Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझी एक कझिन डॉक्टर आहे. ती
माझी एक कझिन डॉक्टर आहे. ती ज्या हॉस्पिटलात नोकरी करायची त्यात एका बाळंतीणीचं भूत एका खोलीत आहे असं लोक म्हणायचे. तिच्या एका कलिगला रात्री तिथून राऊंड मारताना त्या खोलीतून आवाज आला म्हणून खोलीच्या वरच्या झापेतून तिने आत पाहिलं तर तिला एक बाई दिसली आणि त्यानंतर तिने तिथून जायचं टाळलं असं माझी कझिन म्हणाली.
अजून दोन किस्से आहेत पण ते आईला नीट विचारून मग इथे पोस्ट करेन.
भुत्याभाऊ, चांगली माहिती दिली
भुत्याभाऊ, चांगली माहिती दिली आहे वर...
मी चकव्याचे अनुभव घेतलेत, व ते माबोवर पुर्वि दिलेही आहेत.
भुत्याभाऊ, चांगली माहिती दिली
भुत्याभाऊ, चांगली माहिती दिली आहे वर... Happy >>>>+१
गेल्या वर्षी मी माझ्या आजोळी
गेल्या वर्षी मी माझ्या आजोळी,गणपतीपुळ्याला गेलेले. मी, बहीण, भाऊ आणि मामी रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा मामीने एक अनुभव सांगितला.
तिचा चुलत भाऊ मिलिटरी कँप मधे ट्रेनिंग घेत होता.रात्री एका मोठ्या हॉल मध्ये झोपायचे सगळे. पण हॉलमधल्या एका ठराविक पंख्याखाली झोपल्यावर कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे किंवा कुणी तरी रोखून बघतयं अस वाटायचं. खूप जणांना अस्वस्थ वाटायचं,भीती वाटत असे, झोप पण यायची नाही. एकदा मामीचा भाऊ झोपला तिथे.त्याला पण तसंच व्हायला लागलं. तो डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत होता. मधेच का कुणास ठावूक त्याने डोळे उघडले आणि छताकडे पाहिलं तर त्याला पंख्यावर बाई दिसली, शून्यात नजर लावून बसली होती. तो खूपच घाबरला. पंख्याखालुन बाजूला झाला आणि सगळ्यांना ओरडून उठवलं पण कुणालाच काही दिसलं नाही.
हे ऐकून मी खूप घाबरले. झोपताना मी मधे झोपले आणि ते ही नेमकं पंख्याखाली. मला ती गोष्ट आठवून आठवून झोपच येईना. मधेच पंख्याकडे नजर टाकली आणि मला ती दिसली. डोक्यावरून पांघरून घेऊन डोळे गच्च मिटून घेतले.
माझं imagination इतकं भारी पडलं माझ्यावर,रात्रभर झोप नाही लागली.
भुत्याभाऊ तुम्ही दिलेली
भुत्याभाऊ तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे. त्यात अजून एक छोटीशी बाब , मी असा ऐकलंय कि ज्यावेळी आपल्याला चकवा लागलाय असे वाटते किंवा समजते , त्यावेळी तडक जमिनीवर बसावे. आणि रस्ता ठरवावा. शक्य असल्यास एखाद्या कागदावर नकाशा बनवावा. खरे खोटे माहित नाही पण कोणातरी वडीलधाऱ्या माणसाकडून ऐकले होते कि चकवा हा जो काही प्रकार आहे तो साधारण कंबरेपर्यंतच्या उंचीपर्यंत प्रभाव करतो. आपण खाली बसल्यास त्याचा प्रभाव होत नाही. असे कोणी प्रत्यक्षात केल्याचे ऐकिवात नाही. पण तरी कोणीतरी सांगितले होते हे खरे.
जुन्या काळी गावाला सगळ्यांची स्वतःची मोठी घर असायची. त्यात बाळंतिणीची खोली हमखास असायची. आधी कुटुंबनियोजन आणि सुधारित वैद्यकीय सेवा यांचा अभाव होता. आणि कुटुंब हि बरेच मोठे असायचे त्यामुळे हि खोली सहसा रिकामी नसे. पण हळूहळू वैद्यकीय सेवा आल्या , दवाखाने हॉस्पिटल आले आणि या खोल्यांमधील वावर बंद झाला. अनेक स्त्रियांचा बाळंतपणामध्ये तेथे मृत्यू झाला असणार. त्यामुळे घरातील कोणीही त्या खोल्यांमध्ये राहायला धजावत नसे. बहुतांशी या खोल्या बंदच असतात. माझ्या आईच्या गावाच्या घरीही एक अशी खोली होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत जेंव्हा सगळे गावाला जमायचे तेव्हा राहायला जागा कमी पडल्यावर जो शेवटी आला असेल त्याला त्या खोलीत राहावे लागायचे. आम्हालाही खूप वेळा तेथे राहण्याचे सौभाग्य मिळाले. पण आजीच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही स्वतः वेताळ , समंध , हडळी आणि जखिणी यांची टोळी तिथे असताना इतर कोणताही अमानवीय त्रास होणे अशक्यच. असो विनोदाचा भाग सोडता अश्या खोली मध्ये मृत स्त्री चा आत्मा घुटमळत असतो. शक्यतो कोणीहि, खासकरून गरोदर स्त्रीने तेथे ना राहावे. काही वेळा आत्मा हिंस्रक असून बदला घेण्याचा प्रयत्न करू शकतो.
स्वप्ना_राज , स्वरांगी भारि
स्वप्ना_राज , स्वरांगी भारि अनुभव
थोडी सायंटिफिक माहिती
थोडी सायंटिफिक माहिती
भूत योनीबद्दल शास्त्रांमध्ये दिल्या गेलेल्या माहितीनुसार ही योनी अस्तित्वात असते. मानवाचा जन्म पंचमहाभूतांपासून झाला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असी ती पंचमहाभूतं आहेत. मृत्यूनंतर माणूस या पंचतत्वांमध्येच विलीन होत असतो. मात्र या पंचमहाभूतांमधील एका तत्वाचं प्रमाण आपल्यामध्ये जास्त असतं, ते म्हणजे पृथ्वी.. म्हणजेच माती. त्यामुळे मृत्यूनंतर शरीराची राख होते.याउलट भूत योनीमध्ये वायू तत्वाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या योनीतील आत्मे आपल्याला स्थायी रुपात न दिसता वायू रुपात आभासी पद्धतीने दिसतात. मात्र ज्या व्यक्तींचा राक्षस गण असतो, त्यांना वातावरणातील अमानवी गोष्टींचा आभास प्रखर रुपात होतो. त्यामुळे भुतांचं दर्शन या योनीतील माणसांना घडतं. इतरवेळी भूत दिसणं अशक्य असतं. हे यामागील शास्त्र आहे.
>>पण आजीच्या म्हणण्याप्रमाणे
>>पण आजीच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही स्वतः वेताळ , समंध , हडळी आणि जखिणी यांची टोळी तिथे असताना इतर कोणताही अमानवीय त्रास होणे अशक्यच.----- हा हा हा
maza ek anubhav ahe i think
..
"मात्र ज्या व्यक्तींचा राक्षस
"मात्र ज्या व्यक्तींचा राक्षस गण असतो, त्यांना वातावरणातील अमानवी गोष्टींचा आभास प्रखर रुपात होतो. त्यामुळे भुतांचं दर्शन या योनीतील माणसांना घडतं. इतरवेळी भूत दिसणं अशक्य असतं. हे यामागील शास्त्र आहे."
@ भुत्याभाउ मी ऐकले होते कि मनुष्य गणातील व्यक्तिला दिसतात म्हणुन ? खरे नक्कि काय आहे?
अनिरुद्ध
@ अनिरुद्ध - राक्षस गणाला
@ अनिरुद्ध - राक्षस गणाला त्याची जाणीव तीव्रतेने होते आणि मनुष्य गणाला पण दिसते पण जाणीव तितकी तीव्र नसते
याला अमानवीय म्हणावे कि नाही
याला अमानवीय म्हणावे कि नाही माहीत नाही परंतु मी स्वतः पाहिलेला आहे...
नाशिकलाला द्वारका भागात एक बंगला आहे ... मला आठवते तेव्हापासून त्यात कोणी राहत नाही परंतु त्याच्या खिडक्यांच्या काचा सैदव फुटलेल्या असतात ... तिथे एका मुलीने आत्महत्या केली होती. काही लोकांनी तो बंगला विकत घेऊन सगळ्या काचा नवीन बसवल्या तर दुसऱ्या दिवशी परत सगळ्या फुटलेल्या ... त्यांना वाटले कोणीतरी मुद्दाम फोडल्या असतील म्हणून त्यांनी एक watchman ठेवला काही दिवसांसाठी कारण आतल्या भागाचे काम अजून पूर्ण नव्हते म्हणून ते राहायला नव्हते आले ... परंतु नंतर देखील सगळ्या काचा फुटलेल्या ... watchman ला विचारले तर तो म्हणाला रात्री काहीच दिसले नाही पण सगळ्या काचा फुटायला लागल्या ... तो भीतीने पळून गेला ... आज देखील तो बंगला बंद आहे ... कधी तिकडे गेलो तर फोटो टाकतो नक्की
एखादी वास्तू विकली जाऊ नये ,
एखादी वास्तू विकली जाऊ नये , तिला गिर्हाईक मिळू नये म्हणून अशा अफवा उठविल्या जातात हे माहीत नाही का तुम्हाला?
@ अजय अभय अहमदनगरकर - आहो मला
@ अजय अभय अहमदनगरकर - आहो मला माहित हे आहे. परंतु जे मालक आहेत त्यांना काही कमी नाही त्यांचे अजून ४ बंगले आहेत वेगवेगळ्या भागात .. त्यामुळे तसं काही असल्याचा संबंध नसावा असे मला वाटते ...
तसंही त्या वस्तूकडे पाहिलेतर उगीचच उदास वाटतं ... अगदी ज्यांना तिची पार्श्वभूमी माहित नाही त्यांना देखील .. कदाचित खूप वर्ष बंद असल्याने असेल
राक्षस गणाला त्याची जाणीव
राक्षस गणाला त्याची जाणीव तीव्रतेने होते आणि मनुष्य गणाला पण दिसते पण जाणीव तितकी तीव्र नसते >>> हे खरचं अस काही असतं का भुत्यआभाऊ ???
मला पण प्रश्न पडलेला ...पण मी विचारला नाही...
सहमत आहे भुत्याभाउ. अशा काही
सहमत आहे भुत्याभाउ. अशा काही वास्तू माहितीत आहेत.
पण असेही म्हणतात कि देव
पण असेही म्हणतात कि देव गणाला जाणवते. माझा देव गण आहे काही अन्तरावर अस्ल्याचे ३-४ वेळा जाणवले आहे. कधी अन कसे ते सविस्तर लिहिन
विद्या१, नक्की लिहा.
विद्या१, नक्की लिहा.
चिंतोपंत तुम्ही अजुनही
चिंतोपंत तुम्ही अजुनही प्रतिक्षेत आहात ना अश्या अनुभवाच्या ???
एक आला होता. पण त्याबद्दल
Me rakas gan asun,
Me rakas gan asun, mazyakadehi ahet anubhav pan marathit kase lihayche? Mala yet nahiy mobilevarun, koni help karel Kay plz
@क्रांतीवीर ,
@क्रांतीवीर ,
तुम्ही मोबाईलवरून लिहिणार असाल तर Google Indic Keyboard नावाच अॅप install करा.
जर लॅबतॉप /कॉम्प. यूज करणार असाल तर...
१) https://www.google.com/intl/mr/inputtools/try/
यावरून तुम्ही टाइप करून कॉपीपेस्ट करू शकता...
२) http://marathi.changathi.com/
@विद्या१ तुमचे अनुभव ऐकायला
@विद्या१ तुमचे अनुभव ऐकायला नक्की आवडतील ...
भारतातील Gaurav Tiwari, the CEO of Delhi-based Indian Paranormal Society, या बद्दल कोणाला काही माहिती आहे का.. मी असा वाचला आहे कि भामरागडवरून आल्यावर त्यांचा रहस्यमय मृत्यू झाला
अमानवीया
अमानवीया
जिथे जाहला
तुझा जीवनोदय
स्तंभ तिथे जरी
कुणी न बांधिला
तुज आळवितो
आम्ही माबोकर
@ भुत्याभाउ .. भामरागड कि
@ भुत्याभाउ .. भामरागड कि भानगढ़ , ते राजस्थान मधला उजाड़ गांव ना .. मी त्याला म टीव्ही च्या "गर्ल्स नाईट आउट " मधे बघितलेला. कोणाला त्या शो बद्दल माहित नसेल तर साधारण तपशील असा आहे. गौरव तिवारी आणि त्याची टीम देशभरातल्या वेगवेगळी बाधित ठिकाणी सर्वे करायचे. आणि त्याना काही अमानवीय प्रभाव जाणवल्यास, म टीव्ही त्या ठिकाणी ४ मुलींना घेऊन डॉक्युमेंटरी बनवायचे. १ रात्र त्या मुलींना त्या ठिकाणी घालवायची असायची. सर्वत्र कॅमेरे लावलेले असायचे. ४हि मुलींना बाधित ठिकाणी वेगवेगळ्या जागी एकटे राहून काही टास्क करायचे असायचे. अँकर रोड़ीस फेम रणविजय सिंघा (ज्याच्यामुळे मी शो बघायचो) होता. अनेक वेळा वस्तू पडल्याचे , काही सावल्याचे आभास त्या कॅमेरामध्ये टिपलेले दाखवले होते. पण माझ्या मते ते संपूर्ण बनावटी होते. त्यामुळे जास्त T R P ना मिळाल्याने तो शो लवकरच बंद झाला. त्यानांतर गौरव बद्दल सर्च केले असता ,त्याची भानगढ़ ची विडिओ बघितली. नेहमीप्रमाणेच त्यातही अस्सल भूत हा प्रकार काही बघायला मिळाला नाही.
पण मी तर ऐकलं आहे की भूतं ही
पण मी तर ऐकलं आहे की भूतं ही जास्त करून मनुष्य गणाच्या लोकांना दिसतात, आणि त्यांच्यावर त्यांचा इफेक्ट पण होतो, देव गणाच्या लोकांना पण दिसतात पण त्यांच्यावर प्रभाव पडत नाहीत आणि राक्षस गणांना दिसत पण नाहीत त्यामुळे त्यांच्यावर प्रभाव पडण्याचा प्रश्नच येत नाही.
अर्थात हे सगळंं ऐकीव.
अरे वाह खूप सोप्पे आहे.
अरे वाह खूप सोप्पे आहे.
थँक्स मेघा
भूत्याभाऊ नाशिकमधल्या त्या
भूत्याभाऊ नाशिकमधल्या त्या बंगल्याचा पत्ता द्या बरे, जौऊन येतो लगेच
कुणाला स्वतःला भुताने
कुणाला स्वतःला भुताने झपाटल्याचा अनुभव आहे काय?
मला आहे. तो लिहितो नंतर..
कुणाला स्वतःला भुताने
कुणाला स्वतःला भुताने झपाटल्याचा अनुभव आहे काय? मला आहे.>>>> अनुभव लिहुन काढा.
Pages