ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

for Ladies KURTA, ANARKALI KURTIS AND WESTERN OUTFITS JABONG IS THE BEST. GOOD SIZE AND QUALITY

हर्पेन , प्लेस ऑफ ओरोजिनशी ओळख करून दिल्याबद्दल हृदयाच्या तळापासून आभार.
यंदा संक्रांतीला. नो तिळगूळ. इंदूरहून गजक आणि रसपापडी मागवणार.
आता त्या साइटने फेसबुकवर माझा पाठलाग करायला सुरुवात केलीय. त्यामुळे तूर्तास फ्लेवर ऑफ माय सिटी पाहत नाहीए.

राजसी , छान लिंक दिलीये. धन्यवाद. पण ही सेवा अजून सुरू व्हायची आहे असं म्हणतात ते.

प्लेस ऑफ ओरिजिन वरचे जिन्नस महाग मिळताहेत. चंदीगढचे काही पदार्थ आणि त्यांचे दर पाहीले. खूप जास्त होते. आणखी एक दोन होते.लक्षात नाहीये. त्यामुळे काहीच ऑर्डर केलं नाही. नवरा फिरतच असतो. घेऊन येतो.

https://peachmode.com/tunics-kurtis/

इथून कुणी खरेदी केली आहे का ?
( यापूर्वी लिंक दिली गेली असल्यास क्षमस्व )

मध्यंतरी डिस्काउंट सेल होते तेव्हां अशक्य कमी किंमती होत्या. पण तेव्हां गुजरातच्या एका साईटवरून बरेच ड्रेस मटेरियल्स मागवलेले असल्याने त्या वेळी नाही काही करता आलं.

धन्यवाद माधव मेघ भरत

मी प्लेस ऑफ ओरिजिन वरून मागवलेले अजून काही पदार्थ ही व्यवस्थित पोचले. पदार्थांचा आणि पॅकिंगचा दर्जा उच्च होता.

धन्यवाद मी मानिनी. Happy

कोणी बेड, सोफा असे शॉपिंग ऑनलाईन केले आहे का?

लोकल पर्याय आहेत त्यानी दोघानी कामे अती बिघडवली आहेत. एकाने सोफा कम बेड बनवताना इन बिल्ट लाकडी टण्णक उशी बनवायचा शहाणपणा केला त्याने मानदुखी जडली. सरळ जमिनीवर गाद्या टाकल्या पण आता थंडीत शक्य नाहीये. तिसर्‍याला ट्राय करण्यापेक्षा वेल टेस्टेड ऑनलाईन पर्याय आहे का?

Style spa बघा त्यांचे सोफा बेड दोन्ही छान आहेत. आफ्टर sale सर्विस पण चांगली आहे. तेव्हा तरी style spa online नव्हते. Life style home centre मध्ये ५० टक्के ऑफ सेल चाललाय.

मी side table, हँगिंग shelf online घेतलंय, चांगले आलेत.

गेल्या महिनाभरात अ‍ॅमेझॉन वरुन मोबाईल, पुस्तकं, कपडे, शूज असं बरंच काही नेटबँकिंगने आगाऊ पैसे देऊन घेतलं. जास्तीत जास्त ५-७ दिवसांत वस्तू आल्या. बर्‍याचश्या वस्तू रिटर्न देखील कराव्या लागल्या, काहीना काही कारणाने. त्या वस्तू सुद्धा घरी येऊन कुरियरवाले घेऊन गेले, आणि त्याचा रिफंड बँक अकाउंट्ला २-३ दिवसांत क्रेडिट ही झाला !
एकंदर अनुभव फार उत्तम.

चिऊ, आम्ही www.pepperfry.com वरून बेड सोफा वगैरे खरेदी केली आहे. मी पुण्यात, भावाने बंगळुरात. दोन्ही ठिकाणी अनुभव उत्तम!

श्रध्दा, धन्यवाद. छान डिझाईन्स आहेत पण मला कलकत्त्याजवळ मागवायचा आहे आणि तिथे त्यांची अ‍ॅसेंब्ली नाही. ती जमवता येतं का आधी बघितले पाहिजे.

.

मला Pepperfry ची स्टुडिओची कॉन्सेप्ट आवडली. ऑनलाइन वस्तु ऑर्डर करताना, तिचा प्रत्यक्ष फील, आकार, साइझ कळत नाही, म्हणुन त्यांनी सॅम्प्ल्स दाखवण्यासाठी फर्निचरचा स्टुडिओ उभारला आहे. कस्टमाइज्ड फर्निचर आणि गरजेप्रमाणे त्यांचे आर्किटेक्ट्स डिझाइन्स सुद्धा करुन देतात. चांगलं फर्निचर आहे.

club factory वरचे काही हटके ज्वेलरी आयटेम्स आवडले, म्हणुन मोबाइल अ‍ॅप डाउनलोड केलं. आयटेम्स फारच स्वस्त होते म्हणुन भरपुर ऑर्डरही केले, पण चिंधी किंमत होती त्याच लायकीचे आयटेम्स निघाले. कपडे तर फारच फालतु आहेत. ज्वेलरी निम्मी छान आहे आणि बरीच टुकार क्वालिटीची आहे. एकुणात काय, FB वर पाहिलत आणि स्वस्त दिसलं म्हणुन वाटेला जावु नका. club factory पासुन दुर रहा.

मध्यन्तरी अमेझॉन आणि मिन्ट्रा या दोन ऑनलाइन साईटवरून खरेदी केली. अमेझॉनवरून खरेदी करताना prime सुविधा आहे ना हे लक्षात घेतलं. अमेझॉनची डिलिव्हरी सिस्टम जलद आहे. त्या तुलनेने मिन्ट्राची डिलिव्हरी सिस्टम स्लो आहे . मात्र मिंत्राची रिफन्ड सुविधा चांगली वाटली. वस्तू परत केल्यावर लगेच संध्याकाळपर्यत पैसे रिफन्ड देखील झाले Happy

फ्लिपकार्टवरुन खुप खरेदी केली आहे मागच्या दोन तीन वर्षात,एकून तीस हजाराची खरेदी झाली आहे आजपर्यंत.त्यात मोबाईल्स ,जीन्स व इतर वस्तू आहेत.मला असे विचारायचे आहे की ठराविक खरेदीनंतर बोनस पाँईंट्स मिळतात ना? काय असते ते?

ते बोनस पॉइंट्स असतात. त्यामुळे तुम्हाला अधिक खरेदी करायची उर्मी येते, अन फ्लिपकार्टवाले तुमच्याकडून अधिक पैसे उपटतात. Wink

मला मिंत्रावर बोनस पॉईंट मिळाले होते. पुढच्या खरेदीच्या वेळी टोटल बिलातून तेवढ्या पॉइंटची रक्कम कमी झाली होती. It's a kind of discount .फ्लिपकार्टच काय माहित नाही:)

Pages