अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नानाकळा - पत्ता देतो १-२ दिवसात. बरेच दिवस भारत बाहेर असल्याने मला पण उसुक्ता आहे काय झाले त्या जागेच...

मित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना ......... दुसर्‍या महायुद्धाला नऊ वर्ष उलटली होती. अमेरीकेने केलेल्या हिरोशिमा आणि नागासाकी वरच्या अणुबाँबच्या हल्ल्यांमधून जपान अद्यापही सावरत होता. तीन लाखांवर माणसांचा बळी गेलेला दुसरा कोणताही देश कितीतरी वर्षे खचून गेला असता... पण जपान? अविश्रांत मेहनत आणि जिद्द याच्या जोरावर जपान पुन्हा उभा राहत होता. युद्धानंतरही पाश्चात्य देशांशी उत्तम राजकीय आणि आर्थिक संबंध टिकवून ठेवण्यात जपान यशस्वी झाला होता. त्यामुळे जपानमध्ये विविध कामांसाठी येणार्‍या लोकांचा आणि पर्यटकांचा ओघही कायम असे. टोकीयो इथला आंतरराष्ट्रीय विमानतळ कायमच प्रचंड गर्दीने ओसंडून जात होता! अनेकदा तर मुंबईतील उपनगरीय स्थानकाला गर्दीच्या वेळेला येते तशी कळा हॅनेडा विमानतळाला येत असे! १९५४ चा जुलै महीना. सकाळपासूनच टोकीयोच्या हॅनेडा विमानतळावर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. अनेक वेगवेगळी विमानं टोकीयो इथे येऊन पोहोचत होती. टोकीयोवरुन अनेक विमानं वेगवेगळ्या दिशांना उड्डाण करत होती. वेगवेगळ्या विमानांतून आलेले प्रवासी इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्‍यांसमोर तपासणीसाठी रांगा लावत होते. पासपोर्ट आणि व्हिसा तपासणी केल्याविना अर्थातच कोणालाही जपानमध्ये प्रवेश मिळू शकत नव्हता! कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसणारं हे नेहमीचंच दृष्यं होतं. दुपारच्या सुमाराला पश्चिम युरोपातून येणारं एक विमान रनवेवर उतरुन नुकतंच थांबलं होतं. विमानातील प्रवासी आपापले पासपोर्ट आणि व्हिसा याच्यासह इमिग्रेशन आणि कस्टम्सच्या अधिकार्‍यांसमोर रांगा लावत होते. एकेका प्रवाशाची तपासणी करुन अधिकारी त्याला जपानमध्ये प्रवेश देत होते. एक माणूस असाच एका इमिग्रेशन अधिकार्‍यासमोर जाऊन उभा राहीला. आपला पासपोर्ट त्याने तपासणीसाठी त्या अधिकार्‍याच्या हवाली केला. अधिकार्‍याने तो पासपोर्ट पाहीला आणि तो चक्रावून गेला... तो पासपोर्ट 'टॉर्ड' या देशाचा होता... ...परंतु अशा नावाचा कोणताही देश अस्तित्वातच नव्हता! त्या माणसाकडे तो पासपोर्ट आला कुठून? तो माणूस सुमारे साडेसहा फूट उंच आणि धिप्पाड होता. त्याने दाढी राखलेली होती. साधा कोट-शर्ट आणि पँट असा पोशाख त्याने घातलेला होता. वयाने तो साधारण चाळीशीचा असावा! जपानी अधिकार्‍यांनी त्याला इमिग्रेशन काऊंटरवरुन वेगळ्या केबिनमध्ये आणलं आणि त्याच्याकडे चौकशीस प्रारंभ केला. "तुझं नाव काय?" त्याने आपलं नाव सांगीतलं खरं, पण ते इतकं विचित्रं होतं, की जपानी अधिकार्‍यांना ते नेमकं कोणत्या अक्षरांनी लिहावं हेच कळेना. "तू कुठून आलास?" "मी मूळचा टॉर्ड देशाचा रहिवासी आहे!" तो ठामपणे म्हणाला, "यापूर्वीही मी अनेकदा जपानला आलेलो आहे. या वर्षीच माझी जपानला येण्याची ही तिसरी खेप आहे!" जपानी अधिकार्‍यांनी त्याचा पासपोर्ट नीट तपासला. पासपोर्ट तपासल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला... तो माणूस नुकताच दोन वेळा जपानला येऊन गेल्याची पासपोर्टवरील शिक्क्यांवर नोंद होती! इतकंच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्येही त्याने नियमीत प्रवास केल्याचे शिक्के पासपोर्टवर उमटलेले होते. अनेक देशांच्या व्हिसाचे स्टँप त्याच्या पासपोर्टवर आढळून आले होते. जपानचा व्हिसा अर्थात त्याला देण्यात आला होता! जपानी अधिकार्‍यांनी त्याच्याजवळील पाकीटाची तपासणी केली. अनेक वेगवेगळ्या देशांच्या चलनी नोटा त्याच्या पाकीटात होत्या! जपानी येन अर्थातच होतेच! "तुझी मूळ भाषा कोणती?" "फ्रेंच! जगातील अनेक भाषा मी बोलू शकतो!" अस्खलीत जपानी भाषेत तो बोलत होता! "जपानमध्ये कोणत्या कामासाठी आला आहेस?" "अर्थात बिझनेसच्या! माझ्या कंपनीने मला एका बिझनेस मिटींगसाठी पाठवलं आहे!" जपानी अधिकारी या विलक्षण प्रवाशाच्या उत्तरांनी चक्रावून गेले होते. "तुझा हा जो देश आहे, टॉर्ड, तो नेमका कुठे आहे?" एका अधिकार्‍याने विचारलं. "तुम्हाला टॉर्ड माहीत नाही?" त्याने आश्चर्याने आणि काहीशा रागीट स्वरात विचारलं. जपानी अधिकार्‍यांनी नकारार्थी माना हलवल्या. "स्पेन आणि फ्रान्सच्या सीमेवर माझा देश आहे! टॉर्ड! गेल्या हजार वर्षांपासून!" जपानी अधिकार्‍यांनी युरोपचा नकाशा त्याच्यापुढे पसरला आणि त्याला त्याचा देश नकाशावर दाखवण्याची विनंती केली. एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने एका ठिकाणी आपलं बोट ठेवलं. "हे बघा! हाच माझा देश! टॉर्ड!" त्याने दाखवलेल्या ठिकाणी जपानी अधिकारी पाहतच राहीले! त्याने स्पेन आणि फ्रान्सच्या दरम्यान असलेल्या आंडोरा या लहानशा देशावर बोट ठेवलं होतं. "हा आंडोरा देश आहे!" जपानी अधिकारी म्हणाला, "टॉर्ड नाही!" "याचं नाव तर नकाशात आंडोरा दिसतं आहे!" तो गोंधळून म्हणाला, "पण...पण हे कसं शक्यं आहे? हा माझा टॉर्ड देशच आहे! तुमच्या नकाशात याचं नाव का बदललं आहे?" जपानी अधिकारी पार गोंधळून गेले होते! त्यांनी एक-दोन नाही तब्बल दहा नकाशे त्याच्यासमोर आणून ठेवले, पण प्रत्येक नकाशात तो आंडोरा देशावर बोट ठेवून हाच टॉर्ड देश आहे हे ठामपणे सांगत होता. त्या नकाशांत टॉर्ड देश नाही हे पाहून तो देखील चकीत झाला होता! जपानी अधिकार्‍यांनी आता त्याची खोलवर चौकशी करण्यास सुरवात केली. त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या पाकीटातून टॉर्ड देशाचं ड्रायव्हींग लायसन्स आढळून आलं! त्याच्या जोडीला त्याच्या बँकेचे कागदपत्रं आणि चेकबुकही होतं. ....परंतु ज्या बँकेचं चेकबुक होतं, ती बँक अस्तित्वातच नव्हती! एका मोठ्या कंपनीशी संलग्नं असलेल्या लहानशा कंपनीत आपण अधिकारी आहोत असं त्या माणसाने जपानी अधिकार्‍यांना सांगितलं. त्याच्या कामाविषयी अनेक कागदपत्रं त्याच्यापाशी उपलब्धं होते! जपानी कंपनीशी महत्वाच्या मिटींगसंदर्भात आपण टोकीयोला आल्याचा त्याने पुनरुच्चार केला! तसेच टोकीयोतील एका हॉटेलमध्ये आपण रुमचं रिझर्वेशन केल्याचंही त्याने जपानी अधिकार्‍यांना सांगितलं! जपानी अधिकार्‍यांनी त्याच्या माहीतीची खातरजमा करण्यास सुरवात केली. त्याने सांगितलेल्या जपानी कंपनीत चौकशी केल्यावर त्यांना आणखीन एक धक्का बसला.... त्या कंपनीतील एकही माणूस त्याल ओळखत नव्हता! त्याच्या कंपनीचं नावंही कोणाला माहीत नव्हतं.. इतकंच काय, त्याच्या टॉर्ड देशाचं नावही कोणीही ऐकलेलं नव्हतं! हॉटेलमध्ये चौकशी केली असता त्याच्या नावाचं कोणतंही रिझर्वेशन आढळून आलं नाही! या सर्व प्रकाराने तो माणूस मात्रं आता काहीसा वैतागला होता. आपली कोणीतरी मुद्दाम चेष्टा करण्यासाठी हा सगळा प्रकार चालवला आहे अशी त्याची ठाम समजूत झाली! हजार वर्षांची गौरवशाली परंपरा आणि वारसा असलेला आपला देश या लोकांना माहीत नाही याचंच त्याला आश्चर्यं वाटत होतं! दुसरीकडे जपानी अधिकारी त्याच्यापेक्षाही जास्तं गोंधळून गेले होते. टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस नेमका कोण होता आणि कुठून आला होता याचा काहीच पत्ता लागत नव्हता! अस्तित्वात नसलेल्या देशाचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि चक्कं पासपोर्ट त्याच्यापाशी होता. इतकंच नव्हे तर जपानसकट अनेक देशांत पूर्वी तो जाऊन आल्याचं सिद्ध होत होतं! "हे बघा, तुमची चेष्टा आता पुरे झाली!" आठ तासांच्या उलटतपासणीनंतर रागावून तो जपानी अधिकार्‍यांना म्हणाला, "मला ताबडतोब तुमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना भेटायचं आहे!" जपानी पोलीसांनी आणि कस्टम्स अधिकार्‍यांनी त्याला विमानतळाजवळच असलेल्या हॉटेलमध्ये हलवलं. हॉटेलमध्येच रात्रीचं जेवण आटपल्यावर १० व्या मजल्यावरील एका खोलीत त्याची रवानगी करण्यात आली. खोलीच्या बाहेर दोन पोलीस पाहर्‍यासाठी ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी सकाळी पोलीस आणि कस्टम अधिकारी त्याच्या चौकशीसाठी हॉटेलवर गेले. त्याच्या खोलीत प्रवेश केल्यावर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.... खोली पूर्णपणे रिकामी होती! टॉर्ड देशाचा रहिवासी असलेला एकमेव नागरीक हवेत विरुन जावा तसा अदृष्यं झाला होता! हा अकल्पीत प्रकार पाहून सगळेच बुचकळ्यात पडले. त्या खोलीतून बाहेर पडण्याची एकमेव वाट म्हणजे खोलीचा दरवाजा. परंतु दरवाज्यातून तो बाहेर पडलेला नाही हे पहार्‍यावर असलेल्या पोलीसांनी छातीठोकपणे सांगितलं. खोलीला एक खिडकी होती. परंतु त्या खिडकीतून बाहेर जाणं हे निव्वळ अशक्यं असल्याचं पोलीसांना तपासणीअंती आढळून आलं! खोलीची बारकाईने तपासणी करता त्याचं सर्व सामनही तिथून गायब झाल्याचं पोलीस आणि कस्टम्स अधिकार्‍यांच्या ध्यानात आलं! स्वत:ला टॉर्डचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस नेमका कुठून आला होता आणि हॉटेलच्या खोलीतून गायब कसा झाला याचा तपास घेण्याचा जपानी अधिकार्‍यांनी खूप प्रयत्नं केला, परंतु त्यांच्या हाती काहीही लागलं नाही! त्याच्या पासपोर्टवर असलेल्या देशांकच्या इमिग्रेशन खात्याकडे चौकशी केली असता अशी कोणतीही व्यक्ती आपल्या देशात आल्याची त्यांच्याकडे नोंद नव्हती! जपानी अधिकार्‍यांच्या मतानुसार टॉर्ड देशाचा रहिवासी असलेला तो माणूस निश्चीतच खरं बोलत होता! नकाशात आपला देश न दिसल्यावर तो खरोखरच आश्चर्यचकीत झाला होता. आपला देश नकाशावर कसा दिसून येत नाही याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या पासपोर्टची काळजीपूर्वक तपासणी केली असता, तो पासपोर्ट नकली नसल्याचं जपानी अधिकार्‍यांना आढळून आलं! त्याचं ड्रायव्हींग लायसन्संही नकली नसल्याचं त्यांना आढळलं! टॉर्डचा रहिवासी असलेला तो माणूस नेमका कुठून आला होता याविषयी अनेक तर्क मांडण्यात आले. काही संशोधकांच्या मते, आपल्या जगाप्रमाणेच एक वेगळंच जग वेगळ्या मितीत आणि प्रतलावर अस्तित्वात आहे. त्या जगातील बरेचसे व्यवहार आपल्याप्रमाणेच होत असले, तरी काही बाबतीत फरक आहे. स्वत:ला टॉर्डचा रहिवासी म्हणवणारा हा माणूस त्या वेगळ्या समांतर जगतातून काही कारणाने आपल्या जगात आला असावा आणि परतीची वाट सापडतात अदृष्य झाला असावा! दुसर्‍या एका तर्कानुसार टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा हा माणूस एखाद्या गुप्त संघटनेचा सदस्यं असावा आणि कोणत्यातरी विशिष्ट कामगिरीवर त्याची जपानमध्ये पाठवणी करण्यात आली असावी! तो टॉर्डचा रहिवासी असल्याचं आणि आंडोरा देश हाच टॉर्ड असल्याचं त्याच्या मनावर ब्रेनवॉशिंग करुन बिंबवण्यात आलं असावं! मात्रं तरीही अनेक प्रश्न अनुत्तारितच राहतात... त्याच्याजवळचा पासपोर्ट अस्सल असल्याचं तांत्रिक तपासणीत निष्पन्ना झालं होतं. परंतु टॉर्डचा पासपोर्ट आला कुठून? त्याच्या ड्रायव्हींग लायसन्सचं काय? पासपोर्टवर असलेल्या इमिग्रेशनच्या शिक्क्यांचं काय? इमिग्रेशनचे शिक्के आढळल्यावरही कोणत्याही देशात त्याच्या आगमनाचं रेकॉर्ड का नव्हतं? हॉटेलच्या खोलीतून बाल्कनी नसताना आणि बाहेर दोन पोलीस पाहर्‍यावर असताना तो सामानासकट कसा गायब झाला? अजुनही जापान सरकार ह्या वर संशोधन करतोय .. टॉर्ड देशाचा रहिवासी म्हणवणारा तो माणूस होता तरी कोण?

वरील कथा मी वाचलेली आहे आणि सत्य आहे कि नाहि माहित नाहि

प्यारलेलं युनिव्हर्स...

फेक स्टोरी... १९८२ मध्ये पब्लिश झालेली आहे कोणत्याही पुराव्या आणि डोकमेंटतशन शिवाय..

माझ्या काकानंसोबत झालेला एक किस्सा साधारण २०-२५ वर्षांपूर्वीचा ...
माझे काका ऑफिस नंतर रिक्षा चालवायचे घराला आणखीन आर्थिक आधार म्हणून ... तर एकदा रात्री रिक्षा फिरवून झाल्यावर त्यांचे काही मित्र त्याना भेटले व सगळे तिथेच गप्पा मारत बसले ... बराच उशीर झाला म्हणून त्यांचे मित्र म्हणाले कि आता तू एकटा घरी ना जाता जवळच्या मित्राकडे जाऊन झोपू आणि सकाळी घरी जाऊ. तसं हे चौघे निघाले, माझे काका रिक्षा चालवत होते. ते सगळे औरंगाबाद रोड ने निघाले (नाशिक मधील एक भाग) साधारण ११:०० - ११:३० ची वेळ होती. त्याकाळी तिथे जास्त वस्ती नव्हती व रस्तापण बऱ्यापैकी छोटा होता. तर हे गप्पा मारत चालले होते आणि तेव्हड्यात काकांना रस्त्याच्या मधोमध एक माणूस उभा दिसला. काकांना वाटले कि रात्रीची त्याला काही मदत हवी असेल म्हणून ते रिक्षा हळू करू लागले, तर त्यांचा मित्र मागून खूप जोरात ओरडला कि रिक्षा थांबवू नकोस आणि जोरात पळावं. तो ओरडल्याने त्यांनी रिक्षा एकदम जोरात नेली. ते जसे त्याच्या जवळ आले तसं त्या माणसाचा आकार एकदम मोठा होऊ लागला, काकांना वाटले कि आता रिक्षा त्याच्यावर आदळणार म्हणून ते एकदम सावध झाले , परंतु आश्चर्य म्हणजे त्याची रिक्षा त्या माणसाच्या आरपार गेली जणू तो तिथे नव्हताच. परंतु आरपार जातांना त्याना रिक्षा एकदम जड झाल्यासारखी वाटली. त्यांनी rare-view mirror मध्ये पहिले तर तो माणूस तिथेच तसाच उभा होता..

त्यांचा मित्र त्यांना म्हणाला ते जे काही होते ते मानवीय नव्हते ... थांबलो असतो तर काही खरा नव्हतं

ते सगळे औरंगाबाद रोड ने निघाले (नाशिक मधील एक भाग) >>> नक्की कुठला सांगा. माझे घर पण त्याच रोडवर आहे. कन्नमवार पुलाजवळ का??

आश्चर्य म्हणजे त्याची रिक्षा त्या माणसाच्या आरपार गेली जणू तो तिथे नव्हताच >>>>> असाच एक अनुभव ऐकलेला आहे.

आमचं गाव खरतरं वस्तीच म्हणायला हवं, कॅनॉलच्या कडेला १५ -१६ घर वसलेली अशी.
वस्तीत एकुलतं एक मुस्लीम कुटुंब... भुमीहीनांना जमीन स्कीममधये त्यांना इथे जमीन मिळालेली. तर त्यातील मोठा मुलगा रफीक हा शेजारच्या मोठ्या गावातील एका सुमोवर ड्रायव्हर होता.
आमच्या वस्तीवर यायच तर मुख्य रस्ता सोडला कि तीनेक किमी कॅनॉलच्या भराव्यावरून याव लागतं. मुख्य रस्ता संपुन कॅनॉलचा रस्ता जिथे सुरू होतो तिथे ब्रिटीशकालीन पुल आहे, त्याच नावचं "कठीणपुल". आजकाल वापरात नसला तरी त्या जागेला कठीणपुलं असच बोलतात. पुर्वी त्या पुलावर खुप अपघात व्हायचे.
तर रफीक एका रात्री सुमोची ट्रीप मारून मालकाकडे हिशेब देऊन खुप रात्र झाल्याने सुमो घेऊन घरी येत होता. कठीणपुलाच्या थोडसं पुढे आलं कि त्याला एक धिप्पाड माणुस रस्त्याच्या मधोमध उभा असलेला दिसला. याने हॉर्न दिला, अप्पर-डिप्पर केल तरी तो हालेना. उलट याच्या दिशेने रोखुन पहात होता. रफीकच्या म्हणण्यानुसार त्याच्या डोळ्यावर लाईट होती तरी त्याचे डोळे झाकले गेले नव्हते. मग याने घाबरून गाडी तशीच त्याच्या अंगावर घातली तरी त्याच्या गाडीला धडकल्यासारख वाटलं नाही. त्याला मागे वळून वा आरशात पण पाहायची हिंमत झाली नाही.

पुढे काही दिवसानी आम्ही मित्रमंडळी गप्पा मारत बसलेलो असताना रफीकने ही हकिकत सांगितली.

तेव्हा, दत्ता जो कि एरिगेशन खात्यात होता त्यानेही आपल्याला तिथे एक माणुस पाहील्याचे सांगितले आणि त्याला व त्याच्या मित्राला असाच अनुभव आल्याचे सांगितले.

ही दोन्ही माणसे माझ्या अगदी माहीतीतील व फेकू नाहीत हे अगदी खात्रीपुर्वक सांगतो.

२-३ महिन्यांपुर्वि नाशिकमधिल एका अपार्टमेंट बद्द्ल एका चैनल वर दाखवत होते. त्या अपार्टमेंट मध्ये दोन महिलांचा संशयास्पद म्रुत्यु झाला. त्यानंतर तेथिल इतर लोकांना त्या रात्रि बेरात्रि दिसत. त्यामुळे तेथिल सर्वांनि फ्लैट सोड्ले. ति अपार्टमेंट आता ओस पडलि आहे. याचा शोध लावन्यासाठि एकजण रात्रि बारा वाजता तिथे गेलेला त्यालाहि दोन महिला रड्ताना दिसल्या म्हनुन तो त्यांना विचार्न्या साठि गेला तर त्या त्याच्याकडे रागाने पाहु लागल्या.पुढे काय झालं माहित नाहि बहुतेक झि न्युज वर दाखवलेल. मोस्ट हौन्टेड प्लेस या टाइट्ल ने दाखवलेलि. राजस्थान व नाशिक असे दोन ठिकाणं होति.

अहो! काहि पण काय? नाशिक मन्दिराच शहर म्हणून प्रसिद्ध आहे, हॉन्टेट वैगरे म्हणून नाही ह!

अहो! काहि पण काय? नाशिक मन्दिराच शहर म्हणून प्रसिद्ध आहे, हॉन्टेट वैगरे म्हणून नाही ह!>>>> टि. व्हि चैनल वर दाखवलेलं जवळपास राहणार्या लोकांनि हि दुजोरा दिलेला. रात्रि तिथुन जाताना लोक संमोहित होउन त्या अपार्टमेंट मथ्ये जातात. असं तेथिल रहिवाशांनि सांगितल. असा अनुभव आलेल्या एकाचि मुलाखत हि दाखवलि.
मग आता कस कळणार काय झालं ते...>>>> यु-ट्युब वर मिळालि तर लिंक टाकतो.

भारी धागा आहे

काही जणांचे अनुभव पटले आणि तसे ते इतर अनेक ठिकाणी येत असतात. पण सुनसान जागीच फक्त का ते नाही कळत. की भुत पण माणसांना घाबरतात एकत्र पाहुन Wink

Jokes apart
अनेकवेळा जंगलात शिकारी वेळी मलाही बरेच अनुभव आलेत पण ती स्पंदने फक्त जाणवत राहण्या पलीकडे काही कधी त्रास नाही झाला (अपवाद एकाच घटनेचा)

इथे काही लोकांनी पुड्या सोडल्या असतील हे मान्य.

बऱ्याच जणांनी हा माझ्या काका / काकु / मामा / मामी / आजी / आजोबा यांचा अनुभव म्हणुन शेअर केला आहे. त्यातिल काहींनी नातेवाईकांच्या नावे खपवलेली पुडी असेल, किंवा त्या नातेवाईकांनी अनुभव लिहिणाऱ्यांपुढे पुडी सोडली असेल हे ही मान्य.

पण सगळेच पुड्या सोडत नाहीयेत, त्यांच्या दृष्टीने त्यांचा अनुभव सच्चा आहे हे पण मान्य असायला हवे ना!

पुड्या सोडणे वगैरे तर काही माहीती नाही कारण आपण त्यांच्या जागी किंवा त्यांच्या घटनेसंबधात प्रत्यक्ष साक्षीदार नाही त्यामुळे माझ्या मते कोणावर सुद्धा असे आरोप करणे शोभत नाही. हे झाले तात्विक कारण पण शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा ह्यास अनेक कांगोरे आहेत ज्याबद्दल बीबीसी वर काही वर्षापुर्वी छान डॉक्यूमेंट्री होती आणि इंफ्रारेड मध्ये काही शैडो कॅमेरात स्पष्ट दिसल्या.

स्पिरिट्स असतात अस्तित्वात हे नाकारणे तेवढे सोपे नाही. पौर्णिमा आणि इतर दिवशी राहु नक्षत्र काळात त्याचा विशेष अनुभव येतो. पण मग हे सरस्कट सर्वाना का नाही दिसत हाही प्रश्न उद्भवतो.

येथे ते मनुष्य गण वगैरे फार चिकित्सा न करता एक कारण पटते ते ऑरा सम्बंधी. ज्याचा हां कमकुवत त्याला नक्की त्रास होतो. शास्त्रीय कारण पटते ते दुर्बल किंवा घाबरे मनोवृत्ती

बाकी माझ्या वाचनात आलेल्या बाबीनुसार भुत हे आपल्या मितीत नसतात म्हणजेच तो प्रकार थ्री डायमेंशन सोडून दुसऱ्या मितीत अस्तित्वात असणार. आणि हे जे भुत प्रत्यक्ष दिसते ह्याचा अर्थ त्या भुताने त्रीमितीत प्रवेश मिळवला असे मानावे लागेल जे मुळात एवढे सोप्पे नसते कारण ह्यासाठी प्रचण्ड शक्ति खर्च होत असते. जरी कोणी असे आले तरी त्यांना पूर्ण सॉलिड स्ट्रक्चर नाही लाभत म्हणून ते आपल्याला स्पर्श करून डायरेक्ट ईजा सुद्धा नाही करु शकत. फक्त असे मानवी रूप पुर्णपणे घेवून प्रत्यक्ष शारीरिक ईजा करणे ब्रह्मराक्षस कॅटेग्री मध्ये जमते आणि ह्या प्रकारच्या भूतांचे प्रमाण फार कमी असल्याने प्रत्यक्ष त्याचे विक्टिम (खरेखुरे) सुद्धा अगदी क्वचितच. बाकी सर्व आपल्या मनाचे खेळ. पण ते घडवले जातात इतर दुय्यम कॅटेग्रीच्या भुत वगैरे कडून ज्याना प्रत्यक्ष आपल्याला काहीही स्पर्श करता येत नाही म्हणून विविध प्रकारे घाबरवत त्रास देणे इतपतच शक्य होते.

जेथे वाईटशक्ति अस्तित्व दाखवतात त्याला प्रतिकार मानवी पातळीवर कोणी कितीही बढ़ाया मारल्या तरी शक्य नसते. श्रद्धा असलेले कणखर मन फक्त ह्या तावडीतुन सहिसलामत सुटते.

निर्जन स्थळी किंवा शहरात गावात विविक्षित ठिकाणी अश्या प्रकारची अस्तित्व असतील तर त्याची स्पंदने जाणवत राहतात. हे सबल मनाच्या सर्वाना अजमावता येईल. अध्यात्मामध्ये आपण अष्ट भाव जागृत झाले वगैरे शब्द वाचतो ते नक्की काय असते ? आपल्याला जाणवलेल्या शुभ स्पंदनांसाठी आपल्या मनाचे रिफ्लेक्शन. अगदी त्याच थिअरी नुसार निगेटिव्ह स्पंदने आपल्याला फिल होऊ शकतात. न घाबरता अन त्यास कुठलाही प्रतिसाद न देता ह्याचाही आस्वाद घेण्यासाठी भरपूर भ्रमन्ती घडलीय आणि त्यानुसार अनुभवसुद्धा, त्यावरुन भुत नसते हे तर मी नक्कीच मानत नाही पण भुत आहे म्हणून त्याला घाबरण्याचेही उगीच कारण नाही. आपला मनोनिग्रह महत्वाचा !

"रात को बारा बारा बजे, एक एक बजे हम खेतो मेंसे होकर एक गाव से अपने गाव पहुंचते थे... निहत्थे, कभी अकेलेही.. कभी डर नही लगा सा'ब... बिल्कुल भी नही, कोई पेड-पिपल, कुंआ, रास्ता कभी कुच्छ अजीब नही, लगा.. जवान तो हम तब भी थे, जवान तो हम अब भी है.. मग ये जो ३ महिने गुजरे हैना जिंदगी के.. पुच्छो मत..."

"हमारा वो खास दोस्त था पंडीत, एकदम शुद्ध ब्राह्मण था... हमारे घर में जिस दिन मांस-मटन रहता तो वो दरवाजेतक भी आता नही... वो दिन तो हमें मिलता भी नहीं था.. मग दोस्ती थी मजबूत... ऐसा कठोर ब्राह्मण उस दिन घर पें आया, बैठे बैठे उबले हुए अंडे बस खाते गया... हंसी मजाक कर रहा था.. हम भौचक्का एक-दुसरे को देख रहे थे... गजब हुवा सा'ब उस दिन... पुछो मत..."

"चाय बना रहा था भाई... शक्कर का ढक्कन खोला, तो शक्कर नहीं थी.. मुझे बोला जा नीचे से लेके आ.. मै ले आया आधा किलो... उसने शक्कर भरने के लिये डिब्बा खोला, पुरा भरा हुआ था... मतलब अभी तो उसके सामने वो डिब्बा था.. मुश्किलसे पाच मिनिट.. अभी शक्कर थीही नही... अभी पुरा डिब्बा भरा हुआ... सर चकराने लगा भाई का...."

"मै जब भी हजामत बनाता था... खून निकलता बहुत.. समझमें नही आता था.. इतना कटता था.. पुरा चेहरा लहुलुहान हो जाता था... वो घर छोडने के बाद कभी नही हुआ... उससे पेहेले भी नही कभी...."

" ये मेरा आयकार्ड हे... फोटो बस छ्ह महिने पुरानी है... छह महिने पहले मै ऐसा दिखता था... पंजाब से आया हुं साब.. घी में पला बढा हूं... तीन महिने में ये हालत हो गयी के पूछो मत साब..."

माझ्या समोर त्याने आयकर्ड धरले होते... विश्वास ठेवणे कठीण होते... फोटोमधला मुलगा ८०-९० किलोचा गबरू जवान, पंजाबी मुस्टंडा आणि जो हा 'हेड सिक्युरिटी गार्ड' आयकार्ड धरुन आहे तो फारतर ५०-५५ मध्ये आटोपेल असा... दहा दिवस त्याला बघत होतो. तो एक सच्चा माणूस होता.. खोटे बोलणारा, छ्क्केपंजेवाला नाही.... एकदम सोन्याचं मन असणारा.. त्याने सांगितलेली गोष्ट खरी होती...

आठवणीतून.... २००४, पृथ्वी हाऊस, जुहू, मुंबई.

(पूर्ण किस्सा पुन्हा कधीतरी)

"त्यावरुन भुत नसते हे तर मी नक्कीच मानत नाही पण भुत आहे म्हणून त्याला घाबरण्याचेही उगीच कारण नाही. आपला मनोनिग्रह महत्वाचा !"
सहमत आहे, तसेच ज्याना अनुभव यायचा असेल तर तो भरदिवसा अगदी,गजबजल्या वेळी सुद्धा येउ शकतो (शहरातसुद्धा).

अनिरुद्ध

कश्यावरुन सगळ्या पुड्या आहेत ... काही पुड्या असतील पण मी काही किस्से सांगितले आहेत ते खरे आहे ...

विनिता.झक्कास - कन्नमवार वरून पुढे गेलात कि आडगाव नाकावरून थोडे पुढे गेलात तर युजीवीकडे जो फाटा आहे तिथे ...

अजय अभय अहमदनगरकर - हाय वे अलीकडच्या काळात झाला आधी तो सिंगल रोड होता ... माहित नसल्यास आधी माहिती करून मग प्रतिक्रिया द्या ...

Pages