Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36
आज मध्यरात्रीपासूनच!
लागला घोडा काळ्या पैश्याला 
- श्री नरेंद्र मोदी !!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुनिधी, संपूर्ण पोस्ट सुंदर.
सुनिधी, संपूर्ण पोस्ट सुंदर.
आज आलेले व्हाट्स अप
आज आलेले व्हाट्स अप फाॅरवर्ड:
कचरयात फेकून दिलेल्या नोटा,जाळलेल्या नोटा पाहून वाईट वाटतं त्यापेक्षा सरकारने एखादा असा एक अकाऊंट जाहिर करावा जेथे पैसे जमा करणाराची कुठलीही विचारपूस होणार नाही अणि तेथे जमा होणारा पैसा सैनिकांसाठी आणि शेतकरांनसाठी वापरला जाईल ...
असं काही करता आले तर बरे होईल. उगाच पैसे वाया जाणार नाहीत.
त्याला एक्स्टॉर्शन म्हणतात.
त्याला एक्स्टॉर्शन म्हणतात.
हो, सैनिकांना दिलं तरी. लोकशाहीचे काही प्रिन्सिपल असतात, असला बावळ्टपणा चालत नाही.
बोकील आता लैच लाडाला आलेत.
बोकील आता लैच लाडाला आलेत. त्यानी आज चक्क मोदीतात्यांवरच टीका केली. त्यांचं म्हणणं असं की मोदींनी सगळं माझं ऐकलेले नाही त्यामुळे ते अडचणीत आलेत. तसेच ते आता आंतरराष्ट्रीय सल्ले देणार आहेत म्हणे
दाऊद अपराधी नाही परिस्थितीने तो तसा बनला असेही मुक्ताफळ त्यांनी उधळले आहे.
बरं मुलांनो, आनंदाची बातमी. न
बरं मुलांनो, आनंदाची बातमी.
न झोपता काम करण्याच्या सवयीनुसार पंतप्रधानांनी काल रात्रीपर्यंत जागून लोकांच्या कल्याणा एक नवा निर्णय घेतला आहे.
आता बर्याच ठिकाणी म्हंजे कर्/पेट्रोल्/सरकारी इस्पितळे/सरकारी बिले इथे जुन्या नोटा २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहेत.
महाराष्ट्रात फडणवीसांनी त्या खाजगी हास्पिटलांत ही चालवून घ्याव्यात अन्यथा डॉक्टर्/हॉस्पिटल मॅनेजमेंटवर कारवाई होईल असा इशारा दिला आहे.
कर्नाट्कात असे काही नाही.
तर असे करत करत ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढेल बहुतेक.
सातीजी म्हणजे माझ्या नोटा
सातीजी
म्हणजे माझ्या नोटा पेट्रोल पंपावर कशा काय चालल्या या तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेय का ?
सपना , काय बोलताय
सपना ,
काय बोलताय तुम्ही?
तुमच्या नोटा पेट्रोलपंपावर चालणारच होत्या.
त्या चालल्या यात तुम्हाला आश्चर्य का वाटलं असं विचारलं होतं मी?
कारण भारतात रहाणार्या बहुसंख्याना त्या नियमानुसार ११ मध्यरात्रीपर्यंत चालणार आहेत हे माहितच होतं .
पुन्हा एकदा जाऊन माझा प्रतिसाद वाचा.
खरोखर सरकार गोंधळलेले दिसतेय.
खरोखर सरकार गोंधळलेले दिसतेय. आधी मोठ्या वीरश्रीने 'बाल की खाल' वगैरे भाषणे झाली. ८ नोवेंबरच्या रात्रीपासून ५०० आणि ह्जाराच्या नोटा लीगल टेंडर राहिलेल्या नाहीत असे घोषित केले. पुन्हा या नोटा फळे,भाजी, दूध, किराणा, अंडी, मासे, वह्या-पुस्तके, कपडे, चपला,चपाती(पोळी)भाजी, वडापाव यासाठी चालणार नाहीत असे बजावून सांगितले. त्याच बरोबर बेस्ट बसेस, रेल्वे, सरकारी करभरणा, खाजगी औषधदुकाने, हॉस्पिटल्स, पेट्रोल्पंप येथे चालतील अशीही मेहेरबानी केली.आणि आता ही 'चालण्याची' मुदत २४ नोवेंबरपर्यंत वाढवली आहे. म्हणजे मूळ घोषणेपासून पुढे दोन आठवडे. मग हे आधीच का नाही जाहीर केले? आणि किरकोळ जीवनावश्यक वस्तूंना का वगळले? नोटा एका सेक्टरमध्ये चालत नाहीत आणि दुसर्या सेक्टरमध्ये चालतात हे काय गौडबंगाल आहे? मग मुळातच या नोटा एक महिन्याने बाद होतील असे जाहीर करायचे ना.
<<<<< मग मुळातच या नोटा एक
<<<<< मग मुळातच या नोटा एक महिन्याने बाद होतील असे जाहीर करायचे ना. >>>>>>
५०० व १००० च्या नोटा मुळातच रद्द केल्या तेही मोठी चुक केलेली आहे !!
आताच रद्द का केल्या ? एकेक करुन रद्द क रता आल्या असत्या !! ह्या करण्याने काहीच साध्य होणार नाही !!
मुळातच काळा पैसा भारतात कोणाकडेच नाही !! ईतकच काय तर स्विस बँक, मॉरिशीयस, हाँगकाँग मध्ये कुठेही काळा पैसा नसावाच !!
मुळातच फकत ललित मोदी व विजय माल्याला भारता बाहेर जायला ह्या सरकार ने मदत केलेली आहे,
त्या पुर्वी भारतात कोणताही चुकीचा आर्थिक व्यवहार होत नव्हता !!
मिलिंद जाधव...... राहू
मिलिंद जाधव......
राहू दे....
सारकास्टिक लिहिणे हि एक कला आहे... तुमसे ना हो पायेगा बेटा....
हीरा, बडेबडे डिसीजन्समें ऐसे
हीरा,
बडेबडे डिसीजन्समें ऐसे छोटे छोटे गोंधळ होते ही रहते है!
फाळणीच्या वेळेला जसा काही गावांना प्रश्न पडत होता की आपण भारतात की पाकिस्तानात तसा हल्ली पाचशे हजाराच्या नोटांना पडतो. 'मी चालते की नाही चालत? चालते तर कुठे चालते? नाही चालत तर कुठे नाही चालत!'
तसा हल्ली पाचशे हजाराच्या
तसा हल्ली पाचशे हजाराच्या नोटांना पडतो. 'मी चालते की नाही चालत? चालते तर कुठे चालते? नाही चालत तर कुठे नाही चालत!'>> साती
आधी प्लॅनिंग करुन फाळणी केली
आधी प्लॅनिंग करुन फाळणी केली नाही , याचे खापर गांधीजींवर फोडणारे मोदीभक्त हाच प्रश्न इतरानी मोदीना विचारलं तर वस्सकन अंगावर येतात
फेसबुक आणि व्हॉट्सअप वर
फेसबुक आणि व्हॉट्सअप वर देशभक्तीचे उमाळे काढणाऱ्या पोस्ट वाचून झाल्या की मी इथे येतो. लाडू, करंजी खाऊन झाली की मध्येच चकली, चिवड्याचा बकणा भरला कि कसे संतुलन राहते.
पवार साहेबांनी कौतुक केलय
पवार साहेबांनी कौतुक केलय म्हनजे decision correct आहे.
जी व्यक्ती पैसे भरताना ,पैशांचा source नाही सन्गु श्कत ती पैसे भरणार क? मग तीला पकदणार कसे?
३० December नंतर कुथला निर्नय येतोय याची वाट बघत आहे.
फेसबुक आणि व्हॉट्सअप वर
फेसबुक आणि व्हॉट्सअप वर देशभक्तीचे उमाळे काढणाऱ्या पोस्ट वाचून झाल्या की मी इथे येतो. लाडू, करंजी खाऊन झाली की मध्येच चकली, चिवड्याचा बकणा भरला कि कसे संतुलन राहते.>>>>>>
खरंय
मुळात या नोटा एक महिन्या नंतर
मुळात या नोटा एक महिन्या नंतर बाद होणार असे सांगितले असते आणि नविन नोटा आधी आणल्या असत्या तर काळे पैसे त्या नोटात साठवले गेले असते.
डीमोनिटायझेशन एकाच वेळी करावे लागते नाहीतर त्याचा काहीच फ़ायदा नाही.
हे जुने चलन बदलुन नविन चलनी नोटा आणण्या साठी केलेले नाही.
500 च्या नोटा आमच्या इथे
500 च्या नोटा आमच्या इथे दुकानदार, भाजीवाले पण घेताहेत. फक्त अट एवढीच कि फळे भाजी किराणा 300-400 रुपया पर्यंत घ्या. अगदीच 20 रुपयांचा माल घेऊन सुट्टे मागू नका.
जोवर बँकेत 500 रुपये स्वीकारले जाणार तोवर दुकानदार, भाजीवाले त्या घेणार. ते जाऊन बँकेत deposit करू शकतात, कोणी अडवत नाही तसे करायला. त्यांना धंदा बुडवायचा नाहीय. त्यांनी नोटा घेतल्या नाहीत तर लोक फ्रेश, डिमार्ट मध्ये जाऊन कार्डावर खरेदी करणार हे त्यांना माहित आहे.
आशुचँप, तुम्हाला चकली चिवडा
आशुचँप,
तुम्हाला चकली चिवडा मिळावा म्हणून आठ तारखेपासून आम्ही सतत भटारखान्यात!
डु यू एवर थिंक अबाऊट इट? नो, यू थिंक अबाऊट युवरसेल्फ ओन्ली!
:d
(यू थिंक अबाऊट युवरसेल्फ ओन्ली सिरीजमधील लेटेस्ट मेमे!)
आज माझी वनिता गावावरून
आज माझी वनिता गावावरून आली.विचारले तिला काय ग बाई गावाकडे काय खबर? तर म्हणाली,फार नाही हो टेन्शन्,एकतर आपल्यासारखे तिकडे घरात रोकड ठेवत्/असत नाही.दुसरे म्हणजे धान्य वगैरे ज्याच्या त्याच्या शेतातले असते.तिने हॉस्पिटलमधे जाऊन आईवडलांची औषधे, जुन्या नोटांवर घेतली आणि ३०००चे आणखी सुटे करुन घेतले.
साती - अहो तुम्ही सगळे तर
साती - अहो तुम्ही सगळे तर सत्ताबदल झाल्यापासूनच भटरखान्यात आहात. त्यामुळे मिरची भजी, खेकडा भजी खात होतोच, आता दिवाळी निमित्त जरा चेंज ☺
डबल पोस्ट ☺ रच्याकने ते मेमे
डबल पोस्ट ☺
रच्याकने ते मेमे प्रकरण कळले नाही
मिरची भजी/खेकडा भजी! छान
मिरची भजी/खेकडा भजी!

छान लिहिलंत.
फेबुवर एक 'डु यू थिंक अबाऊट इट, नो यू थिंक अबाऊट युवरसेल्फ ओन्ली' अशी कशाही खाली कॅप्शन टाकलेली मजेशीर सिरीज आहे. सार्कॅजम वाल्यांची.
तसे बेसिकली डॉ. लोक मला खूप
तसे बेसिकली डॉ. लोक मला खूप आवडतात.:स्मित: हे उपहासाने लिहीलेले नाहीये, कारण माझ्या घरात डॉ. लोकांना देव मानण्याची पद्धत आहे. आयुष्यात एकच नालायक डॉ. सोडला तर बाकीचे अक्षरशः देव च भेटलेत. एका डॉ ने मला गुरु ( माझे हे गुरु कोल्हापूरला होते, ते गेले बिचारे) देऊन माझ्यावर नकळत अनंत उपकार केले. नुकतीच मागच्या व या महिन्यात आम्ही दोघे ( नवरा-बायको ) डॉला भेट देऊन आलो.:फिदी:
लोक डॉ ना पाहुन टेन्स होतात, पण मी मात्र जाम खुश असते. तर सांगायचे तात्पर्य हे की सुनिधी ला वाटतेय की झाडु हेच इब्लिस आहेत तसेच मला पण वाटतेय. सुनिधीशी मी टोटली सहमत आहे. मागे मी डॉ इब्लिस यांना हेच म्हणले होते की कडु गोळी डायरेक्ट न देता ती शुगर कोटेड कॅप्सुल मध्ये द्या, तर त्यांना ते पटले नाही.
बाकी डॉ. साती व त्यांचे डॉ. मिस्टर यांना दंडवत!
अता पळवाटा स्वतः सर्कारच
अता पळवाटा स्वतः सर्कारच देतय..
काही ठिकाणी मुदत वाढवली
सॉनार सोने तसेच ठेवले.
आणि आता हे ...
Cash deposits upto ₹2.5 Lacs made by housewives, won't invite IT attention...
एके ठिकाणी वाचण्यात आले कि
एके ठिकाणी वाचण्यात आले कि 'आज घाटकोपर परीसरात, रस्त्याच्या कडेला बॅग्स वगैरे विकणार्या लोकांनी, आम्ही चेक स्वीकारू असे फलक लावलेले बघितले. या परिस्थितीत चेंबूरच्या काही रेस्टॉरंट्स नी कार्ड नी पैसे स्वीकारण्यास सुरवात केली आहे.'
माझ्या मते चलनाच्या तुटवड्यामुळे आज लोकांकडे त्यांना द्यायला रोख पैसा नाही, म्हणून ते सद्या अनिच्छेने किंवा आपसातील स्पर्धेमुळे चेक आणि कार्ड घ्यायला तयार झालेत. चलन पुरवठा व्यवस्थित झाला कि ते पुन्हा रोखीच्या व्यवहारावर येणार आहेत. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.
आपण त्यांच्याशी ₹५०० च्या वरचा व्यवहार करताना रोख रक्कम देण्याऐवजी कायमच त्यांना चेक, मनी ट्रान्सफर, कार्ड ह्याद्वारे पैसे प्रदान करण्याचा आग्रह धरला, तर मला वाटते काळा पैसा निर्माण होण्याला थोडातरी अटकाव होऊ शकतो. ह्याकरिता सरकार तसेच समाजानेही त्यांच्यावर दबावगट निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
कालचं उदाहरण सांगतो. ₹५०० आणि ₹१००० च्या नोटा रद्द होण्यापूर्वी मी सुताराला मांडणी बनवण्यास सांगितली होती. त्याकरिता काही रक्कम त्यास अग्रिमही दिली होती. काल त्याने मांडणी बनवून आणली आणि माझ्याकडे शिल्लक ₹८०० ची मागणी केली. आता देण्याकरिता माझ्याकडे एव्हढी रोख रक्कम नव्हती. आणि नजीकच्या काळात बँक किंवा एटीममधून मिळण्याची शक्यताही धूसर होती. म्हणून मी त्यास सांगितले कि मला तुझा बँक खाते क्रमांक सांग, मी मोबाईलवरून IMPS (Immediate Payment Service) द्वारे रक्कम एका मिनिटात तुला हस्तांतरीत करतो. प्रथम तर ह्या गोष्टीस नकार देऊन तो रोख रक्कमेवर अडून बसला. मी ती देण्यास ठाम असमर्थता प्रकट केल्यावर त्याने बँक खाते क्रमांक दिला तोही चुकीचाच. चार आकडी! जो पूर्वीच्या काळी वापरात होता. ह्याचा अर्थ गेले २०/२५ वर्षे तो त्याच दुकानात व्यवसाय करत असूनही तो आपल्या व्यवसायाचे कोणतेही व्यवहार बँकेमार्फत करीत नव्हता. सगळा व्यवहार रोखीनेच करण्यावर भर होता.
अशा छोट्या व्यवसायिकांबरोबर केलेल्या व्यवहारात आपण रोख रक्कम देण्याऐवजी नेहमीच त्यांच्याशी बँकेमार्फत व्यवहार करण्याचा आग्रह धरला तर काळा पैसा निर्माण होण्याला आपण निश्चितच थोडा तरी अटकाव करू शकतो.
जानेवारीपासून भिकारीसुद्धा
जानेवारीपासून भिकारीसुद्धा पेटीएमचा नंबर लिहिलेला फलक घेऊन दिसतील!
याले म्हंतेत अर्थक्रांती रे भौ!
हाहाहा
हाहाहा
*'On the day money turns into
*'On the day money turns into worthless peices of paper in the East; the great orange man shall topple the white lady in the West and peace shall reign for a thousand years'*
_Nostradamus_ फ्रॉम व्हॉटसपे
डायरेक्त 1000 ???? अधे मध्ये
डायरेक्त 1000 ????
अधे मध्ये काही नाही का?
Pages