अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण २० २५ वर्षांपूर्वी गिरगावात खूप मोठ्या चाळी होत्या. त्यातीलच एका चाळीमधील हा छोटासा अनुभव आहे. हि चाळ आयताकृती असून मध्यभागी एक मोठा चौक होता. त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे शौचालये घरात नव्हती. प्रत्येक मजल्यावर ४ शौचालये होती. तळमजल्यावरील ४थ्या म्हणजेच शेवटच्या शौचालयात एका स्त्री ने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. मृत व्यक्ती बद्दल काही अचूक माहिती उपलब्ध नाही. काही जण म्हणतात कि ," घरच्यांच्या त्रासाला कंटाळून एका विवाहित स्त्री ने आत्महत्या केली." तर काहींचा म्हणणं ," प्रेमभंग झालेली युवती होती." त्यानंतर ते शौचालय कायमचे बंद करण्यात आले. त्यानंतर रोज रात्री ती त्या चौकात फेऱ्या मारायची. तिच्या पैंजणांचा आवाज खूप जणांनी ऐकलंय. अगदी स्वतःच्या घरातून दरवाज्याला कान लावून ऐकले असता बाहेरून तिच्या चालण्याचा आणि पैंजणांचा आवाज स्पष्टपणे ऐकू यायचा. हि गोष्ट खूप जणांनी अनुभवली आहे. पण मला माहित असलेले ३ जण खालील प्रमाणे

१. चाळीतील एका घरात खूप माणसे होती त्यामुळे झोपायला जागा पुरात नसल्याने घरातील मोठे आजोबा रोज रात्री घराबाहेरही मोकळ्या जागेत खाटेवर झोपायला लागले. पहिल्याच रात्री तिने त्यांच्या खाटेला लाथ मारली आणि बजावले कि इथे झोपत जाऊ नकोस हा माझा रस्ता आहे. पुन्हा इथे दिसला नाही पाहिजेस. आजोबांचा नाईलाज होता. मग कोणीतरी त्यांना सांगितले रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा म्हणून झोपा त्रास होणार नाही. त्यांनी तसे केले व नंतर त्यांना त्रास झाला नाही.

२. चाळीतील एक खोली छपाईकामासाठी देण्यात आली होती. तिथे २४ तास छपाईचे काम चालायचे. एके रात्री त्यांच्यापैकी एक मजूर शौचालयास जाण्यास निघाला. तर त्याला फक्त २ पाऊले चालताना दिसली. तो घाबरून बेशुद्ध पडला.

३. त्या तळमजल्यावरील एक घर आमचेही होते. जिथे माझा काका राहायचा. सुट्टीत आम्ही तिथे जायचो. एके रात्री तिच्या पैंजणाचा आवाज ऐकवण्यासाठी भावाने ( काकाच्या मुलाने ) ताईला दरवाज्याजवळ झोपवले. आणि ताईने स्वतः तो आवाज ऐकल्याचे मान्य केले आहे.

या सगळ्या ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्यात काही गोष्टींबद्दल मलाही प्रश्न आहेत जसे ,

दरवर्षी चाळीचा गणपती चौकात बसवायचे त्यावेळी ती कुठे फिरत असेल.
तिने कधी कुणाला त्रास दिला नाही किंवा कोणाची दारे ठोठावली नाहीत.
आता ती चाळ पडून तिथे मोठा टॉवर बांधण्यात आला आहे , आशा आहे तिच्यासाठी काही शांत अथवा पूजा विधी केला असावा.

चाळीचे नाव लिहिण्याचे टाळत आहे.

वेताळाच्या पालखी बद्दल माझी मावशी पण गोष्ट सांगायची, खरे खोटे करायला मी सरळ आजोबांनाच विचारले आणि मावशीला ओरडा बसला. बिसूर, सांगली येथे (बुधगांवच्या पुढे १/२ किमी.) तासगांवाच्या वाटेने हि पालखी जायची. पालखीत एक तांबडा तेजपुंज गोळा असायचा. सगळे माणसांसारखी माणसेच दिसायची. त्या पालखीचा गोंडा तोडून आणला तर काही कमी पडायचे नाही म्हणे!! कोणी आणला का ही कल्पना नाही.

वेताळाच्या पालखीबाबत आधी वाचल्याचे आठवत आहे. बहुतेक इथेच-माबोवर.
प्लीज कोणाला वेळ / नक्की माहिती असेल तर त्या किस्स्याची लींक इथे द्यावी.
अगदी सेम टू सेम किस्सा आहे.

@मी_आर्या यांनी दिलेल्या लिंक वरून एक गोष्ट लक्षात आली कि, योगायोगाने या धाग्यावर मागच्या वर्षी आजच्या दिवशी "वेताळाची पालखी" यावरच चर्चा सुरु होती.

अजून एक किस्सा इथे सुद्धा आहे:
http://www.maayboli.com/node/49229?page=27

एकंदर सांगली/सातारा जिल्ह्यातला काही भाग (नागझरी, वडी-तिरमली, वडूज, पुसेसावळी, दहिवडी, औंध इत्यादी) "वेताळाची पालखी" साठी प्रसिद्ध दिसतोय.

वेताळाची पालखी असे सगळे म्हणताहेत म्हणून माझा गोंधळ झाला. मी ऐकलेले किस्से वेताळाच्या दिवट्या, मशाली बद्दल . गावाकडे ऐकले होते. ते ही लक्षात नाही नीट.
फक्त बाबांना वरात दिसायची ते मात्र चांगले लक्षात आहे.

वेताळाची पालखी साताऱ्यात अंजिक्यतार्यावर सुद्धा दिसते. नक्की माहित नाही पण आमच्या शेजारच्या आजी या बद्दल सांगतात.
आणि आमच्या कडे म्हणजे माण तालुक्यात एकापेक्षा एक भूताच्या कथा आहेत. कधी अनुभव घेतला नाही पण आजीला अनुभव असल्याने आजी आम्हाला संध्याकाळी एकट्याला बाहेर पडू देत नाही.

माझ्या जन्माआधीची गोष्ट आहे. माझे आईबाबा पुण्याच्या पूर्वेला रहायचे. तेव्हां पुणे खूप लिमिटेड होतं. मेंटल हॉस्पिटलच्या पुढे तर बसेस पण नव्हत्या . येर्वड्याच्या पुढे कुणाकडे जायचे असेल तर पुण्यातले (गावातले) लोक आढेवेढे घेत. भरपूर मोकळ्या जागा होत्या. कही कॉलनी आगाखान पॅलेसच्या परिसरात होती. पुढे आर्मीची डंकर्क लाईन आहे.

बाबांना रात्री तहान लागायची त्यामुळे ते झोपेतून एकदातरी उठायचे. एकदा असेच पाणी प्यायला उठले तर समोर लग्नाची वरात चालली होती. खूप मोठी वरात होती. बाबांनी आईला उठवून सांगितले की कुणाचे लग्न आहे का ? पाहून येतो. आईने काही जाऊ दिले नाही. हा प्रकार दोन तीनदा झाल्यावर मात्र हे वेगळं आहे असं वाटलं.

कॉलनीच्या मागे काही बैठी घरं होती. तिथले भाई सामंत हे गृहस्थ परिचयाचे होते. खूप वर्षांपासून तिथे राहत होते. त्यांना हा अनुभव सांगितला. तर तेम्हणाएले अहो इथे आख्खी लग्नाची वरात लुटारूंनी (ती एक जमात असते , नाव लक्षात नाही ) कापून काढलेली आहे. तेव्हांपासून दर अमावस्येला ही वरात दिसते. आम्ही अजिबात लक्ष देत नाही. तुम्हीही दुर्लक्ष करा.

( किस्सा जसा ऐकला तसा लिहीला आहे. खरेखोटेपणा किंवा श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा माझे मत हे त्यात आलेले नाही ).

धन्यवाद मी आर्या.. मला वाटलंच होतं हे मी वाचलंय याआधीही बरेचदा.

@मी_आर्या यांनी दिलेल्या लिंक वरून एक गोष्ट लक्षात आली कि, योगायोगाने या धाग्यावर मागच्या वर्षी आजच्या दिवशी "वेताळाची पालखी" यावरच चर्चा सुरु होती. >> अमानवीय योगायोग Uhoh

Sसाताऱ्यात माझ्या गावातली अजून एक गोष्ट लहानपणी आजोबांकडून खूप वेळा ऐकली . मला हि अनुभव घ्यायचा होता तो काही जमलं नाही आणि आतातरी ते शक्यच नाही .
तर आता किस्सा सांगते.माझं वडी हे गाव . आता सुधारणा झाल्या तरी माझ्या लहानपणी खेडंच होत आमचं शेत जिथं आहे तिथं जाणारा एकमेव रास्ता श्मशानाजवळून जातो. त्यामुळे तिथून भरदिवसा हि जायला खूप भीती वाटते वैयक्तिक मला , आमच्या वावराच्या एका बाजूने वडा आहे ज्यात फक्त पावसाळ्यात पाणी असते बाकी दिवस नुसती दाट झाडी आणि वड्यापलीकडे इतरांचे शेत वडा आणि शेतालगत एक जुनं आंब्याचं झाड होत वडाच्या झाडासारखं जुनाट जीर्ण असे दिसायचं खूप बहारदार डेरेदार ..पूर्वी ते प्रेमळ म्हाताऱ्या आजोबासारखं दिसायचं त्या झाडाचा एक एक आंबा अगदी पपई इतका भाला मोठा आणि रसाळ यायचा तो आंबाच वेगळा होता. आणि त्या आंब्याखाली आमची विहीर होती शेतासाठी पाणी तिथूनच वापरायचो झाडाखाली विहरीबाजूला दुपारी सर्व रानातली मंडळी जमून जेवायचे दुपारी विश्रांती घ्यायचे भन्नाट वातावरण होत तिथं शिवाय विहिरीच्या पलीकडे वड्यात खालच्या बाजूला आमचा शेतातला देव म्हसोबा होता त्या आंब्याच्या सावलीत म्हसोबाच्या कठड्यालगत खूप खेळणं व्हायचं आमचं एकदा सर्वजण दुपारी जेवण करून तिथेच झाडाखाली पहुडले असता माझे आजोबा उठले आणि त्यांनी कामाला सुरवात केली आणि तिथली कुर्हाड हातात घेतली ती त्यांना खूप जाड लागत होती त्यांना वाटले खाल्लेली सुस्ती नि झोप यामुळे असे होत असावे म्हणून त्यांनी गवताचा भारा कापण्यासाठी हात उचलला तर ती कुर्हाड हातातून निसटून थेट विहिरीत पडली आता हे कस झालं ते धावत विहिरीत डोकावले त्यांना प्रचंड धुकं दिसलं म्हणजे पाणी नाही नुसता पाण्याच्या सर्फेसवर धूर दिसला ते विचारातच पडले . त्यांनी ते सोडून दिल आणि दुसऱ्या कामाला लागले त्यांनतर काही दिवसांनी त्यांना उसाला पाणी पाजायला रात्री जावं लागलं आजही लोडशेडिंग मुळे पिकांना पाणी दाखवायला लोक रात्रीअपरात्री जातात असेच ते निघाले हातात एक बॅटरी नि घोंगड अचानक रस्तातील स्मशानात त्यांना कुजबुज ऐकू आली त्यांना वाटलं कोण असेल ? चोर डाकू तर नसतील म्हणून त्यांनी टॉर्च बंद केली आणि हळू हळू चालत राहिले नंतर त्यांना जाणवत होते कि कोणतरी पाठलाग करतंय पण ते पाठी वळले नाही कि घाबरले नाहीत चालत राहिले अचानक एक भारदस्त माणूस त्यांच्या जवळ आला आणि सोबत चालू लागला आणि बोलू लागला काई मग आता पाळी लागली का ? (म्हणजे पाण्यासाठी आता नंबर मिळाला का) आजोबा बोलले हो ना .... मग तो म्हणाला बरं..! मग हाय का तंबाखू ? आजोबानी लगेच हातात डबी ठेवली त्याने तंबाखू मळली आणि तोंडात भरली आणि अर्धी आजोबाना देऊ केली आजोबानी घेतली आणि ते चालत राहिले ते शेतात पोचले तो माणूस सोबतच होता फक्त मधेच रस्तात पायवाट निमुळती होती जिथे एक व्यक्तीच चालू शकत होती तिथे तो त्यांच्या पाठी चालत होत शेतात पोचल्यावर जेव्हा त्यांनी मागे पाहिले तेव्हा तो सोबत नव्हता आता त्याची शंका त्यांना पूर्ण खरी वाटली तो माणूस नव्हता. जर तंबाखू त्याला दिली नसती तर त्यांचं काही खरं नव्हतं. त्यानंतर तोच माणूस त्यांना भेटत राही आणि तंबाखू खाऊन लुप्त होई तो पर्यंत विहरीजवळ अद्भुत घटना घडत होत्या एकदा तर एका बाईचं मुलं विहिरीत पडलं तेव्हा खूप प्रयत्न करून त्यात कुणाला उतरता येईना कारण विहरीची बांधणी जुनी होती शिवाय खूप खोल ...आजोबा खूप घाबरले काय करावं सुचेना त्यांनी देवाचा खूप धावा केला जाऊन म्हसोबाला हात जोडले अचानक त्यांना पळत येऊन कोणीतरी सांगितले कि काढला मुलाला बाहेर आणि सुखरूप आहे त्यांनी तो व्यक्ती कोण ज्यांनी मुलाला वाचवले हे पाह्यला गेले तर तिथेच त्यांची कुर्हाड भेटली त्यांनी वर्णनावरून ओळखले रात्री भेटणारा तो अनोळखीच होता कोण असेल बरं ... त्यांनी परत भेटला तर विचारायचं ठरवलं होत . पण त्याच्या मनात आलं देऊ केलेल्या तंबाखूची तर परतफेड नसेन ती कोणती तरी शक्तीच आहे जी नेहमी जाणवते आसपास आता ती चांगली का वाईट ठाऊक नाही पण ती आमच्या घरातल्या प्रत्येकाला त्या स्मशानापासून ते त्या झाडापर्यंत जाणवली ....लहान होती तेव्हा ऐकायची पण जेव्हा अनुभव घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र आज जुनी माणसं ह्यात नाहीत शिवाय तो आंबा ७-८ वर्षपूर्वी आजोबा वारले तेव्हा पूर्ण झाड वठल. हिरवागार आंबा एका रात्रीत पिवळा झाला आज तो आंबा तिथे नाही विहीर आहे नव्याने बांधलेली आंब्याची लाकडे तोडून विकली ........ पण तसा आंबा आजपर्यंत खाल्ला नाही कि पहिला नाही ..... ( तो माणूस फक्त आजोबाना दिसायचा तो ना गावातला होता नाही तिथे कोणी बाहेरच होत जे होत ते अनाकलनीय ते आजोबांसोबत च लुप्त झालं ...कदाचित त्या झाडाशी त्याचा वास्तव्याचा काही संबंध असावा हे सर्व फक्त तर्क बाकी तर देव जाणे .)S

मला वाटतं एखाद्याची एक विशिष्ट इच्छा असते पण तरी काही ती पूर्ण होत नाही आणि पूर्ण होण्याआधी ठरल्याप्रमाणे मृत्यू होतो . पण ती इच्छा कुठेतरी राहतेच राहते मग त्यातून अमानवीय जन्माला येते .

ज्यांचा अकाली मृत्यू होतो तो अजिबात अपेक्षित नसतो तेव्हा ती घटना सतत घडत राहते जशी कॅसेट अडकते तशी ! तसाच काही त्या लग्नाच्या वऱ्हाडी बद्दल झाले असावे ( संदर्भ : नैना पिक्चर ..मलातरी आवडला होता ).

@ प्रिया : खूप छान अनुभव .... मला नेहमी वाटायचे सगळीच भुते थोडीच वाईट असतील काही चांगली ,निरुपद्रवी आणि मदत करणारी कशी नाहीत ?? ( माझा वेडेपणा आणि काय) त्याचे उत्तर मिळाले .

हो ना !! एक पाहिलंय का भुताने असा असा खून केला ... मुळात ती फक्त स्वतःच अस्तित्व जाणवून देतात आणि त्यांना त्यांच्या अपूर्ण इच्छा किंवा त्यांची विशिष्ट जागा हवी असते बस्स.... Happy

@मोल : होय सर्व इच्छा कुणाच्याच पूर्ण होत नाहीत म्हणून तर "विशिष्ट "इच्छा असे म्हणालेय. Happy

लिंबुभाऊ, तुम्हाला अजिंक्यतार्‍याच्या वेताळाच्या पालखीची गोष्ट माहित आहे का? असल्यास टंका इथे.
कारण बर्‍याच नवीन लोकांना ती माहित नाही>>>>

मी आरळे - वढूथ (ता ,जि : सातारा ) इथला वेताळाच्या पालखी चा लहानपणी ऐकला होता ...
त्याची पालखी कोणी धरेल त्याला तो भरपूर पैसे देतो असे ऐकले होते. तिथे वेताळबाद नावाचा दगड होता. तो रोज रात्री नदीवर जायचा पालखी सगळी भुते धरायची असे ऐकले होते .. मी लहान म्हणजे ७ वर्षाचा होतो तेव्हा ते गाव सोडले त्यामुळे डिटेल माहित नाही. पण पालखी वाजतगाजत नेल्यासारखा आवाज त्या बालपणात ऐकल्या का लक्षात आहे, कदाचित कोणाची लग्नाची वरात देखील जात असेल , पण आम्हा बालकाना वाटले असेल. आमचे राहायचे ठिकाण वेताळबाद ते नदी या वाटेवरच होते, त्या मुळे रात्री पालखी , दिवसा पाणी आणणारे कोळी , तसेच मयतास हि तिथूनच नेले जायचे दारावरून.
कोण तिकडचा असेल तर अधिक माहिती देऊ शकेल.

ही ,जी पालखी असते, त्या मध्ये वेताळ हा पालखीत बसलेला असतो आणि त्या पालखीला गोंडा असतो. जो कोणी त्या पालखीचा गोंडा धरेल ,त्याला वेताळ पाहिजे ती गोष्ट देतो.

हो ना !! एक पाहिलंय का भुताने असा असा खून केला ... मुळात ती फक्त स्वतःच अस्तित्व जाणवून देतात आणि त्यांना त्यांच्या अपूर्ण इच्छा किंवा त्यांची विशिष्ट जागा हवी असते बस्स.... >>सगळीच भुतं फक्त अस्तित्व जाणवून देत नाहीत. काही भूत झपाटून जीव घेतात. एका दूरच्या नात्यातल्या आजींचा किस्सा आहे. त्यांना एका मुंजाने झपाटला होता. त्या पूर्णपणे अधू झाल्या होत्या. अंधत्व , चालता ना येणे. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती कि , ज्या वेळी कुठे बाहेर जायचे असल्यास उदा. डॉक्टर कडे जाणे , समारंभाला जाणे , अश्यावेळी त्या खणखणीत बऱ्या होत. पुन्हा घरी आल्यावर सगळे सुरु होत. भूत उतारवणाऱ्या एका बाईंनी सांगितले कि मी घरी येऊन त्या मुंजाच सामना नाही करू शकत. त्यांना माझ्या ठिकाणी आणावं लागेल. त्यांच्याकडे निघाले असता आजींना जागेवरून हलणेहि मुश्किल व्हायचे नाही . त्यामुळे कधी त्या बऱ्या झाल्याचं नाहीत. त्या नुसत्या घरातील खुर्चीवर बसून असत. त्यातच त्यांचा अंत झाला. शेवटी त्या मुंजाने त्यांचा जीव घेतलाच.

अजून एक छोटीशी गोष्ट. १००% भुताची नाहीये. पण अमानवीय आहे. कोणी जुना 'नागीन' (१९७६) चित्रपट पहिला आहे का ? रीना रॉय ,सुनील दत्त , फिरोझ खान ... त्यातील एक दृश्य आहे ,ज्यात नागीण आपल्या शत्रूला मारण्यासाठी त्याच्या लहान मुलीला वेटोळे घालून बसते.
आता मूळ गोष्टीकडे. माझा मामा लहानपणापासून गावालाच राहिलाय. SSC पर्यन्तच शिक्षण तिथेच झालं. हे सांगण्याचं कारण असा कि गावात उनाडक्या करणे , दंगा मस्ती हि त्याची नित्याचीच कामे. उन्हाळ्याच्या दिवसातली गोष्ट आहे. मामा साधारण १२ १४ वर्षाचा असावा. रोज नदीवर धुडगूस घालण्याचा कार्यक्रम असायचा. पाण्यात दगडी मारत बसने हा त्यांच्या टोळक्याचा आवडता छंद. संध्याकाळी मोठ्या काकांच्या भीतीने ७ च्या आत घरी यावं लागायचं. असाच एके दिवशी मामा संध्याकाळी घरी आला. देवाची आरती म्हणून वैगरे सगळ्यात लहान मावशीला ( साधारण १ वर्षाची ) खेळवत बसलेला.मोठमोठ्याने गाणी म्हणून तिला हसवत होता. कोणीतरी हाक मारली म्हणून मावशीला पाळण्यात ठेऊन बाहेर गेला. काही मिनिटातच परत येऊन बघतो तर पाळण्यात मावशी आणि पाळण्याला एक नागीण लटकत होती. मामाची भीतीने गाळण उडाली. त्याने बाहेर येऊन सगळ्यांना बोलावले. सगळेजण खोलीजवळ जमा झाले. मोठे काका( माझे मोठे आजोबा ) काठी घेऊन आले. त्याकाळी मोठे आजोबा साप मारण्यात खूप पटाईत होते. कोणाच्या घरात साप शिरला तर त्याला मारण्यास त्यांना बोलावत. त्यांना परिस्थिती लक्षात आली होती. त्या नागिणीने मावशीला दंश केला नव्हता. ती मामासाठी आली होती. त्यांनी सगळ्याना खोलीपासून लांब जायला सांगितले स्वतः दरवाज्यात काठी घेऊन उभे राहिले आणि त्यांनी मामला पाळण्याच्या समोर पण दरवाज्याच्या जवळ ,आधीसारखा गाणी गात उभे राहायला सांगितले. जसा मामा तिथे उभा राहून गाणी म्हणायला लागला , ती नागीण पाळण्यातून खाली आली आणि मामाकडे झेपावली. जशी ती मामाच्या जवळ आली ,आजोबानी काठीने तिच्या डोक्यावर वार केला आणि तिला मारले. त्यानंतर मामा २ दिवस तापात होता.

यावरून आजोबानी असा अनुमान काढला, कि नदीवर खेळत असताना एखादा दगड तिला लागला असावा ,अथवा त्याची सावली तिच्यावर पडली असावी ( जुन्या काळी गावात असा समज होता ) ज्यामुळे ती डिवचले गेली असावी. त्याचा माग काढत काढत ती घरी पोहोचली. त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखले असावे ( पण सापाला , नागाला कांन नसतात असं कुठेतरी वाचलंय त्यामुळे याबद्दल साशंक आहे.) ती काही ईच्छाधारी नागीण वैगरे मुळीच नव्हती. गावात अश्या खूप गोष्टी साप , नाग याबद्दलहि प्रचलित आहेत.

धाग्याचा विषय भरकटवला असेल तर क्षमा असावी.

Bakee Sarva theek ahe, pan nag-sapa vishayi che he gairsamaj pasaravu nayet ASE vatate

भुतांच्या पंगतीचा किस्सा कुणाकडे आहे का ?
मला एक माहीत आहे पण आजोळी ऐकला आहे कि गावी हे लक्षात नसल्याने सांगता येत नाही.

माझ्या मावशीच्या घरातील घटना, हे अमानविय सदरात येईल की नाही माहित नाही पण इथेच लिहिते. करणी, भानामती हा प्रकार मानवाने केलेला त्यामुळे हे मानविय. पहिली गोष्ट साधारण २० वर्षापुर्वीची. तर माझी लहान मावशी खेडेगावात राहते. तिथे सकाळची एकच बस येते त्यानंतर दिवसभरात एकही वाहतुकीचे साधन नाही. त्यामुळे जर त्यांना पनवेल किंवा उरणला जायचे असल्यास बस थांबा असलेल्या गावात येण्यासाठी साधरण ८ तेर ९ किलोमिटर पायी प्रवास करावे लागे. हेच माझ्या आजीचे गाव म्हंजेच मावशीच्या आईचे सुद्धा. तसेच पिण्याच्या पाण्यासाठीही त्यांना एव्हढाच प्रवास करावा लागे. अजुनही असेच आहे पण फक्त हल्ली सगळ्यांकडे खाजगी दुचाकी, चारचाकी आल्यामुळे पायी प्रवास कमी झाला आहे आणि गावात पाणी आले आहे. हे सांगण्याचे कारण म्हंजे गावातील लोकांच्या परिस्थितीची जाणिव व्हावी म्हणुन.
तर त्यावेळेस मावशीची मुलगी ६-७ वर्षाची असेल आणि मुलगा ३ वर्षाचा. मावशी आधी खुप गरीब होती अगदी दोन वेळ जवणाची मारामार इतकी. पण नंतर मावशीच्या नवर्‍याने घरातुनच एक छोटस किराणा मालाचं दुकान टाकलं. गावात एकुलतं एक दुकान म्हणुन खुप धंदा होऊ लागला आणि बघता बघता मावशीचा संसार आणि दुकान दोघांचाही कायापालट झाला.
मावशी-मामा(आमच्याकडे मावशीच्या नवर्‍याला मामाच म्हणतात) खोर्‍याने पैसे ओढु लागले आणि हे सगळं झाले फक्त २ वर्षात. मावशीच्या अंगावर भरमसाठ दागिने आले, मुले आता चांगले चांगले कपडे वापरु लागले. मामा दुकानाचे पैसे आजीकडे पाण्याचा ड्रम असतो ना त्यात लपवुन ठेवत. सगळं व्यवस्थित असताना अचानक मावशीची मुलगी आजारी पडली. ताप डोक्यात गेलाय म्हणुन पनवेलला अ‍ॅडमिट केली. तीचे शरीर लुळे पडले, वाचा गेली. तिचे फक्त डोळे बोलायचे कधी हसायचे कधी रडायचे, बाकी शरीर सुन्न. त्यावेळेस पण मामाने लाखोने पैसे खर्च केले पण उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी दोन महिन्यांनी तिला घरी घेऊन जायला सांगितले. घरी आणल्यावर २ ते ३ वर्ष ती त्याच अवस्थेत होती. मावशी तिला पातळ पेज वैगरे पाजायची. तिचे शरीर वाढत होते पण हालचाल होत नव्हती. त्या ३ वर्षात ती अगदी १६-१७ वर्षाच्या मुलीसारखी दिसु लागली, वजन तर भरमसाठ वाढले. त्यादरम्यान तिचे इलाज सुरुच होते पण उपयोग होत नव्हता. मावशी, आजी देव-देवस्की करु लागल्या तेव्हा त्यांना कुणितरी सांगितले की त्यांच्याच भावकीतल्यांना त्यांची प्रगती बघवत नव्हती म्हणुन त्यांनी मामांवर करणी केली होती पण त्यात त्यांची मुलगी सापडली. अखेर ती गेलीच सोबत मामांनी जेव्हढा पैसा जमविला होता तोसुद्धा गेला. धंदाही मंदावला होता.
दरम्यान गावात अजुन एक-दोघांनी दुकान थाटले त्यातला एक मामाच्या भावाचाही होता. मुलगी गेल्यावर मामा पुन्हा धंद्यात लक्ष देऊ लागले आणि पुन्हा गिर्‍हाईके मामाच्या दुकानाकडे वळली. यावेळेस प्रतिस्पर्धी असल्याकारणाने मामाला पुन्हा आधीच्या पोझिशन यायला १०-१२ वर्षे लागली. आणि पुन्हा ५ वर्षापुर्वी मामा अचानक आजारी पडले, लकवा मारला, हालचाल बंद, बोलणे बंद. यावेळेस मावशीने लवकर 'बाहेरचं' बघितलं, मामांवर करणी केली होती. मावशी डॉक्टरी उपाय व बाहेरचे' उपाय दोन्हीही करत होती. २-३ वर्षात मामा हळुहळु हिंडु-फिरु लागले. आता दुकानाकडे लक्ष त्यांचा मुलगा देतो. आणि १५ दिवसांपुर्वी मामा पुन्हा आजारी झाले, मावशीने त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. पोट दुखत होते म्हणुन सोनोग्राफी केली पण काहीच आढळले नाही. तिसर्‍या दिवशी मामा गेले. पोस्टमॉर्टममध्ये मामांच्या पोटातुन पाव किलोभर गोळ्या ( ज्या ते रोज घेत होते) काढल्या.
माझा स्वतःचा करणी, भानामती याप्रकारावर विश्वास नाही पण या दोन्ही घटनांमुळे मनात संशय निर्माण होतो.

वि.सु. १) अमानविय सदराखाली मी हे लिहले आहे त्यामुळे ज्यांना विश्वास नाही त्यांनी कृपया हिणकस प्रतिसाद न देता सौम्य शब्दात आपले मत मांडावे.
२) कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा हेतु नाही.

बाकी ठीक आहे,पण एसटीसाठी ६० ते ७० किमी प्रवास हे नक्कीच अमानवीय सदरात मोडतं. >> नक्की किलोमिटर मध्ये मला माहित नव्हते पण आम्ही जेव्हा लहानपणी चालत जायचो तेव्हा दिड ते दोन तास नक्कीच लागायचे. माझ्या अंदाजाने ठाणे ते ऐरोली इतके अंतर असावे त्यामुळे मी गुगलबाबांकडे ठाणे ते ऐरोली अंतर विचारले असता त्यांनी ६७ किमी सांगितले म्हणुन मी ६० ते ७० किमी लिहलयं. तरीही पुढच्यावेळी जेव्हा मावशीकडे जाईन तेव्हा किलोमिटरमध्ये अंतर बघुन ठेवेन.

जेव्हा लहानपणी चालत जायचो तेव्हा दिड ते दोन तास नक्कीच लागायचे.>> अहो ६० ७० किमी दिड तासात ते ही चालत.. बापरे.. जास्तीत जास्त ६ ७ किमी असेल..
अनुभव बाकी भयंकर..कुटुंबाची वाताहात झाली बिचारी..

जेव्हा लहानपणी चालत जायचो तेव्हा दिड ते दोन तास नक्कीच लागायचे.>> अहो ६० ७० किमी दिड तासात ते ही चालत.. बापरे.. जास्तीत जास्त ६ ७ किमी असेल.. >>>> सॉरी सॉरी, आता गुगलबाबांना ठाणे ते ऐरोली व्हाया कळवा विचारले तेचा १३ किमी सांगितले. (आम्ही नेहमी नणंदेकडे जाताना जी ऐरोलीत राहते तेचा याच रस्त्याने जातो म्हणुन मला एव्हढचं कळतं Happy )ते किलोमिटरचे गणित कळत नाही मला. मुळ पोस्टीत बदल करते.

@ निल्सन ....हे माझ्या सासऱ्यासोबत असाच अगदी झालाय असे मी ऐकलंय खर देव जाणे .....त्यांचंही दुकान होत. ४ वर्ष आजारपणात गेली पैसा गेला आणि सासरे हि गेले . खूप वाईट दिवस भोगले आमच्या घरच्यांनी शिवाय माझा नवरा देखील तेव्हा लहान होते . सर्वांचं असे म्हणणं आहे करणी केली गेलेली म्हणून एवढी वाताहत झाली . माझी सासू सांगत होती जेव्हा त्यांना अग्नी दिला तेव्हा त्यांच्या पोटातून २ गोळे पडले जे खूप जळत होते .... मला सर्व पटत नाही पण ऐकलंय ....

Pages