ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

योडी,
तु एकदा अली एक्स्प्रेस वर लॉगिन करुन ' माय अली एक्स्प्रेस' मधे बघतेस का?

मला आठवतय त्याप्रमाणे तु दोन तीनदा पेमेंट साठी ट्राय केलस आणि झालं नव्हतं. मग नंतर झालं.
तर जेव्हा दोन वेळा झालं नव्हतं तेव्हाच्या ही ऑर्डर व ऑ. नंबर बनलेल्या असतात. पण पेमेंट झालं नसतं. मग आठ दहा दिवसांनी त्या नो पेमेंट म्हणुन कॅन्सल होतात.
तुझ्या ज्या ऑर्डरचे पेमेंट झालं त्याचं तुला इमेल आलं असेल. त्याचा ऑर्डर नंबर आणि कॅन्सल झालेल्याचा ऑ. नंबर वेगळा असणार. त्यामुळे ज्याचे पेमेंट केले आहेत त्या शिप झाल्या असतील, आणि मिळतील. तु वेबसाईट वर जाऊन बघ प्लिज.

माझ्याही पहिल्या तीन ऑर्डरचे पेमेंट लास्ट स्टेजला झाले नाही पण ऑ.नं बनला.
मग चौथ्या वेळेस पेमेंट झाले.
आता पहिल्या तीन ऑर्डर चे नो पेमेंट मुळे कॅन्सलेशनचे इमेल मला आलेय आणि चौथ्या सक्सेसफुल पेमेंट च्या ऑर्डरची अर्धी डीलिवरी पण आलीये.

माझ्या २९ मार्च च्या ६ ऑर्डर बाकी आहेत.
परवाच ११ तारखेला अजून एक खरेदी केलीय.
वाट बघणं फार वैतागवाण आहे बुवा.

२९ च्या बाकी आहेत म्हणजे माझी येईल कदाचित.

दुसरं, तिथून १/२ टीबी वाला पेनड्राईव्ह कुणी घेतला असेल अन तो चालत असेल, तर प्लीज प्लीज मला सांगा. मलाही घ्यायचाय.

अली एक्स्प्रेस वर...."पेमंट व्हेरिफिकेशन" हा काय प्रकार आहे????
Any one who suceesfully pucrhased can guide me...Please..........

मी credit card ने purchase केली आहे..... मला OTP शिवाय पेंमेट रेसिव्ड हा मेसेज आला..... Sad
बेंकेकडून येणारा transaction मेसेज मोबाईलवर आला नही.....

५०० जीबी चा पेनड्राईव! पाहायला पाहिजे! प्लीज कुणी घेतला असेल अन नीट चालत असेल तर कळवा इथे.

मला ८ वर्शांच्या मुलासाठी एक स्टोरेज युनिट घ्यायचे आहे. निलकमल, फर्स्ट क्राय, इबे, अलिबाबा अशा काही साईट्स बघितल्या.
नीट काही कळत नाही. विशेषतः ते कपाट आतुन कसे दिसते याचा व्ह्यु सगळे देत नाहीत, त्यामुळे गोंधळ होत आहे.
जाणकारांनी मदत करावी.

धन्स.
अश्वे, एक चांगले आहे. ड्रॉवर सारखे आहे ते. मी थोडे कपाटाप्रमाणे पाहत होते. पण ही आयडिआ पण चांगली आहे.

मला पण एक लिटर चा प्रेशर कुकर ऑनलाईन खरेदी करायचा होता (प्रत्यक्ष जायला वेळ नाही म्हणून) पण कुठे मिळाला नाही. स्नॅपडिल वर १ लिटरचे कुकर्स भलत्याच कंपन्यांचे आहेत. Uhoh
आणि हॉकिन्स वगैरेचे दिड चे आहेत. आणि मला नेमका १ लिटरचाच हवा आहे.
मी आत्ता पर्यंत बर्तनवाला का अशी कोणतीतरी साईट पाहिली, स्नॅपडिल पाहिली आणि अमेझॉन पाहिली. अजून आहेत का वेबसाईट भांडीकुंडी खरेदी करायला?

@दक्षीणा,
http://www.magickart.in/

या आणखी दोन आहेत पण त्या ऑफिशियल प्रेस्टीज कंपनीच्या आहेत की नाही माहीती नाही.
http://www.prestigesmartkitchen.com/pressure-cookers
http://www.ttkprestige.com/products/product-range

त्यातल्या दुसर्या साईटवर मी एकदा चौकशी केली होती, त्याचे उत्तर खुपच उशिरा आले. मग तेवढ्या वेळात मी दुसरीकडून कुकर घेतला.

मला कॉफी चहा साठी कप्/मग सेट खरेदी करायचा आहे. छान व्हरायटी कुठेच सापडत नाहीये.
ऑनलाईनच हवा आहे (भारतात पाठवायचा आहे)
इथुन ऑर्डर करेन. कुणाला माहीती असेल तर एखादी साईट सांगा प्लीज.

I want to purchase kitchen tiles in large quantity, anybody can tell me any sight. I am staying at Mumbai. Sorry for english typing. I am facing difficulty to type in marathi. Pl guide me for that also. Thank you.

परवा बिग बास्केट मधून पाच किलो तेलाचा डबा घेतला होता इतर सामानासोबत. तो त्या दिवशी आलाच नाही. पण माणूस दुसृया दिवशी येउन देउन गेला. सो नाईस.

उषाचे अव्हन नव्या प्रकारचे आले आहे. ते ही छान आहे. घेण्यात येइल. विकास खन्ना जाहिरात करतो आहे. ( म्हणून नाही) पण छान नव्या प्रकारचे आहे.

अलि वरुन आलेल्या नेकलेस चेन आणि अंगठीची क्वालिटी एकदम खराब. बोटात घातली तर लगेच दुसर्‍या दिवशी लाल काळी पडली. नेकलेस चेन चं पण तसंच.

अलिच्या गोष्टींचं तसंच होतं स्मित.. माझीही एक चेन काळी पडली. लाईमरोड वरुन २ कुर्तीज ऑर्डर केल्या बाय १ गेट १ फ्री मधे. ८-९ दिवस लागले डिलीव्हरीला, पण काल मिळाले दोन्ही. सॉफ्ट कॉटन आहे मस्त. धुतल्यावर आटतील अशी शंका आहे मला. बघु कसे निघतायत ते. चांगले निघाले तर घ्यायला हरकत नाही.

https://www.limeroad.com/angarakha-style-blue-kurti-499-p81254
https://www.limeroad.com/black-pleated-cotton-kurta-499-p48368
हे दोने घेतले मी.

Pages