीची वाट आहे. बहुतेक भूतांना ह्याची सवय झाली असावी. माणूस दारू वगैरे प्यायलेला दिसत नव्हता. मग असं का म्हणाला कोणास ठाऊक. अंधार पडत असल्याने अधिक काही विचारायच्या भानगडीत पडलो नाही. पण नक्की कोणाची भूतं दिसतात - एत्तदेशीयांची का साहेबांची - ही उत्सुकता राहिली. तो माणूसच भूत असावा असाही एक विचार मनात येऊन गेला ते वेगळंच Proud

तो माणूसच भूत असावा >>>> बाप रे !! शनिवारी मारुतीला जाऊय यायचं एखादे दिवशी
हे असं वाचलं की भीतीही वाटते आणि उत्सुकताही.. ..

आत्ताच थोड्यावेळापुर्वी म्हणजे पहाटे ४ वाजता मी जुने 'अमानवीय ' वाचत होते . कारण मला असे गूढ वाचायला खूप आवडते.... भारी वाटते.

मी असेच एक किस्सा वाचताना शेजारील बंगल्या वरून मोटारीच्या हॉर्न दिल्याचा चा आवाज आला.. स्पष्ट आला .. भास नव्हता तो ..हा आवाज मला जवळून आला आणि आश्चर्य म्हणे शेजारील बांगला मोकळा आहे आणि त्यांनी कार पण नाहीये तिथे
मला वाटलं रस्त्यावरून एखादी कार चालली असें तसा टायरीचा किंवा वाहन गेल्याचा आवाज नाही आला ...

एक मात्र ..खरंतर सगळ्याना वाटते तशी मला पण थोडी भीती वाटते ..पण ह्यावेळेस नाही वाटली ... उलट कोणीतरी साद दिल्यासारखे वाटले !!!

असे का झाले कुणास ठाऊक !!

वृन्दा .. साद घातल्यासारखं होतं कधी कधी .

माझ्या मामेभावाने सांगितलेला किस्सा आहे. नीट लक्षात नाही, आठवेल तसा लिहीतेय. त्याच्या मित्राच्या कि कलिगच्या कि त्याच्या भावाच्या बाबतीत घडलेला किस्सा आहे, त्याला आपण तो म्हणूयात

तर हा साऊथच्या कुठल्यातरी गावात कि शहरात नोकरीला गेला होता. कंपनीचे क्वार्ट्र्स नव्हते. ओळखी नव्हत्याच. कामाच्या ठिकाणी एक दोन जणांना सांगून ठेवले होते. सुरुवातीचे काही दिवस कॉट बेसिस वर लॉजवर काढले, एजंट्स आणि क्लासिफाईड्स चालूच होते. अशातच एके ठिकाणी गेटवर पेईंङ गेस्ट हवेत म्हणून बोर्ड पाहिला.

ते एक जुनं घर होतं. एका बाजूला होतं.मालकीण तशी तरूणच होती. तिला दोन्ही डोळ्यांनी दिसायचं नाही. त्यामुळे तिला सोबतीची गरज होती. म्हणून पेईंग गेटची जाहीरात दिली होती . बाई येऊन जेवण बनवून जायची. तो प्रश्न सुटला होता. वॉचमन नव्हता. त्या बाईला सतत कुणीतरी आपला जीव घेणार आहे ही भीती वाटायची. तिच्या अटी पण ब-याच होत्या. काही जाचक होत्या. पोलिस व्हेरीफिकेशन करून आणायचं होतं. सध्याच्या एम्प्लॉयरची शिफारस आणायही होती. ते वकील वाचणार आणि ठरवणार.
घर सुंदर होतं. पेइंग गेस्ट म्हणून चार्जेस अतिशय माफक होते. जेवणाचा प्रश्न सुटत होता.

पण त्याला सतत काही न काही खटकत होतं. ही बाई एकटी कशी ? हिचे नातेवाईक कुणी नाहीत का ? अंध बाईला कोण कसे टाकून देईल ? सोबतीला सडा माणूस कसा काय चालतो ? ते ही दिसत नसताना ? सुरक्षेचा प्रश्न होता तर वॉचमन का नाही ? बरं आपण नोकरीसाठी बाहेर असणार जास्तीत जास्त वेळ. मग पेईंग गेस्ट घेण्याचं जे कारण दिलं होतं त्याचं काय ?

आणि समजा ही म्हणजे त्याप्रमाणे खरंच हिचा जीव कुणी घेतला तर ? मग पोलीस कुणावर संशय घेणार ?
तो गेला नाही. नंतर कळालं की त्या घरातल्या सर्वांचाच अपघातात मृत्यू झालेला होता. त्यातली एक मुलगी अंध होती.

अरे बाप रे ! .. बरं झाले तो त्या बंगल्यात पेइंग गेस्ट म्हणून गेला नाही !!!

पण मला का असं वाटलं हॉर्न देऊन कोणी बोलावतंय?? ... कि मनाचे खेळ !! god knows !! Happy

Mazya tai chya ghara shejaril ek bai kadhi kadhi ek naral jalat aste tichya darasmor kdhi kdhi ek naral (coconut) ardh jaltana thevlel ast he kay ahe te naral continously jalat ast bghun khup awkward vatt....kahi karni vgere ahe ka

त्यांना भाजलेल्या नारळाच्या करंज्या करायच्या असतील. माफ करा पण असं काही करून कोणाला काहीतरी होईल या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, बाकी काही नाही.

आमच्या इमारतीतल्या एक बाई नेहमी रात्री लिंबू मागायला येतात. पहिल्यांदा आल्या तेव्हां माझ्याकडे लिंबू नव्हते. पण नंतर कळाले कि त्या सगळ्यांकडेच असे लिंबू मागतात. शेजा-यापाजा-यांनी तिला लिंबू देऊ नकोस आणि लांबच ठेव म्हणून सांगितले.
विश्वास असो नसो, पण अशा चमत्कारिकपणाने अस्वस्थता वाटते हे खरे.

पहिल्यांदा आल्या तेव्हां माझ्याकडे लिंबू नव्हते. पण नंतर कळाले कि त्या सगळ्यांकडेच असे लिंबू मागतात.
>> Check if she is limbu sarbat vendor... Wink

आमच्या इमारतीतल्या एक बाई नेहमी रात्री लिंबू मागायला येतात. पहिल्यांदा आल्या तेव्हां माझ्याकडे लिंबू नव्हते. पण नंतर कळाले कि त्या सगळ्यांकडेच असे लिंबू मागतात. शेजा-यापाजा-यांनी तिला लिंबू देऊ नकोस आणि लांबच ठेव म्हणून सांगितले.
विश्वास असो नसो, पण अशा चमत्कारिकपणाने अस्वस्थता वाटते हे खरे.

--> फरच भयन्कर अनुभव...

णा़़ईच।

फरच भयन्कर अनुभव >>> Lol
च्रप्स म्हणजे मला जे वाटताय तेच असाल तर तुम्हाला एक लिंबू पाठवून देईन ( कोड डिकोडेड म्हणून ) Happy

एकदा सकाळी सकाळी सौ.ने घाबऱ्या घुबऱ्याने मला झोपेतून उठवले. "अहो बघा! कोणीतरी बिब्बा, मिरच्या, कोळसा टोचलेले लिंबू आपल्या दारात आणून टाकलाय". मी धडपडत डोळे चोळत उठलो. दारात जाऊन पाहिले तर खरंच तिथे बिब्बा, मिरच्या टोचलेला एक लिंबू मला वाकुल्या दाखवत पडला होता. माझा काही भानामतीवर विश्वास नाही. तरी तो लिंबू कोणी आणून टाकला असावा याचा शोध घेणे क्रमप्राप्तच होते.

मी आजूबाजूला जरा चौकस नजरेने पाहू लागलो. आमच्या दरवाजाला लागूनच वरच्या मजल्यावर जाण्याकरिता पायऱ्या होत्या. वर पायऱ्या संपतात तेथेच दुसऱ्या एका बिऱ्हाडाचा मुख्य दरवाजा होता. वर जाऊन आजूबाजूला नीट निरखून पाहिले तर त्या दरवाज्याच्या वरच्या चौकटीवर मधोमध एक धागा लोंबकळत होता.
आणि तो लोंबकळणारा धागा पहाताचक्षणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सदर बिऱ्हाडकरूने लिंबू, मिरची, बिब्बा, कोळसा धाग्यात एकत्र गुंफलेला आणि घराला नजर लागू नये म्हणून बांधतात तसा कसलासा प्रकार दाराच्या वरच्या चौकटीला मध्ये बांधलेला होता. मध्यरात्री केव्हातरी काही कारणाने तो धागा तुटला आणि मिरची, बिब्ब्यासकट लिंबू पायरीवरून घरंगळत थेट आमच्या दारात येऊन पडला होता. आणि आम्हाला वाटत होतं की कोणीतरी मुद्दाम जादूटोणा करण्याकरिता लिंबू, मिरची, बिब्बा आमच्या दारात आणून टाकलाय.

हे पाहून आमच्या सौ.चा जीव भांड्यात पडला. आणि अशारितीने आमचा इतरांंविषयी गैरसमज होता होता राहिला.

@ काकेपांदा, यात अमानवीय काय हाय? >>> आपल्या अपेक्षेप्रमाणे माझ्या पोस्टमध्ये आपणांस काही 'अमानवीय' आढळले नाही, ह्याकरिता मी अत्यंत दिलगीर आहे.

च्रप्स म्हणजे मला जे वाटताय तेच असाल तर तुम्हाला एक लिंबू पाठवून देईन ( कोड डिकोडेड म्हणून ) Lol
सपना +१ Lol Lol

khup divasanpasun ethle sagale anubhav vachtoy. khup chan ahet saglyanchya goshti. malahi ek chotasa anubhav sangaycha ahe. ha anubhav maza swatacha nahi, mazya mitracha ahe. sadharan dec 2015 madhe maza mitra ani tyachya college cha mitraparivar goa la picnic sathi gele hote. Dec cha mahina aslyamule goa purn pack asto he sarvana mahitach asel. tyamule saglyanchi rahnyachi soy ekach thikani zali nahi .tyamule group divide houn 2 vegveglya thikani rahile. tyapaiki maza mitra ani tyache 3 mitra eke thikani rahat hote. divasbhar sagale firun maja Karun sandhyakali apapalya room var jayache ani fresh houn ratri punha bhetayche. maza mitra ani tyache 3 mitra roj dusrya group chya room var ratri jayche. tar ek ratri nehmipramane chaughe jan, ratri dhumakul ghalayla nighale. rastyat eke thikani khupach traffic jam zale hote. tyapaiki ek mitra mhanala " mala ek shortcut mahit ahe apan tithun jauya ". sagale jan tayar zale . pratyekakde bhadyane ghetlelya scotty hotya . chaughe jan nighale . jya rastyane te jat hote to rasta atishay sunsan hota. tithe rastyachya dutarfa anek baski ghar hoti, pan sagali padaki ani band hoti . halu halu tyancha lakshat ale ki ti ek ujad vasti hoti .tarihi sagale jan Shantpane gadi chalvat hote. konihi konashi kahi bolat navate. ek vishistha Valan yetach tyana disle ki tyapudhache sagle street light band ahet. jasa tyani to turn cross kela tasa chaughanchyahi headlight ekach veli band zalya ani chaughanchyahi khandyavar konitari hat thevale. sudaivane gadyana side mirror naslyane konachihi patkan mage najar geli nahi. ani konihi mage valun baghitale nahi. mala ashcharya vatla aikun ki tyapaiki konihi ghabarla nahi . parantu sarvana paristhitichi janiv zali hoti. sadharan 5 minute gadya chalvlyanantar pudhil streetlight chalu hota. jase tyani to streetlight cross kela tyanchya khadyavarun hat kadhle gele ani tyanchya headlight on zalya. jyaveli te nishchit thikani pohochale tyaveli eka mitrane Vishay kadhala ," yetana tumhala kahi janavala ka ,mazya mage konitari basala hota ani tyane mazya khandyavar hat thevala hota" saglyancha same anubhav hota. yanantar tyani tithe nehmipramane maja masti keli ani punha ratri sadharan 2 , 2.30 chya sumaras punha aplya room kade nighale . maza mitra atishahana ahe ani tyache mitra tyahun 2 paula pudhe. tyani muddamum tyach rastyane parat janyache tharvale. jasa tyani to street light cross kela , adhisarkhe tyanche headlight band zale ani konitari tyanchya khandyavar hat thevala. yaveli hi konihi kahi bolale nahi. tasach 5 minute gadi chalavlyavar te Adhichya valanachya street light javal pohochale ani adhisarkhach hat kadhala gela ani headlight on zale. ha anubhav tyane alya alya mala sangitala yat mala swatala janvlelya kahi goshti

1. saglyanchach devgan asava , bhute devganachya mansala zapatu shakat nahit
2. konihi chukun mage valun pahile nahi he nashib
3. atishay murkhapanachi goshta- punha tya rastyane jane yane kadachit ti amanviy Shakti divachali janyachi shakyata hoti ki , 'punha aalat kay yaveli sodnar nahi tumhala'
4.jyapramane headlight band padale tyapramane ekhadyachi gadi band zali asti tar yanchi kay halat zali asti dev jane

pan ek goshta matra khari ahe ki mitrane khoti goshta rachun sangitali navati karan tasa to nidar ahe . kadachit mi to anubhav nit mandu shaklo nahiye. tumcha pratisad jarur kalava .

चॉकोलेट बॉय
मायबोलीची फॉण्टसुविधा असताना हे असे वाचता येत नाही. तुम्हाला अडचण असेल तर इंग्लीश मधे लिहा किंवा देवनागरी मधे रुपांतर करा.

भारी अनुभव चॉकलेटबॉय..
असं काही घडल्यावर पर जाणे म्हणजे कुर्‍हाडीवर पाय मारणे होय Lol

Pages