Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हाला अडचण असेल तर इंग्लीश
तुम्हाला अडचण असेल तर इंग्लीश मधे लिहा >>>> इंग्लीश मधे लिहुन जितकं समजेल त्यापेक्षा हे समजतंय सपनातै.
देवनागरीतच लिहा साठी +१. तसंही तुम्ही फोनेटीकलच लिहिलंय.
हो आणि अनुभव डेंजरच चॉकलेटबॉय
हो आणि अनुभव डेंजरच चॉकलेटबॉय
असं काही घडल्यावर पर जाणे म्हणजे कुर्हाडीवर पाय मारणे होय >>>> +१
तुम्हाला अडचण असेल तर इंग्लीश
तुम्हाला अडचण असेल तर इंग्लीश मधे >>maf kara pan maz English etka changla nahi aho. mhanun khup divas prayatna kela Marathit type karnyacha nahi jamala teva mhatala English madhech type karuya .tari prayatna karto pudhchya veli
<देवनागरीतच लिहा साठी +१. तसंही तुम्ही फोनेटीकलच लिहिलंय.> mi prayatna kela atta pan ha pratisad lihitana pan nahi jamat ahe. mi office chya pc varun type kartoy . +1 lihun mi type karayla suruvat keli pan bhaltach type zal ajunahi kahi aiklele kisse mala sangaychet ,krupaya mala nit samjaval ka konitari kas type karayach marathit
च्रप्स यन्चि तुइतिओन लावा..
च्रप्स यन्चि तुइतिओन लावा..
.
.
.
असा सल्ला मी देणार नाही. प्रतिसाद लिहितो त्या चौकटीवर म/E असं दिसत डावी कडून सहावे. त्यावर क्लिक करा.
शब्द लिहिताना अकारांता साठी एक a आणि आकारांतासाठी दोन: aa (उदा: saat = सात). बाकी सरळ आहे.
s = स, S = श, t = त, T = ट. याप्रमाणे असे इतर अक्षर लक्षात येतील.
तसेच Th = ठ, Dh = ढ, jn = ज्ञ.
करा सुरवात, येईल.
प्रयत्न करण्या साठी चाचणी
प्रयत्न करण्या साठी चाचणी धागा वापरु शकता: http://www.maayboli.com/node/1565
@ चॉकलेट बॉय,
@ चॉकलेट बॉय,
मी तुमचा मजकूर
इथे चिकटवला. व तिथून इथे कॉपी पेस्ट केले. वाचायला बरेच सोपे जाईल असे वाटते.
खूप दिवासंपसून एथले सगळे अनुभव वाचतोय. खूप छान आहेट सगलयांचया गोश्टी. मलाही एक छोटसा अनुभव संगेचा आहे. हा अनुभव मज़ा स्वतचा नही, माज़या मिट्रचा आहे. साधारण डेक 2015 मढ़े मज़ा मित्रा आनी त्याचया कॉलेज छा मिटरापरिवार गोआ ला पिक्निक साथी गेले होते. डेक छा महीना असल्यमूले गोआ पूर्ण पॅक आस्तो हे सर्वाना माहिताछ असेल. त्यमूले सगलयांची रहन्यची साय एकच तिकनी ज़ालि नही .त्यमूले ग्रूप डिवाइड हौं 2 वेगवेगलया तिकनी राहिले. त्यपाइकी मज़ा मित्रा आनी त्याचे 3 मित्रा एके तिकनी रहट होते. दिवसभर सगळे फिरून मज़ा करूँ संध्यकाली अपपल्या रूम वार जयाचे आनी फ्रेश हौं रात्रि पुँहा भेटयछए. मज़ा मित्रा आनी त्याचे 3 मित्रा रोज दूसरया ग्रूप च्या रूम वार रात्रि जयचए. तार एक रात्रि नह्मिप्रमाने चौघे जान, रात्रि धूमकूल घालयला निगले. रासट्यत एके तिकनी खुपच ट्रॅफिक जाम ज़ले होते. त्यपाइकी एक मित्रा म्हानाला " माला एक शॉर्टकट माहित आहे अपन तितून जौया ". सगळे जान टायर ज़ले . प्रत्यककड़े भादाने घेत्लेलया स्कॉटी होतया . चौघे जान निगले . ज्या रासताने ते जात होते तो रास्ता आतिशे सुनसान होता. टाइद रासतयाचया दुतर्फा अनेक बास्की घर होती, पं सगली पदाकी आनी बंद होती . हालू हालू त्यांचा लक्षात अले की ती एक उजाड़ वस्ति होती .तरीहि सगळे जान शंतपाने गाड़ी चलवाट होते. कोनीही कोनशी कही बोलत नवाते. एक विशिस्ता वलन एतच त्याना दिसले की त्यापूधचे सगळे स्ट्रीट लाइट बंद आहेट. जसा त्यानी तो तुर्न क्रॉस केला तसा चौघनचयाही हेडलाइट एकच वेली बंद ज़लया आनी चौघनचयाही खंदयावार कोनिटरी हट तेवाले. सुदईवने गडयाना साइड मिरर नस्ल्ाणे कोनाचीही पटकं मागे नज़र गेली नही. आनी कोनीही मागे वालून बाघीटाले नही. माला आश्चर्या वतळा अकून की त्यपाइकी कोनीही घबरला नही . परंतु सर्वाना परिस्थितिचही जनीव ज़ालि होती. साधारण 5 मिनिट गड़या चालवलयणंतर पूधील स्ट्रेयेटलाइट चालू होता. जासे त्यानी तो स्ट्रेयेटलाइट क्रॉस केला त्यांचया खाद्यवरुण हट कढ़ले गेले आनी त्यांचया हेडलाइट ओं ज़लया. ज्यावेली ते निश्चित तिकनी पोोचले त्यावेली एका मितरने विषय कढ़हाला ," एटना तुम्हाला कही जनवाला का ,माज़या मागे कोनिटरी बसला होता आनी त्ाने माज़या खंदयावार हट तेवला होता" सगलयांचा सेम अनुभव होता. यनंतर त्यानी टाइद नह्मिप्रमाने मज़ा मस्ती केली आनी पुँहा रात्रि साधारण 2 , 2.30 च्या सुमारस पुँहा आपल्या रूम कड़े निगले . मज़ा मित्रा आतिशहाना आहे आनी त्याचे मित्रा त्यहूं 2 पॉला पुधे. त्यानी मुद्दमूं त्याच रासताने परत जन्यचे तरवाले. जसा त्यानी तो स्ट्रीट लाइट क्रॉस केला , अधिसरखे त्यांचे हेडलाइट बंद ज़ले आनी कोनिटरी त्यांचया खंदयावार हट तेवला. यवेली ही कोनीही कही बोलाले नही. तासाच 5 मिनिट गाड़ी चलवल्यवर ते अधीचया वलनचया स्ट्रीट लाइट जवल पोोचले आनी अधिसरखच हट कढ़हाला जेला आनी हेडलाइट ओं ज़ले. हा अनुभव त्ाने अल्या अल्या माला संगीटाला यत माला स्वटाला जँवलेलया कही गोश्टी
1. सगलयांचाछ देवगन असवा , भूटे देवगनचया मांसला ज़पटु शकट नाहित
2. कोनीही चुकून मागे वालून पहीले नही हे नाशिब
3. आतिशे मूर्खापनची गोश्ता- पुँहा त्या रासताने जाने याने कदाचित् ती अमानवीय शक्ति दिवचली जन्यची शक़याटा होती की , 'पुँहा आलात के यवेली सोडनर नही तुम्हाला'
4.ज़्याप्रमाने हेडलाइट बंद पदाले त्यप्रमाने एखद्याची गाड़ी बंद ज़ालि अस्ति तार यांची के हालत ज़ालि अस्ति देव जाने
पं एक गोश्ता मात्रा खरी आहे की मितरने खोती गोश्ता रचून संगीतली नवती कारण तसा तो निडर आहे . कदाचित् मी तो अनुभव नित मांडू शक्लो नहिए. तुमचा प्रतिसाद ज़रूर कालवा .
इंग्लीश मधे लिहुन जितकं समजेल
इंग्लीश मधे लिहुन जितकं समजेल त्यापेक्षा हे समजतंय सपनातै. >>> tumhalaasechchanasamajataselatarathikaahemalatarimuddamunromanamadhemaaybolitkasekaylihitatahekalatnahikaranbydefaultdevnagarimadheselectkaratoswitch.
(No subject)
मानव , शाम , कावेरी खूप खूप
मानव , शाम , कावेरी खूप खूप आभार. नक्की प्रयत्न करेन.
सपना हरिनामे> पुढच्या वेळी नीट टाइप करेन यावेळी सूट द्या Happy
पुढच्या वेळी नीट टाइप करेन
पुढच्या वेळी नीट टाइप करेन यावेळी सूट द्या >>> जमलं म्हणजे देवनागरी मधे टंकायला. मला काळजी वाटत होती कि बाय डिफॉल्ट मायबोली देवनागरी लिपी घेत असताना तुमच्याकडे रोमन कसे काय टंकले जाते ? काही बाहेरची बाधा तर नाही ना कीबोर्डला ?
>>> ajunahi kahi aiklele
>>> ajunahi kahi aiklele kisse mala sangaychet <<<<<
रोमन मध्ये टंकत बसाल, तर मजकुर खात्रीने "इग्नोर मारला जाईल
तुमची आधी दिलेली गोष्ट रोमन मध्ये असल्याने मी वाचली नाहीये.
जमतय हो तयिप करयला तुमला..
जमतय हो तयिप करयला तुमला.. थोदा प्रयत्न हवा... बकि हलुहलु जमयला लगेल.
मला अता जमयला लग्ले आहे... अता बरेच शब्द नीत तयिप होतात
@ चॉकलेट बॉय>> तुम्ही "
@ चॉकलेट बॉय>> तुम्ही " google input tool " वापरू शकता . एखादे वाक्य टाईप करता करता वेगवेगळ्या शब्दांची टूल टीप येते त्यामुळे खूप सोपे जाते लिहिताना आणि फास्ट पण होते
परवाचीच गोष्ट मला रात्री
परवाचीच गोष्ट मला रात्री स्वप्न पडले साधारण २ वाजता की खिडकी बाहेर कोणी आहे आणि मी बघायला गेले तर बाहेर कोणी नाही दिसले पण खिडकीपाशी पण घराच्या आत आई उभी होती आणि मी विचारते आईला तू इथे का उभी आहेस जा झोपायला आत आणि बेड कडे मी बोट दाखवते आणि आत बघते तर आईसारखीच किंबहूना आईच बेडवर झोपलेली आणि मी गोंधळले कि दोन दोन आई कशा ??? मग ह्या स्वप्नातून जागी झाले . खूप भयाण अशी जाणीव झाली आणि काळजीने आईकडे बघितले तर आई शांत झोपलेली तेवढ्यात आई झोपेत ओरडायला लागली मग मी जागे केले तर म्हणतेय मला माहेरच्या पाचखाणातील स्वप्न पडले कुणाची तरी साडी दिसली !!
मला जेव्हा भयाण स्वप्न पडले तसेच आईला पण का पडले आणि ते ही जवळ जवळ सेम टायमिंगला !!!
रोमन मध्ये टंकत बसाल, तर
रोमन मध्ये टंकत बसाल, तर मजकुर खात्रीने "इग्नोर मारला जाईल Happy
तुमची आधी दिलेली गोष्ट रोमन मध्ये असल्याने मी वाचली नाहीये.>>> + १
@ चॉकलेट बॉय: एका ठराविक
@ चॉकलेट बॉय: एका ठराविक वयानंतर आयुष्यात इतक्या जबाबदाऱ्या वाढतात आणि ताण तणावांना सामोरे जावे लागते कि भूताखेतांची भीती त्यापुढे काहीच नाही. म्हणूनच मी यावर विश्वास ठेवत नसूनही असे अनुभव/गोष्टी केवळ मनोरंजन म्हणून वाचतो. म्हणूनच तुम्ही रोमन मध्ये लिहूनही मी ते वाचले. खूपच रोमांचक अनुभव. जर शक्य असेल तर त्या मित्राला हा रस्ता नक्की कोणता हे विचारून घ्या. त्यामुळे लिखाण अजून वास्तववादी होईल. या धाग्यावर मुळातच अशा अनुभवांच्या खूप कमी पोष्ट येत आहेत. त्यामुळे ज्या येतात त्यांना आपण प्रोत्साहन देणे आवश्यक असे माझे मत आहे.
>> तुम्ही " google input tool " वापरू शकता
मी पण हेच सुचवणार होतो. मराठी टायपिंगसाठी सर्वात जलद मार्ग सध्या हाच आहे.
http://www.google.co.in/inputtools/try/
@chocolateboy tyat kay karni
@chocolateboy tyat kay karni ahe samjaun sangave plz
@chocolateboy tyat kay karni
@chocolateboy tyat kay karni ahe samjaun sangave plz > करणी काय होती मला कल्पना नाही. पण प्रत्येक जण एकटा एका गाडीवर होता. अचानक हेडलाईट बंद झाली आणि कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवले म्हणजेच अचानक कोणीतरी मागे येऊन बसले. इतकंच . आणि याला करणी म्हणता येईल का याबाबत शंका आहे.
atuldpatil >>खूप आभारी. आपला विश्वास नसूनही आपण अनुभव वाचलात आणि आपल्याला तो आवडला. मित्र भेटला कि नक्की त्याला त्या रस्त्याबद्दल विचारेन. अजून २ अनुभव सांगावयाचे आहेत. आधीच नमूद केल्याप्रमाणे हे अनुभवही माझे नाहीत.
आमचं गाव साताऱ्यात पुसेसावली
आमचं गाव साताऱ्यात पुसेसावली जवळ वडी-तिरमली आहे. तिथेच हि पालखी ऐकली आहे वडिलांकडून पण त्यांना त्याच्या आजोबानी सांगितलेला किस्सा त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. नागझिरी ते वडी असे अंतर पूर्वी चालत पार केले जाई. जिथे आज वाहनाने अर्धा तास तरी लागतो ... तर जुना रास्ता डोंगरातून आणि थोडया रानातून पायवाट अशा प्रकारे लोक ये जा करत तिथे
एकदा माझ्या वडिलांची आत्या च्या नात्यात कोणाकडे तरी काही कामानिमित्त ते गेले होते. त्यांचं वय तेव्हा १२ तरी असेंन त्यांना घरी आधीच बजावून ठेवले होते तिन्हीसांजेपर्यंत ये घरी, पण तिथे गावातून निघताना दुपार टळून गेलेली होती. त्यांना तिथून सर्व जण अडवत होते, या वेळेला जाऊन पोचायला रात्र होईल पण त्यांनी ऐकले नाही. मला इथे राहायचे नाही मी पटापट जाईन असे सांगून ते निघाले. अर्धा रास्ता नीट पार झाला परत एके ठिकाणी त्यांना काय हुक्की आली,त्यांना थोड़ीशी डुलकी काढावीशी वाटली, म्हणून तिथेच एका वडाच्या झाडाखाली ते झोपले त्यांना वाटले उठेन अर्ध्या तासात... असे पण ४ वाजता निघालोय ७ वाजेपर्यंत पोचू आणि इथेच त्यांचा अंदाज चुकला.
याना जाग आली तेव्हा पूर्ण रात्र झाली होती आता मात्र काहीच कळतं नव्हत नक्की किती वाजलेत आणि आपण केव्हा पोचू ना हातात घड्याळ ,नाही प्रकाशाचं साधन .... त्यांनी तरी सुद्धा घराचा रास्ता धरला आणि चालू लागले मधेच त्यांना अचानक हलगीचा ,पिपाणीचा आवाज आला जस कि कोणती पालखी आसपासुन निघाली आहे, पण दिसत तर काहीच नव्हत खूप दूरवर बघायचा प्रयत्न केला पण चंद्राच्या प्रकाशात काय दिसणार अचानक त्यांना १०-१२ जणांचा ग्रुप वाजवत जाताना दिसला, ते फार खुश झाले निघाले त्या ग्रुप मध्ये तेही कारण त्यांच्याजवळ कंदील होता त्यांना वाटलं तेवढीच सोबत अश्या एकांतात....
पण त्यांना नंतर अचानक वाटलं कि कोणीतरी त्यांना मागे खेचल वळून पाहिलं ते त्यांचे बाबा होते त्यांच्यासोबत ५-६ जण गावातील मंडळी होती नंतर पुन्हा त्यांनी पुढे पालखीच्या दिशेने पहिले तर ती पालखी एका पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यात आत जाऊन लुप्त झाली ... तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला तोवर बाबानी त्यांना घट्ट धरून ठेवलं होत . पुढे त्यांनी घरी आल्यावर ऐकलं ती वेताळाची पालखी होती, ते वेळेत घरी आले नाहीत तिन्ही सांजेपर्यंत म्हणून त्यांचे बाबा काही माणसं घेऊन त्या रस्त्याला लागले होते त्यांना आणायला आणि त्यांनी जे पाहिलं त्यात जर त्यांनी आजोबांचा हात धरला नसता तर ती पालखी त्यांना कायमच घेऊन गेली असती हे ऐकून ते ४-५ दिवस आजारीच पडले अशीच त्याच रस्तावर अमावस्येला लग्नाची वर्हाडी दिसतात अगदी अशीच ...कारण एका वरातीवर वीज पडून सर्वजण जळुन मेले होते .......
व्याकरणाच्या चुका असतील तर क्षमस्व ...पहिल्यांदा माबो वर लिखाण केले आहे
बाप रे प्रिया
बाप रे प्रिया
चित्तथरारक आहे अनुभव अगदी.
हो मी ह्या पालखी बद्द्ल ऐकले
हो मी ह्या पालखी बद्द्ल ऐकले आहे.सेवागिरी महाराजांच्या पुसेगाव जवळ आहे ना ?
बापरे बापरे किती भयंकर . गेले
बापरे बापरे किती भयंकर . गेले दोन दिवस हा धागा वाचतेय, कधी हसु तर बरेचदा अंगावर काटा उभा राहतोय. आता ट्रेनमधेआहे , दिवा स्टेशन यायचं आहे आणी ट्रक मधे कोणीतरी आहे असा भास . अजुन जुना धागा वाचायचा आहेच.
मला हा धागा वाचुन नेहमीच
मला हा धागा वाचुन नेहमीच प्रश्न पडतात पण मी विचारायला जामच घाबरते.
@प्रिया येवले: खूपच थरारक कथन
@प्रिया येवले: खूपच थरारक कथन. मी गुगल मॅप वर पाहिले. नागझरी ते वाडी थेट रस्ता नाही. मध्ये बऱ्याच छोट्या मोठ्या डोंगर दऱ्या आहेत. पाच सहा किमी चे अंतर दिसतेय. थोडीफार शेतीही आहे. दाट झाडीतून जाणारी वाट दिसतेय. बहुदा इथेच कुठेतरी तुम्ही म्हणता तो प्रकार घडला असावा.
@राया: का घाबरता? मलाही प्रश्न पडतात आणि मी पण विचारायला घाबरतो. कारण कथेमधली मजा निघून जाईल म्हणून.
पालखीचं नाही ऐकलं कधी पण
पालखीचं नाही ऐकलं कधी पण भुतांच्या जेवणावळीचं ऐकलंय. पण एकही किस्सा नीट लक्षात नाही. इतकंच लक्षात आहे की भुतांच्या जेवणावळीत पंगतीला जाण्याच्या पैजा लागतात. ते वाढत असताना बास म्हणायचं नाही आणि कुणाशी बोलायचं नाही एव्हढंच लक्षात आहे. कुणीतरी रिफ्रेश करून दिलं तर लिहीन मग.
>>>मी पण विचारायला घाबरतो.
>>>मी पण विचारायला घाबरतो. कारण कथेमधली मजा निघून जाईल म्हणून.-
मी विचारायला घाबरते कारण भुतंच आली उत्तर द्यायला तर काय? मी घरी एकटी असते काहीवेळा, बाकीचे वर्क ट्रॅवलसाठी बाहेर असतात तेव्हा. आणि आमचे घर जरा डोंगराळ प्रदेशात आहे. रात्री फार म्हणजे फारच सन्नाटा असतो
मी पण विचारायला घाबरतो. कारण
मी पण विचारायला घाबरतो. कारण कथेमधली मजा निघून जाईल म्हणून>>>. +१
अमानवीय वरिल अनुभव आमच्या
अमानवीय वरिल अनुभव आमच्या सिक्युरिटि गार्ड ला सांगितले तर त्यांनि मला सांगितले कि आपण आता जेथे बसलो आहोत तेथे पूर्वी स्मशान होते व तेथे लहान मुलांना पुरले आहे.
@ प्रिया येवले मी पुसेसावली
@ प्रिया येवले मी पुसेसावली जवळ असलेल्या वडूज गावामध्ये कामानिमित्त २ वर्षासाठी होतो. तुम्ही जो दुसरा अनुभव लिहिला आहे (अमावस्येला लग्नाची वर्हाडी दिसतात ) त्याबद्दल मी ओझरतं ऐकलं आहे. पण त्यावेळी खरं वाटलं नाही.
जर शक्य असेल तर त्या मित्राला
जर शक्य असेल तर त्या मित्राला हा रस्ता नक्की कोणता हे विचारून घ्या.>> ओल्ड पणजी रोड होता असा म्हणाला. नीटसा आठवत नाहीये त्याला.
Pages