आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झालं का सुरु परत? कुठल्याही त्राग्याला, रागाला काहीच नेम नाही. आपण ह्या समोरच्या माणसावर का चिडत आहोत, ह्याचं तरी भान आहे का तुम्हाला? Lol जाऊ द्या. हेमाशेपो करतो तुम्हाला. (तो अ‍ॅक्रोनिम आहे, चिडू नका परत)

हा काय प्रकार असतो कोणी समजावेल का? याला जबाबदार मोदींना ठरवण्यात आले आहे.

Well planned structured money laundering was carried out by Modi before banning 500 and 1000 denomination currencies ...
Last year ( May 26 , 2015) RBI increased the slab for LRS "Liberalized remittence scheme" upto USD 250,0000 which means an individual from India can transfer upto two crore rupee to their overseas account in a financial year ..
Before modi come into the power the LRS limit was just 75,000 USD. He was elected as prime minister on 26 May 2014, RBI Increased the LRS slab to 125,000 in very next month Modi come into the power I.e Jun 03 2014 and also they increased the slab to 250,000 USD second time on May 26 2015.
Please refer below link for this LRS slab from RBI
https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx
Due to this increase in LRS slab, there was a sudden spurt in remittence since June 2015. Approximately 4.6 billion USD (30,000 Crore rupees) has been transferred from India in last 11 months. This sudden spike in remittance almost 300% higher than historical average remittance. There is no clear explanation from RBI for this sudden surge.
Read this below article from economic times stated this sudden surge on May 17 2016
http://economictimes.indiatimes.com/news/economy/finance/indians-sent-a-...
After parceled this enormous amount to overseas , now modi playing anti corruption , anti counterfeit and anti black money drama by banning 500 and 1000 currencies ....

ऋन्मेऽऽष ,

कायद्याने भारतातुन बाहेर किती पैसे घेउन जायचे याला पुर्वी पासुन मर्यादा होती. ह्याच कारणामुळे हवाला मार्केट भरपुर जोरात चालु आहे. जर एखाद्या भारतिय माणसाला काही कारणास्तव बाहेरच्या देशात पैसे पाठवायचे असेल तर २०१४ मध्ये एका वर्षात फक्त $७५,००० बाहेरच्या देशात पाठवायला परवानगी होती. मागच्या दोन वर्षात ही मर्यादा $२५०,००० पर्यन्त वाढवली आहे. आजच मोदीनी सांगितले की त्याचा भारताला जगातिल ओपन economy बनवायची आहे. ओपन economy मध्ये कष्टाने कमवलेले आणि कर भरुन उरलेले पैसे कसेही खर्च करु शकतो आणि कुठल्याही देशात transfer करु शकतात आणि त्यासाठी काही मर्यादा नसते.
जे लोक RBI मार्फत पैसे पाठवतात ते टॅक्स भरुन उरलेले पैसे असतात. त्यात सरकार जे माणसे पैसे बाहेर पाठवतात त्याचा उत्त्पन्नाचा सोत्र तपासते. त्यामुळे जे टॅक्स भरतात तेच ह्या मार्गाने पैसे पाठवतात. बाकीचे हवाला नी पाठवतात.

माझ्या मते कायद्याने जे लोक देशाबाहेर पाठवतात त्यावर काही लिमिट नसावे कारण त्यामुळे हवाला रॅकेट पुर्णपणे बंद होईल. ५ वर्षापुर्वी पण लोक बाहेर पैसे पाठवत होते पण ते हवालाच्या माध्यमातुन. आता जास्त लोक बॅके तर्फे पाठवत आहेत. ओपन economy आणी black money generation बंद झाले की सगळेच लोक बॅकेतर्फे पैसे पाठवतिल आणि हवाला बंद होईल. त्यावेळी मात्र outword remittence आजुन वाढेल.

अरब देशातिल केरळीयन लोक हवाला मार्फत पैसे पाठवत होते. त्यात अरब मधले मल्लु मजुर हवाला करण्यार्याला दिनार देत होते आणि भारतात हवाला करणारे त्याचा नातेवाईकाना रोख देत होते. भारतात ही रोख काळा बाजार करण्यार्या माणसाकडुन मिळत होते. नोटा बंद केल्याने ह्या लोकाचे खुप हाल झाले आहेत. ह्यापुढे हे मजुर हवालाने पैसे पाठवायचे टाळतिल आणि त्यामुळे कायद्याने होणारे remittence पण वाढेल

अगदी थोडक्यात सांगायचे तर तु जे कर भरुन पैसे कमवले आहेत ते कुठे खर्च करायचा याचा तुला अधिकार हवा. जर तु टॅक्स देउन कायद्याने १ महिन्यात ५० लाख कमवले तर ते पैसे बाह्रेरच्या देशात खर्च करायचा अधिकार हवा. उद्या जर तुझ्या मुलाला अमेरिकेत महागड्या युनिवर्सिटी मध्ये घालयचे असेल तर त्या साठी पैसे पाठवायचा अधिकार हवा.

नवीन १०० प्रतिसाद अजुन वाचले नाहीत पण झाडु यांचा एक प्रतिसाद वाचुन रहावत नाही म्हणुन आधी लिहीते.
झाडू व त्यांच्यासारखे इतर लोक आम्हाला 'भारतात न रहाता भारताबद्दल का लिहिता' अशा आशयाचे म्हणत असता ना ते म्हणु नका.
आमचे पण भारतावर तुमच्या इतकेच प्रेम आहे म्हणुन लिहितो. प्रेम नसते तर दुर्लक्ष केले असते.
त्यामुळे असे प्रतिसाद देऊ नका ही विनंती. फक्त भारतात रहातात त्यांनाच भारताबद्दल बोलायचा अधिकार नाही. आम्हालाही आहे. एखादी गोष्ट पटत नसेल तर ते सांगण्याचा पण अधिकार आहे. योग्य मुद्द्याने मत खोडा अवश्य, पण असे म्हणु नका.

झाडूजी

किती एकतर्फी विचार करता हो ? सगळेच मोदीभक्त असा शेरा मारून सर्वांना भक्त का बनवताय ? राईट लिबरल्स असा काही प्रकार असू शकतो हे तुम्हाला मान्य नाही का ? मी तरी विरोधातले व्हॉट्स अ‍ॅप मेसेजेस पण तितक्याच बारकाईने वाचते. त्यात अजिबातच द्वेष नसतो. पण भाषा फक्त चुका काढण्याची वाटली तर मग बॅशिंगसाठी इथे आणून चिकटवण्यात मला काही वावगं वाटत नाही. दिल्लीतल्या "त्या" युनिवर्सिटीतल्या पण एका "महान" अर्थतज्ञाचा लेख वाचला असेल ना ? तितक्याच महान कुणीतरी मराठीत अनुवाद पण केलाय. भाषा किती सभ्य, विद्वत्तापूर्ण. पण तरीही ग्राउंड रिअ‍ॅलिटी आजूबाजूला दिसतेच आहे. माझी शेजारीण स्वत: ब्याग भरून पैसे व्हाईट करायला गेलेली पाहिली. म्हणजे काळा पैसा बाहेर पडतोय हे खरेच आहे.

जो त्रास झाला तो ही खरा आहे. मी ते पण लिहीलंय. सगळेच एकतर्फी नसतात हो, प्लीजch !

...

मोदीबॅशिंग हा शब्द वाचून ट्रंपजीं बद्दल अमेरिकेत सध्या जे चालू आहे त्याची आठवण आली. ट्रंपजींना अवधी दिला पाहीजे हे अमेरिकन्सना समजत नसेल तर काय !! इंडीयात पण सध्या मोर्चे चालू आहेत. पण काळ्या पैशाच्या विरोधातल्या या खेळीने सध्या तरी देश एक झालेला दिसतोय.

असेच अमेरिकेत पण घडेल.

ही अजून एक लिंक आहे एल आर एस बद्दल

http://indianexpress.com/article/business/banking-and-finance/1-billion-...

क्रेक्ट आहे तुमचं साहिल शहा. हवालानी पैसे पाठवण्यापेक्षा योग्य मार्गानी पाठवलेलेच बरे. सगळा आउटफ्लो एक तर मुलांच्या शिक्षण किंवा नोकरी करणार्या मुलांना घर घ्यायला वगैरे मदत म्हणून पैसा पाठवला गेलेला आहे (वरच्या लिंक मध्ये आहे). ह्या मार्गानी कोण कोणाला पैसे पाठवू शकतो ह्याबद्दल पण नियम ऋनमेष नी दिलेल्या आर बि आय च्या लिंक वर दिलेले आहेत. नातं प्रुव करावं लागतं. कोणीही कोणाला पाठवू शकतं पैसे असं नाहीये.
ह्या मार्गानी पैसे बाहेर जाऊन पुढे काही गैरवापर, फ्रॉड होत असेल तर तशाही खबरा येतीलच. तशा खबरा येतील तेव्हा जबाबदार धरा नक्की सरकारला. सहसा आधिकृत मार्गानी पैसे पाठवायचे असले की फ्रॉडचा प्रश्न नसतो. फ्रॉडस्टरांना अधिकृत मार्गानी पैसे पाठवायचे नसतात म्हणून हवाला सारख्या स्कीम तयार होतात.

पुढे काही गैरवापर, फ्रॉड होत असेल तर तशाही खबरा येतीलच. तशा खबरा येतील तेव्हा जबाबदार धरा नक्की सरकारला.

Proud

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या खबरा कोणत्या कोर्टात सिद्ध झालेत म्हणे?

साहील शहा,

उत्तम प्रतिसाद,

फक्त एक लक्षात घ्या की हा प्रश्न विचारणार्याने गुगल करुन वा व्हॉट्सअ‍ॅप वर आलेल पुढे ढकलल आहे, त्याची स्वतः ची अश्या, ह्या विषयावरची आकलन शक्ती किती आहे हे सर्वांनाच माहीती आहे. येन केन प्रकरणाने मोदी बॅशींग करता येईल अस बघत असतोय !!

आता ज्यांच्याज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे ते सर्व एव्हाना ते पैसे सोने/हिरे/माणके वगैरे संपत्तीमधे पैसे कन्व्हर्ट करून मोकळे झाले असतील, कारण जागेत गुंतवणे एवढ्या पटकन जमणारे नाही. त्यामुळे इथून पुढे, नोटा न साठवता ब्लॅकचे सोने साठवले जाईल. त्यामुळे ब्लॅक पैसा शोधताना सोने/हिरे वगैरे संपत्ती तपासली जाईल. सध्या आहे की नाही माहीत नाही, पण किमान मध्यमवर्गीय घरातले दागदागिने कोणी इन्कम टॅक्स साठी दाखवत नाहीत असे वाटते. मालमत्तेसाठीचा सध्याचा कायदा काय आहे?

मोदीजींनी निर्णय घेतला म्हणून त्रास होतो म्हणणारे पण एककल्लीच आहेत आणि राष्ट्रभक्तीच्या आडून झोडण्याची संधी साधणारे वाटताहेत. त्यांचे लिखाण काही तटस्थ बिटस्थ अजिबात वाटत नाहीये. त्रास खरोखर होतोय आणि तो लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. अमेरिकेत चारशे डॉलरवर महिना काढता येऊ शकेल पण जर प्लास्टिक कार्ड्स बंद झाली तर याचा विचार करा की.

हे जेटलीजी पण काय म्हणत होते ते तारखा काढून फिरवलं जातंय. हे पण दुसरं टोक. अर्थात तारीख बदलली की जेटलीजींची मतं १८० च्या कोनात बदलतात हे पण विचित्रच.

http://blogs.timesofindia.indiatimes.com/sanjeev-singh-blog/how-bjp-had-...

(मायबोली च्या मराठी टायपिंगचा त्रास दुरुस्त करा कुणीतरी. मला दुसरीकडे टाईप करून इथे कट पेस्ट करावं लागतंय)

मेधावी ,
<<<< आता ज्यांच्याज्यांच्याकडे ब्लॅक मनी आहे ते सर्व एव्हाना ते पैसे सोने/हिरे/माणके वगैरे संपत्तीमधे पैसे कन्व्हर्ट करून मोकळे झाले असतील >>>>>

आता अस सोने/हिरे/माणके खरेदी साठी ही पॅन कार्ड लागत, जर त्या शिवाय विकल तर विकणार्या सोनाराला आत टाकणार !

साहिल शहा, धन्यवाद.
आपली पोस्ट (नावासह) मी व्हॉटसपवर जिथून वरची मी दिलेली पोस्ट आलेली त्या ग्रूपवर टाकली तर हरकत नसावी असे गृहीत धरतो.

मिलिंद जाधव, नक्कीच माझी या विषयावरची आकलन शक्ती कमी आहे म्हणूनच मी ईथे स्वतः कमी लिहितोय पण आतापर्यंत आलेल्या चारशेपाचशे पोस्ट सावकाशपणे एकूण एक वाचून काढल्या आहेत Happy

ऋन्मेऽऽष

<<<< नक्कीच माझी या विषयावरची आकलन शक्ती कमी आहे म्हणूनच मी ईथे स्वतः कमी लिहितोय पण आतापर्यंत आलेल्या चारशेपाचशे पोस्ट सावकाशपणे एकूण एक वाचून काढल्या आहेत >>>>

पण तु मोदी बॅशींग करतो हा आरोप तुला मान्य आहे तर !!

Biggrin

पैसे देशाबाहेर अधिकृतपणे पाठवताना नाते तपासले जाते हे जरी खरे असले तरी या प्रकरणात विद्यार्थी पाल्यांचा मदत पाठवण्यासाठी उपयोग केला गेला असणे सहज शक्य आहे. म्हणजे मोठे उत्पन्न असलेल्याचा पैसा मध्यम उत्पन्नवाल्याने आपल्या विद्यार्थी मुलासाठी पाठवणे आणि पैसा बाहेर पोचल्यावर त्याची योग्य ती विल्हेवाट लावणे.

ती कलर झेरॉक्स काढून केलेली बनावट नोट आहे, जी कुणालाही बनवता आणि ओळखता पण येईल. पद्धतशीरपणे सहज ओळखू न येणार्‍या नोटा छापून बाजारात आणणार्‍या रॅकेटचा भाग निश्चितपणे नाही.

चिनूक्स | 12 November, 2016 - 09:31
http://m.thehindu.com/news/national/demonetisation-of-rupee-notes-no-tim...

This is interesting. Should we expect more fakes in a month or two?
>>>>>>>>>>>>
चिनुक्स
नोटे बद्दल माहिती देणारा तो सरकारी ऑफिसर देशद्रोही आहे,
आणी ती माहिती मायबोली वरती लार्जर फोरम वर हि माहिती पोहचवून तुम्ही पण त्याच मार्गाने जात आहात.

सिम्बा, अशी माहिती पसरवण्यास आपण हातभार लावू नये, असे आपले मत आहे हे समजले. पण हिंदु.कॉम पेक्षा मायबोली हा लार्जर फोरम?

दोन तीन दिवस पुरण्याएवढे पैसे होते सुरवातीचे तीन दिवस चालले पण आज ५००-१००० चे ४००० बदलुन आणले तर २००० च्या दोन नोटा. Sad आता ह्याचे सुटे कोण देणार? एटीएम पण बंद आहेत. दुसरी काही सोय आहे का?

सिम्बा, काही दिवस सार्कॅस्टिक बोलू नका>>

भारी आहे!
Happy

पण हीराही सार्केस्टिकलीच बोलत असतील तर!
(नाहीतरी सगळेच ड्यू आइज गुरुदेवांचे!)

Pages