ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण घरोघरीच्या उपद्व्यापी बेब्या ते किती दिवस टिकू देतील? << बेब्या पोरी असतील उध्वस्त करता तर त्यालाच टिकलीपावडर करीत बसतात. Proud

मंजू मला फक्त गॉगल ला पैसे द्यावे लागले. मला शंका आहे की पोस्टमन ने सुड म्हणून पण घेतले असतील. Proud १०व्या मजल्यावर यावे लागले ऑल द वे ते देण्यासाठी. कारण बॉक्स मोठा होता पत्रपेटी न मावू शकणारा. बाकी जेल लायनर, काजळ पेन्सिल आणि एक गळ्यातलं हे विनासायास येऊन पडलं होतं.

गजानन, इतके क्युट दिसले तर मुलं ते उचकटणार. आणि इतक्या छोट्या आकाराचे असल्याने टेप फार काळ तग धरणार नाही. असे असंख्य प्रकार वापरले आहेत जपान मधे. घरातली मुलं शाणीबाळं असली तरी त्यांचे मित्रमैत्रिणी असतीलच असे नाही Wink
सूड . Lol अगं पण तुला काही रिसिट दिली नाही? कस्टममधे लागले असतील तर त्यांच्याकडुन काहीतरी रिसिट / कागद यायला हवा.

मंजूडी, हेच सेम भिंतीच्या कडांना वापरता येईल पण त्याने भिंत चांगली दिसणार नाही. कडा आपटून खराब होत आहेत का?

खोल्यांच्या दरवाज्यात हात चिमटू नये म्हणुन <<< हो, ते बघितले पण ते सारखे काढ-घाल करायला लागेल ना? फोटोत बघून लगेच सैल होईल असे वाटतेय.

गजानन, शक्यतो लावुनच ठेवायचे ते. आमच्याकडे आहेत ते गेले सात वर्ष वापरतोय. अजुन लूज नाही झालेत. म्हणजे काढ घाल केलीत तरी लगेच लूज नाही होणार. दरवाजे आपटले तरी दणादण आवाज येत नाही हा अजुन एक फायदा.

मंजूडी, त्याला बहुधा काहीच उपाय नाही. आमच्याकडे पण आहे एक अशी जागा जिथे लगेच टवके उडतात.

अग्निपंख,

ग्राहक संरक्षण वाल्यांकडे तक्रार नाही का करता येणार? माल पोहोचला नाही म्हणून. किंवा क्रेडीट कार्ड कंपनीला सांगून डिस्प्युट उघडता यावं.

आ.न.,
-गा.पै.

जर ट्रॅन्झॅक्शन नीट/ अन्सक्सेस झाले नसेल तर ४८ वर्कींग तासात पैसे परत यायला हवेत.

जर ट्रॅन्झॅक्शन नीट/ अन्सक्सेस झाले नसेल तर ४८ वर्कींग तासात पैसे परत यायला हवेत.>>
नाही तोच तर प्रॉब्लेम झालाय, ट्रॅन्झॅक्शन झालेले आहे त्यामुळे इंटरनेटचा एक पॅक अक्टिव्ह झाला आणि परत १० मिनिटांनी दुसरा पॅक अक्टिव्हेट झाला पण पहिला ओव्हर्राइट झालाय. कस्टमर केअर वाले म्हणताहेत आता काहिच करु शकत नाही, तुमचा डाटा प्लान अनलिमिटेड असल्यामुळे तो डाटा पण ट्रान्स्फर होत नाही.

येय!!!!
अलिएक्स्प्रेसवरची माझी पहिली ऑर्डर आत्ता हातात पडली. काही पोस्टेज द्यावं लागलं नाही.
आता अजून ३ पॅकेट्स (वस्तू ४) यायची बाकी आहेत. ती सुखरूप पोचली की खरेदीचा धडाका लावणार Wink

इब्लिस, जाम उत्सुकता असेल ना? Happy दाराशी कुरियर आलं की "जरासी आहट होती है तो दिल सोचता है, कही ये वो तो नही...कही ये वो तो नही.." असं होत असेल ना? Proud

ऑर्डर लगेच आली, तर अलि-एक्सप्रेस; नाही आली तर गेली-एक्सप्रेस Proud

इ, माझी २६ मार्चच्या ४ ऑर्डरींपैकी १ आज मिळाली. बाकी ३ प्रतिक्षा मोडात.

तुमच्याकडे अ‍ॅप आहे ना? ट्रॅकिंग काय म्हणतंय?

I bought long door curtains and two side tables from fab furnish. It came nicely. The order was delayed but call centre kept me updated. The curtains are very beautiful. Huge saving of time, energy n money. Veggies and groceries too getting bought online and home delivered efficiently .

हो, पैसे डेबिट झाले होते. दक्षीनेच करुन दिलंचहोतं पेमेंट. परत मिळाले नाहीयत. पण त्यांच्या कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करुन पैसे परत मिळवण्याइतका वेळ नाहीय सध्या मला.

Pages