Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11
सध्या फ्लिपकार्ट , अॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.
**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी काही दिवसांपुर्वी limeroad
मी काही दिवसांपुर्वी limeroad वर एक स्कर्ट मागवला .. ऑन्लाईन पे केल्यावरही ऑर्डर प्लेस झाल्याचा समस भेटला नै आणि बँकेचा समस आला.. लगेच त्यांना मेल केला तर त्यांनी अगदी २ दिवसात त्यांच्या फायनांन्स टिम ला विचारणा करुन ऑर्डर प्लेस झाल्याची मेल केली .. ओव्हरऑल हा अनुभव मस्त होता.. सहसा कॅश ऑन डिलेव्हरी चा ओप्शन निवडते पण नेमकं ऑनलाईन पेमेन्ट केल्यावर असली गोष्ट झाली कि जाम जीवावर येत .. :रागः
टीना, मलाही असाच अनुभव आला
टीना, मलाही असाच अनुभव आला आता. माझ्याकडे समस होता ऑर्डर प्लेस झाल्याचा. त्यावरुन ट्रॅक करत होते.
हं .. इथे कुणाला इबे चा अनुभव
हं ..
इथे कुणाला इबे चा अनुभव आहे का ?
मला अँटीव्हायरस घ्यायचा आहे आणि त्यावर छान डिल मिळत आहे .. करावी का शॉपींग त्यावरुन. ?
सुमेधाजी, ते हॅलोजेन अव्हन
सुमेधाजी,
ते हॅलोजेन अव्हन आहे. सर्व बेकिन्ग, कुकीन्ग कमी तेलात, एअर फ्राइन्ग ग्रिलिन्ग वगैरे करते. यूट्यूब वर रिव्य्हू व इन्फोमेन्युअल आहे. बघुन घ्या. मी घेणार आहे.
अलिवरून सिल्व्हर मटेरियल
अलिवरून सिल्व्हर मटेरियल खरेदी केलंय. मला तर क्वालिटी चांगली वाटली.
५ महिन्यांच्या भाचीसाठी एक
५ महिन्यांच्या भाचीसाठी एक ड्रेस hopscotch वरुन घेतला , थोडा मोठाच घ्यावा, म्हणून ६-१२M चा ऑर्डर केला. बरोबर मॅचिंग शूज पण. २ दिवसात मिळाला, पण ड्रेस अगदीच छोटा ०-३ M वयासाठी.शूज ची क्वालिटी पण अत्यंत वाईट. तो परत करायचा ठरवला, आणि तोच ड्रेस, पण आता 1-1.5 वर्ष वयासाठी, अशी दुसरी ऑर्डर दिली. हा ड्रेस पण ३ दिवसात मिळाला, उघडून पाहते तर हा पण आधीच्याच मापचा ०-३ M साठीचा. या साइट वरुन असा अनुभव बर्याच वेळेला आलाय. Collection छान आहे , पण साइज़ वगैरे सगळं साईटवरच , हाताला येइन तो ड्रेस पॅक करतात ते. म्हणून हॉपस्कॉच लिस्ट मधून बाद.
ट्युलिप, माझा फ्लिपकार्टचा
ट्युलिप, माझा फ्लिपकार्टचा हाच अनुभव आहे.
माझा पायाचा साइझ अगदी छोटुसा ( EU34/34.5) असल्यामुळे मला फुटवेअर घेताना नेहमीच कॉम्प्रमाइझ करावं लागतं. हील्स तर अगदीच मिळत नाहीत. फ्लिपकार्टवर मस्त पॅटर्न आणि माझाच साइझ बघुन मी तुफान आनंदले. पण डिलिवर करताना त्यांनी EU37 पाठवला. तो परत केल्यावर परत EU36 आला. मला वाटलं चुक होत असेल पण नेट वर जर माझा साइझ दिसतो आहे तर परत एकदा प्रयत्न करुन पहाते ( आणि मला फार चॉइस ठेवता येत नसल्याने परत आशा होतीच).
यावेळेस तिसर्यांदा परत EU37 पाठवल्यावर एक स्टिंकर लिहुन रिफंड घेतला.
15 दिवसांपूर्वी अमेझॉन वर एक
15 दिवसांपूर्वी अमेझॉन वर एक ऑर्डर केली होती .पण साइटवर दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रॉडक्ट नसल्याने लगेच रिटर्न केलं आणि रिफन्डसाठी क्लेम केला. सर्व प्रोसिजर वगैरे होऊन 15 दिवसात रिफन्ड मिळाला . अमेझॉनचा पहिलाच अनुभव होता.. साइटवर दाखवल्याप्रमाणे प्रॉडक्ट नसणं हा रिव्ह्यू लिहून आलेय.
अॅमेझोन चे कॅश डिलिवरी असेल
अॅमेझोन चे कॅश डिलिवरी असेल तर ते तुम्हाला पार्सल ओपन करु देतात (पैसे घ्यायच्या आधी) थोडा आग्रह करावा लागतो. पसंद आल्यावर तुम्ही पैसे द्या अन्यथा परत पाठवा.
हो , मी तो डिलिव्हरी बॉय
हो , मी तो डिलिव्हरी बॉय गेल्यावर पार्सल उघडलं . कॅश ऑन डिलिव्हरीच होती ऑर्डर . आधीच ओपन करायला हवं होत
सध्या फक्त मिंत्रा आणि
सध्या फक्त मिंत्रा आणि मिंत्रा वरून खरेदी. कॅश व डिलिव्हरी चाच कायम ऑप्शन स्वीकारतो . अगदी आजच वेगळ्या कंपनी कडून अमोझोन वरून कॅमेरा आलाय.काल ऑर्डर प्लेस केली आणि आज आला पण
My personal experience Amazon
My personal experience Amazon is best for online shopping
अॅमेझॉन चा कायमच अतिशय उत्तम
अॅमेझॉन चा कायमच अतिशय उत्तम अनुभव आहे. पैसेपरती, दर्जा, पॅकिंग, पाठवायला लागणारा वेळ, सगळाच. रोखीच्या व्यवहारातही जेव्हा वस्तू परत केली तेव्हा लगेचच बँकेच्या खात्यात पैसे जमा केल्याचा अनुभव आहे. फक्त मी वस्तू निवडताना अॅमेझॉन फुलफिल्ड या निकषात बसतात ना एवढं बघून घेते.
फ्लिपकार्टच्या पॅकिंगचा चांगला अनुभव नाही, शिवाय बरेचदा अनेक गोष्टी काही विशिष्ट शहरांतच उपलब्ध आहेत असं दाखवतात. स्नॅपडीलचा अनुभव नाही.
माझाही अॅमेझॉन चा अनुभव खूप
माझाही अॅमेझॉन चा अनुभव खूप चांगला आहे.
फ्लिपकार्ट वरून मी ३ टॉप्स मागवलेले, त्या तिन्हीचीही क्वालिटी अतिशय वाईट आहे...त्यातला एक सेम पीस मी कँप मध्ये रस्त्यांवर कपडे विकणार्या विक्रेत्यांकडे पाहिला.. मी १००० रू. देऊन खरेदी केलेला टॉप त्यांनी २००रू. ला सांगितला, आणि मी कमी करून मागित्ल्यावर १२० रू मध्ये द्यायला तयार झालेला...
अॅमेझॉन चांगले आहे जवळपास
अॅमेझॉन चांगले आहे जवळपास सगळ्याच बाबतीत. वस्तुंच्या किंमतींबाबत थोडे विचित्र वाटतात मात्र कधिमधी. एक विशिष्ट हेका असल्यासारखे.
स्नॅपडीलवर फक्त ब्रँडेड वस्तु आणी त्याही घाई नसताना (डिलिव्हरीची) घ्याव्यात.
फ्लिपकार्टवाले महाडँबीस आहेत. इतर पर्याय नसल्यासच तिथे जाणे करावे.
जबोंग व मिंत्रा चांगले आहेत तसे पण बायकांसाठीच जास्त उपयुक्त.
वरील सर्व विधाने अनुभवाने आलेली आहेत आणी कदाचीत बदलुही शकतात.
स्नॅपडील, अॅमेझॉन,फ्लिपकार्ट
स्नॅपडील, अॅमेझॉन,फ्लिपकार्ट ,इबे चांगल्या साईटस आहेत.लाईमरोड,पेपरफ्रायचा अनुभव चांगला नाही
मिंत्रा वरच्या कपड्यांची
मिंत्रा वरच्या कपड्यांची क्वॉलिटी खुपच खराब आहे. साड्या मात्र खुपच छान निघाल्या.
अॅमेझॉन - १ नंबर. काही
अॅमेझॉन - १ नंबर. काही अनुभवः
१. एक मोबाईल फोन- ऊत्तम.
२. परत तोच फोन ऑर्डर - एक टेक्निकल फॉल्ट- सकाळी ९:३० ला रिटर्न रिक्वेस्ट टाकली- दुपारी १ च्या आस-पास त्यांनी कलेक्ट केला. २ वाजता पैसे अकाऊंट मधे जमा.
३. फोन केस - १० दिवस मिळाली नाही म्हणुन कंप्लेंट केली. ३ तासांनी रिप्लाय आला कि package was lost in transit. So full refund made to account. प्लस पुढच्या ऑर्डर ला रु. १००/- च गिफ्ट वाऊचर. पहिला केस २ दिवसांनी घरी आला. फुकट.
४. कार स्टीअरींग कव्हर - amazon fulfilled नव्हता. लुज फिटींग होते. म्हणुन रिटर्न रिक्वेस्ट टाकली. अॅमेझॉन ने सप्लायर ला फॉरवर्ड केली. थोड्या वेळाने सप्लायर चा फोन. माहिती घेतली आणि product चे फोटो मागितले. ते पाठवले. १ तासात रिफंड. वस्तु परतही नेली नाही.
स्नॅपडील : डिलीव्हरीची घाई नसेल आणि manufacturer warranty असलेले branded product असेल तर चांगले आहे. ३२ ईंच Phillips LED TV आणि एक exercise bike घेतली आहे. ऊत्तम अनुभव.
फ्लिप्कार्टः भगवान भरोसे. LED बल्ब ऑर्डर केले होते. भलत्याच brand चे आलेत.
शॉपक्लुज : रस्ते का माल सस्ते मे.
---
कानडा
ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत माझी
ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत माझी पहिली पसंती स्नॅपडिल ला दुसरी अली एक्स्प्रेस ला.
स्नॅपडील चा आता पर्यंतचा अनुभव अतिशय उत्तम. सर्व ऑर्डर्स वेळेत आणि उत्तम दर्जाची निघाली. एकदा मी एक नाईट सुट घेतला जो मला बसला नाही, मी साईज बदलून मागितला पण त्यांच्याकडे तो नव्हता, मग साईटवरच रिटर्न ऑप्शन सिलेक्ट करून मी तो ड्रेस परत नेण्यासाठी रिक्वेस्ट केली. त्यांचा मेसेज आला त्याप्रमाणे माणूस येऊन घेऊन गेला. पैसे त्याच दिवशी संध्याकाळी जमा झाले अकाउंटमध्ये.
अली एक्स्प्रेसवर फक्त डिलिव्हरी टू मच लेट असते त्यामुळे बोर होते. पण बाकी क्वालिटी उत्तम असते. मी आतापर्यंत मोस्टली फक्त कानातलीच घेतली आहेत, पण युनिक डिझाईन्स असतात शिवाय किंमती बर्यापैकी कमी असतात. त्यामुळे कधी कधी क्वालिटी ची शंका येऊ शकते, पण मला आजतागायत प्रॉडक्ट कायम अॅज डिस्क्रिपटेड च मिळाले आहे
स्नॅपडिल चा सप्लायर रिच
स्नॅपडिल चा सप्लायर रिच जास्त मोठा आहे.
फ्लिपकार्ट मुख्य इलेक्ट्रॉनिक गोष्टींसाठी वापरले जायचे.
जबोंग बायकांचे जरा महाग पण क्लासी कपडे.
कूव्ह्ज वगैरे खूपच महाग पडतात.
पण आता या सगळ्यांना झपाट्याने मागे टाकत अमॅझॉन ची घोडदौड चालू आहे.
मला अॅक्रिलिक कलर्स हवे होते.अमॅझॉन वर जवळ जवळ ४० रु ने स्वस्त मिळाले.
टाटा क्लिक्स पण अगदी हळूहळू पुढे येते आहे.लोकांच्या मनात यायला अजून वेळ आहे.
अमेझॉन बेस्ट आहे. कपडे वैगेरे
अमेझॉन बेस्ट आहे.
कपडे वैगेरे मागवत नाही. पण इतर बरंच काही मागवते.
मिंत्रा वर जॅकेट्स /स्वेटर /
मिंत्रा वर जॅकेट्स /स्वेटर / स्वेट शर्ट मागवले होते . कालच आले. त्यांचा साईज चा जरा घोटाळाच होतो आणि रंगांचा पण . दोन जॅकेट्स परत पाठवले. अमेझॉन वरचा कॅमेरा मस्त आहे. एकदम पर्फेकट
वाह! मस्त बाफ आहे. sammydress
वाह! मस्त बाफ आहे.
sammydress पण छान आहे, इथे विशेषता bags छान आहेत with affordable price.
जबोंग वरून मी नेहमी खरेदी
जबोंग वरून मी नेहमी खरेदी करते.
अजुन कुठल्याच साईट वरून खरेदी करून वाईट अनुभव आला नाही
अजुन एक पेरु
अजुन एक पेरु
आमच्याकडे अजूनपर्यंत
आमच्याकडे अजूनपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्लिपकार्टवरून मागवल्या आहेत. सुरुवातीला पूर्वानुभव चांगला म्हणून (इतक्या किंमतीच्या वस्तू) तिथूनच मागवल्या जायच्या. नंतर इतर पर्यायांचा चांगला अनुभव येत गेल्यावर मग किंमती, मिळणारी सूट इ. तुलना करून मग जिथे चांगले वाटेल तिथून मागवतो. या गाळण्यांमधून आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी आम्हाला फ्लिपकार्टच पुरून उरलेला आहे (चांगल्या अर्थाने). एकदा फोनच्या चार्जरचा वाईट अनुभव आला त्या व्यतिरिक्त सर्व्हीस चांगली आहे. त्याविषयी कुठेतरी लिहिले होते. पण त्या चार्जरच्या प्रकारानंतर आपोआपच फ्लिपकार्टप्रेम थोडे कमी झाले.
एक वस्तू मागवली आणि दुसर्याच ब्रँडची आली, हा अनुभव स्नॅपडीलवर आला. छताच्या पंख्यांच्या बाबतीत आणि भिंतीवर लावण्याच्या दिव्यांच्या बाबतीत.
अॅमेझॉनने अजून चांगलेच मार्क्स टिकवून ठेवलेत. सूटही बरी मिळते हल्ली अॅमेझॉनवर.
वरचे अनुभव वाचता एक लक्षात
वरचे अनुभव वाचता एक लक्षात आलेय..
जर या कंपन्या इतक्या स्वस्तात वस्तू देत असतील, तर बाजारातील इतर विक्रेते किती नफा कमावत असतील ?
जुना रिजेक्टेड माल, परतही न घेणे ज्याना परवडते, ते उत्पादकही किती नफा कमावत असतील ?
या उत्पादकांना, या कंपन्या आपले कमिशन कापूनच पैसे देतात ( ते किती असेल ? ) आणि ग्राहकाचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत पैसे रोखलेले असतात... म्हणजे ????
जर या कंपन्या इतक्या स्वस्तात
जर या कंपन्या इतक्या स्वस्तात वस्तू देत असतील, तर बाजारातील इतर विक्रेते किती नफा कमावत असतील ?
जुना रिजेक्टेड माल, परतही न घेणे ज्याना परवडते, ते उत्पादकही किती नफा कमावत असतील ?>> या सगळ्या कंपन्या बर्यापैकी तोट्यात चालतायत. त्यांच्या बॅलन्सशिटस मधून लक्षात येईल.
सध्या या कंपन्या e commerce मार्केट ताब्यात घेण्यासाठी धडपडतायत. भरपूर पैसे ओततायत. अमेझॉनने एक महिन्या पुर्वीच आणखी कितीतरी मोठ्ठी रक्कम भारतात गुंतवणार सांगितलेय. फ्लिपकार्ट सध्या या कट थ्रोट प्रॅक्टिसमध्ये कसे तगायचे यावर कसरत करतायत.
सध्याची बातमी Myntra ने Jabong विकत घेतले.
सध्याची बातमी Myntra ने
सध्याची बातमी Myntra ने Jabong विकत घेतले. >> फ्लिपकार्ट ने विकत घेतले
सध्याची बातमी Myntra ने
सध्याची बातमी Myntra ने Jabong विकत घेतले. >> फ्लिपकार्ट ने विकत घेतले>> Myntra ने घेतले आणि Myntra ला फ्लिपकार्ट ने विकत घेतले आहे.
Pages