अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऐक ऐकलेली कथा.

शहराचे आणि हॉस्पिटल चे नाव मुदाम टाळत आहे.

माझी मैत्रीण एका हॉस्पिटल मध्ये कामाला आहे, तिथे रोज रात्री १२ ते १२.३० शवगृहात जाणारी लिफ्ट खाली शवगृहात जाते आणि ५ मिनीटांनी टेरेस वर जाते,लिफ्ट मध्ये कोणीही नसते. १० मिनीटांनी लिफ्ट आपोआप बंद होते आणि शवगृहात जाऊन थांबते. एकदा २ वॉर्ड बॉय त्या लिफ्ट मध्ये अडकले होते लिफ्ट वर टेरेस आणि परत शवगृहात आल्यावरच त्यांना त्या लिफ्ट मधून बाहेर पडता आले. खरा खोटं माहीत नाही पण हा प्रकार रोज रात्री घडतो असे शपतेवर सांगणारी आहेत.

माझ्या मित्राच्या बाबत घडलेला किस्सा

पुण्यात मैदानी खेळात मन काही रमलं नाही...घरातच पैलवानकी .. राजू मात्र मला लोळवायचा...
आज राजू ची पाठ मातीला लावयचीच असं ठरवून बस मधून उतरलो.. थेट डोहा च्या मैदानात गेलो...राजु एकटा च मेहनत करत होता..
त्याला आव्हान दिले...सलामी झाली....अर्धा तास झोम्बॅ झोम्बी झाली...
पण आज मात्र मी राजुला पुरते लोळवलं होतं....
आनंदाच्या भरात मी गावात आलो...पारावर सगळ्यांना सांगितलं....आज मी राजुला लोळवलं ! अक्ख पार गप्प !
राजू च्या घरी गेलो....
राजूच्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...
तिनं आत बोलावलं !
माझं भिंतीवरच्या माळ घातलेला फोटो कडे लक्ष गेलं....दरदरून घाम फुटला...शब्द गोठले...
राजु ची आई म्हणाली , आजच राजुचा महिना घातला...गेल्या अमावस्येला राजू डोहात पाय घसरून पडला...पैलवानकीचे डाव शिकला तसं पोहायला का नाही शिकला !

खूप वेळाने विचार मनात आला , राजू ने आज स्वतःच स्वतःची पाठ लावून तर घेतली नसेल ना ? जीवंत मित्राला जिंकून देण्यासाठी...

@सुश्या हा किस्सा मित्राने सांगितला आहे .. तेव्हा तिथे मी खरा खोटा करायला नव्हतो पण त्याच्या घरच्यांनी मान्य केला होता.. बाकी मी बरेच ठिकाणी असा काही अनुभव घेण्यासाठी फिरलो पण मला अनुभव आला तो माझ्याच शहरात .... मी तो आधी पोस्ट केला आहे

मागच्या महिन्यात घरी गेलो होतो. समोरच्या घरात घडलेली एक छोटीशी घटना कळली. आमच्या समोर राहत असलेल्या कुटुंबात आई, वडील आणि २ मुली आहेत. काकू लहान मुलांचे क्लासेस घेतात. काही दिवसांपूर्वी अचानक त्यांच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या.
१. एके रात्री काकू बाथरूमसाठी उठल्या. बाथरूम ला जाऊन आल्यावर सवयीप्रमाणे त्या बाथरूम चा लाईट आणि दरवाजा उघडा ठेऊन किचन मध्ये पाणी प्यायला गेल्या. अचानक धाडकन दरवाजा बंद झाला. प्रथमदर्शी कोणीही म्हणेल कि हवेने बंद झाला असणार. परंतु पूर्ण उघड असलेला दरवाजा तोही मार्च महिन्यात (ज्यावेळी मुंबईत हवेचा लवलेशही नसतो ) बंद होणे जवळ जवळ अशक्यच. त्यातून त्यांच्या घरात हवा खेळायला मुळीच जागा नाही. तरीही काकूंनी असेच काहीसे गृहीत धरून दुर्लक्ष्य केले.

२. क्लासला आलेल्या अनेक मुलांनी बाथरूम मध्ये गेले असता , एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येतो असे सांगितले. तरीही काकूंना वाटले मुले मस्ती करत आहेत, बाहेर असणाऱ्या मुलांपैकी कुणीतरी खोडी करत असेल. लहान मुलांना ताकीद होती कि बाथरूम मध्ये असताना दरवाजा बंद करायचा नाही. तरीही अनेक वेळा दरवाजा आपोआप लॉक होत असे. हे सारे बघून काकूंना संशय आला होता. तरीही त्यांनी घरात कोणाला काही सांगितले नाही.

३. काकूंची मोठी मुलगी रोज रात्री अभ्याससाठी जागत असे. एके रात्री तहान लागल्यावर पाणी प्यायला उठली. पाण्याचा ग्लास तिने टेबलावर ठेवला. काहीतरी करायला ती वळली असताना ग्लास थाड्कन खाली पडला. तिचा धक्का लागून ग्लास पडणे शक्य नव्हते कारण ती टेबलापासून लांब होती. आणि तिच्या सांगण्याप्रमाणे नक्कीच तो कोणीतरी पाडला होता. कारण तो खूप लांब जाऊन पडला होता, जणू कोणीतरी त्याला जोरदार फटका मारला असावा.

त्यांचे वडील रात्रपाळीस जात असत त्यामुळे त्यांना याची काही कल्पना नव्हती. आणि ते रागावतील म्हणून काकूंनी आणि मुलींनी त्यांना काही सांगितले नाही. परंतु हळू हळू घरातले प्रकार वाढू लागले. अचानक वस्तू खाली पडणे, दरवाजे आपोआप लॉक होणे. त्या तिघींपैकी घरी एकटे कोणीच राहत नसे. रात्रभर हनुमान चाळीस आणि रामरक्षा मोबाइलवर लावून ठेवत.

एके दिवशी पहाटे त्यांचे वडील लवकर आले असता , त्यांनी तिघींना जागे पहिले. तेव्हा त्यांना सारा प्रकार सांगण्यात आला. सर्वप्रथम त्यांनी विचारले कि घरात कोणती नवीन वस्तू आणली आहे का ?
सगळी कडे शोधाशोध केल्यावर त्यांच्या लक्षात आले ,कि दरवाज्यावर विचित्र काहीतरी लटकत होते. मुलींना विचारले असता असे कळले कि धाकट्या मुलीचा कोणी मित्र आसामला फिरायला गेला असता , त्याने सर्वाना द्यायला तीथुन हाताने तयार केलेला शो-पीस आणले होते. ते फारच विचित्र प्रकारचे होते त्यात विविध रंगाचे मणी आणि लहान घंटा होत्या. ताबडतोब त्यांच्या वडीलांनी ते शो-पीस काढले आणि खाडीत विसर्जित केले. त्यानंतर त्यांच्या घरी सर्वकाही सुरळीत झाले.

हि गोष्ट ऐकल्यावर मी गुगल वर सर्च केले असता असे कळले कि, आसाम मधील मयोंग गाव हे काळ्या जादूची राजधानी म्हणून ओळखले जाते. The land of black magic. या ठिकाणी अतिशय प्राचीन अश्या काळ्या जादूची साधन केली जाते. अनेक वेळा याचा उपयोग करणी, जादूटोणा, मूठमारी उतारण्यासारख्या कामीही केला जातो.

कदाचित आसामला गेले असताना त्या मित्रांन अश्याच एखाद्या गावातून ते शोपीस आणले असावे, असा माझा कयास आहे.
खरेखोटे देव जाणे. परंतु वेळीच त्यांनी ते विसर्जित केल्यामुळे धोका टळला असे म्हणायला हरकत नाही.

कोणतीही नवीन गोष्ट घरी आणताना काळजी बाळगावी. दरवाजे, खिडक्या, पॅसेज अश्या ठिकाणी शक्यतो ठेवणे टाळावे.

दुसरी गोष्ट काकूंनी लहान मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष्य केले. अमानवीय शक्ती सर्वप्रथम लहान मुलांना बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा आपण लहान मुले खोटे बोलत आहेत असे समजून त्यांनाच ओरडतो. याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

टीप - माझ स्वतःच त्यांच्याशी काही बोलणे झालेले नाही. हा सर्व अनुभव मी आईकडून ऐकला आहे आणि तसाच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

@Chocolateboy
आयला म्हणजे शोपीस डेंजर लागला की राव

@परस्वा फक्त शोपीसच नाही ,ब्रेसलेट ,किचेन ,अंगठी अश्या अनेक गोष्टी अभिमंत्रित असू शकतात. कधी कधी आरसे सुद्धा. आरश्यावरून आठवला , ब्लडी मेरी ची जगविख्यात गोष्ट माहीतच असावी सगळ्यांना. मलाही संपूर्ण गोष्ट नीटशी आठवत नाही. मेरी नावाची कोणी एक हडळ (का जखीण, का चेटकीण, तिलाच माहित ) होती. तिला मारण्यासाठी एका आरश्यात कैद करण्यात आले. त्यानंतर असा समाज आहे कि कोणत्याही आरश्यासमोर उभे राहून ३ वेळा तिचे नाव पुकारले असता ती परत येते आणि आणि आवाहन करणाऱ्यास मारून टाकते. हि परदेशातील खूप प्रसिद्ध दंतकथा आहे. कोणाला याबद्दल अधिक माहिती असावी तर शेयर करावी.

बाप रे
चॉकलेट बॉय, तुम्ही टाकलेले दोन्ही किस्से वाचून अंगावर शहारा आला.

धन्यवाद . नक्कीच , जसे मला आठवतील किंवा कळतील तसे लगेच लिहीन. मीही नवीन अनुभवांच्या आणि गोष्टींच्या शोधात असतोच.

माझ्या मित्राने सांगितलेला किस्सा ... त्याच्या आजोबां बाबत

माझ्या आजोबांच्या बाबतीत घडलेला...जेव्हा साधारण माझे आजोबा तरुण वयाचे असतील तरी पण साधारण 26-२७ वर्षाचे..असेच एकदा आजोबा मुंबई वरून सकाळच्या बोटीने गावाला आले होते...ऐन पावसाचा मौसम असल्याने बोट जरा उशिराच मुसाकाजी धक्क्याला लागली होती...मुसाकाजी हे आंबोळगड जैतापूर यांच्या मधील एक शांत बंदर आहे....आजोबा उतरले तेव्हा साधारण ९.३० किंवा १०.०० वाजले असतील...जरी पूर्वीची माणसे घड्याळ वापरात नसलीत तरी समुद्राच्या हवेच्या झोत कोणत्या दिशेला आहे...हवा कशी आहे कितपत आहे...ह्यावरून हि अंदाज लावत असे कि आता मध्यरात्र झाली आहे कि तीनसान..तीनसान म्हणजे तिने सज्ज्यांचा वेळ..म्हणजे शुद्ध मराठीत संध्याकाळ ७ ते ८ च्या मधला कालावधी...तर असेच आजोबा जेटीवर उतरले आणि बाहेर पाऊस खूप म्हणून छत्री उघडली आणि आपले एकटेच पायी चालू लागले...कारण त्या काळी जर कोणी येणार असेल तरच टांगा वगैरे बोलवायचेत...टांगा म्हणजे बैलगाडी होय ...घोडागाडी नव्हे....पाऊस हि खूप होता त्यामुळे अजूनच अंधार पडला होता..आणि त्यात अमावस्या हि होती त्यामुळे रानात साधा चांदण्याचा प्रकाश हि पडला नव्हता...आणि घराकडे जाणारा रास्ता हा पूर्णपणे समुद्रकिनारी ला लागून जाणारा होता..आणि सभोवताली सुरु ची झाडे म्हणजे सुरु बन..आणि नेमकी पायवाट हि सुरुच्या बनातूनच गेली होती...आजोबा शांतपणे एक एक पाऊल पुढे हळू हळू टाकत होते... अचानक चालत चालता आजोबाना पुढे काही अंतरावर मिणमिणता कंदिलाचा प्रकाश दिसला...आणखी पुढे aalyavar असे लक्षात आले कि तो कंदील नसून काही मशाली पेटत ठेवल्या आहेत..मशाली चांगलीच धगधगत पेटत होत्या...पण कोण बार पेटवून गेलं असेल ह्याचा काही अंदाज मात्र आजोबाना लागत नव्हता...दूरदूरवर कोणी दिसत नव्हते..आजोबा मात्र चालतच राहिले आणि आणखी पुढे आल्यावर एक पिंपळाचे झाड होते आणि त्या पिंपळाच्या झाडाच्या आजूबाजूला कोण तरी रडत आहे असा आवाज येत होता...तो आवाज एका बाईचा होता...आजोबाना कदाचित वाटले कि वर वाडीवरची कोण तरी बाई असेल...नवऱ्यासोबत तिचा भांडण झालं असेल म्हणून येऊन रडत असेल...म्हणून आजोबा पुढे चालत राहिले पण हळूच आजोबांची नजर सुरुबनात गेली आणि ते पाहून आजोबा गार च झाले..कारण समोर पारदर्शक आरपार समोरचे दिसेल अश्या स्वरूपात एक आकृती होती जणू काही तिचे पाय जमिनीला ना टेकता havet तरंगत होते...ती एक केस मोकळे सोडलेले बाई होती...चांगली उंच धिप्पाड आणि हाता पायाने जाड जाड...(हो पण साडी मात्र पांढरी नव्हती) माळकटलेली साडी होती....पण तिची ती आकृती पाहून आजोबांची मात्र चांगली पाश्चयावर धारण बसली....आजोबा मात्र राम नाम चा जप करत कसे बसे घरी पोहोचले....आणि घराची पायंडा चढतानाच एक आवाज आला ...वाचलस रे वाचलंस बा....

कुठेतरी वाचनात आले म्हणून इथे टाकतो आहे

आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा वासना आणि कामानामय शरीरात निवास होतो तेव्हा त्याला प्रेतात्मा म्हणतात.हिच आत्मा जेव्हा सूक्ष्मतम शरीरात प्रवेश करते तेव्हा त्याला सूक्ष्मात म्हणून संबोधले जाते.

वासना अतृप्त असताना, अकाली, बाळंतपणात, रजस्वला असताना, अपघात तसेच विश्वासघात, आत्महत्या इ. कारणांनी मृत्यू आल्यास व्यक्ती भूत बनते. भूताप्रेतांची गती तसेच शक्ती अपार असते यांचे वेगवेगळे प्रकार असतात.हिंदू धर्मातात गती व कर्मनुसार मेलेल्या जीवांचे वर्गीकरण केले जाते.आयुर्वेदात 18 प्रकारचे प्रेतात्मा आहेत असे सांगितले आह तसेच पिचाश, प्रेत, आसरा, डाकिन, शाकिन, ब्रह्मसमंध, मुंजा, गिऱ्हा, लावसटीन, हडळ, हाकाट्या, वेताल, खवीस, कृष्मंडा, क्षेत्रपाल, मानकाप्या, कर्णपिचाश, विरीकास असेअनेक प्रकर सांगितले जातात .

या प्रेतयोनीत जाणारे लोक अदृश व बलवान बनतात परंतु सगळेच मरणारे जीव प्रेतयोनीत जात नाहीत वा सगळेच बलवान होत नाहीत. ते आत्माच्या कर्म व गतीवर अवलंबून असते.
भूतानमध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामधील काही खालीलप्रमाणे प्रेत :- जेव्हा एखादी व्यक्तीचा हिंसात्मक मृत्यू होतो आणि त्याचा अंत्यविधी केला जात नाही तेव्हा तो जीव प्रेत बनतो . प्रेत हे खूप स्वार्थी आणि शक्तिशाली असत .
हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा . अनेक वेळा ह्या कबरीतून प्रेत काढून ते मांत्रिकाला देण्याच काम करतात . मांत्रिकाला लागणारी कवटी , हाडे सुध्धा ह्या पुरवतात . हडळी ह्या माणसांचा ताबा घेतात आणि नंतर त्यांना मारतात.
शाकिन- लग्न झाल्यानंतर काही दिवसातच मरण पावण्यार्या तसेच अपघातात मृत्युमुखी पाडणाऱ्या स्रीया शाकीन बनतात.
डाकिन- डाकिन हे हडळ व शाकीन चे मिळतेजुळते रूप आहे.ज्या स्रीयाचा हिंसात्मक मृत्यु होतो त्या स्रीया डाकिन बनतात.डाकिन या दिसायला खुप कुरूप व शक्तिशाली असतात. त्या नेहमी आपल्या हत्या बदल्यचा फिराक मध्ये असतात.
जी हिंदू स्त्री बाळंतपणात मरते व भूत होते तिला ' अलवंतीण 'असे म्हणतात ! हॉस्पिटल सारख्या ठिकाणी अलवंतीण हमखास दिसते .
' अस्रा ' सात असून त्या ब्राम्हण स्त्रियांप्रमाणे दिसतात . प्रत्येक अस्रेचा पोशाख वेगवेगळा असतो . या अस्रा ज्यांना पछाडतात ती माणसे नेहमी पाण्याकडे वळतात . मुसलमानातील ' परिस ' व हिंदूंमधील ' अस्रा ' एकच होत .
ब्रम्ह राक्षस ब्राम्हणाचा जर खून झाला तर तो ब्रम्हराक्षस होतो . गिऱ्हा पाण्यात बुडून मरणाऱ्याच्या भुताला गिऱ्हा म्हणतात. गिऱ्हा नेहमी ज्या ठिकाणी मारतो तेथेच घुटमळत असतो .
विद्वान ब्राम्हण मारून जर पिशाच्च योनीत गेला तर “ब्रम्ह्समन्ध” होतो .ब्रम्ह्समन्ध सहसा कोणाला त्रास देत नाहीत उलट लोकांची मदत करतात . ब्रम्ह्समन्ध माणसांप्रमाणेच दिसतो . त्यांना स्पर्श केला तर ते ' केळीच्या खुंट्या ' प्रमाणे थंड स्पर्श जाणवतो.
"वेताळ” हा भूत - पिशाच्चांचा राजा असून त्याचे शरीर व अवयव मनुष्याप्रमाणेच असतात . डोळे हिरव्या रंगाचे असून डोक्यावरील केस ताठ उभे असतात . तो आपल्या उजव्या हातात चाबूक व डाव्या हातात शंख धारण करतो . तो फेरीस जातो त्या वेळी संपूर्ण हिरवा पोशाख करून पालखीतून किंवा घोड्या वरून फिरतो . त्याच्या आगेमागे बरीच भूते असतात . त्यांच्या हातात जळत्या मशाली असतात व ती मोठ्या मोठ्याने आरोळी मारीत असतात
खवीस- खवीस पठाण लोकांचे भुत आहे, अफगाणिस्तान, गल्फ ई देशांत जास्त प्रमाणात असतें काही ठिकाणी यांना राक्षस म्हणून ओळखल जात . खविस नेहमी त्यांच्या कुटुंब बरोबर राहतात . खविस लग्न सुध्धा करतात आणि त्यांना मुल देखील होतात. अस म्हणतात की खाविस लोखंडाहून जास्त बळकट असतो. जो पण त्याला कुस्तीत हरवतो, खवीस त्याला आशीर्वाद देतो व ती व्यक्ती श्रीमंत बनते.
चकवा :- हा भूताचा प्रकार नसून ही एकप्रकारची भूतांची भूल देण्याची पद्धत आहे. हा जास्त करून रात्री दिला जातो . यात त्या व्यक्तीला एकप्रकारचा आभास होतो . आणि तो व्यक्ती त्या आभासाच्या पाठीपाठी जातो . आणि ती व्यक्ती इच्छित स्थळी आली की भूत त्याचा जीव घेत . अनेक वेळा चकवा बसलेली व्यक्ती रात्रभर एकाच जागेवर भटकत असते पण तिला त्याच भान राहत नाही .
मानकाप्या :- याला स्वताला मुंडक नसत . हा कधी घोड्यावर तर कधी चालत फिरत असतो . अस म्हणतात कि मानकाप्या हा लोकांची मुंडकी उडवतो . हाकाट्या . जे लोक अपघातात मारतात ते हाकाट्या होतात . हाकाट्या हाका मारत रस्त्यावरून फिरतो, याला जर चुकून ओ दिलीत की काम तमाम. हाकाट्या निर्जन स्थळी जास्त आढळतो .
कर्णपिशाच्च भविष्यकालीन घटना सांगणाऱ्या भुताला कर्णपिशाच्च म्हणतात. कर्णपिशाच्च हा साधनेद्वारे प्राप्त करता येतो . पण एकदा का त्याला वश केल का तो आयुष्यभर मानगुटीवर बसून राहतो . साधकाचा शेवटी अत्यंत दुर्दैवी मृत्यू होतो.

भुत्या भाऊ, आजोबांचा किस्सा एकदम फेक वाटतोय, बोट उशीरा येणं, आमावस्या असणं, पावसाळा असल्याने पोर्णिमा असती तरी चांदण्यांचा प्रकाश नसता, त्यात बोट मुंबई हुन फक्त तुमच्या आजोबांसाठीच सोडली होती का? बाकी एकही माणुस जेटीवर उतरला नाही?
भुतं घरात आल्यावरच का वाचलंस असं ओरड्तात? जंगलात एकटा माणुस सापडुन पण काही करत नाहीत आणि घरात शिरलास की वाचलंस म्हणतात? उगाच गोष्टी बनवुन नका सांगु

मानकाप्या हे म्हणजे लोकांच्या फेकुपणाचे एक ज्वलंत उदाहरण आहे, काय त म्हणे हा लोकांच्या माना उडवत फिरतो. म्हणजे एक तर असा कोणता भुत अस्तित्वातच नाही, नाहीतर किती तरी उडवलेल्या मुंड्या आपल्याला सकाळी पहायला मिळाल्या असत्या

सॉरी भुत्या चुकुन 'तुमचे आजोबा' असा उल्लेख झाला आहे, त्या बद्दल क्षमस्व. पण तुमच्या मित्राने तुम्हाला फेक मारली आहे हे नक्की

भूतानमध्ये अनेक प्रकार आहेत. >> यावरून फाको करायची जाम इच्छा होतेय Proud

वैभव,सगळेच खोटे आहेत त्यातले पण एक मज्जा म्हणून किंवा डेटाबेस म्हणून भारीये हे वाचायला/ स्टोअर करायला

वैभव राव तुमचा काहीतरी गैर समाज झालेला दिसतोय ... मी कुठे हि म्हंटलं नाही कि हा किस्सा माझ्या फॅमिली बाबत झालाय ... ते मित्राने सांगितलं ...
मी स्वतः याकडे फार गाम्भीर्यने बघत नाही ... परंतु मला स्वतःला असा एक अनुभव आलेला आहे तो मी इथे टाकला होता मागे ...

बाकी यावर जास्त किस ना काढता थोडी करमणूक म्हणून पाहायला काय हरकत आहे ... शेवटी भय रस हा पण नाव रसापैकीच एक आहे ना ...

>> यावरून फाको करायची जाम इच्छा होतेय

मला पण Happy

एकूणात भूतांत सुध्दा ब्राम्हण वगैरे चातुर्वण्य तसंच धर्माचे भेद आहेत हे वाचून मजा वाटली. रजस्वला असताना मृत्यू आल्यास भूत होतं हे तर भारीच आहे. 'खविस लग्न सुध्धा करतात आणि त्यांना मुल देखील होतात. ' हे वाचून अनेक प्रश्न पडलेत पण ते इथे विचारणं योग्य नाही. Happy मानकाप्याला स्वतःचं डोकं नसताना लोकांची डोकी कशी दिसतात हेही गूढच.

>>हडळ :- दिसायलाच या भयानक असतात .हिच्या अंगातून एकप्रकारचा घाणेरडा वास येतो , सडलेल्या अंड्या सारखा

सडलेल्या अंड्याचा वास म्हणजे हायड्रोजन सल्फाईड.....ह्याचा एक इफेक्ट म्हणजे hallucinations. हडळ दिसणे हा त्याचाच भाग असावा.

पण बाळंतीणीचं भूत ह्याबाबत मात्र माझ्या आजोबांनी सांगितलेला एक किस्सा आहे. ह्याच्या आधीच्या धाग्यावर बहुतेक शेअर केला होता. परत करते. आजोबांचे वडिल अकाली जायच्या आधी आजोबा मेडिकलला होते. तिथे एक बाई बाळंतीण झाल्यावर गेली आणि तिचं भूत त्या खोलीत आहे अशी बोलवा होती. आजोबांचा 'भूत' ह्या कल्पनेवर विश्वास नव्हता....अगदी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर फॉरेस्ट खात्यात नोकरीला लागल्यावर रात्री अपरात्री जंगलात फिरायला लागलं तरीही. त्यामुळे त्यांनी त्या खोलीत एक रात्र काढायची पैज मित्रांबरोबर लावली. रात्री त्यांना एक बाई - मोकळे केस सोडलेली वगैरे - दिसली सुध्दा. ती त्यांना म्हणाली की तू मला घाबरला असशील तर तुला ताप येईल नाहीतर काहीही होणार नाही. अर्थात आजोबांना ताप वगैरे आला नाही. पण त्यांचं म्हणणं हे की ती बाई त्यांना स्वप्नात दिसली. ते पण लोकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून. ती प्रत्यक्षात नव्हतीच. खरं खोटं देव जाणे.

Pages