Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे साईट . धन्यवाद
मस्त आहे साईट . धन्यवाद हर्पेंन
हर्पेन किंमत ७०० +६० शिपिंग
हर्पेन किंमत ७०० +६० शिपिंग असंच ना?
हो
७०० चा माल ६० मधे मिळाला वाटलं का
ऑथेंटिक फिल्टर कॉफी पावडर आहे आणि एक जिंजर कॉफीपण interesting वाटतेय हो मी फिल्टर कॉफी पावडर कार्ट मधे अॅड केल्ये. पण अजून ऑर्डर केली नाहीये.
७०० चा माल ६० मधे मिळाला
७०० चा माल ६० मधे मिळाला वाटलं का फिदीफिदी>> हो ना
हर्पेन, कसली भारी साईट आहे
हर्पेन, कसली भारी साईट आहे ती! आता काही गोष्टी मागवते तिथून.
इथे लिहिल्याबद्दल धन्यवाद.
कसली भारी साईट आहे ती!
कसली भारी साईट आहे ती! >>
हो ना? मला तर काय घेऊ आणि काय नको असं पहिल्यांदाच फक्त याच साईट वर झालं होतं.
वेलकम जाई आणि श्रद्धा
मला ऑनलाईन खरेदीचं वेड आहे.
मला ऑनलाईन खरेदीचं वेड आहे. पण आता डिलिव्हरी कंपनीमुळे वाद होऊ लागले आहेत. आधीच्या घरी सासू सासरे असल्याने कधीच जाणवलं नव्हतं. कधीही डिलिव्हरी बॉय आला तरी कुणी न कुणी घरी असायचेच. इकडे नवीन असल्याने आणि दोघेही घरात नसल्याने गेल्या महिनाभरात किमान १० ते १५ वस्तू परत गेल्या.
या कंपन्या डिलिव्हरीचं स्केड्युल देतात ते कधीच पाळत नाहीत. ८ डिसें ते १४ डिसे किंवा अमूक तारखेनंतर १५ दिवसात सांगून प्रत्यक्षात त्याआधीच डिलिव्हरी होते. अशा वेळी व्यवस्था करता येत नाही. त्यात आम्ही नवीन आहोत. शेजा-यांना लगेच त्रास देणं बरं वाटत नाही. इकडचे डिलिव्हरीवाले जरा उद्धट आहेत. मी सगळीकडे नव-याचा नंबर दिलेला होता. त्याला उद्धटपणा केलेला अजिबात चालत नाही. मग वाद होतात. त्या मुलांचं म्हणणं की वेळ नाही सांगता येत. एकाने तर सीओडी पार्सल घेतलं नाही तर २४ तासात परत पाठवावं लागतं म्हणून पाठवून दिलं. मला सण्डे सुपर सेल मधे ४५०० रु. चा ड्रेस ७०० मधे मिळाला होता. ते गेल्याचं अतिशय वाईट वाटलं. नंतर चौकशी केल्यावर कळालं की तीनदा ट्राय करावा लागतो. कंपनीचं नाव Aramex. अॅमेझॉन वर मुलीसाठी घेतलेला ड्रेस आलाच नाही आणि त्याने कस्टमर घरी नाही असा रिपोर्ट दिला होता. कंपनीला कळवूनही फायदा झाला नाही. कंपन्यांना आधी फोन करून डिलिव्हरीच्या सूचना देऊनही फायदा होत नाही.
ट्रॅकिंगसाठी एक वेबसाईट दिलेली असते. प्रत्येकाची वेगळी असते. तिचा फारसा उपयोग होत नाही. सकाळी नऊ ला घर सोडलं की साडेदहा वाजता यांचा मेसेज येतो , तुमचं पार्सल डिलिव्हरीसाठी बाहेर पाठवलं आहे. किती वाजता येणार त्याचाही उल्लेख नसतो. साडेदहाला मेसेज आला कि रात्री आठपर्यंत कधीही. ते ही पूर्णपणे डिलिव्हरी वाल्यावर असतं. त्याच्याकडे बहुतेक खूप मोठा भाग दिलेला असतो. त्याला फोन केला होता एक दोनदा. एकदा म्हणाला मी डीएसके विश्वला आहे. पाच मिनिटात येतो. मी तासभर वाट पाहून मग भाजी आणायला गेले तर हा इकडे घरी हजर. त्याचा फोन आला म्हणून पळत आले तर निघूनही गेला होता. इतका वेळ नसतो म्हणाला थांबायला.
त्यांच्याही अडचणी असतीलच, पण असा बेरभरवशाचा कारभार असेल तर डिलिव्हरीचं काय ? किमान सकाळच्या सत्रात मुलगा येणार आहे हे नाही का सांगता येत ? मेसेज एक दिवस आधी पाठवला तर थोडा तरी वेळ मिळेल. अर्थात त्या वेळीही व्यवस्था करता येईलच असं नाही.
सपना अगं इतकी पळापळ
सपना अगं इतकी पळापळ करण्यापेक्षा दरवाजावर लिहुन ठेवायचे पार्सल बाजुला द्यावे म्हणुन .. देतात ते लोकं .. अन शेजार्यांना इतका काहि त्रास नाहि होणार .. अगोदर सांगुन ठेवायचं.. आमचंहि असं झालं होतं.. पण बाजुवाल्यानी आणुन दिल घरी पोचल्यावर लगेच..
तुमचा सिक्युरिटी नाही ठेवून
तुमचा सिक्युरिटी नाही ठेवून घेत का? आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये आता प्रत्येक बिल्डिंगला काही तरी कपाटासारखं ठेवणार आहेत विथ पासवर्ड. तिथे कोरियर ठेवणार. नक्की कस काम करतात ते वापरले कि सांगीन. सध्या security / maintenance जिंदाबाद
हो, पण आपण सकाळी नऊ ला
हो, पण आपण सकाळी नऊ ला गेल्यानंतर आणि ठरलेल्या दिवसाच्या आधी पार्सल आल्यावर कसं सांगणार शेजा-यांना ? कारण यांचे मेसेज सकाळी साडेदहा नंतरच येतात. फोन केला तर तो ऑफीस मधे जातो. सीओडीला नेहमी प्रॉब्लेम येतो.
माझ्या बाजूला एकच फ्लॅट आहे. ते काका अंथरुणाला खिळून असतात. समोरचे दोन फ्लॅट्स आहेत. त्या काकूंनाही बाहेर जायचं असतं. एकदा प्रिपेड पार्सल वॉचमनकडे दिलं होतं. पण सिक्युरीटीने सांगितलं की त्यांना ही कामे देऊ नका.
माझं म्हणणं इतकंच आहे कि ८ तारीख सांगितली असेल तर त्या दिवशी पाठवा. इतकंही अशक्य नसेल ते.
म्हणजे कुणालातरी सांगता येईल.
पण आपण सकाळी नऊ ला गेल्यानंतर
पण आपण सकाळी नऊ ला गेल्यानंतर आणि ठरलेल्या दिवसाच्या आधी पार्सल आल्यावर कसं सांगणार शेजा-यांना ? कारण यांचे मेसेज सकाळी साडेदहा नंतरच येतात.>>> मी सगळ्या ऑर्डर्स ऑफिस अॅड्रेसवरच मागवते.
राजसी, प्रतिसाद लिहीत असतानाच
राजसी, प्रतिसाद लिहीत असतानाच तुझा प्रतिसाद आला. आत्ता वाचला.
सपना अस होत असेल तर ऑफिस
सपना अस होत असेल तर ऑफिस अॅड्रेस द्यायचा.. पण शनिवार - रविवार आलं तर परत प्रॉब्लेम.. आमच्या ऑफिसमध्ये या दिवशी देखिल एखादा प्युन असतोच म्हणुन पार्सल मिळतच.
मी सगळ्या ऑर्डर्स ऑफिस
मी सगळ्या ऑर्डर्स ऑफिस अॅड्रेसवरच मागवते. >> मस्तं. नोकरीचा हा फायदा आहे.
सपना, काही वेबसाईट त्यांच्या
सपना, काही वेबसाईट त्यांच्या डेपोमधून पार्सल घेऊन जाण्याचे ऑप्शन देतात.
भावना माझं ऑफीस असं नाही.
भावना
माझं ऑफीस असं नाही. फ्री लान्सर आहे. प्रॉब्लेम फक्त अचानक (वेळेआधी) आलेल्या पार्सल्सचा आहे. इतर बरीच पार्सल्स जी ठरलेल्या वेळेत आली ती रिसिव्ह केली मी. एकदा कुरियरच्या ऑफीसमधूनही घेतलं होतं.
लगेच येणार असू तर आपल्याच
लगेच येणार असू तर आपल्याच दाराशी ठेवायला सांगायचं. मी अस खूपदा करते. किंवा मग एखाद मोठं खोक दाराबाहेर ठेवायचं आणि त्यात ड्रॉप करायला सांगायचं. बिग बास्केट चे क्रेट्स खूपदा दाराशी ठेवून घेतलेत. कारण ओपन आणि एवढे कस सिक्युरिटी ठेवून घेणार. प्रीपेड बिसलेरी कॅन -रिकामे कॅन बाहेर ठेऊन.
मला फ्लिपकार्टचा नाही येत
मला फ्लिपकार्टचा नाही येत प्रॉब्लेम. त्यांची स्वतःची कुरियर कंपनी असल्याने ताळमेळ चांगला जमतो. लवकर पार्सल आलं तर आदल्या दिवशी फोन सुद्धा येतो.
राजसी, त्यांना तर सही लागते
राजसी, त्यांना तर सही लागते ना ?
बेस्ट मग फ्लिपकार्टवरूनच
बेस्ट मग फ्लिपकार्टवरूनच मागवायच. मी सध्या flipkart सोडलंय त्यांच्या डिलिव्हरी चार्जेस आणि रिटर्न पॉलिसी मुळे. अँमेझॉन व्हेरिफाईड घेते. फ्लिपकार्ट वर price check करायला पण जात नाही.
कोणाला? सही? नाही . मी ठेवा
कोणाला? सही? नाही . मी ठेवा सांगितले की सगळी जबाबदारी माझी. मी मला परवडेल तेवढी रिस्क घेते. बिग बास्केट क्रेट आणि वॉटर कॅन कोण चोरेल, अशी माझी भाबडी समजूत आहे. परत पाणी आणि फूड आयटम्स कोणी चोरले तर बिचाऱ्या ना तेवढी गरज असेल, जाऊ दे!
फ्लिपकार्ट वरून फक्त मोबाईल
फ्लिपकार्ट वरून फक्त मोबाईल किंवा इतर वस्तू मागवल्या जातात. शॉप क्ल्यु आणि पेटीएम वर पण चांगल्या ऑफर्स असतात. अॅमेझॉन आणि अली एक्स्प्रेस चा प्रश्नच नाही. पण घरी न येताच कस्टमर घरी नव्हता म्हणून कळवत असतील तर काय उपयोग ?
घरी येत नसतील तर तक्रार
घरी येत नसतील तर तक्रार करायची, it helps. मोबाईल येणार असेल तर मी थांबते
दिवाळीत मला amazon ची खूप मदत झाले, they went out of the way to deliver the gifts when told them that they are diwali gifts and would be no use if delivered after diwali.
राजसी चोरीचा नाही प्रश्न. ते
राजसी
चोरीचा नाही प्रश्न. ते सही घेतात डिलिव्हरी पूर्ण केल्यानंतर. अशा पद्धतीने देत असतील तर मी सिरीयसली विचार करतेय भिंतीला लागून लाकडी खोकं बनवता येईल का याचा. म्हणून विचारलं.
आले जरा आवरा आवरी करून..
आले जरा आवरा आवरी करून.. बोलूयात. जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
मी सध्या amazon only कस्टमर
मी सध्या amazon only कस्टमर आहे. त्यामुळे इतरांबद्दल माहीत नाही.
मी सध्या flipkart सोडलंय
मी सध्या flipkart सोडलंय त्यांच्या डिलिव्हरी चार्जेस>>>> +१. मी स्नॅपडीलची कस्टमर आहे.
प्लेस ऑफ ओरिजिनवरून भाचीला आंबे पाठवले होते.त्यांची साईट खूप टेंम्प्टींग आहे.
हर्पेन, लाखमोलाचं काम केलं
हर्पेन, लाखमोलाचं काम केलं आहेस. तुला पोटापासून धन्यवाद
मी पण ओन्ली अॅमेझॉन .
मी पण ओन्ली अॅमेझॉन .
मी ताजा आयडी असताना या
मी ताजा आयडी असताना या धाग्यापुढे ३० नवीन प्रतिसाद दिसतात. हे कसे काय? नुकताच जन्म झाला आहे.
www.qikpod.com हे कपाट मी वर
www.qikpod.com
हे कपाट मी वर सांगत होते . पैसे भरून आहे ही सर्विस, आत्तातरी मी वापरीन असे वाटत नाही. पण ही कपाटं आहेत म्हणून सिक्युरिटी नी पॅकेजेस स्वीकारणे बंद केले तर मग मला पण भविष्यात अडचण येईल असे वाटते. किती रेंटल घेतात त्यावर अवलंबून आहे.
Pages